✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/02/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय विज्ञान दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. 💥 जन्म :- १९२७: भारताचे १० वे उपराष्ट्रपती कृष्णकांत १९४७ - दिग्विजय सिंघ १९४७ - विजय बहुगुणा १९५१ - करसन घावरी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६९ - यू. श्रीनिवास, मेंडोलिन वादक १९७१ - परमजीत सिंघ, भारतीय खेळाडू 💥 मृत्यू :- १९३६: पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू १९६३: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद २००६- ओवेन चेंबेरलेन ,नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाबद्दल ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केली चिंता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तामधील तणावामुळे दोन्ही देशांच्या हवाई हद्दीतून होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक झाली प्रभावीत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली - भारताचा एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात, भारताने पाकिस्तानला दिले पुलवामा हल्ल्याचे पुरावे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिक : औरंगाबाद येथील पोलीस अधीक्षक आरती सिंग यांची नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अहमदनगर : गावात दारूमुळे असुरक्षिततेची भावना आहे. गावे स्वच्छ व पाणीदार होतील. पण गावे संस्कारक्षम होण्याची गरज - पोपटराव पवार यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *१९ हजार कोटी तुटीचा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलेसादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बंगळुरु, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात सात विकेट्स राखून मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मतदार जागृती आवश्यक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_11.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय विज्ञान दिवस* नोबेल पारितोषिक हा जगातला सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सी. व्ही. रामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचं पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन असं होतं. १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. शिवाय १९५४ मध्ये भारतरत्न आणि १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांतता हा पुरस्कारही देण्यात आला होता. सी. व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचं शिक्षण चेन्नईला झालं. १९१७ ते १९३३ पर्यंत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) यासाठी ते ओळखले जाऊ लागले. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जितके निरीक्षण सुक्ष्म, तितकी समजूत अधिक, म्हणून जास्त सखोल आणि अचूक विचार करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) भारताची राजधानी कोणती ?* दिल्ली *2) भारताची आर्थिक राजधानी कोणती ?* मुंबई *3) भारताचे पंतप्रधान कोण आहेत ?* नरेंद्र मोदी *4) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?* पं. जवाहरलाल नेहरू *5) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?* डॉ. राजेंद्र प्रसाद *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • साईनाथ सुरेश येवतीकर • राजेश्वर भंडारे • आनंद आनेमवाड • मारुती पाटील • प्रशांत चिखलीकर • शंकर गर्दसवार • श्रीकांत आदमवाड • निर्मला सोनी • मुरलीधर राजूरकर • संदीप नागला • अशोक होवाल • मारोती पाटील • सुनील कोल्हे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जशास तसे इट का जवाब पत्थर आहे जशास तसे चोख उत्तर आहे ही वेळच आहे जशास तसे उत्तर देण्याची गरज नाही कोणापुढे आता नतमस्तक होण्याची शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जीवन हे सुखदु:खाच्या वाटेवरूनच पुढे जात असतं. जीवन पटाचं वस्त्र सुख दु:खाच्या धाग्यांनी तयार होत असतं. ते सुंदर जरतारी व्हावं, असं वाटणं स्वभावधर्मच आहे. दु:खाचा सल जाणवल्याशिवाय सुखाचं मोल कळत नाही. तरूणपणी स्वत:च्या सौंदर्याची जाण झाल्यामुळे आपण तारूण्याच्या धुंदीत सौंदर्याचा, सुखाचा आनंद उपभोगतो.* *हे सुख शाश्वत नसतं. वय आपलं काम करतच असतं. जीवनाचं अखेरचं पर्व, वृद्धावस्था सुरू झाली की, या गोष्टीत आनंद मिळत नाही. आपल्या मायेच्या माणसांनी प्रेमाचं, आपुलकीचं वस्त्र आपल्या अंगावर घालावं असं वाटतं. अशा त-हेने बालपण, तरूणपण व वृद्धावस्था हे जीवनपटाचं तीन अंकी वस्त्र विणलं जातं. आपल्या वाटेला येणारं सुखदु:खाचं वस्त्र जरतारी मानून जीवन व्यतीत करणं हेच आपल्या हातात असतं.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दूजा हैं तो बोलिये, दूजा झगड़ा सोहि दो अंधों के नाच मे, का पै काको मोहि। सारांश विधाता निर्गुण निराकार आहे. तो सर्व विश्व व्यापून उरलेला आहे. तरी त्याची विभिन्न मुर्त रूपे उभी करून एकमेकात विनाकारणंच भांडून घेणार्यास उद्देशून महात्मा कबीर म्हणतात परमात्मा वेगवेगळा असता तर तुमचं म्हणणं मान्य केलं असतं. माझाच देव श्रेष्ठ आहे व इत्तरांचा चुकीचा आहे असे माणण्यातच तर भांडणाचं मुळ दडलेलं आहे. तेच भांडणाला कारण ठरतं. दोन अंधांच्या नाचण्यावर कोण अांधळा कोणत्या कारणाने त्या अंधावर मुग्ध किवा प्रसन्न होईल ? लिळाचरित्रात आंधळ्यांचा दृष्टांत सांगितलेला आहे. एका गावात सहा आंधळे असतात. त्यागावी एक हत्ती येतो. आंधळ्यांना हत्ती पाहाता येत नाही. प्रत्येक आंधळा आपआपल्या परीने हत्तीला चाचपून घेतो. त्यांना झालेल्या स्पर्श ज्ञानावरून ते हत्तीच्या रूपाचं वर्णन करायला लागतात. ज्याच्या हाती कान लागला, तो हत्ती सुपासारखा असल्याचे सांगतो. ज्याने सोंड चाचपली, तो हत्ती मुसळासारखा आहे म्हणतो. ज्याने पाय चाचपले, तो हत्ती खांबासारखा असल्याचे सांगतो. ज्याचा स्पर्श हत्तीच्या पोटाला झाला, त्याचे म्हणणे असते हत्ती पोत्यासारखा आहे. ज्याने पाठ चाचपून घेतली, तो हत्ती भिंतीसारखा असल्याचे सांगतो. ज्याने शेपटीला स्पर्शलेले असते, त्याला हत्ती खराटा म्हणजे झाडूसारखा भासतो. शेजारीच त्यांचा संवाद ऐकणारा एक डोळस असतो. त्याने पूर्ण हत्ती पाहिलेला असतो. तो संवाद ऐकून म्हणतो, तुम्ही तर फक्त हत्तीच्या अवयवांनाच हत्ती समजत आहात . प्रत्यक्षात हत्ती तर महाकाय आहे. तसं विधात्याचं स्वरूपही विश्वात्मक आहे.तो सर्वव्यापी आहे. त्याला जाणण्याची आत्मदृष्टी जवळ असायला हवी. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा,अयोग्य दिशेने जाणारे पाऊल,आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते.तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• देहेरक्षणाकारणें यत्न केला। परी शेवटीं काळ घेउन गेला॥ करीं रे मना भक्ति या राघवाची। पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरुड व घुबड* एक गरुड आणि घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत. परंतु एक दिवस, त्यांनी एकमेकांशी मैत्रीने वागण्याचे ठरविले, तसेच एकमेकांची पिल्ले खाऊ नये असेही ठरवले. तेव्हा घुबड गरुडाला म्हणाले, 'मित्रा ! परंतु, माझी पिल्लं कशी आहेत ते तुला माहित आहे का ? नाहीतर दुसर्याचीच आहेत असे म्हणून तू त्यांना खाऊन टाकशील.' गरुड म्हणाला, 'माझी पिल्लं खूप सुंदर आहेत. त्यांचे डोळे, पिसं, आवाज सगळंच खूप सुंदर आहे. आता येईल ना तुला ओळखता ?' पुढे एके दिवशी, झाडाच्या ढोलीत गरुडाला घुबडाची पिल्ले सापडली. ती पाहून तो म्हणाला, 'किती घाणेरडी आणि कुरूप पिल्लं आहेत ही. घुबडाची पिल्लं तर खूप सुंदर आहेत. म्हणजे ही काही घुबडाची पिल्लं नसणार. यांना मारून टाकावं. असे म्हणून त्याने सगळ्या पिलांचा फडशा उडवला. नंतर घुबडाने येऊन पाहिले तो ढोलीत पिल्ले नाहीत. ते गरुडास म्हणाले, 'मित्रा, तूच माझी पिल्लं खाल्लीस.' गरुड म्हणाला, ' हो, मी खाल्ली; पण मला काय माहीत की ही कुरूप पिल्लं तुझी आहेत म्हणून ? तू तर म्हणालास की, माझी पिल्लं खूप सुंदर आहेत. मला वाटलं ती दुसर्याच पक्ष्याची आहेत. आता यात माझी काय चूक ? तात्पर्य - स्वतःची खरी माहिती लपवून खोटी माहिती सांगितली असता मनुष्य संकटात सापडतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment