✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📱 9423625769 📅 दि. 04/01/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन* 💥 ठळक घडामोडी :- १८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले. २००४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली. 💥 जन्म :- १९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री १९३७ - सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १८५१ - दुसरे बाजीराव पेशवे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• ••••••••••••••••••••••••••••••••••••• 1⃣ *इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते उद्घाटन हा मराठी सारस्वतांचा अपमान; यवतमाळचे मराठी साहित्य संमेलन उधळून लावण्याचा मनसेचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गेल्या दोन वर्षात उत्तर प्रदेशात एकही दंगल झाली नाही- योगी आदित्यनाथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजना सावंत यांची बिनविरोध निवड, स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आणखी 900 गावांत दुष्काळ जाहीर होणार; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, राज्य सरकारकडून आज किंवा उद्या जीआर काढला जाण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *महात्मा फुले दांपत्याला भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नाटककार महेश एलकुंचवार यांना राज्य शासनाचा यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारत 4 बाद 303* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *भाग अकरावा* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_31.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कवयित्री इंदिरा संत* इंदिरा संत (जानेवारी ४, १९१४, इंडी - जुलै १३, २०००, पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) महाराष्ट्राचा कोणत्या खनिज साठ्यात भारतात प्रथम क्रमांक लागतो?* 👉 मॅगनीज *२) मदर तेरेसा यांचे संपूर्ण नाव काय?* 👉 मेरी तेरेसा बोझॉंक्झ्यु *३) दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?* 👉 सिंकदराबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बालाजी डिगोळे, अहमदपूर अंकुशराजे जाधव माधव बोइनवाड, येवती चंद्रभीम हौजेकर, धर्माबाद राजेश कुकूटलवार निलेश आळंदे माधव सूर्यवंशी, मुंबई *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उजेडाची लेक* सावित्री उजेडाची लेक तू चैतन्याचा ध्यास आहेस सावित्री तू स्त्रीमुक्तीचा खरा खरा श्वास आहेस तुझ्या जन्मामुळे स्त्रीला आज मोकळा श्वास आहे तुझ्यामुळे नारी नरात ख-या अर्थाने विश्वास आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण प्रत्येकाच्या घरीदारी सुख, शांती, समृद्धी नांदो अशीच प्रार्थना करीत असतो. एकमेकांना शुभेच्छा देतो. हीच गोष्ट जर पदोपदी जीवनभर आमच्या ठायी वसली, तर कष्टप्रद जीवनाचे आनंदवन व्हायला फार वेळ लागणार नाही. तशी प्रत्येकाला उजेडाची आस असते. म्हणून तो प्रकाश आणि सत्याची आस भाकतो, पण डोक्यात कुठल्या नं कुठल्या प्रकारचा अंधार असतो. जेव्हा हा अंधार पूर्णत्वाने दूर होतो, त्यावेळी ती व्यक्ती तेजाने उजाळते आणि अनेक पिढ्यांना प्रकाशमान करते. आपल्या मेंदूतले असे सारे अंधारे कोपरे उजळून निघावेत नि आपल्यातला माणूस तेजाने तळपू लागावा, यासाठी आपण दिपदान का मागू नये ?* *जळणं वा तेवणं हे जिवंत असल्याचं द्योतक. परंतु दिव्याचं जळणं हे कधी त्याच्यासाठी नसतं. ते इतरांना प्रकाश देण्यासाठीच जळत असतात. इतरांना उजाळण्यातच त्यांच्या जळण्याची सार्थकता असते. लहानपणी दिवाळसणाला तांड्यातल्या मुलींचे उजेडाचे गाणे ऐकले आहे. या मुली अंधारून आलेल्या अमावस्येला रात्रभर तांड्यातल्या प्रत्येक दारी हातात दिवा घेऊन प्रेम, जिव्हाळा व्यक्त करतात. हाच दिवा हातात घेऊन जळता ठेवण्याचं नि उजेडाचं गाणं आजन्म गाण्याचं वचन जर आम्ही प्रत्येकाने स्वत:ला दिले, तर ख-या अर्थाने अंधारावर उजेडाने आम्ही मात करू.!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• लिखा लिखि की है नाहि, देखा देखी बात दुलहा दुलहिन मिलि गये, फीकी परी बरात। सारांश विधात्याला जाणून घ्यायचं असेल तर केवळ पोथ्या पुराणे वाचून तो कसा काय कळणार ? वाचन व श्रवणात माणूस परमात्म्याच्या मुळ रूपापेक्षा त्याच्या कपोल कल्पित व वर्णनातून रंगवून चढवून सांगितलेल्याच रूपाभोवती घिरट्या मारीत राहातो. पुस्तकातून रंगवलेल्या कथा ह्या विधात्याच्या थोड्याच आहेत. त्या तर मानवाच्या पूर्वजांच्या. तत्कालीन राजा महा राजांच्या युद्ध प्रसंगाच्या , सत्ता विस्ताराच्या , अधिराज्य प्रस्थापित करण्याच्या . दोन विचार प्रवाहातील संघर्षाच्या. भावबंदकीच्या कलहाच्या . महाकाव्यातल्या पात्रांनाच माणूस देवाची रूप माणू लागला. त्यांचीच उपासना करू लागला. मुळ विश्व व्यापक परमात्मा पंच महाभुतात सामावलेला. सृष्टीचालक मुळ ईश्वर बाजुलाच राहून गेला. मंगेश पाडगावकरांच्या गीत पंक्ती किती बोलक्या आहेत. कुढे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला राहिला हृदयातून उपाशी.. देव बोलतो बाळ मुखातून देव डोलतो उभ्या पिकातून कधी होवून देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी अवतीभवती असून दिसेना शोधितोस आकाशी.... खरे तर परमात्मा ही पाहाण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवण्याची बाब आहे . जेव्हा वधू वराची एकत्र गाठ मारली जाते तेव्हा वर्हाडी व वरातीचं आकर्षण नाहिसं होतं तसं ईश्वराच्या मुळ स्वरुपाशी एकरूपता साधताच वरवरच्या भाकड गोष्टींचा लेप आपोआपच गळून जातो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चंदन आणि संत यामध्ये खूप काही साम्य आहे.ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात राहिलो तर चंदनाचा सुगंध आपल्या अंगाभोवती असल्याचे किंवा अंगाला येत असल्याचे जाणवते व आपणच चंदन झालो आहोत असे वाटायला लागते.चंदन जेव्हा सहानेवर पाणी टाकून घासायला लागतो तेव्हा ते स्वत: झिजायला लागते आणि त्याचा गंध सर्वत्र दरवळायला लागते. चंदनाचा गुण जसा आहे तसाच संतांचाही आहे.संतांच्या सहवासात जर आपण राहिलो तर आपल्या जीवनातले सारे दुर्गूण नष्ट होण्यास मदत होते तर त्यांचा सहवास आपल्याला चंदनासारखा नेहमी हवासा वाटायला लागतो.संत हे स्वत: जगाच्या कल्याणासाठी अविरत आपला देह झिजवतात ते स्वत:साठी जगत नाहीत तर आपल्या ईश्वराप्रती प्रेम निर्माण व्हावे,आपण सन्मार्गाला लागावे,आपण मानवतेच्या दृष्टीने आपल्याकडून काहीतरी चांगले कर्म घडावे.आपल्यातला खरा माणूस जागा व्हावा.आपला जन्म इतरांच्या काही चांगल्या कारणी लागावा यासाठी नेहमी सांगत असतात झिजवत असतात.चंदन आणि संत हे दोघेही तितकेच मानवाच्या जीवनात महत्वाचे आहेत.म्हणून चंदन आणि संत यांच्यात साम्य आहे आणि यांचा सहवास नित्य राहिला तर नक्कीच आपले कल्याण होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संपर्क.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रवचन - Discourse* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कृती महत्त्वाची* स्वामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं. सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘ ‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले. ’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला. ‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! सर्व श्रोते थक्क झाले. *तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment