✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/02/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८८५ - वॉशिंग्टन डी.सी.मध्ये वॉशिंग्टन स्मारकाचे उद्घाटन. १९९५ - अल्जीरियातील कारागृहात उठाव. ४ रक्षक व ९६ कैदी ठार. 💥 जन्म :- १८७५ - जीन काल्मेंट, हिचे मृत्युच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे. 💥 मृत्यू :- १९०१ - जॉर्ज फ्रांसिस फित्झगेराल्ड, आयरिश गणितज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - भारत आणि सौदी अरेबियासोबत पाच महत्त्वपूर्ण करार, दहशतवादाविरोधात पूर्ण सहकार्य करण्याचे सौदी अरेबियाचे आश्वासन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *हेग - कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानच्या पाचही याचिका फेटाळल्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *चेन्नई - तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि डीएमके आघाडीची घोषणा, काँग्रेस तामिळनाडूमध्ये 9 आणि पाँडेचेरीमधील एका जागेवर लढणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नांदेड - शहिदांना श्रद्धांजली वाहून महाआघाडीच्या सभेला सुरुवात, शरद पवार, जोगेंद्र कवाडे, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते होते उपस्थित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : आजपासून राज्यात बारावीच्या परीक्षेला होणार सुरूवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पालघरमध्ये जाणवले भूकंपाचे तीन धक्के; धक्क्यांची तीव्रता 3 रिश्टर स्केल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नाशिक- सार्वजनिक वाचनालयाचा प्रतिष्ठेचा कार्यक्षम आमदार पुरस्कार विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हम सब एक है* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/15.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नुतन* नूतन या हिंदी सिनेमातील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. त्यांच्या नितळ सौंदर्याला मिस इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नूतन यांचा जन्म ४ जून १९३६ रोजी एका उच्च शिक्षित कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव शोभना सर्मथ आणि वडिलांचे नाव कुमारसेन सर्मथ होते. आपल्या चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीची सुरुवात त्यांनी १९५0 मध्ये केली जेव्हा त्या शाळेत शिकत होत्या. त्यांचा विवाह लेफ्टनंट कमाण्डर रजनीश बहल यांच्याशी १९५९ मध्ये झाला. त्यांचा पुत्र मोहनीश बहल हादेखील सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून कार्यरत आहे. नूतन यांची बहीण तनुजा आणि भाची काजोलही सिनेक्षेत्रात अभिनेत्री म्हणून नावाजल्या आहेत. नूतन यांना अनेक पुरस्कार मिळाले आणि त्यांना सहा वेळा फिल्मफेअर मिळाला आहे. त्यांच्या या पुरस्काराची बरोबरी त्यांची भाची काजोल हिने केलीय हे विशेष. नूतन यांना सिनेसृष्टीतील योगदानासाठी १९७४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत ?* शक्तीकांत दास *2) जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कोणते ?* कांचनगंगा *3) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?* भारतरत्न *4) राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो ?* 29 ऑगस्ट *5) मानवी मेंदूचे वजन किती असते ?* 1350 ग्रॅम (1300 ते 1400 ग्रॅम) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा जि. गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • विशाल चव्हाण • संजय कासलोड • पियुष मुजळगे • सचिन मानधनी • एकनाथ पांचाळ • डॅनिहल ग्रॅम्हबल *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दुनिया* ही दुनिया मतलबी आहे वर वर छान छबी आहे छान छबी मतलबा पूरती सर्व भार साहते धरती शरद ठाकर सेलू जि.परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नातेसंबंध टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. संत कबीर म्हणतात-"प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला." थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करूणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वार्थाचाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते.* *सफल प्रेम हे फळासारखे असते, ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आई-वडील, पत्नी-मुले, भाऊ-बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते, अहंकाराला तीलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्य देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले तर कुठलेही नाते अभंग राहील. म्हणून वडिलधा-यांच्या आठवणीतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे 'नवरात्रौत्सव' घरात साजरे करावे, समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता प्रयत्नशील राहावे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• लकड़ी कहे लुहार की , तू मति जारे मोहि | एक दिन ऐसा होयगा , मई जरौंगी तोही || अर्थ : लोहाराचा धंदा म्हटला की भट्टी आणि भाता आलाच. कठीण वाटणार्या लोखंडाला आकार देण्यासाठी लोहार त्याला भट्टीत टाकतो. भट्टीत इतका गरम करतो की ते लालबुंद होवून जातं अन् त्याच्या घनाच्या/ हातोड्याच्या दणक्या सरशी पाहिजे तसा आकार घेवू लागतं. मात्र त्याच्यामागं खरं समर्पण असतं लोहाराकडच्या लाकडांचं ! जसजसा लोखंडाला ताव चढू लागतो तसं तसा लोहार चेव चढतो. भट्टीत लाकडे टाकून भात्याने वार्याला फुस देत लाकडांना लाल इंगळ करीत संपवून टाकतो. त्याचा जोस लाकडांचा कर्दनकाळ असतो. ते पाहून लाकूड म्हणतं की आज मी तुझा अंकित आहे. माझा तुला हवा तसा वापर करून घे. एक दिवस माझाही असेल. त्यावेळी तू निचेष्ट पडलेला असशील. त्यावेळी मी तुला असेच बेमुर्वतपणे भस्मसात करीन. त्यावेळी तुझ्या अस्तिवाच्या खुणाही मागे असणार नाहीत. तात्पर्य: कार्य कर्तृत्त्वासाठी प्रत्येकाला काळ संधी देत असतो. बलशाली माणसे कमकुवतांवर हुकूमत गाजवतात. त्या हुकूमतीला कळवळ्याचा आधार असेल तर ती हुकूमत हवीहवीशी वाटू लागते. परतु ती अतिरेकी मनमानी करणारी असेल तर एक दिवस सहज पत्त्यांचा डाव कोसळावा तशी ती कोलमडते अन अन तिच्या अस्तित्वाच्या खुणाही शेष राहात नाहीत. मगधच्या धनानंद व आॅस्ट्रियाचा राजा सोळावा लुई ही उदाहरणं पाहता सर्वकाही कळून जाते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही करत असलेल्या एखाद्या चुकीमुळे एखाद्याचे आयुष्य खराब होऊ शकते.त्यापेक्षा एखादा सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन चांगला किंवा बरोबर असलेला विचार समोर ठेवला तर एखाद्याचे त्याला त्याच्या जीवनात एक चूक सुधारण्याची संधी मिळवता येईल व आयुष्य ही सुंदर बनवून जगताही येईल.त्याच्या जीवनात जे काही चैतन्य निर्माण झालेले असेल ते केवळ तुमच्या एका चांगल्या विचारामुळेच. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/8087917063. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बहू हिंपुटी होईजे मायपोटी। नको रे मना यातना तेचि मोठी॥ निरोधें पचे कोंडिले गर्भवासी। अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥२०॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नक्कल नाही ;अनुकरण करावे. वर्ग सातवीतला मनिष हा नकला चांगल्या करायचा .मित्रांच्या बोलण्याच्या लकबी,शिक्षकांच्या बोलण्याच्या लकबी तो सहज करत असे.शिक्षकांना त्याच्यातील हा गुण माहिती होता ,त्यामुळे त्याला शिक्षकांनी सांगितले होते की, तू नकला चांगल्या करतोस हे ठीक आहे ; पण नक्कल करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करावे .नक्कल ह्याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब वर्तन ,त्याचे हावभाव जसेच्या तसे व्यक्त करणे होय,पण अनुकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण स्वत: रुजवून आपला विकास करणे होय . मनिषने शिक्षकांचे हे म्हणणे काही ऐकले नाही .नक्कल करणेच त्याला योग्य वाटले .एकदा शिक्षक दिनादिवशी सगळी मूल वेगवेगळ्या वर्गात शिक्षकांचे काम करणार होते .थोडक्यात त्यांना वर्गावर शिक्षकांच्या ऐवजी शिकविण्यासाठी जायचे होते.मनिषही पाचवीच्या वर्गावर शिकवण्यासाठी गेला.त्याला वाटले आपण एखाद्या शिक्षकांची नक्कल करून तास संपवू या . फारसे अवघड काही नाही. असा विश्वास ठेवून तो वर्गावर गेला .विषयांशी निगडित असलेल्या शिक्षकांची त्याने अचूक नक्कल केली .पण शिकवतानात्याला एका विद्यार्थ्याने पाठासंबंधी प्रश्न विचारला .मनिषला केवळ नक्कलच माहित होती. विचारलेल्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ,याचा विचारच त्याने केला नव्हता .सगळी मुले हसायला लागली त्याची थट्टा करू लागली. त्यावेळी मनिषच्या मनात एक गोष्ट पक्की रुजली की सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणे अधिक फायदेशीर ठरू शकते .कारण त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्वाचा बुद्धीचा विकास होऊ शकतो .अन्यथा आपण केवळ एखाद्या व्यक्तीची नक्कल करू शकतो .पण त्या व्यक्तीसारखे श्रेष्ठ बनू शकणार नाही. तेव्हापासून मनिष चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्यावर भर देऊ लागला . *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment