✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/01/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकरसंक्रांत, उत्तरायण भारत* 💥 ठळक घडामोडी :- १७६१ - पानिपतची तिसरी लढाई - मराठे व अहमदशाह अब्दाली मध्ये झालेले भीषण युद्ध. १९९३ - मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. १९९८ - ज्येष्ठ गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान जाहिर. २००० - ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत बाबा उर्फ मुरलीधर देविदास आमटे यांना इ.स. १९९९चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्र्पतींच्या हस्ते प्रदान. 💥 जन्म :- १८८२ - रघुनाथ धोंडो कर्वे, संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत. १८९२ - दिनकर बळवंत देवधर , क्रिकेटमहर्षी १८९६ - डॉ. चिंतामणराव देशमुख. , भारताचे अर्थमंत्री १९०५ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री. १९०८ - द्वा.भ. कर्णिक , ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत. १९२६ - महाश्वेतादेवी , ज्ञानपीठ व इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका. 💥 मृत्यू :- १९३७ - जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाच्या ऑनलाइन बुकिंगसाठी मोजावे लागणार शंभर रुपये* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सवर्ण आरक्षण 14 जानेवारीपासून राज्यात लागू करणार- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जयपूर- राजस्थानमधील ज्येष्ठ भाजपा नेते गुलाबचंद कटारिया यांची राजस्थान विधानसभेच्या विरोधीपक्षनेते पदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई, कोल्हापूर आणि वर्धा नंतर शिक्षणाची वारी पोहोचली नांदेड नगरीत, येत्या बुधवारपासून नांदेडमध्ये शिक्षणाच्या वारीस प्रारंभ होत असल्याची माहिती वारीचे संयोजक प्राचार्या सौ. जयश्री आठवले यांनी पत्र परिषदेत दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *हिमाचल प्रदेशातील शिमल्यात जोरदार हिमवृष्टी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पोंडेचेरी- पोंडेचारीमध्ये 1 मार्चपासून लागू होणार प्लॅस्टिकबंदी, मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *हैदराबाद : तीन दिवसीय पतंग महोत्सवाला आजपासून सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकर संक्रांती निमित्त लेख* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_12.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दुर्गा खोटे* दुर्गा खोटे मराठी अभिनेत्री होत्या. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. १९६0) चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले. दुगार्बाई यांचा जन्म १४ जानेवारी १९0५ साली झाला. दुर्गा यांना लहानपणी बानू असे म्हणत होते. त्यांना दोन बहिणी होत्या. एका बहिणीचे नाव इंदू व दुसर्या बहिणीचे नाव शालू असे होते. कांदेवाडी या गावात दुगाबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचा तेथे वाडा होता. तो वाडा लहान बानू यांना खूप आवडायचा. तेथील वातावरण अतिशय आनंदी होते. दुर्गा यांची काकू काकीबाई ह्यांनी सर्व पोरांचा सांभाळ केला. त्या खूप प्रेमळ होत्या. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) अजमेर शहर कोणत्या सुफी संताशी संबंधित आहे ?* ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती *२) जालियनवाला बाग कोणत्या शहरात आहे ?* अमृतसर *३) भारतातील पहिल्या रेल्वेचा प्रवास कधी सुरू झाला ?* १६ एप्रिल १८५३ *४) आपल्या सौर परिवारात किती ग्रह आहेत ?* 8 *५) प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?* आत्माराम पांडुरंग *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुनील मुंडकर ● तानाजी कांबळे ● शिवहार चपळे ● पवनकुमार तिकटे ● दीपक उशलवार ● बालाजी माळवदकर ● सुधाकर कदम ● कैलास तालोड ● रमेश बंडे ● राजू वाघमारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भास* वागणं अन् बोलणं विरोधाभास असतो एखादा बोलण्यातच फक्त खास असतो वागणं अन् बोलणं एक असलं पाहिजे बोलण्यापुर्त फक्त नेक नसलं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महाभारतातला सर्वोत्कृष्ट निर्णय म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णाला आपल्या पक्षात घेणे. श्रीकृष्णाला भेटायला अर्जुन आणि दुर्योधन गेले असता, झोपलेल्या भगवंताला पाहून,'मी एवढा मोठा सम्राट , याच्या पायाशी का बसू ? असा अहंकार निर्माण झालेला दुर्योधन उशाशी बसला, आणि उशीरा आलेला अर्जुन पायाशी. श्रीकृष्णासारखा बलाढ्य राजा, धूर्त राजकारणी, विद्वान मित्र आणि अपराजित योद्धा आपल्या बाजूने असावा, असे कोणाला वाटणार नाही?* *जागे होताच समोर बसलेल्या अर्जुनाला त्यांनी प्रथम मागणी विचारली. उशाशी बसलेला दुर्योधन 'मी प्रथम आलोय, आधी माझे ऐका' असे म्हणताच,'पण मी अर्जुनाला आधी पाहिलयं म्हणून त्यानेच पहिल्यांदा मागावे.मी आणि माझे सैन्य यातील एक गोष्ट आपणांस मिळेल, शिवाय मी प्रत्यक्ष युद्ध करणार नाही, मी फक्त सारथ्य करीन. तरीसुद्धा अर्जुनाने भगवंताला मागितले व दुर्योधनाने दहा हजार अक्षौहिनी सैन्य मिळाल्याचा आनंद ऊपभोगला खरा. पण त्यामुळे 'शक्ती' दुर्योधनाकडे आणि 'युक्ती' अर्जुनाकडे गेली. 'शक्ती'पेक्षा 'युक्ती' श्रेष्ठ ठरली. अर्जुनाचा 'भक्ती'पूर्ण निर्णय विजयी ठरला. शांत, धीरगंभीरपणे घेतलेले निर्णय इतिहास निर्माण करू शकतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आतम अनुभव जब भयो, तब नहि हर्श विशाद चितरा दीप सम ह्बै रहै, तजि करि बाद-विवाद। सारांश जेव्हा हृदयात परमात्म्याची अनुभूती होते तेव्हा सर्व सुख-दु:ख विषयक वाद आपोआप नाहीसे होतात. सुख आणि दु:ख हे केवळ मानवी मनाचे खेळ आहेत. मानवी मनाच्या प्रवृत्तीनुसार सुख- दु:खाच्या भावना निर्माण होत असतात. माणसाचे मन शांत व स्थिर असेल तर समाधानाची भावना वाढीस लागते. मनाची बेचैनी अस्थिरता निर्माण करते. मन शांती नाहीशी होते. व त्यातून आपल्याकडे काहीतरी नसल्याची मनाला टोचणी लागते. ही अवस्था म्हणजेच दु:ख. स्थिर मनोवस्थेतला माणूस अर्धवट अवस्थेतल्या प्याल्याकडे अर्धा भरलेला आहे म्हणून सकारात्मकतेने पाहतो. त्याला त्यात समाधानाची प्राप्ती होते. उर्वरित अर्धा प्याला भरण्यासाठी तो आनंदाने सामोरा जातो. ही समाधानावस्था जगणं सुसह्य करते. याउलट असमाधानी माणूस हावरटासारखा त्या प्याल्याकडे अर्धा रिकामा असल्याची खंत मनी घेवून मनाला आणखी अस्थिर करून टाकतो. त्याचा अधाशी दृष्टीकोनच त्याच्या जगण्यातील आनंद नाहिसा करतो. जीवनाकडे उदासीनतेने पाहिले की नैराश्य पदरी पडतं. सुख आणि दु:ख जीवन मार्गातले चढ उतार आहेत. उल्हसित मनानं पुढं सरकत राहिलं की ती लिलय्या पार होतात. ही अनुभूती घेवून पुढं जाता आलं पाहिजे. स्वत:च्या ठायी असणारा ठाम आत्मविश्वासंच आपल्या जगण्याला सुंदर आकार देत असतो. आत्मविश्वास असणार्या माणसाचं जीवन नंदा दीपासारखं अखंडितपणे तेवतं असतं. विधायक वृत्ती अंगिकारली की त्याचे जीवन विषयक विचार सत्याला नाकारत नाहीत. मनाची दोलायमान अवस्था नाहिशी होवून जाते. सत्य, शिव, व सुंदराची अनुभूती येवू लागते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता, प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात. पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दर्शन - Visions* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बिरबलाची युक्ती* एकदा दरबार चालू असताना बादशहाच्या मनात एक विचार आला .त्याने दरबालातील सर्व कामे बाजूला ठेऊन बिरबलाला विचारले ,बिरबल एखाध्या नालायक माणसासमोर गाठ पडली तर काय करावे ? बिरबल खूप कामात होता .कामाच्या वेळी बादशाहने असा विचित्र प्रश्न विचारलेले बादशाहाला आवडले नाही .परंतु काहीही न बोलता त्याला गप्प बसून आपले कामही करता येण्या सारखे नव्हते "महाराज आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपलेला ह्याच वेळी मिळेल बिरबल दरबारातील आपल काम उरकून घरी गेला आपल्या एका मित्राला घरी बोलवलं तो म्हणाला उद्या तू माझ्या बरोबर बादशहा च्या दरबारात ये बादशहा तुला प्रश्न विचारतील तू काही बोलू नकोस बादशाहने कितीही प्रयत्न केले तरी तू तोंड उघडू नकोस घरी आल्यावर मी तुला इनाम देईन दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन बिरबल बादशहा च्या दरबारात गेला बादशाहाला मुजरा करून तो म्हणाला खाविंद आपल्या कालच्या प्रश्नाच उत्तर माझा हा मित्र देईन .विचारा त्याला प्रश्न .बादशाहने त्याला प्रश्न विचारला एखादया नालायक माणसाशी गाठ पडली तर शहाण्या माणसाने काय करावे? बिरबलाचा मित्र काही न बोलता चुळबुळ करत राहिला बादशाहने आपला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला परंतु बिरबलाचा मित्र गप्पच शेवटी बादशहा चिडला तो बिरबलाला म्हणाला ख काय मूर्ख पणा चालवला आहे .तुझा मित्र तर काहीच बोलत नाही .बिरबल नम्र पणे म्हणाला खाविंद माझ्या मित्र ने आपल उत्तर दिले आहे .नालायक माणसाबरोबर गाठ पडली तर गप्प राहावे.बादशाहाला उत्तर मिळाले .परंतु बिरबलाने आपलेला नालायक ठरविल्या मुळे तो मनातून खजील झाला . *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment