✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/02/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९४४- भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना करण्यात आली. १९९८- ज्येष्ठ गांधीवादी नेते,माजी मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर. 💥 जन्म :- १८२३ - गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी समाजसेवक १८८३-क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा 💥 मृत्यू :- १९६७- अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ,अणुबॉम्बचे जनक जे.रॉबर्ट ओपेनहायमर १९९२-चित्रकार नारायण श्रीधर बेंद्रे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पाटणा मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार होते उपस्थित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुलवामा हल्ला- राजौरीतील शहीद जवान नसीर अहमद यांच्या कुटुंबाला राज्यपालांकडून 20 लाखांची मदत जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शिव समर्थ स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते अनावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *शिवसेना-भाजपाचं जमलं! उद्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, गेल्या काही दिवसांपासून युतीसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राजस्थान- चालू वर्षात स्वाईन फ्ल्यूमुळे आतापर्यंत 127 जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सरकारी नोकऱ्यांची कल्पना डोक्यातून काढून टाका- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई: पीळदार सौंदर्यवतीच्या मिस मुंबई स्पर्धेत एफसीटी जिमची डॉ. मंजिरी भावसार ठरली विजेती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपले नशीब आपल्या हाती* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/12.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी* गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (१८ फेब्रुवारी १८२३ ते ९ ऑक्टोबर १८९२) हे इ.स.च्या १९व्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने त्यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे लिहिली. भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुर्टे हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका 'शतपत्रांचा इत्यर्थ' मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते. गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. 'सदर अदालती'ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८६२पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवेनवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रपणे वाटत होते. लोकहितवादींनी १८४२ मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी 'हिंदुस्थानचा इतिहास' हे पुस्तक लिहिले. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणार्या प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. १८४८ ते १८५0 या काळात त्यांनी १0८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. त्यांनी विविधविषयांवर लहानमोठे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. १८५६ साली गोपाळराव 'असिस्टंट इनाम कमिशन' या पदावर नेमले गेले. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्टात जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी गुजरातमध्ये गुजराती वक्तृत्वसभा स्थापन केली. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यासारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी हल्ला चढविला. १८७७ साली दिल्ली दरबारप्रसंगी ब्रिटीश शासनाने रावबहादूर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कर्तव्याची जाणीव करून देते ती खरी संस्कृती ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?* सरपंच *2) गावात कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?* पोलीस पाटील *3) महाराष्ट्रातील 'जंगलाचा जिल्हा' कोणता ?* गडचिरोली *4) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?* अहमदनगर *5) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?* मुंबई शहर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा जि. गोंदिया 📱 9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ सोमेश्वर तांबोळी ◆ संजय राचावाड ◆ गणेश पाटील ◆ लक्ष्मीकांत डेबेकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारखेच* शिकलेले अन् न शिकलेले सारखे आहेत शिकून ख-या विचाराला पारखे आहेत शिकले तरी जुन्या परंपरा सोडत नाहीत विचारा सोबत घेतलेल शिक्षण जोडत नाहीत शरद ठाकर सेलू जि.परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरीब माणसाला घरापासून दूर राहून पोटाच्या चार घासासाठी प्रचंड मरमर करावी लागते. पण पैशावाल्याच्या बाबतीत हे होत नाही. "एका बसल्या ठिकाणी त्याचा व्यापार चालतो. त्याला घर सोडून कुठेही जावं लागत नाही." गरीबाला एका वस्तूसाठी पैशाअभावी कुढत मरावं लागतं. शेवटपर्यंत ती वस्तू मिळेलच असं होतं नाही. पण "श्रीमंताला मात्र पाहिजे असणारी कोणतीही वस्तू रानावनातच काय या पृथ्वीतलावर कुठंही असली तरी पैशाच्या जोरावर मिळवणं सोपं असतं आणि वस्तू कोणतीही असू द्या, कितीही अनमोल असू द्या, कितीही महत्वाची असू द्या, शक्यतो जास्तीचे पैसे देऊन मिळवता येणार नाही, इतकी ती अवघड नसतेच." थोडे जास्त पैसे देऊन अति मौल्यवान वस्तुसुद्धा पैश्यावाल्याला सहज मिळवता येते.* *म्हणून, पैसा माणसाच्या आयुष्यात यासाठी महत्वाचा आहे. पैसा वाईट मार्गाने कमवायचा तर नाहीच, पण चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवून तो वाईट मार्गावर खर्च सुद्धा नाही करायचा. चांगल्या मार्गाने कमावलेला खूप पैसा 'आनंदी आणि सुखकर आयुष्य' जगण्यासाठी खर्च करायचा आहे. पैशाचा लोभ नाही आणि तिरस्कारही नाही. त्याची हाव नको आणि त्याच्याविषयी विरक्ती नको. पैसा कमवताना आनंदाने कमवायचा तसाच तो खर्च करतानासुद्धा जीवनात आनंदच असला पाहिजे. एवढा सुंदर असा 'मध्यम मार्ग' संतानी आपल्याला दिला आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञान भक्ति वैराग्य सुख पीव ब्रह्म लौ ध़ाये आतम अनुभव सेज सुख, तहन ना दूजा जाये। ज्ञान भक्ति वैराग्य सुख जलद ब्रम्हानंद दायी आत्मानुभव प्राप्तीची सर अन्यत्र कुणा न येई महात्मा कबीर अनुभव ज्ञानाची महत्ती विषद करताना म्हणतात , 'ज्ञान,भक्ति,वैराग्य सुख प्राप्तीद्वारे जलद गतीने ईश्वराचा साक्षात्कार होईल. ईश्वराची दिव्यताही अनुभवता येईल. हा मार्ग ईश्वरी लिला जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा आहे. मात्र आत्मानुभव आत्मा आणि परमात्म्याचंं मिलन घडवून आणतो. जेव्हा आत्माच परमात्म्याच्या रुपाशी एकरूप होऊन जातो. तिथे अन्य कुणाला प्रवेश कसा मिळणार बरे ! जीव आणि शिवाच्या एकरूपतेत मनाचाच मनाशी संवाद घडून येतो. विश्वातील नश्वरता व विकारांना त्याठायी यत्किंचितही स्थान उरत नाही. निसर्गाची सर्वव्यापकता व समदृष्टी त्या जीवात्म्याच्या ठायी स्थापित होते. हा स्थितप्रज्ञतेचा सर्वोत्कट आविष्कार असतो. त्याच्यावर कोणत्याही प्रलोभनाचा प्रभाव पडत नाही . कारण तो स्वतःच अविनाशी विश्वरूपाशी तादात्म्य पावलेला असतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना राघवेंवीण आशा नको रे। मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥ जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें। तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आईवडिलांना विसरू नका एकदा एक वयोवृद्ध बाप आपल्या उच्च शिक्षित मुलासोबत घराच्या छतावरती बसला होता. तेथे एक कावळा आला. मुलाला बापाने विचारले, ते काय आहे? मुलगा म्हणाला कावळा. पुन्हा दुसऱ्यांदा बापाने विचारले, ते काय आहे? मुलाने पुन्हा उत्तर दिले कावळा. तिसऱ्यांदाही बापाने विचारले ते काय आहे? मुलाने जरासे दात-ओठ खात म्हटले, कावळा. मग ते दोघे घरात गेले. त्याला पुन्हा बापाने विचारले ते आत्ता आले होते ते काय होते? मुलाचा संयम सुटला होता त्याने ओरडत सांगितले, समजत नाही का? कावळा...... कावळा... कावळा. पाचव्यांदा बापाने विचारले ते आपण पाहिले ते काय होते? मुलगा आता मात्र जाम भडकला त्याने त्यांना सांगितले, का टाईमपास करताय? तुम्हाला कितीदा सांगितले तो कावळा होता म्हणून, तरी तुम्हाला समजत नाही का? का जाणून- बुजून त्रास देताय? मग त्या वयोवृद्ध बापाने त्या मुलाला घरातील एक डायरी आणायला सांगितली. त्याने ती आणली, त्यात हीच कथा लिहिली होती. परंतु, ती थोडी वेगळी होती. त्या बापाच्या जागी एक लहान मुलगा होता. त्याने बापाला एक-दोन नाही तर तब्बल 25 वेळा हाच प्रश्न केला होता, आणि तितक्याच वेळा त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रश्नाला हसत हसत उत्तर दिले. त्यांना त्याच्या विचारण्याचा मुळीच राग येत नव्हता, उलट त्यांना त्या मुलाचा निरागस स्वभाव आणि त्याचे ते विचारणे आवडत होते. तो बाप त्या मुलाचाच होता जो त्याला केवळ पाच वेळा विचारल्यावर त्यांच्यावर खेकसला. फरक फक्त हाच, की मुलासाठी बापाने केलेले कष्ट, त्यांनी सहन केलेल्या सर्व वेदना तो विसरला होता. उलट त्याने वडिलांना केवळ दु:खच दिले. लक्षात ठेवा. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी कितीतरी कष्ट केले आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी केवळ दु:खच देत आहात? *आई-वडिलांना विसरू नका. त्यांनी केलेल्या कष्टांना विसरू नका.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment