✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/02/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक सामाजिक न्याय दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९१३- ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराची स्थापना. १९८७-मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. 💥 जन्म :- १९५१- इंग्लंडचे प्रधानमंत्री गार्डन ब्राऊन 💥 मृत्यू :- १९५०- नेताजी बोस यांचे वडील बंधू बॅ शरदचंद्र बोस १९८५ - क्लॅरेन्स नॅश, अमेरिकन अभिनेता, डोनाल्ड डकचा आवाज. २००१- माजी केंद्रीय गृहमंत्री इंद्रजित गुप्ता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दहशतवादाच्या मार्गावर असणाऱ्या सर्व मुलांना परत बोलवा, काश्मीरमधील पालकांना लष्कराचं आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान नवी दिल्लीत; स्वागतासाठी पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *तिहेरी तलाकच्या अध्यादेशाला पुन्हा मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुलवामासारखा हल्ला भविष्यात होऊ नये याची काळजी घेऊ- संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *द हेग - आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव खटला स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता (डीए) तीन टक्क्यांनी वाढविण्याचा मंत्रिमंडळाने घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ * आयपीएलच्या 12 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर, गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणिरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने होईल सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति क्रोध करू नये* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/14.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनंत लक्ष्मण कान्हेरे* अनंत लक्ष्मण कान्हेरे (जन्म : आयनी मेटे, रत्नागिरी जिल्हा, इ.स. १८९१; मृत्यू : ठाणे, १९ एप्रिल १९१०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकरयांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले. सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा समवयस्क साथीदारांची जोड मिळाली. जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये 'शारदा' या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. ठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे. नाशिकमध्ये 'अनंत कान्हेरे' नावाचे क्रिकेटचे मैदान आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) 'फुगडी' हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ?* गोवा *2) भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?* ज्ञानपीठ पुरस्कार *3) हिमा दास ही कोण आहे ?* धावपटू *4) मेरी कोम कोणत्या टोपणनावाने ओळखली जाते ?* मॅग्नीफिसेन्ट मेरी *5) जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ?* भारत *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा जि. गोंदिया 📱 9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • उत्तम कानिंदे • शिरीष गिरी • नागेश पांडे शेवाळकर • दिलीप लिंगमपल्ले • व्यंकटेश रोंटे • शिवाजी पाटील • साहेबराव कदम • संतोष कामगोंडे • विठ्ठल डोनगिरे • बालाजी उगले • नागेश काळे • विशाल खांडरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राजे* राजे तुम्ही स्वराज्य निर्माते आहात तुम्ही सकलांचे भाग्यविधाते आहात तुमचा अभिमान मनामनात आहे प्रत्येक भारतीय तुमच्या ऋणात आहे शरद ठाकर सेलू जि परभणी •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चित्ताचं चैतन्य चेतलं की ज्ञानसूर्याचा साक्षात्कार होतो. तो काही विवेकी संतासह विचारवंतानाही होतो. विवेकी संत माणसा-माणसात माणुसकीचे अर्थात दया-प्रेम-करूणेचे पूल बांधत असतात. परोपकारातून परमेश्वराशी त्यांचं नातं जुळवत असतात. दुसरा एक संत प्रकार आहे लहरीबाबांचा, सतत मौनाचं नाटक करून हजारोंना नादी लावण्यात कुशल असलेल्या बुवांचा, प्रवचनाचं संमोहन वापरून जणू तो ईश्वर मलाच कळला आणि माझ्यावरच भाळला असा बनाव निर्माण करणा-यांचा. या लोकांच्या चरणांशी सर्व सुखं शयण असतात. तिथं कनक-कांतांचा सुकाळ असतो. कित्येक मती मारलेले भक्त आपल्या लेकीसुना या 'पहुंचे हुए' लोकांच्या नादी लावतात. सत्तेतील 'सत्ते' आणि राजकारणातील 'पत्ते'ही त्यांच्या आशीर्वादासाठी टपून असतात.* *कृष्णकथा-रामकथा कानाशी बिलगल्यानं आपण ईश्वरप्रिय होतो असा कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो भाबडेपणा आहे. ईश्वर समजण्यासाठी पराकोटीचा त्याग आणि कष्ट उपसावे लागतात. कबीर-ज्ञानोबा-तुकोबाइतकं आत्मबोधन अनुभवावं लागतं. हा मार्ग जनसामान्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच ते कर्मकांडांच्या थोतांडाला ब्रम्हांडाचा साक्षात्कार समजतात. ईश्वर कुणालाही दर्शन देत नाही. सूर्यकिरणांनी सूर्याचाच शोध घेण्यासारखा तो अज्ञानी प्रकार आहे. म्हणूनच रोज काही क्षण आत्मशोधात व्यतीत करीत राहिल्यानं कुठल्या तरी क्षणी आपण आपल्या सत्य-असत्यासह आत्मदर्पणापुढे येतोच!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर पगरा दूर है, आये पहुचै सांझ जन जन को मन राखती, वेश्या रहि गयी बांझ। कबीरा दूरच मुक्ती होत आलिया सांज सर्वांच्या राखित मना वेश्या राहिली वांझ महात्मा कबीर म्हणतात की मुक्तिपासून मी आणखी कोसो राहिलोय. जीवनात अज्ञानामुळे अंधःकार भरलेला आहे. हा अंधःकार षडविकारांनी युक्त आहे. हे विकार वारंवार मनाला भुरलळ घालीत असतात. त्यांना भुलून अज्ञानाचा मोहमयी पडदा बाजुला सरतंच नाही. त्यासाठी कर्मठपणाही अंगिकारला. त्यातल्या रूढी परंपरांनी असं काही जखडून टाकलं की विकारांपासून दूर जाण्याऐवजी विकाराभोवती भरकटून जीवन अखेरच्या टप्प्यावर येवून थांबू पाहातं आहे. तरीही जीवनातल्या माया जाळातून अजूनही मुक्तता झालेली नाही. मानवी मनाचे खेळही मोठे विचित्र असतात. मन विषय उपभोगात रमत मात्र ते कधीही भरत नाही अतृप्तच राहातं. जसे वेश्या सर्वांचे मन जपते . इत्तरांना समाधान देते. मात्र इत्तरांना जपण्यात तिला स्वतःचं अस्तित्व कुठं जपता येतं. ती स्वतः वांझपणाच्या यातनेतंच संपते. सर्व इंद्रियांना तृप्त करताना मन मात्र अतृप्तंच राहातं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सुगंधीत असलेल्या फुलांना आम्ही सुगंधीत आहोत म्हणून तुम्ही आमच्याकडे या आणि सुगंध घ्या असं कधीच म्हणावं लागतं नाही.आपोआपच सुगंध असणा-या फुलांकडे लोक आकर्षित होतात. त्याचप्रमाणे सज्जन माणसे कधीच कुणाला म्हणत नाहीत की,तुम्हीआमच्याकडे आमच्या सहवासात या आणि आमचे सद्गुण घ्या. आपोआपच सर्वसामान्य माणसे सज्जनांच्या सहवासात जाऊन आपल्यातील असलेल्या दुर्गुणावर मात करुन सद्गुणी होण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य असा की सद्गुणांचा सहवास हाच दुर्गुणावर मात करु शकतो.त्यासाठी आपली मानसिकता असावी लागते. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥ मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विश्वासघात* जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केले. तेंव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरु केली. शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच का सहकार्याचा मोबदला का?. चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, " हा एवढा मोठा चित्ता! वाऱ्याच्या वेगाने पळणारा! आणि हा एवढ्याश्या जाळीत कसा अडकून पडेल. तू खोटे बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे, हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा का चित्ता ? हे पाहू." हे ऐकून चित्ताही घमेंडीत गेला तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, " अरे मित्रा आता तरी पळ! नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल ! *तात्पर्य - जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment