✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९७२ -गुआममध्ये १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते. १९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले. 💥 जन्म :- १९१२ - केनेथ वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९१५ - जॉन ट्रिम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९१६ - व्हिक्टर स्टॉलमायर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९६६ - होमी भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. २०११ - पंडित भीमसेन जोशी, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : 6 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या याचिकांवर अंतिम सुनावणीस होणार सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण 4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत भरती केली जाणार अशी माहिती रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी खेळी; प्रियांका गांधींवर मोठी जबाबदारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचं उद्घाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा आठ गडी राखून विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राम गणेश गडकरी* मराठी साहित्याचे शेक्सपिअर म्हणून ओळखले जाणारे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, आणि भावबंधन ही चार पूर्ण नाटके लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. त्यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. पुण्यात महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी किलरेस्कर नाटक मंडळीत दाखल झाले. रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या करमणूक नियतकालिकातून ते कविता, लेख, नाटके लिहू लागले. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीघार्युषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, पण गडकर्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'वर्ल्ड वाईड वेब कॉन्सोर्टीअम' या संस्थेला कोणत्या नावाने ओळखतात ?* डब्ल्यू ३ सी *२) देशात अवयवदानात अग्रेसर असणारं राज्य कोणतं ?* तामिळनाडू *३) 'कवी बी' हे कोणाचं टोपणनाव आहे ?* नारायण गुप्ते *४) न्यायमूर्ती सरकारिया आयोग कशासाठी स्थापन केला होता ?* केंद्र-राज्य संबंध ५) कोणत्या वेदामध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख आहे ?* ऋग्वेद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● राहुल तांबे, मुंबई ● सोनू राजेंद्र येरमलवाड, येवती ● प्रशांत उकिरडे, बार्शी ● रेश्मा कासार, पुणे ● सिध्दांत मनूरकर, पाथर्डी ● योगेश फत्तेपुरे, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसं* आपलीच माणसं आपल्याला टाळतात लपून छपून माघारी आश्रूही ढाळतात आश्रूच ढाळायचे तर टाळायचे कशाला टाळण शक्य नसल्यास पाळायचे अशाला शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *स्वत:चं मरण पाहता येत नाही, इतरांच्या मरण्यातूनच हा अनुभव येतो. मृत्यू अटळ आहे, हे कळलेलं असतं. मरण आपल्या जाणिवेत केव्हा प्रवेश करतं ? घरात, शेजारी जेव्हा कुणाचा मृत्यू होतो तेव्हा. प्रत्येकजण या अनुभवातून जातो. मग सुरू होते आपले मरणरंजन. मरणाचे भय वाटत नाही, पण मरावेसे वाटत नाही. इतकी वर्ष जगलो, खूप झाले. तरी अजूनही जगावेसे वाटते. याचे काय उत्तर देणार ? आपले अध्यात्म जन्म-मरणाचा फेरा चुकवायला सांगतं. हा फेरा चुकविणे म्हणजे 'मोक्ष'. हीच 'मुक्ती.'* *निद्रा म्हणजे मरणाची छोटी आवृत्ती असते. आपण निद्रा घेतो म्हणजे नेणिवेच्या प्रांतात सुखनैव संचार करतो. तिथे सुखदु:खाचे भान नसते. निद्रा-जागृतीचा हा खेळ आपण नेहमीच खेळतो. झोपेत स्वप्न पडतात, ती जागेपणी आठवतात. अर्थ इतकाच, की आपण संपूर्णपणे जाणिवेच्या बाहेर गेलेलो नसतो. निद्रा ही विश्रांती आहे म्हणून आपणांस तिचे भय वाटत नाही.* *मरण हीसुद्धा अशीच निद्रा आहे...पण ती अंतिम, चिरनिद्रा आहे. मरण ही वस्तुस्थिती आहे. मरणाची भितीदायक कल्पना दूर सारून मूळस्वरूप न्याहळणे म्हणजे 'मरणसौंदर्य' पाहणे. एखादे ज्ञानेश्वर किंवा तुकारामच हे करू शकतात. मरणातील मरणपण काढायचे तर मरणापाशी समरस झाले पाहिजे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रात गवई सोय के दिवस गवाया खाय | हीरा जन्म अनमोल था , कौड़ी बदले जाय || अर्थ : महात्मा कबीर मनुष्य जन्माची दुर्लभता पटवून देतात. सर्व प्राणीमात्रांमध्ये मानव जन्म दुर्मिळ असून विश्वाची चिंता वाहण्याचं सामर्थ्य फक्त मानव जन्मातच आहे. मानव प्राणी चिंतनशील व विचारशील आहे. इतरांपेक्षा मानवाला बुद्धी आणि बोलीच वरदान लाभलेलं आहे. त्यामुळे तो जगताची काळजी वाहू शकतो. भल्या वाईटाचा विचार करू शकतो,परंतु हल्ली मानव स्वार्थांध झाला आहे. जग आपल्यामुळं सुंदर होवू शकतं. हा भावही तो जणू विसरूनच गेलाय की काय ? अशी परीस्थिती बनलीय. मानवाने विवेकी अन निरामय जगण्यातच त्याची जीवन सार्थकता आहे. परंतु हे मानवा तू देह विलासी बणून रात्र झोपून आळसात गमावत आहेस. दिवसचे दिवस देह शृंगारात व जिभीचे चोचले पुरवण्यातच तू मश्गूल होवून संपवून टाकत आहेस. अशा प्रकारे तू हिर्यासमान असणारा अनमोल असा मनुष्यजन्म उगाच कौडीचेही सार्थक न करता व्यर्थच वाया घालवत आहेस. अशा प्रकारे तुझ्या या जन्माला अर्थच काय राहिला बरे ? असे जगणे तर सर्लच पशू पक्षीही जगत असतात. पुढील संत सुवचन पहा. गेला गेला रे जन्म वाया । फुकाची झिजवली काया । नाही केला रे विचार । नराचा झाला रे खर । एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रुबाबदार - Bourbon* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जंगलचा राजा !* एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.अस्वलाला वाटलं...'आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.'अस्वलानं ठरवलं... आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही तसंच करायचं. जंगलचा राजा व्हायचं. तेव्हापासून रोज ते अस्वल, सिंहाच्या पाळतीवर राहिलं. लांबून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं. सिंहाचं ऐटित चालणं. झाडाखाली त्याचं डौलदार बसणं. सिंहाची भरदार आयाळ. त्याचं राजा सारखं जंगलात फिरणं.पण, चार-पाच दिवसात अस्वल कंटाळलं. अस्वलाला वाटलं...खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे. कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे. सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे.माझ्यातर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे. आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की! जंगलामधे फिरतोच की!पण... मला सिंहासारखं चालता येत नाही म्हणून मी जंगलचा राजा होत नाही! मी सरळ चालतना मागे वळून पाहात नाही म्हणून जंगलचा राजा होत नाही! बस्स!! आता ठरलं तर... आज पासून चालताना मधे-मधे मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं. आपण चालताना मागे वळून पाहातो, हे इतर प्राणी पाहतात की नाही? हे पण पाहू लागलं. 'मी किती जाडजूड आहे पाहा. माझी अंगभर आयाळ पाहा. माझं रुबाबदार चालणं पाहा. आता तरी मला राजा म्हणा..असं भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं.पण... तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात.अस्वलाच्या पाठी हेच प्राणी ख्वॅ ख्वॅ, फॅक्वॅक फॅक्वॅक करुन हसायचे. शेपट्या हलवून, तोंडं वाकडी करुन त्याला चिडवायचे.अस्वल वैतागलं. भलतंच चिडलं. चराचरा केस खाजवत, कराकरा दात चावू लागलं.अस्वलाने ठरवलं... 'आजच काय तो फैसला करू. जंगलातल्या या चुटूक पुटूक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपला रुबाब, आपली चाल त्या सिंहालाच दाखवू. सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ. माझी राजेशाही चाल पाहताच सिंह आपोआपच मान खाली घालून जंगलातून निघून जाईल. मग या जंगलचा मीच राजा होईन!! अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं. सिंह झाडाखाली सुस्तावला होता. अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन ऊभं राहिलं. सिंहाने शेपटी उडवत अंगावरच्या माशा हाकलल्या. मान वाकडी करत डाव्या पायाने आयाळ खाजवली.अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चाललं. म्हणजे थोडसं चालून त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं. चालताना सिंहासारखं ऐटित चालण्याचा प्रयत्न केला.आता... 'हा कोण नवीन रुबाबदार राजा?' असं म्हणत सिंह चवताळून उठेल. किंवा... आपली ऐटबाज चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल, असं अस्वलाला वाटलं होतं.पण.... सिंहाने अस्वलाकडे पाहिलं ही नाही! त्याला काही किंमतच दिली नाही. सिंह आपल्याच मस्तीत होता. सिंह आरामात शेपटी उडवत माशा हाकलवत होता. आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. त्याने उजव्या हाताची नखं झाडावर कराकरा घासली. अस्वलाने ठरवलं... आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच. राजा सिंह सरळ चालताना मधे मधे मागे वळून पाहातो. ठीक आहे. पण आपण आता.. मागे मागे बघतच सरळ चालायचं. आणि जंगलचा राजा व्हायचं. अस्वल मागे मागे पाहात पुढे चालू लागलं. राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्यात पडलं! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment