✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/01/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९७२ - मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. 💥 जन्म :- १८९४ - माधव ज्युलियन, मराठी कवी, कोशकार. १८९८ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, अभिनेते, संगीतकार. १९२४ - प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते. 💥 मृत्यू :- १९४५ - रासबिहारी बोस, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते. १९९८ - एस.एन.कोहली, माजी नौदलप्रमुख ॲडमिरल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी 10 टक्के आरक्षणाची अधिसूचना जारी, केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मेक्सिको : गॅस पाईपलाईनच्या स्फोटातील मृतांची संख्या 79 वर पोहोचली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पालघर : पालघर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का, भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील भाजपा कार्यकर्त्यांशी साधला संवाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पंजाबमध्ये आप सर्वच जागा लढवणार - अरविंद केजरीवाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉन 2019 चा विजेता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पुणे : शालेय विद्यार्थ्यांना क्रीडागुण देण्याबाबत राज्य सरकारने अवलंबिली नवी पद्धत, याबाबत येत्या २ दिवसांत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कथा - मुख्यालय* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_22.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत नामदेव* संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. नामदेव हे ‘मराठी’तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) भारतीय पूर्व किनारपट्टीवरील सागरजलाची क्षारता किती टक्के आहे?* 👉 34% *२) सयुंक्त राष्ट्रसंघाने जागतिक शैक्षणिक वर्ष कधी घोषित केले होते?* 👉 १९७० *३) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली?* 👉 २० सप्टेंबर १९८५ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● पांडुरंग मामीडवार ● ऋषीकेश पवार ● अनिल मुपडे ● कुलदीप सूर्यवंशी ● संतोष हेंबाडे ● साईनाथ जगदमवार ● वीरभद्र बसापुरे ● पिराजी कटकमवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकजूट* आमची संख्या मोठी हे डोक्यात खुळ असते संखेत नाही विचारत एकीचे बळ असते संख्येला नाही एकजुटीला कुठेही किंमत असते एकजुटी पुढे जाण्याची कोणातच हिंमत नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एका मुलाने काहीतरी खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फारसा ओरडला नाही किंवा त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत.* *तसेच आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल, तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते.* *ज्या दातांनी सिंह मोठ-मोठे प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेतो, हे लक्षात असू द्यावे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• खान खर्च बहु अंतरा, मन मे देखु विचार ऐक खबाबै साधु को, ऐक मिलाबै छार। सारांश माणसाने आपल्याकडील संपत्तीचा खर्च बरबादीसाठी न करता सत्कार्यासाठी करावा हे महात्मा कबीर आपल्या मधूर वचनातून सांगतात. खाणे आणि खाण्यासाठी खर्च करणे यामध्ये खूप मोठं अंतर आहे. हे आपापल्या परीने आपल्या मनाला विचारले व विचारपूर्वक जानले तर लक्षात येईल. माणसाकडे पैसा असेल तर माया उत्पन्न होणे स्वाभाविकच आहे. ती स्वभावानुरूप उत्पन्न होत असते. जसा ज्याच्या स्वभाव तशी ती प्रतिबिंबीत होत असते. जी व्यक्ती सत्संगतीत असते ती अन्नदानाला महत्व देत असते. अन्न हे भुकेल्यांना मिळालं पाहिजे ते वाया जाता कामा नये. पंक्तीला बसणारा गरीब की श्रीमंत याचा विचार तो करीत नाही. मात्र अन्न ग्रहन करणार्याच्या मुखात ते जावे, हा त्याचा सद् हेतू असतो. तो इत्तरांना तृप्त करीत असतो, त्याच्या ठायी परोपकारी वृत्ती विलसत असते. दुसर्या प्रकारचा माणूस अन्नाबाबतीत इत्तरांचा विचारंच करीत नाही. तो केवळ स्वत:पुरता मर्यादित विचार करतो. उरलेले अन्न सरळ फेकून देतो. वाया घालवतो. व्यसनी माणूस तर आपल्याकडील धन संपत्ती नको त्याच बाबीवर खर्च करून बरबाद करीत असतो. मदिरा व मांसाहारावर अनाठायी खर्च करीत असतो. या अन्नसेवनातून व मदिरापानातून मनात विकार उत्पन्न होतात व त्याला विनाशाकडे नेत असतात. माणसाने आपल्या कडील धनाचा उपयोग सन्मार्गाने सत्कार्यासाठी केला तर स्वत:ला समाधान मिळते व आनंदानुभूती मिळते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विशिष्ट ध्येयाकडे जात असताना प्रत्येक पावलागणिक विचार करत असतो.आपले काम यशस्वीपणे पार पडणार का ? जर पार पडत नसेल तर अजून काही करावे लागते का? असे जेव्हा अनेक प्रश्न पडतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे असे वाटायला लागते.असा आत्मविश्वास कमी असल्याचा भास कमी होऊ देऊ नका.कारण तुम्हालाच तुमचे काम पूर्ण करायचे आहे तेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका किंवा डळमळीत होऊ देऊ नका.मी हे काम पूर्ण करणारच आणि पूर्ण झाल्याशिवाय सर्वार्थ बसणार नाही असा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर आणि प्रत्येक पुढे पाऊल टाकताना करा.नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उद्दिष्ट - Objective* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• . *आयुष्यभराची प्रतिष्ठा* महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने तुम्ही कसे काय उभे राहिलात.? कृष्णाने उत्तर दिले. ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले. *रुक्मिणीने विचारले..* *कोणते पाप.?* कृष्ण म्हणाला. जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे. *रुक्मिणीने विचारले.* *मग कर्णाचे काय.?* कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही. पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले. तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला. *तात्पर्य :-* तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.! *चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment