✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/01/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९६ - भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या. १९९८ - ज्येष्ठ उर्दू कवी व लेखक अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. २००८ - टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण 💥 जन्म :- १९४६ - कबीर बेदी, भारतीय अभिनेता. मृत्यू १९०१ - महादेव गोविंद रानडे, भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ १९०५ - दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर १९५४ - बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार. १९८८ - लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ. २००१ - पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता. २००३ - रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपती 💥 मृत्यू :- १९३८: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चटोपाध्याय १९५४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर २०१८ - विधान परिषदेचे माजी सभापती, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा.ना.सि.फरांदे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - सातव्या वेतन आयोगाचे लाभ शिक्षकांनाही मिळणार, केंद्र सरकारकडून 1 हजार 241 कोटींची तरतूद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानातील ३३ पोलीस कर्मचाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती, गडचिरोली भेटीत पोलीस महासंचालकांकडून मंजुरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मध्यमवगीर्यांना दिलासा देत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लवकरच करमुक्त उत्पन्नाची र्मयादा दुपटीने वाढवत पाच लाख करण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नांदेड : आजपासून नांदेडात शिक्षणाची वारी होणार प्रारंभ, पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते होणार उदघाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग, कुमारस्वामी यांच्या सरकारला धक्का, दोन अपक्ष आमदार शंकर, नागेश यांनी काढला काँग्रेसचा पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार विराट कोहलीचे शतक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे अर्धशतक, याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे* प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर* द.रा. कापरेकर हे देवळाली (नाशिक) मध्ये राहणारे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रँग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२ मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे. महाविद्यालयीन स्तरावर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध होतात, पण शालेय स्तरावर आणि शाळा मास्तरांकडून असे लेख लिहिले जाणे अतिशय अपवादात्मक असते. दत्तात्रेरय रामचंद्र कापरेकर यांचे लेख हे त्यांतले एक होते. १९७५ साली अमेरिकेतील प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांच्या संशोधनावर आधारित Mathematical Games या सदराखाली Scientific American या मासिकात लेख लिहिला, आणि द.रा. कापरेकर भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) मानवी डोक्याच्या कवटीत असणार्या हाडांची संख्या किती ?* आठ *२) नॉनस्टीकच्या भांड्यावर कशाचा थर असतो ?* टेफ्लॉन३ *३) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करतं ?* लहान मेंदू *४) कोणत्या अवयवाची त्वचा सर्वात पातळ असते ?* डोळा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● साईनाथ सायबलू, सहशिक्षक, धर्माबाद ● सचिन होरे, धर्माबाद ● किरण शिंदे ● ज्ञानेश्वर मोकमवार ● भीमसंदेश पतंगे ● रमेश सरोदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पत्रकार* सर्व सामान्याचे प्रश्न शासनापुढे मांडत असतो जनतेच्या हक्कासाठी तत्त्वाने भांडत असतो सामान्याचे प्रश्न सोडवते तुमच्या हातची लेखणी न्यायासाठी लढून ती अधिकच होते देखणी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.* *याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील, विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली नावाखालीही विश्वासाला नख लावणे सुरू झाले. मॅथ्यू अरनाॅल्ड हा कवी मानवी जीवनातील विश्वासाची व्याप्ती व खोली स्पष्ट करण्यासाठी समुद्राची प्रतिमा वापरतो. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीराचे बोल ———————— पर नारी पैनी छुरी, मति कौई करो प्रसंग रावन के दश शीश गये, पर नारी के संग। सारांश पर नारी तीक्ष्ण धार असणार्या सुरीसारखी असते. तिच्या सोबत संगती करता कामा नये. तिच्या सोबत संग करणे तर दुरच राहिले. परनारीचा मनात निर्माण विचारही माणसाची शांती व समाधान हिरावून घेतो. आमचं लोकबोलीचं धन म्हणजे संस्काराचा ठेवाच आहे. जात्यावरच्या ओव्या मधून सुद्धा संस्काराचं दर्शन घडतं. घरची अस्तुरी जसा हळदीचा गाभा पराया नारीसाठी रहातो वळचणीला उभा । पोथी पुराणांमधून परनारीचा मोह बाळगणार्यांची काय अवस्था होते, याचे दाखले वाचायला मिळतात. महारती लंकाधीश राजा रावनाने मंदोदरी सारखी पतिव्रता पत्नी असताना परनारीचा मोह केला. सीता पळवून नेली गेली. सीतेचा शोध घेताना क्रोधीत हनुमानाकडून लंका दहन केली जाणे, राजा रावणाचीच दाडी जाळली जाणे. यातूनही सावध न होण्यामुळे रामायण घडले . क्षुल्लक कुंभकर्णासारखा बलशाली भाऊ, इंद्रजितासारखा कुशल मुलगा मारल्या गेला. मोहापायी राज्य बुडालं सेना मारल्या गेली. रावणाची दहाही शीरं उडवल्या गेली. परनारीच्या नादात अख्ख्पा साम्राज्याचा विनाश झाला. तिथं सामान्य माणसाचं काय होईल ? याची कल्पनाच न केलेली बरी. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समाधान - Solution* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्ञानवर्धक बोधकथा* गौतम बुद्धा सोबत एक लहान मुलगा बसलेला असतांना त्यावेळेस तिथून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने गौतम बुद्धाना विचारले "तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" बुद्ध म्हणाले"तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोड्या वेळा नंतर त्या नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच गौतम बुद्धानां म्हणाला " तो बघा आजून एक चोर आला", गौतम बुद्ध म्हणाले "तो राजा आहे." मुलगा गौतम बुद्धाना म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे." गौतम बुद्ध म्हणाले "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे नेतील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे." "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विकार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment