*थोरवी माय मराठीची* 📚📚📚📚📚📚 माय मराठीचा महिमा आहे अपार माय मराठी तुझ्यातच आहे जीवनाचे सारं माय मराठीचा बोलीत आहे किती गोडी शब्दाशब्दात दडली आत्मसन्मानाची गुढी माय मराठीने दिला थोरामोठ्यांना मान इथले सैनिक देतात देशासाठी हो प्राण राबराब राबून बळीराजा करतो जीवाचे रान इथेच दिला जातो आईवडिलास मान नामदेव माऊली तुकोबां जनाई यांची अभंगवाणी संभाजी शिवरायांचे पोवाडे इथेच गुंजती शूर वीरांची गाणी अनेक भिन्न रूपे तुझी चांदया पासून बांदया पर्यंत बदलती ही बोली खेड्या पासून शहरापर्यंत मातृभाषेचा घेऊनी ध्यास जागवूया मनामनात आत्मविश्वास मातृभाषेचा करूया विकास हाच एक ध्यास अन् हीच मनी असे आस कितीकिती गाऊ मी माय मराठीचे गुणगाण माय मराठीच आहे शान हाच आहे सार्थ अभिमान अनेक अलंकाराणी सजविले तुला समृध्द व्याकरणी सुंदर अलंकृत तुज सम नाही दुसरी भाषा कुणी माय मराठीचा साहित्यास नाही जगात हो तोड कितीही शोधले तरी नाही दुसरी या परी जोड अमृताहूनी गोड असे माय मराठी आमुची तुझ्याच परंपरेची, संस्कृतीची गाऊ गाणी सह्याद्रीची आकाशाचा करुनी कागद सागराची करूनही शाई माय मराठी तुझी थोरवी लिहण्यास पुरत नाही. *जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा* 💐💐📚📚💐💐 *〰〰〰〰〰〰* *✍ ©प्रमिला सेनकुडे* ता.हदगाव जिल्हा नांदेड *〰〰〰〰〰〰〰*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment