✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते. 💥 जन्म :- १८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी. १९३१ - गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९९४ - वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक. २००० - के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते. २००४ - सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *21 फेब्रुवारीपासून राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात, शंकराचार्यांच्या धर्मसंसदेत संतांकडून प्रस्ताव मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नाशिकचे किमान तापमान 7.6 अंशावर, थंडीचा कडका कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट असून, वीज जोडणीसाठी राज्यात ८ हजारांवर शेतकऱ्यांचे अर्ज.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त आजपासून राज्यात जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पूर्णवाद परिवार सेवा मंडळ आणि पूर्णवाद लाईफ मँनेजमेंट इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा डॉ. पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, प्रसिद्ध वक्ते आणि लेखक चंद्रशेखर टिळक यांना जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राळगेणसिध्दी(अहमदनगर) : संत यादवबाबांचे दर्शन घेऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आज भारत वि. न्यूझीलंड चौथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हसा आणि हसवा* जीवनात हसण्याचे महत्व ....! वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/blog-post_29.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लातूर* लातूर शहर ही या जिल्ह्याची राजधानी आहे. या शहरास प्राचीन इतिहास आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले. १९ व्या शतकात ते हैदराबाद संस्थान संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले. १९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. कालांतराने उस्मानाबाद जिल्ह्या्चे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला. लातूर हे महाराष्ट्राच्या,आंध्र प्रदेशाच्या आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक परंपरा व रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. लातूर जिल्हा व त्या लगतचे कित्येक लोक मराठी व्यतिरिक्त कन्नड आणि तेलुगू भाषा सहज बोलतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) नेपोलियन बोनापार्ट सम्राट कधी बनला ?* १८०४ *२) आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळाचं सचिवालय कुठे आहे ?* पॅरिस *३) वेरुळचं कैलासनाथ मंदिर कोणी बांधलं ?* राष्ट्रकूट राजा कृष्ण (द्व) *४) मीठाचं सर्वाधिक उत्पादन घेणारं देशातील राज्य कोणतं ?* गुजरात *५) दाचीगाम राष्ट्रीय अभयारण्य कोठे आहे ?* जम्मू काश्मीर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● विनायक हिरवे ● राजेश पटकोटवार ● हिलाल पाटील ● जयेश पुलकंठवार ● राजेश्वर रामपुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *थंडीची लाट* राज्यात थंडीची लाट आली आहे काहींची अंथरूणात पहाट झाली आहे थंडीने काही गप्पा गार पडले आहेत सूर्याने नित्याचे कामं कुठं सोडले आहेत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परिक्षेत वरचा नंबर हवा, टक्केवारी चांगली हवी; म्हणून क्लास लावला जातो. मात्र, आपल्यातला माणूस घडला पाहिजे, त्याला चांगलं वळण लागलं पाहिजे यासाठी शोधला जातो का एखादा क्लास? संतानी माणसातला माणूस जागविण्यासाठी अभंगांचा शब्द न् शब्द खर्ची घातला. तो समजून घेण्याच्या फंदात कुणी पडत नाही. आपल्याला डाॅक्टर, वकील, इंजिनीयर व्हायचं! पण त्याबरोबर कधी आपण हा विचार केला की मला बाबा आमटे यांच्यासारखी रुग्ण्सेवा करायचीयं. सिंधूताई सपकाळांसारखी अनाथांची माय व्हायचंय.* *'समाजसेवा' घडवेल असा धडाच आपल्या पाठ्यपुस्तकात नाही किंवा असलाच तर समजून घेतला गेला नाही. तसं झालं असतं तर अमानुषतेचं एकही उदाहरण सापडलं नसतं. म्हणूनच-* *"माणूस माणूस, तुझी नियती बेकार* *तुझ्याहून बरं, गोठ्यातलं जनावर"* *असा समाचार बहिणाबाई घेतात. संयम, विनम्रता, सौहार्द, सहिष्णुता हे फक्त निबंधातील शब्द आहेत. ते माणसाने आचरणातून हद्दपार केले आहेत. मातीत उगवून आलेल्या पिकांच्या अवतीभवतीचं तण-तणकट निंदणी-खुरपणी करून निर्मळ करावं लागतं. तसंच माणसाचं, माणसाचा सहजी माणूस बनत नाही. संस्काराच्या शाळेत माणूस घडतो. मात्र, माणूस संस्काराच्या शाळेत हजर राहण्यास नाखूष असल्याने, त्याची अॅब्सेंटी वाढत चाललीयं. मग कसा होऊ शकेल त्याचा माणूस ?* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नहाये धोये क्या हुआ , जो मन मेल न जाय | मीन सदा जल में रही , धोये बॉस न जाय || अर्थ : नहाणे धुणे देखावा गेला न मनीचा मळ सदा पाण्यात मासळी दुर्गंध न काढी जळ महात्मा कबीर दिखाऊ पणाला फटकारतात. नहाणे , धुणे व सुंगधाने सजणे हा तर केवळ बाह्य देखावा आहे. जर मनाचीच सफाई झाली नाही तर विवेकी व निरामय जीवनशैली विकसित होणार नाही व त्याशिवाय विश्वात्मक भाव दृढ कसा होणार ? मासा सदा सर्वकाळ पाण्यात राहूनही अंगीचा दुर्गंध त्यागीत नाही. तिथे पाण्याचा काय दोष असणार आहे. बाह्य बदलापेक्षा आंतरिक बदल महत्त्वाचा असतो. तो अवगुण कायमचे दूर करतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की, मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाचे श्लोक* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक दिवसाचा पांडुरंग* "पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन" त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा" पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले, श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे" (त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले ) गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे....... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे" ( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो ) पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे " (असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो ) तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा" (हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.) रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?" गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही " ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो .......... पांडुरंग पुढे म्हणतो ........ अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता. त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे. त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल. पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो" तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ...... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.श्रद्धा ठेवली पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment