✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/01/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात. २००६ - शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह कुवैतच्या अमीरपदी. 💥 जन्म :- १८७१ - चंद्रशेखर शिवराम गोर्हे, बडोदा संस्थानचे राजकवी. 💥 मृत्यू :- १९५० - अहमद अल-जबर अल-सबाह, कुवैतचा अमीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घोषित होऊ शकतात. अधिकृत सूत्रांची माहिती * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्य शासनाच्या वतीने मुंबईतील आयआयटी पवई येथे २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २0१९ या काळात चौथ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे आयोजन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुणे - साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यांवर कारवाईचे तसेच शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात केला प्रवेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ, सोन्याच्या दरात ३५० रुपयांची वाढ होत तो प्रति १० ग्रॅम ३३ हजार ६५० रुपयांवर पोहोचला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंडविरुद्ध तिसर्या कसोटीत विराट आणि रोहितने दुसर्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयाची हॅट्ट्रिक, मालिकेवर कब्जा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ऑफरचा भुलभुलैय्या* कमी श्रमात जास्त संपत्ती मिळावी असे प्रत्येक मनुष्याला वाटणे म्हणजे आपल्या अंगात असलेल्या आळशीपणाला उत्तेजन देणे होय. ज्या ज्या वेळी मनुष्य असे प्रयत्न करत आला आहे त्या त्यावेळी त्याला उदासीनते शिवाय काहीही मिळाले नाही. तरी सुद्धा माणूस अश्या घटनेतून काही बोध न घेता पुन्हा तश्याच काही बाबीच्या शोधात राहतो. मी गोष्ट करतोय ऑफरची. रस्त्याने जाता येता ....... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवरून ब्लॉगला भेट द्यावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/01/blog-post_28.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चंद्रशेखर शिवराम गोर्हे* चंद्रशेखर शिवराम गोर्हे तथा कवी चंद्रशेखर यांचा जन्म 29 जानेवारी 1871 रोजी झाला. ते मराठी कवी होते. यांचे शिक्षण नाशिक, वडोदरा आणि पुणे येथे झाले. त्यांनी वडोदरा येथे वैद्यकीय खात्यात लेखनिकाची नोकरी केली. आयुष्याच्या अखेरीस बडोदा संस्थानाचे ते राजकवी झाले. चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचा अलीकडच्या काळातील एक अवतार, असे त्यांना म्हटले जाई. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणूस त्याच्या कर्माने मोठा होतो जन्माने नव्हे - आर्य चाणक्य *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) वैदिककालीन देवतांमध्ये कोणती देवता सूर्याची आई म्हणून पुजली जाते ?* आदिती *२) 'स्त्री विचारवती' ही सामाजिक संस्था कोणी स्थापन केली ?* सरस्वती गणेश जोशी *३) कवितेचा आशय आणि अभिव्यक्तीमध्ये आमूलाग्र बदल म्हणजे कोणतं काव्य ?* नवकाव्य *४) 'अजेंडा २१' हा पर्यावरणविषयक ठराव कुठे संमत झाला ?* रिओ डी जानेरो *५) जहाजबांधणीमध्ये अग्रेसर देश कोणता ?* द. कोरिया *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● मधूसुधन जाधव ● सुनील वानखेडे ● कोंडीराम केशवे ◆ नरेंद्र जोशी ◆ वीरभद्र करे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आनंद* ज्याचे दु:ख त्यालाच इथे भोगावे लागते दु:खात ही आनंदाने सदा जगावे लागते दु:खात आनंदाने जगतो तो खरा आनंदी आहे आनंदातही रडतो कूढतो तो विचारांचा बंदी आहे शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सत्याला 'सत्य' म्हणून ओळखा आणि असत्याला 'असत्य' म्हणून, असा संदेश गौतम बुद्धांनी दिला. सत्य या शाश्वत मूल्याचा वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील आचारासाठी माणसाचं विवेकी मन हाच मूलाधार असतो. वस्तुत: माणसाला सत्य सहज कळतं. सत्य पाहण्याची, बोलण्याची वा कृती करण्याची रूची स्वाभाविक असते. माणूस आसक्तीत अडकला की खोट्या, असत्य, अप्रामाणिकपणाची पुटं मनावर चढतात. विवेक हरपतो. तोंडानं सत्याचा पुरस्कार परंतु आचरण मात्र असत्य. उच्चार-आचार यात पूर्णत: विसंगती. लग्नातील सातवी प्रतीज्ञा आहे, "सखा सप्तपदी भव" म्हणजे विवाहानंतर स्त्री व पुरूष यांच्यात मालक आणि नोकर असा भाव असता कामा नये. पती व पत्नी यांच्यात सख्याची -मैत्रिची भावना हवी. समानतेचा, कधीही न तुटणारा ऐक्याचा सख्य संबंध हवा. परंतु सत्यपालनाचे आचरण किती घडतं.* *सत्यनिष्ठेनं, सत्य आचरणानं खरंतर माणसाचं ह्रदय व्यापक होतं. अंत:करणात प्रेमभाव वाढतो. वैरभावनेचा लोप होतो. आत्म्याचा विकास होतो. सत्य हे सर्व समर्थ असल्यानं जगण्यातील विश्वास बळावत जातो. व्यापक अर्थानं सत्याचं पालन करण्याने स्वत:चं, कुटुंबाचं जगणं अर्थपूर्ण ठरतं, आनंददायी होतं.* *दुष्ट कर्म तुम्ही, अजिबात टाळा !* *पुढे नाही धोका, मुलांबाळा ॥* *सद्यस्थितीत देशात सत्य आचरणाच्या बाबतीत सर्वत्र अंधार दिसतो. सत्याचं पालन करणं हीच सर्वोत्तम समाजसेवा हा विचार रूझला तरच असत्याचा अंधार मिटून सत्याचा सूर्योदय नक्कीच होईल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नारी मदन तलाबरी, भव सागर की पाल नर मच्छा के कारने, जीवत मनरी जाल। महात्मा कबीर परनारी व नारीचा अतिसंग बरा नव्हे हे पटवून देताना म्हणतात . नारी वासनेचा तलावात या भवसागरात माया जालात बुडवून टाकते. माशानं सफाईदारपणे पोहत जलाशयी स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतू तो फसव्या गळांच्या नादी लागून स्वत: शिकार्याच्या तावडीत जातो. तसे पुरूषाला आपल्या जाळ्यात जखडून ठेवण्याचं काम स्त्री करीत असते. त्या मुळे स्त्री संगापासूम सांभाळून राहिलं पाहिजे. संन्याशी व ब्रम्हचार्यानं स्त्री सान्निध्यात राहून स्वत:ला सुरक्षित ठेवणं महा कठीण काम. आगीजवळ राहून लोण्यानं आपलं अस्तित्व कायम जपता येईल का ? तशातलाच हा प्रकार आहे. जप तपात आकंठ बुडून गेलेल्या ऋषी मुनींच्या जन्मभर केलेल्या तपश्चर्येला क्षणात भंग करण्याचं काम नारी सान्निध्यानं केलं आहे. ऋषी विश्वामित्राची तपश्चर्या मेनकेने नाहीशी केली होती , विभांडक ऋषींची तपश्चर्या भंग करण्याचं काम उर्वशीने पूर्ण केले होते. क्रोधी व कोपीष्ट म्हणून ख्याती असणार्या पराशरांचंही सत्यवतीपुढे काहीही चाललं नाही. अशी असंख्य उदाहरणे आपणास पोथी पुराणातून पाहता येतात. तेव्हा साधक , ऋषी, मुनींचाही निभाव न लागू देणार्या नारीपुढे सामान्यांचं काय खरं आहे? एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनाच्या जीवनप्रवासाची प्रत्येक वाट ही सरळ असतेच असे नाही तरीही मनुष्य त्या वाटेवरुन चालतच असतो आणि चालायलाच हवे.त्याच्याशिवाय जीवनप्रवास कसा आहे हे कसे समजणार ! त्या वाटेवरील चढ उतार कसा आणि किती आहे हे तरी कसे समजणार.चढ जास्त आहे म्हणून थांबायचे नाही आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही आणि उतार आहे म्हणून संथगतीने ही चालायचे नाही.कमीजास्त असले तरी त्याचपध्दतीने मार्गक्रमण करायचे.जोपर्यंत आपला जीवनप्रवास चालू राहील तोपर्यंत आपण न थकता तेवढ्याच आत्मविश्वासाने निरंतर चालायचे तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे नाही तर आपल्या जीवनाची दिशाच बदलून जाऊन पदरी घोर निराशाच स्वीकारावी लागेल.काळ जसा सातत्याने पुढे पुढे चालत जातो तसा आपला जीवनप्रवासही सतत पुढे पुढे चालू द्यावा. किंचितही अडथळा आला तरी ती दूर करण्याची तयारी आपल्यामध्ये असू द्यावी तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे हे नेहमी लक्षात असू द्यावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🛣🛤🛣🛤🛣🛤🛣🛤🛣🛤🛣 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक - समर्थ रामदास स्वामी 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥ संकलक : सुभद्रा सानप, बीड 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गुरुपदेश* एका गुरूकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा मला गुरुपदेश द्या. त्यावेळी गुरु म्हणायचा, ‘उद्या ये.’ तो उद्या आला की म्हणायचा, ‘उद्या ये.’ असे दहा दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, ‘द्या ना गुरुपदेश !’ त्यावेळी ते म्हणाले, ‘एकटा येरे, किती जणांना बरोबर आणतोस?’ तेव्हा तो चपापला. कारण कोणीच नसायचे बरोबर. दुसऱ्या दिवशी तेच ! तिसऱ्या दिवशी तेच! शेवटी त्याने धाडस करून विचारले, ‘महाराज, मी तर एकटाच येतो, किती जणांना बरोबर आणतोस असे का म्हणता?’ ते म्हणाले, ‘अरे, मनामध्ये काय आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे !’ समर्थांनी तर प्रपंचालाच सहावा रिपू मानला आहे. आता काय करायचे? ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो, तो सहावा रिपू म्हणतात समर्थ ! मग त्याला कळले की अरे हे सगळे काढले पाहिजे चित्तातून ! त्यावेळी गुरुपदेश मिळेल. तात्पर्य :- आपले चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे. चित्तशुद्धीनंतर धर्माचरणाचा, सदाचाराचा खरा अर्थ कळतो आणि धर्माधिष्टीत अर्थ-काम सेवन केल्यावर मोक्षाचा लाभही अपरिहार्य ठरतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment