✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/01/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५६ - संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच काँग्रेस आमदारांचा राजीनामा 💥 जन्म :- १८४२ - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, अर्थशास्त्रज्ञ,समाजसुधारक, राजनीतीज्ञ. १८८९ - नाट्यछटाकार दिवाकर लेखक. १८९५ - विठठ्ल दत्तात्रय घाटे प्रसिद्ध लेखक १९७२ - विनोद कांबळी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८६ - प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक २००३ - हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक. १९४७ - कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक. १९६७ - डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ * राज्यात पुन्हा डान्स बार सुरू, सरकार डान्सबारबाबत कायद्यात बदल करणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकार नियम बनवणार - अधिकृत सूत्रांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *येत्या सोमवारी 21 जून रोजी भारतातून सुपरमून दिसणार; खग्रास चंद्रग्रहणाचीही पर्वणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कोल्हापूर- अंबाबाई मंदिरात भक्तांना आता मोफत चहा, दुपारी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मोफत चहा मिळणार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महेश एलकुंचवार 99 व्या नाट्य संमेलनाचे उद्धाटक, आज होणार अधिकृत घोषणा.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नांदेड : शिक्षणाची वारीचा आज शेवटचा दिवस,नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांची अनेक स्टॉलला भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पत्रकार हत्या प्रकरणी राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पंजाबमधील पतियाळा येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणतर्फे २१ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी औरंगाबादच्या प्रतिभावान जिम्नॅस्ट रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एका शेतकऱ्याची आत्मकथा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महादेव गोविंद रानडे* महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी झाला. माधवराव रानडे व न्यायमूर्ती रानडे नावाने प्रसिद्ध, हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली. लहानपणी माधवराव अबोल आणि काहीसे संथ होते. मात्र त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६ नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. त्यांचा मृत्यू १६ जानेवारी १९०१ रोजी झाला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) चांदी या धातूचं रेणूसूत्र काय ?* एजी *२) विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरण्यात येते ?* टंगस्टन *३) भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण ?* कैलास सांकला *४) जागतिक व्यापार संघटना केव्हापासून कार्यान्वित झाली ?* १९९५ *५) १९०९ च्या सुधारणा कायद्याचे नाव काय ?* मोर्ले मिंटो कायदा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीमती विजया वाड, साहित्यिक ● प्रभाकर कमटलवार ● रामनाथ खांडरे ● त्र्यंबक आडे ● महेश गोविंदवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राजकारण* आत वेगळ बाहेर वेगळ असलं धोरण आहे साहित्यातही पहा कसलं राजकारण आहे साहित्य क्षेत्रही त्या पासून सुटू शकत नाही राजकारणात कोणताच प्रश्न मिटूत शकत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.* *तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेता मीठा बोलना तेता साधु ना जान पहिले थाह देखि करि, औंदेय देसी आन। सारांश गोड बोलणारा प्रत्येक जण साधू असेलच असे नाही. त्यामुळे गोड बोलणार्या सर्वांनाच साधू म्हणून स्वीकारू नये. सुरूवातीला पोपटावानी गोड व खुपच आस्थेवाईकपणे बोलल्यासारखी वाटणारी बरीच माणसे अंतिमतः ढोगीरूपाने सामान्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेवून त्यांना फसवणारे साधुरूपातले लांडगेच निघाल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडलेली अाहेत. तेव्हा खरा साधू ओळखता आला पाहिजे. संताची महत्ती सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात . 'जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें ॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥ ज्यासि अपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ॥ दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥ तुका म्हणे सांगू किती । त्या चि भगवंताच्या मूर्ति ॥' समर्थांनीही सज्जनाची लक्षणे सांगितलेली आहेत. 'वेष असे बावळा परि अंतरी नाना कळा ।। अगदी अलिकडे खर्या संताचं प्रात्यक्षिकच ज्यांनी आपल्या जगण्यातून समाजाला दाखवून दिलंय ते दृष्टे सुधारक संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांनी सुधारणावादी दृष्टी घेवून सामाजिक सुधारणांचा नवा अध्याय आपल्या कृतीतून समाजापुढे ठेवला आहे. आम्हाला खरे संत ओळखता आले पाहिजेत. अध्यात्माच्या नावाखाली लोकांना कर्मकांडाच्या व थोतांडाच्या नादी लावून साधू रूपाआडून साध्या भोळ्या लोकांचं शोषण करणारी गोचिडे आम्हाला वेचून फेकता आली पाहिजेत... एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपले विचार लोकांपर्यंत पोहचवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातला भित्रेपणा नष्ट करुन आत्मविश्वासाने बोलण्यासाठी किंवा विचार व्यक्त करण्यासाठी लोकांसमोर उभे राहिले पाहिजे.दुसरी गोष्ट आपण काय बोलणार आहोत त्यात सत्यता असली पाहिजे कारण लोक सत्य काय आहे आणि किती सत्य आहे ह्याकडे लोकांचे तुमच्याकडे लक्ष असते. आपल्यावर कुणीही आक्षेप घेणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. आपल्यामध्ये स्पष्टपणा आत्मविश्वास,सकारात्मक परिणामकारकता आणि सत्यता असल्यामुळे भ्यायची गरज नाही.मग आपोआपच आपल्यातला भित्रेपणा नष्ट व्हायला लागतो.भीती वाटते केव्हा आपल्या विचारात सत्यता नसेल,स्पष्टपणा नसेल आणि लोकांना आपण काहीतरी म्हणून फसवत आहोत तर भीती आपल्यामध्ये राज्य करते. मग ती कधीही आपल्याला पुढे जाऊ देत नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आत्मविश्वास - Self* confidence •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बुड बुड घागरी* बुड घागरी तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले 'मी आणतो साखर'. मांजर म्हणाले 'मी आणतो दूध'. उंदीर म्हणाला 'मी आणतो शेवया'. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले 'चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ'. इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले 'खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले, 'मला नाही माहीत.' मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ' हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला 'चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ' म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment