✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/02/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८३० - मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना. १९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. १९३३ - म. गांधी यांच्या हरिजन वीकली चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. १९९९ - मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर. 💥 जन्म :- १९४२ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका. 💥 मृत्यू :- १९४२ - जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक. १९६८ - पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष. १९९३ - कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्राने रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *किसान सन्मान योजना मोदींसाठी डोकेदुखी; केंद्र सरकारची लोकसभा निवडणुकीपूर्वी घाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राजस्थानमध्ये आरक्षणासाठी गुर्जर समाजाचं आंदोलन सुरूच* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *केंद्र सरकार राज्यांकडून हिशेब मागत असल्यानं राज्य सरकार टेन्शनमध्ये आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कडाक्याच्या थंडीने महाबळेश्वर गोठलं, परभणीमध्ये 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हॅमिल्टन : स्मृती मानधनाच्या 86 धावांच्या फटकेबाजीनंतरही भारतीय महिला संघाला अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *हॅमिल्टन : यजमान न्यूझीलंड संघाने सांघिक कामगिरी करताना विजय मिळवला. न्यूझीलंडने तिसरा सामना 4 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रिय वाचक सप्रेम नमस्कार विनंती विशेष https://drive.google.com/file/d/14-L8iLJCkuh-hmQVdFop15I9B-cn-B-n/view?usp=drivesdk *आज सोनियाचा दिन* हे वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करावे. माझ्या आगामी येत असलेल्या ई बुकबद्दल विचारधनचे लेखक श्री संजय नलावडे, मुंबई यांचा शुभेच्छा संदेश खालील लिंक वर वाचन करता येईल. https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_47.html आपण ही शुभेच्छा संदेश माझ्या क्रमांकावर पाठवावे. ही विनंती. - नासा येवतीकर, स्तंभलेखक 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पंडित दीनदयाळ उपाध्याय* दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतक व विचारक होते. ते संघटनकार्य करणारे होते. ते उत्तम लेखक होते. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९१६ रोजी मथुरा जिल्ह्यातील नगला चंद्रभान गावात झाला. त्यांनी पिलानी, आग्रा व प्रयाग येथे शिक्षण पूर्ण केले.नंतर मात्र ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. ते संघाचे प्रचारक होते.१९५१ मध्ये अखिल भारतीय जनसंघाचे मंत्री बनले. पुढे १९५३ मध्ये त्यांना जनसंघाचे महामंत्री बनवण्यात आले. त्यांनी तब्बल पंधरा वर्षे हे पद सांभाळले. कालीकतच्या अधिवेशनात ते जनस्ंघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १८६७ च्या सुमारास जनसंघाचे प्रमुख बनले. १९६८ मध्ये प्रखर राष्ट्रवादी नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा मृत्यू. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तीनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) विद्युत प्रवाह मोजणारं उपकरण कोणतं?* अँमीटर *२) जगातील पहिली भुयारी रेल्वे कोठे सुरू झाली?* लंडन *३) बर्म्युडा ट्रँगल हे भौगोलिक ठिकाण कोठे आहे?* उत्तर अटलांटिक महासागर *४) वादग्रस्त तेलंगणाप्रकरणी केंद्र सरकारने कोणती समिती नेमली होती?* बी.एन.श्रीकृष्ण समिती *५) डायलिसिसचा उपयोग कधी होतो?* मूत्रपिंडाच्या विकारात *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ प्रमोद शिंदे ◆ दत्तात्रय दळवी ◆ म. जावेद ◆ रविशंकर बोडके ◆ माधव हिमगिरे ◆ ज्ञानेश्वर पलिकोंडलवार ◆ राणी पद्मावार ◆ प्रभाकर बेरजे ◆ कृष्णकांत लोणे ◆ शिवराज हलीखेडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नाटकं* दिखाव्या करता ते शुद्ध नाटकं करतात काही क्षण लोकांच्या मनात हिरो ठरतात दिखावा ताबडतोब ओळखला जाऊ शकतो खोटं कितीही रंगवा प्रेक्षक काही काळच पाहू शकतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••, *आधीं फळासी कोठें पावो शके ।* *वासनेची भिकेवरी चाली ।।* *तुका म्हणे राजहंस ढोरा नाव ।* *काय तया घ्यावे अळंकाराचें ।।* *"एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी वाईट गोष्ट सोबतच असते. माणूस विद्वान तर आहे, पण त्याला धन आणि मानाची अपेक्षा असेल तर? ही अपेक्षाच त्याचा नाश करत असते, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे." अपेक्षेसोबत अपेक्षाभंग असतो, हे पटवून देण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. "आपण ज्या ज्या इच्छा करतो, जेवढ्या अपेक्षा बाळगतो त्या सर्वच्या सर्वच पूर्ण कशा होऊ शकतील? पण माणूस हे समजून घेत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे या आणि अशा अनेक वासना माणसाला शेवटी भीक मागायला लावत असतात." हव्यासापोटी भिकेला लागण्याची वेळ आली तरी माणूस शहाणा होत नाही.* *जुगारात मिळण्याची अपेक्षा सर्व घालवून बसते. राज्यच काय पण बायकोला सुद्धा 'डावात' हरून बसल्याची साक्ष महाभारतासारखे ग्रंथ देतात. संत तुकाराम आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छेतून अपमानित होण्याची वेळ येणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे. "एखाद्या गाढवाचं 'राजहंस' असं अलंकारीक नाव जरी ठेवलं, तरी त्या नावाचं त्या गाढवाला काय भूषण वाटणार आहे?" गाढवाची राजहंस नाव ठेवण्याइतकीसुद्धा पात्रता नसते आणि त्याला त्याचं भूषणही वाटत नसतं.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• जो रोऊ तो बल घटी , हंसो तो राम रिसाई | मनही माहि बिसूरना , ज्यूँ घुन काठी खाई || अर्थ : सांसारिक जीवन षड्विकारांनी भरलेलं आहे. मोह , माया, मद, मत्सर, भय, मैथुन हे ते षड्विकार. यांनी जीवनातला परमानंद हिरावून घेतला आहे. ठायी ठायी करावी लागणारी तडजोड वारंवार मानवतेच्या विवेकशील सत्य मार्गापासून भरकटवून टाकते. त्यामुळे होणार्या यातना असह्य होतात. त्यामुळे रडकुंडीला येतो. रडायचं ठरवलं तर जगाच्या नजरेत भित्रा ठरण्याची भय. चालतोय तोच मार्ग योग्य आहे असे समजून हसायला लागलो तर ती वाट सत्याशी व अंतरात्म्याशी गद्दारी करणारी. अशा द्वंद्वात अडकून आगतिकपणे जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्नही अधिकच बेचैन करतोय. मनाला शांती मिळत नाही. सतत अस्वस्थ वाटायला लागतं. एखाद्या मजबूत व भक्कम लाकडाला वाळवी लागावी आणि तिने त्या लाकडाला आतून कुरतडून काढावे. अशी गत झाली आहे संसारी. अशी घुसमट करून घेण्यापेक्षा ताठ मानेने जगायचे तर सत्याचा अंगीकार करून विवेकपूर्ण जगायला हवे. त्यायोगे आपलं नाणं खणखणीत राहील. सारवासारवी व बणवाबनवी असा कधी प्रसंगच येणार नाही . अंतरात्म्याकडूनही प्रताडणा होणार नाही. आंतरिक समाधान आपोआपंच चेहर्यावर विलसायला लागेल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्या आशारुपी पंखांना खूप पसरु द्या.कारण तेच पंख तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी मदत करतात.त्यांना जर संकुचित वृत्तीने तुमच्याच मनामध्ये जवळ करुन ठेवलात तर तुमच्या मनातल्या असलेल्या इच्छा पूर्ण कशा होतील ? त्यापेक्षा त्या पंखामध्ये आत्मविश्वासरुपी बळ निर्माण करुन त्यांना नवे काहीतरी करण्यासाठी पसरु द्या म्हणजे तुम्हाला आनंदाने आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी संधी निर्माण करुन देतील. पक्षी आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात ते पंखाच्या बळावरच ना ! मग पंखच पसरले नसते किंवा एखादी बाजू पंख विरहित असली तर कसे बरे आकाशात विहार करु शकले असते का ? नाही ना ? मग तसेच मानवी जीवनाचे आहे.आशारुपी पंखांचे तसेच आहे त्यांनाही थोडे स्वातंत्र्य द्या आणि जीवनरुपी आकाशात स्वच्छंदपणे विहार करायला प्रेरणा द्या. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जनीं सर्वसूखी असा कोण आहे। विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥ मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले। तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याची खरी किंमत* एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत काय असते हो? " आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली . तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. " पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - " अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार ." आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला . त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - " मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती, हेतू आणि कुवतीनुसारच करणार." त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा. इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका. तात्पर्य :- मनुष्य या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत. तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment