*ग्वाही मनाची*
जे दिले दुःख नशिबाने
झगडून त्याला ना हार मानली
आयुष्य जगले असे मी जणू
काट्यावरून चालत चालत
किती बोचतील काटे तरीही
जीवनाशी संघर्ष मी करीन
अन् पुन्हा या भारतमातेचा कल्याणासाठी देह मी झीजवीन
देह माझा लागो देश कल्याणा
राखेतून राहीन पुन्हा उभी मी
झिजुन स्वतः चंदनापरी घडविण
माझ्या विद्यार्थ्यांना
वाटेतल्या काट्यांना
नाही मी जुमानणार
धरूनी कास सत्याची
चालत मी राहणार.....
〰〰〰〰〰〰〰
✍ श्रीमती प्रमिला सेनकुडे
ता.हदगाव जिल्हा नांदेड
No comments:
Post a Comment