✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/01/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले. १९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले. 💥 जन्म :- १८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज १९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर १९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले १९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात १९४८: विदुषी व लेखिका शोभा डे 💥 मृत्यू :- २०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - उत्तर भारतात थंडीची लाट, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मोदी सरकारनं 50 कोटी जनतेला दिलं आरोग्य कवच - भाजपा अध्यक्ष अमित शहा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नयनतारा सहगल यांचं निमंत्रण साहित्य संमेलन आयोजकांकडून रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *देशातील 10 ठिकाणांहून शिर्डीसाठी विमानसेवा सुरू होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ओरिसाचे कृषिमंत्री प्रदीप महाराठी यांचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हिमाचल प्रदेश- शिमल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 बर्फवृष्टीमुळे बंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *Ind vs Aus 4th test - सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर संपुष्टात, कुलदीप यादवचे पाच बळी, भारताला 322 धावांची आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकच ध्यास ; वाचन विकास* शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून ........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चंद्रकांत रघुनाथ गोखले* चंद्रकांत रघुनाथ गोखले (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते, चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमलाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र विक्रम गोखले हे देखील अभिनेते आहेत. यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन, राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?* 👉 शेकरू *२) औरंगाबादला किती दरवाज्याचे शहर म्हणून ओळखल्या जाते?* 👉 ५२ *३) जागतिक जलदिन म्हणून कधी साजरा केल्या जातो?* 👉 २२मार्च *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● कुणाल पवारे, कुंडलवाडी ● धनाजी माडेवार ● शिवाजी गुजेवार ● धनराज बनसुडे ● संजय पवार ● रमेश माने ● आबासाहेब निर्मले ● रघुनाथ नोरलावार ● संतोष कोयलकोंडे ● पद्माकर मुळे ● रवी पुपलवार ● राजकुमार धावडकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नशा* सत्तेची नशा तर कुठेही न्यारीच असते ज्याची सत्ता त्याचे जरा भारीच असते सत्ता आली की वेगळी नशा चढते सांगायच्या आधी हे सारेच घडते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.* *तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दूजा हैं तो बोलिये, दूजा झगड़ा सोहि दो अंधों के नाच मे, का पै काको मोहि। सारांश विधाता निर्गुण निराकार आहे. तो सर्व विश्व व्यापून उरलेला आहे. तरी त्याची विभिन्न मुर्त रूपे उभी करून एकमेकात विनाकारणंच भांडून घेणार्यास उद्देशून महात्मा कबीर म्हणतात परमात्मा वेगवेगळा असता तर तुमचं म्हणणं मान्य केलं असतं. माझाच देव श्रेष्ठ आहे व इत्तरांचा चुकीचा आहे असे माणण्यातच तर भांडणाचं मुळ दडलेलं आहे. तेच भांडणाला कारण ठरतं. दोन अंधांच्या नाचण्यावर कोण अांधळा कोणत्या कारणाने त्या अंधावर मुग्ध किवा प्रसन्न होईल ? लिळाचरित्रात आंधळ्यांचा दृष्टांत सांगितलेला आहे. एका गावात सहा आंधळे असतात. त्यागावी एक हत्ती येतो. आंधळ्यांना हत्ती पाहाता येत नाही. प्रत्येक आंधळा आपआपल्या परीने हत्तीला चाचपून घेतो. त्यांना झालेल्या स्पर्श ज्ञानावरून ते हत्तीच्या रूपाचं वर्णन करायला लागतात. ज्याच्या हाती कान लागला, तो हत्ती सुपासारखा असल्याचे सांगतो. ज्याने सोंड चाचपली, तो हत्ती मुसळासारखा आहे म्हणतो. ज्याने पाय चाचपले, तो हत्ती खांबासारखा असल्याचे सांगतो. ज्याचा स्पर्श हत्तीच्या पोटाला झाला, त्याचे म्हणणे असते हत्ती पोत्यासारखा आहे. ज्याने पाठ चाचपून घेतली, तो हत्ती भिंतीसारखा असल्याचे सांगतो. ज्याने शेपटीला स्पर्शलेले असते, त्याला हत्ती खराटा म्हणजे झाडूसारखा भासतो. शेजारीच त्यांचा संवाद ऐकणारा एक डोळस असतो. त्याने पूर्ण हत्ती पाहिलेला असतो. तो संवाद ऐकून म्हणतो, तुम्ही तर फक्त हत्तीच्या अवयवांनाच हत्ती समजत आहात . प्रत्यक्षात हत्ती तर महाकाय आहे. तसं विधात्याचं स्वरूपही विश्वात्मक आहे.तो सर्वव्यापी आहे. त्याला जाणण्याची आत्मदृष्टी जवळ असायला हवी. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून. अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रक्षण - Protect* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वतःमध्ये बदल* *कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'* *तात्पर्य:- दुसर्याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला कधीही चांगले असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment