✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/01/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना. २००५ - अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी. 💥 जन्म :- १९०९ - आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्या प्रथम लेखिका. १९४५ - प्रभा गणोरकर- मराठी लेखिका. 💥 मृत्यू :- १९४१: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल १९६७ - श्रीपाद कृष्ण बेलवलकर- प्राच्यविद्यापंडित. १९७३: सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक ना. भि. परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर १९७३ - स.ज. भागवत -तत्त्वज्ञ व विचारवंत. १९९२ - द.प्र. सहस्रबुद्धे- 'आनंद' मासिकाचे माजी संपादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आर्थिकदृष्ट्या मागास संवर्णांना मिळणार 10 टक्के आरक्षण, मोदी सरकारचा मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली- जपानचे परराष्ट्रमंत्री तारो कोनो यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यसभेचं कामकाज आणखी एक दिवस चालणार; आजऐवजी उद्या अधिवेशन संपणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भाजपा आमदार आणि माजी मंत्री गोपाल भार्गव यांची मध्य प्रदेश विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करा, महामंडळातील वारेमाप खर्चाची श्वेत पत्रिका काढा; महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक) संघटनेची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *10 जानेवारीला ओपन एसएससी बोर्ड लाँच करणार, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात भारताने रोवली 72 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची पताका, रचला नवा इतिहास* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करता......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गोदावरी परुळेकर* मराठी लेखिका आणि साम्यवादी स्त्री कार्यकर्ती गोदावरी परुळेकर ( १४ ऑगस्ट, १९०८ - ऑक्टोबर ८, १९९६) (माहेरचे नाव- गोदावरी गोखले) या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, व मराठी लेखिका होत्या. १९१२मध्ये ना.म. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परुळेकर यांनी मानद सहाय्यक सचिव म्हणून कामगारांच्या शिक्षणप्रसाराच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. गिरगावपासून परळपर्यंतच्या भागात ठिकठिकाणी नागरिकांना वर्तमानपत्रे वाचण्यासाठी केंद्रे सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली व त्यांना शिक्षणाची गरज वाटू लागली. याच सुमारास १९१७मध्ये चिंचपोकळी येथे वाचनालय सुरू केले. त्यावेळी ११ ग्रंथालये व १० वाचनालये मोफत चालविली जात. १९७२ चा साहित्य अकादमी पुरस्कार – 'जेव्हा माणूस जागा होतो' या पुस्तकासाठी त्यांना देण्यात आला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जे जीवनाशी प्रेम करतात त्यांनी आळसात वेळ घालू नये. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) अमिताभ बच्चन यांना कोणत्या विद्यापीठाने डी.लिट. ही पदवी दिली ?* दिल्ली विद्यापीठ *२) भारतात 'राष्ट्रीय फलोद्यान योजना' कधीपासून सुरू करण्यात आली ?* २००५ पासून *३) 'मानवजातीसाठी एक धर्म, एक जात आणि एक देव' हे ध्येयवाक्य कोणाचे ?* श्रीनारायण गुरू *४) पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ?* ०५ जून *५) पुष्करालू उत्सव कोणत्या नदीच्या काठी साजरा केला जातो ?* कृष्णा नदीकाठी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● बालाजी पेटेकर, खतगावकर ● शेख आसिफ ● मंगेश जाधव ● आकाश गाडे ● पोतन्ना मुदलोड ● आनंदा कुमारे ● मारोती गोडगे ● किरण भंडारी ● मन्मथ चपळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *लाईक-कमेंट* मदत गेलं बाजूला लोकं फोटो काढत असतात मदत करायची सोडून ग्रुप वर धाडत असतात मदती पेक्षा लोकांना फोटो काढायची घाई आहे अपघातात मदत महत्त्वाची लाईक-कमेंट वाई आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• *तासन् तास पारावर बसून राहणारी मंडळी आपण पाहिली आहेत. येणा-या जाणा-याला चहा पाजणे किंवा कोणाकडून तरी चहा उकळणे एवढेच त्यांचे काम असते. अनेक तरूण-तरूणी रात्रंदिवस राजकीय पुढारी किंवा धनाढ्य शेठजींच्या अवतीभवती असतात. छोट्याशा लाभासाठी ही मंडळी आपला वेळ आणि शक्ती खर्चिला घालतात. अमक्या तमक्याशी ओळख किंवा नाते सांगण्याचे त्यांना वेड असते. अशी मंडळी आपल्या स्वत:चे आणि कुटुंबाचे वाटोळे करतात. त्यांना त्यांचे वेड काही सुचू देत नाही.* *पु.ल.देशपांडे यांनी सुखासीन नोकरी सोडून साहित्य, नाटक, कला या प्रांतात स्वछंद विहार केला. उत्कृष्ट गायक असूनही दीनानाथ मंगेशकर किंवा बालगंधर्वांनी गल्लाभरू कार्यक्रम केले नाहीत. बॅरिस्टर असूनही देशाच्या वकिलीसाठी गांधीजींनी पोटार्थी वकिली सोडून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशप्रेमापोटी हालअपेष्टा भोगल्या. बाबा आमटे यांनी कुष्ठरूग्णांच्या सेवेसाठी विटाळाचे जगणे पसंत केले. खाण्यापिण्याला फाटा देऊन गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन, सी. व्ही. रामन या शास्त्रज्ञांनी जगाच्या कल्याणासाठी अहोरात्र कष्ट उपसले...याचे कारण त्यांचे वेड असते. ही सर्व मंडळी वेडी होती* *माणसाला कसले तरी वेड असलेच पाहिजे; पण ते सकारात्मक असले म्हणजे त्याचे हसे होत नाही. असले वेड आपल्याला लागले तर जगावेगळं काम आपल्याही हातून घडून शकेल.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 👏👏👏👏👏👏👏👏👏 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आतम अनुभव जब भयो, तब नहि हर्श विशाद चितरा दीप सम ह्बै रहै, तजि करि बाद-विवाद। सारांश जेव्हा हृदयात परमात्म्याची अनुभूती होते तेव्हा सर्व सुख-दु:ख विषयक वाद आपोआप नाहीसे होतात. सुख आणि दु:ख हे केवळ मानवी मनाचे खेळ आहेत. मानवी मनाच्या प्रवृत्तीनुसार सुख- दु:खाच्या भावना निर्माण होत असतात. माणसाचे मन शांत व स्थिर असेल तर समाधानाची भावना वाढीस लागते. मनाची बेचैनी अस्थिरता निर्माण करते. मन शांती नाहीशी होते. व त्यातून आपल्याकडे काहीतरी नसल्याची मनाला टोचणी लागते. ही अवस्था म्हणजेच दु:ख. स्थिर मनोवस्थेतला माणूस अर्धवट अवस्थेतल्या प्याल्याकडे अर्धा भरलेला आहे म्हणून सकारात्मकतेने पाहतो. त्याला त्यात समाधानाची प्राप्ती होते. उर्वरित अर्धा प्याला भरण्यासाठी तो आनंदाने सामोरा जातो. ही समाधानावस्था जगणं सुसह्य करते. याउलट असमाधानी माणूस हावरटासारखा त्या प्याल्याकडे अर्धा रिकामा असल्याची खंत मनी घेवून मनाला आणखी अस्थिर करून टाकतो. त्याचा अधाशी दृष्टीकोनच त्याच्या जगण्यातील आनंद नाहिसा करतो. जीवनाकडे उदासीनतेने पाहिले की नैराश्य पदरी पडतं. सुख आणि दु:ख जीवन मार्गातले चढ उतार आहेत. उल्हसित मनानं पुढं सरकत राहिलं की ती लिलय्या पार होतात. ही अनुभूती घेवून पुढं जाता आलं पाहिजे. स्वत:च्या ठायी असणारा ठाम आत्मविश्वासंच आपल्या जगण्याला सुंदर आकार देत असतो. आत्मविश्वास असणार्या माणसाचं जीवन नंदा दीपासारखं अखंडितपणे तेवतं असतं. विधायक वृत्ती अंगिकारली की त्याचे जीवन विषयक विचार सत्याला नाकारत नाहीत. मनाची दोलायमान अवस्था नाहिशी होवून जाते. सत्य, शिव, व सुंदराची अनुभूती येवू लागते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मनुष्याच्या जीवनातला सर्वात मोठा,महत्वाचा आणि मौल्यवान जर कुठला दागिना असेल तर तो म्हणजे नम्रता हा आहे. ज्यांच्या अंगी नम्रता असेल ती व्यक्ती महनीय, आणि वंदनीय असते.ती व्यक्ती केवळ अंगी असलेल्या नम्रतेमुळे इतरांच्या हृदयावर राज्य करु शकते. ©व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दागिना - Jewelery* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दृष्टिकोन* एका गावात दोन शेतकरी होते, दोगेही मेहनती. खूप काम करत पण मोबदला खूप कमी मिळत असत. . . त्यांचं वय झालं, दोघे देवाघरी गेले.... . . दोघे देवासमोर गेले, देवाने विचारलं, ' पुढच्या जन्मसाठी तुम्हाला काय हवं??' . . पहिला शेतकरी बोलला, '' देवा, मी या आयुष्यात खूप काम केलं...खूप मेहनत घेतली...घाम गाळला..पण मला त्याचा योग्य मोबदला नाही मिळाला..जेवढा पैसा कमवला तो खूप कमी होता, कर्ज देण्यात सर्व पैसा संपला ! मला असा आशीर्वाद दे की या जन्मी मला फक्त पैसा मिळत राहो...कुणाला काही द्यावं लागू नये...'' देव बोलला 'तथास्तु.....' . . दुसर्या शेतकर्याला देखील तोच प्रश्न देवाने विचारला. दूसरा शेतकरी बोलला, '' देवा तू मला या जन्मी जे काही दिलं त्यात मी समाधानी होतो...दोन वेळचं पोट भरत होतं आमच्या कुटुंबाचं.... पण मला एका गोष्टीचं दुख: आहे की माझ्या दारावर आलेल्या भिकार्यांना मी पोटभर जेवण देऊन पाठवू शकत नव्हतो....! या जन्मी असा आशीर्वाद दे की माझ्या दारावर आलेल्या प्रत्येक भिकार्याचं पोट मी भरू शकेल...'' देव बोलला ' तथास्तु....'!! आता ते दोघेही त्याच गावी जन्मले.....मोठे झाले....!! पण, पहिला व्यक्ति ज्याने देवाला मागितलं की मला फक्त मिळत रहावे-मिळत रहावे कुणाला काही द्यावे लागू नये....' तो बनला भिकारी, ज्याला फक्त भिक मिळू लागली....तो इतरांना काहीच देऊ शकत नव्हता....' आणि, दूसरा व्यक्ति बनला त्या गावचा सर्वात श्रीमंत व्यक्ति ' ज्याच्या घरच्या दरवाज्यासमोर आलेल्या प्रत्येक भिकार्याचं पोट भरून तो पाठवत असे....' " या गोष्टीचा तात्पर्य एवढाच की , तुम्हाला सुखी राहायचं असेल तर आगोदर दुसर्यांना सुखी ठेवायला पहा.... तुम्हाला सुख आपोआप मिळेल.. '' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment