✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/01/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय प्रजासत्ताक दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९३० - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने २६ जानेवारी हा पूर्ण स्वराज्य दिन असल्याचे जाहीर केले. वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून काँग्रेसने २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सुरुवात केली. १९३३ - स्वातंत्र्यदिन साजरा केल्याने देशात धरपकड. १९४९ - भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला. १९५० - भारत प्रजासत्ताक देश झाला. डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपतिपदी. १९६५ - भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले. २००१ - गुजरातमध्ये भूकंप. २०,००० ठार. 💥 जन्म :- १९५७ - शिवलाल यादव, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५७ - अशोक मल्होत्रा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १८८५ - एडवर्ड डेव्ही, ब्रिटीश संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : नानाजी देशमुख आणि डॉ. भुपेन हजारिकांना यांना मरणोत्तर भारतरत्न तर माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार मिळणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *विविधता, लोकशाही आणि विकास हीच भारताची ओळख आणि जगासमोरील आदर्श - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील एकूण 44 पोलिसांना पुरस्कार जाहीर. 4 पोलिसांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली : अयोध्या खटल्यासाठी नव्या घटनापीठाची स्थापना, 29 जानेवारीला होणार सुनावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *रणजी करंडक : विदर्भ संघाचा अंतिम फेरीत प्रवेश, केरळ संघावर एक डाव व 11 धावांनी विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नोवाक जोकोव्हीचने लुकासवर 6-0, 6-2, 6-2 असा सहज विजय मिळवित ऑस्ट्रेलिया ओपनच्या अंतिम फेरीत मारली धडक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन* आपल्या देशात प्रामुख्याने दोन दिवस राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जातात. एक म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि दुसरे प्रजासत्ताक दिन होय. प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन म्हणून सुद्धा ओळखले जाते. व्यापारी म्हणून आलेले आणि राज्यकर्ते बनलेल्या इंग्रजांनी भारतावर जवळपास दीडशे वर्षे राज्य केले. ........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://b.sharechat.com/rcO9CGfOLT आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय प्रजासत्ताक दिन* प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली. हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणानंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो. या कार्यक्रमात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्र ही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. ठिकठिकाणी प्रभातफेरी, भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्याचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोषनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊ ही वाटप केला जातो. मुले ही आनंदित होतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शील, करुणा, विद्या, मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *०१) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?* मोर *०२) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?* वाघ *०३) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?* हॉकी *०४) भारताचा राष्ट्रीय फुल कोणता ?* कमळ ०५) भारताचा राष्ट्रगीत कोणते ?* जन-गण-मन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● रवींद्र मुपडे ● सचिन पुरी ● सुरेश पवार ● बालाजी जोगे ● कल्याण वतनदार ● विशाल सोनालकर ● जावेद शेख ● सतिशकुमार साटले ● ओमसाई कोटुरवार ● चंद्रकांत लांडगे ● दिलीप सोनकांबळे ● निखिल मोटघरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भास* वागणं अन् बोलणं विरोधाभास असतो एखादा बोलण्यातच फक्त खास असतो वागणं अन् बोलणं एक असलं पाहिजे बोलण्यापुर्त फक्त नेक नसलं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.* *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेता मीठा बोलना तेता साधु ना जान पहिले थाह देखि करि, औंदेय देसी आन। सारांश गोड बोलणारा प्रत्येक जण साधू असेलच असे नाही. त्यामुळे गोड बोलणार्या सर्वांनाच साधू म्हणून स्वीकारू नये. सुरूवातीला पोपटावानी गोड व खुपच आस्थेवाईकपणे बोलल्यासारखी वाटणारी बरीच माणसे अंतिमतः ढोगीरूपाने सामान्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेवून त्यांना फसवणारे साधुरूपातले लांडगेच निघाल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडलेली अाहेत. तेव्हा खरा साधू ओळखता आला पाहिजे. संताची महत्ती सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात . 'जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें ॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥ ज्यासि अपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ॥ दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥ तुका म्हणे सांगू किती । त्या चि भगवंताच्या मूर्ति ॥' समर्थांनीही सज्जनाची लक्षणे सांगितलेली आहेत. 'वेष असे बावळा परि अंतरी नाना कळा ।। अगदी अलिकडे खर्या संताचं प्रात्यक्षिकच ज्यांनी आपल्या जगण्यातून समाजाला दाखवून दिलंय ते दृष्टे सुधारक संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांनी सुधारणावादी दृष्टी घेवून सामाजिक सुधारणांचा नवा अध्याय आपल्या कृतीतून समाजापुढे ठेवला आहे. आम्हाला खरे संत ओळखता आले पाहिजेत. अध्यात्माच्या नावाखाली लोकांना कर्मकांडाच्या व थोतांडाच्या नादी लावून साधू रूपाआडून साध्या भोळ्या लोकांचं शोषण करणारी गोचिडे आम्हाला वेचून फेकता आली पाहिजेत... एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रजासत्ताक - Republic* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उपयुक्त जीवन* कोणे एके काळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे, जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीव जंतू, किडे यांचा जगाला काही उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आदेश दिला कि, कोणकोणते जीव-जंतू, किडे हे निरुपयोगी आहेत? याची यादी करा आणि मला सांगा. खूप काळ शोध घेतल्यावर त्याच्या माणसांनी असे संशोधन केले कि या जगात जंगली माशी आणि कोळी (जाळे विणणारा कीटक, spider) हे फारशे उपयोगी नाहीत. त्यांचा जगाला काही उपयोग नाही. राजाने तत्काळ आदेश दिला कि या दोन किड्यांना आपल्या राज्यातून नामशेष करावे. याच दरम्यान त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. त्यात या राजाचा पराभव झाला, जीव वाचविण्यासाठी त्याला राज्य सोडून पलायन करावे लागले. राजा पळाला आणि जंगलात गेला. दुसऱ्या राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. त्यांना चुकवून राजा कसातरी एका झाडाखाली झोपला. खूप श्रमामुळे त्याला गाढ निद्रा आली. काही काळाने त्याला नाकावर काही तरी चावत असल्याची जाणीव झाली, पाहतो तर काय एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावली होती. झोपमोड तर झाली आणि त्याचबरोबर त्याला शत्रूच्या सैनिकांची चाहूल लागली, राजा पुन्हा पळाला आणि उघड्यावर झोपल्यास सापडण्याची भीती वाटल्याने त्याने एका गुहेचा आधार घेतला. राजा गुहेत गेला व काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले, शत्रूचे सैनिक तेथेही आले. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकात चर्चा केली कि ज्याअर्थी येथे कोळ्याने जाळे विणले आहे त्याअर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणी आत जावू शकत नाही. गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कि जंगली माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहज सापडला असता किंवा कोळ्याने जाळे विणले नसते तर गुहेत येवून सैनिकांनी त्याला मारून टाकले असते म्हणजेच या जगात कोणताही जीवजंतू असा नाही कि ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे. *तात्पर्य - जगात प्रत्येक जीवाचा काही न काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. त्यामुळे कोणी कुणाला किंवा स्वताला कमी समजू नये.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment