✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/02/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी* 💥 ठळक घडामोडी :- २००१- तालिबान ने बमयन (अफगाणिस्तान) येथे दोन विशाल बुद्ध प्रतिमांना विस्फोटकाद्वारे नष्ट केले. २०१०- अफगाणिस्तान येथील आतंकवादी हल्ल्यात ९ भारतीय नागरिक मारले गेले. 💥 जन्म :- १९०८-लीला मुजुमदार ,बांग्ला साहित्यकार. १९२८-एरियल शेरॉन, इसरायली प्रधानमंत्री. १९८२- ना ली ,महिला टेनिस खेळाडू. 💥 मृत्यू :- १९६६ - विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारी, मराठी लेखक, कवि. २००४ - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *50 वर्षांसाठी देशातील 5 मोठ्या विमानतळांचं कंत्राट अदानी समूहाला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *91 व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा; रेजिना किंगला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - देशातील पहिले पोलीस साहित्य संमेलन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मोठ्या दिमाखात पार पडले. जेष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी पोलिसांचे केले कौतुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे- मूकबधिरांवरील लाठीमार प्रकरणी उद्यापर्यंत अहवाल सादर करा; मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *यावर्षी देशातील मान्सून सामान्य राहील, तसेच दुष्काळही पडणार नाही, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नाशिकला बदली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣*मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची करण्यात आली निवड, भारताच्या कर्णधारपदी महाराष्ट्राच्या स्मृती मानधाचे नाव घोषित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/09.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शंकरराव चव्हाण* डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा जन्म शेतकरी कुटूंबात पैठण येथे झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली. पण स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.1948-49 मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. 1952 च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (1956), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक इ. विविध पदे त्यानी भूषविली. 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रूवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रूवारी 1975 रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पाटबंधारे मंत्री महणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजींच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे. कोणताही राजकीय प्रश्न ते समजुतीने सोडवीत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे 1975 मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिद्ध होते. ते रामानंदतीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरू मानत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. २६ फेब्रुवारी २००४ रोजी त्यांचे निधन झाले *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारातलं सुख, शांती हरवून बसतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ?* नागपूर *2) 'विद्येचे माहेरघर' असे कोणत्या शहराला म्हणतात ?* पुणे *3) महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?* 720 Km *4) महाराष्ट्रात एकूण विधानसभा सदस्य किती ?* 288 *5) महाराष्ट्रात एकूण विधानपरिषद सदस्य किती ?* 78 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा, जि. गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • नारायण मुदगलवाड • घनश्याम बोऱ्हाडे • निलेश जोंधळे • विलासराज भद्रे • प्रदीप तळणीकर • योगेश दरबस्तेवार • शैलेश फडसे • शंकर पवार • कपिल मनूरकर • अरुण टिरके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आदर जो लोकांची कधीच कदर करत नाही त्याचा जगात कोणी आदर करत नाही दुसऱ्याचा आदर करतो त्याला आदर मिळतो दुसऱ्याविषयी आदर नाही त्याची कोण कदर करतो शरद ठाकर सेलू जि.परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.* *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रेमभाव एक चाहिए , भेष अनेक बनाय | चाहे घर में वास कर , चाहे बन को जाए || अर्थ मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ? भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा . विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य व प्रेमभाव हाच खर्या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते म्हणून माणसाने अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा एकाच बिंदूतून कितीतरी रेषा काढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत तरीही त्या एकमेकांना एकाच बिंदूत छेदून पुढे सरळ मार्गाने निघून जातात आणि त्याच रेषा परत एकाच बिंदूत एकत्रीत येऊन मिळतानाही पाहिले आहे.असा जर आपण विचार केला तर आपले हृदय आणि मनही एकच आहे.आपणच आपल्या हृदयातून आणि मनातून अनेक माणसांना जोडण्याचे काम करत असतो.त्यात काहींना काही कारणाने जवळ करतो तर काही माणसे आपल्यापासूनच जवळ येऊन दूर जातात.जे दूर जातात त्यांचा विचार करु नका,कारण त्यांना स्वातंत्र्य आहे.परंतु जी माणसे तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांना दूर करुन नका कारण त्यांना तुमचे मन आणि हृदय कळलेले असते.कारण तुम्ही त्यांचे केंद्रस्थानी बिंदूस्थानी आहात.तुम्हीच त्यांचे आधारही आहात आणि त्यांची प्रेरणाही आहात.सा-यांना जवळ करण्याचे बिंदूसारखेच काम करायला शिकले पाहिजे तरच जीवन समृद्ध होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०./८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रघुनायकावीण वांया शिणावे। जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥ सदा सर्वदा नाम वाचे वसो दे। अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खंबीरतेने जगणे* (दोन मित्रातील संवाद) कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ? जरा ओळखुन दाखव!” एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या समोर टाकलेले कोडे ...... मित्राला विचारचक्रात अडकवुन स्वतः मात्र पसार झाला. मी विचार करु लागलो, “बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय साम्य असणार?” खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असलेल्या बांधकामावरुन दोन विटा आणि बाजारातुन अर्धा डझन अंडी घेउन घरी आलो. खूप निरीक्षण केले पण उत्तर सापडले नाही. दुसऱ्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला “काय सापडले काय उत्तर?” मी नकारार्थी मान हलविली आणि “आता तुच काय ते साम्य दाखवं!” असे म्हणुन ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे ठेवल्या. मित्राने हातात अंडे घेतले. ते उभे ठेवले आणि दाबले, पण ते फ़ुटले नाही . मग त्याने अंड्याला आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले. मग त्याने दोन फ़ुटावरुन हातात उभी धरलेली विट खाली सोडली, विटेला काहीच झाले नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने आडवी धरुन विट खाली सोडली, आता मात्र विट फुटली. मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला “विट आणि अंडे उभे असेपर्यंत फ़ुटत नाही, आडवे होताच फ़ुटते. हे त्या दोघांमधील साम्य. माणुस त्या विट किंवा अंड्यासारखाच तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे, तो पर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला, जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य फ़ुटण्याची शक्यता बळावते." खंबिरपणे उभे राहा. जग तुमचे काही बिघडवू शकत नाही. "ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच जगात किंमत आहे." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment