✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/01/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुतात्मा दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने गोळी झाडून खून केला. १९९४ - पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला. २००२ - भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १९१० - चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी. 💥 मृत्यू :- १९४८ - राष्ट्रपिता महात्मा गांधी. १९९६ - गोविंदराव पटवर्धन, हार्मोनियम व ऑर्गन वादक. २००० - आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर, मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते. २००१ - प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ नाटककार. २००४ - रमेश अणावकर, प्रसिद्ध गीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केंद्र सरकारकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला 4 हजार 714 कोटींची मदत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अहमदनगर - लोकायुक्तांना मंजुरी दिली म्हणजे कायदा झाला असे नाही, आंदोलन करणारच - अण्णा हजारे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जळगाव : शिक्षणाची वारीच्या शेवटच्या टप्याला जळगाव मध्ये प्रारंभ, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी आणि संचालक डॉ. सुनील मगर यांच्या हस्ते उदघाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा पारा 6 अंशावर, विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *तब्बल 24 वर्षांनी भारतीय महिला संघाने न्यूझीलंडच्या भूमीत वन डे मालिका जिंकण्याचा केला पराक्रम.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रामाणिक वसंता* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_48.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जळगाव शहर जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत. जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत.जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात. जळगाव शहराची स्थापना मराठी सरदार तुळाजीराव भोईटे यांनी केली. सरदार तुळाजीराव भोईटे हे सातार्याचे संस्थानिक होते. भोईटे कुटुंबाचे पूर्वज दुर्गोजीराव भोईटे हे छत्रपती शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक असल्याकारणाने महाराजांकडून त्यांना नशीराबाद आणि जवळील प्रांत अनुदान म्हणून मिळाले होते. भोईटे बऱ्याच काळपर्यंत जळगावचे राज्यकर्ते राहिले. त्यांनी जळगाव येथे एक वाडा बांधला. आज त्या वाड्याला भोईटे गादी म्हणून ओळखले जाते. जळगाव हे एक जिल्ह्यातले महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून तेभारतातल्या मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, कोलकाता, अलाहाबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांशी रेल्वेमार्गाने जोडलेले आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळ, चाळीसगाव व पाचोरा हीही रेल्वे जंक्शने आहेत, त्यांपैकी भुसावळ रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातले मोठे जंक्शन म्हणून ओळखले जाते *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'शांतता! कोर्ट चालू आहे' चे नाटककार कोण ?* विजय तेंडुलकर *२) १९४0 च्या 'ऑगस्ट प्रस्तावा'नुसार कोणत्या तरतुदी सादर करण्यात आल्या ?* वसाहतींचे स्वातंत्र्य *३) नानासाहेबांनी कुठे स्वत:ला पेशवा म्हणून जाहीर केलं ?* कानपूर *४)कोणतं राज्य अँस्बेस्टसचं सर्वाधक उत्पादन घेतं ?* राजस्थान *५) एक किलोबाईट म्हणजे किती ?* १०२४ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● प्रा. बालाजी कोंपलवार ● सौ. सारिका राजेश मद्दलवार ● मगदूम अत्तार ● अंकुश निरावार ● शिवकुमार माचेवार ● सतीश गंलोड ● सुरज एडके ● देवराज बायस *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदर्शन* नको त्या गोष्टींचा हल्ली दिखावा जास्त आहे दिखावा करणाराला वाटते हे सर्वच रास्त आहे जे प्रदर्शनीय नाही ते विचारपूर्वक झाकल पाहिजे कशाच प्रदर्शन करतो याच प्रत्येकाने भान राखल पाहिजे शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?* *प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पत्ता बोला वृक्ष से , सुनो वृक्ष बनराय | अब के बिछड़े न मिले , दूर पड़ेंगे जाय || अर्थ : संघटनेचं विघटन झालं की उभारी घेणं अवघडच असतं. हे पटवून देताना महात्मा कबीरांनी निसर्गातला किती समर्पक दृष्टांत दिलेला आहे. पान झाडाला म्हणतं, ' हे तरूवर वृक्षराज तुम्ही ऐका तर खरं ! आज तुम्ही भक्कमपणे उभे आहात. या तुमच्या भक्कम पणासाठी आम्ही लक्षावधी पानांनी स्वतःला ऊन्हात सूर्यासोबत टक्कर देत त्याला न घाबरता अंगावर घेतलं. ऊन्हात राबून स्वतःचं नाजूकपण तुझ्या संगोपणात साकारण्यात विसरूनच गेलो. अन राठ होवून पिकत गेलो. आम्ही जुन्या दमाची परंतु अनुभवी तुझ्या स्वछंद बागडण्याला मुरड घालून ताळ्यावर आणू पाहाणारी तुला नकोशे वाटतोय. नव्या दमाची फौज तुला हवी. तिला जशी फुस दिली तशी ती उधळते. भूत भविष्याचा विचार न करता वर्तमानाच्या क्षणिक फसव्या मोहात पाडून तू त्या नव्या नाजूक पात्यांना फसवून स्वतःच वैभव आभाळी मिरवू पाहात आहेस. तुझे पाय त्या वटवृक्षावाणी मजबुतीनं कुठं घट्ट रोवलेले आहेत ? त्याच्या सोबतीला जुने नवे असे पानाचे अक्षौहिनी सैन्य खोडाआधी भक्कमपणे ऊन, वारा थंडीशी टकरायला तयार आहे. म्हणून तर वडाचं राज्य दीर्घकाल चालतं. तो आधार असणार्या पान अन मातीची नाळ वड तुटू देत नाही. तू मात्र "विद्या आली हाता अन गुरूला लाथा" असं वागून नवीन पिढी बिघडवत आहेस. ती पिढी बायका पोरं झाली की मायबापा पासून दुरावून स्वतःचा अधःपात करून ऊर फोडून घेत आहेत. तुला वैभव उंच आभाळी नेल्यासारखं वाटत असलं तरी वादळं वावटळी मध्ये सर्वात आधी ताडमाड उंचीची दिखाऊपणा करणारी भक्कम आधार नसलेलीच झाडंच आधी आडवी होतात. दुरावलेलं गळालेलं पान पुन्हा आधाराला कधीच जवळ येत नाही. ते नव निर्माणासाठी मातीशीच एकरूप होवून जातं ! सोबत्यांना (जनतेला) मारून नव्हे तर सोबत घेवून मोठं होता येतं. हे झाडांनी विसरता कामा नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण काही राक्षसीवृत्तीचे किंवा विध्वसंकवृत्तीचे नाही की, ज्यामुळे कुणाच्याही जीवनात असलेल्या नंदनवनाचे स्मशान बनवण्यासाठी.आपण आहोत सर्वसामान्यपणे एकमेकांच्या आधारे आपल्या जीवनाची नौका पार करण्यासाठी जन्माला आलेली सामान्य माणसे.आपला प्रत्येकाशी कुठे ना कुठे , कोणत्या ना कोणत्या कारणासाठी संबंध येतो.मग तो दु:खाचा असो की सुखाचा.मग आपला संबंध इतरांशी चांगला ठेवायचा असेल तर आपल्या मनात दुस-याविषयीची आत्मियता बाळगायला हवी,जो कोणी संकटात सापडला असेल तर त्याला आणखी संकटात न टाकता आहे त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याला कशी मदत करता येईल आणि वाचवता येईल हे प्रथम विचार करायला हवे.जर आज आपण दुसऱ्याच्या विध्वंसाचा विचार केला तर उद्या आपलीही गत तशीच होणार.मग आपण आपल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी इतरांना बोलावण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या मदतीला कसे धावून येणार ?आपण अशावेळी दुसऱ्याकडून मदतीची अपेक्षाही करणे चुकीचे ठरेल.आपली व इतरांची जीवननौका व्यवस्थितपणे पार करायची असेल तर एकमेकांच्या साथीनेच करावी लागणार.आपल्या एकमेकांच्या मनातल्या उभ्या असलेल्या संशयाच्या,भेदाच्या व तिरस्काराच्या भिंती सा-या पाडून टाकायला हव्यात तरच आपले आणि इतरांचे चांगले,प्रेमाचे,सहकार्याचे संबंध प्रस्थापित होतील.ज्या काही असलेल्या मनातल्या राक्षसीवृत्ती आपल्या चांगल्या संबंधांमुळे केव्हाच लोप पावायला लागतील.असा हा आपला एकमेकांना सहाय्य करण्याचा आणि संकटाच्यावेळी मदतीचा हात पुढे करण्याचा माणुसकीचा खरा धर्म पाळला पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *यशाचे बीजगणित* आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न? 'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी टाइमपास म्हणून उत्तर दिले. 'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली. आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!' 'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली. 'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?' 'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे. 'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले. 'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली. 'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का? अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली. 'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते. 'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते. ''खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे. पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment