✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/02/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले. २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी. २००४ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार. 💥 जन्म :- १८८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार. १९०४ - बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी १९१० - जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता. १९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९५ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार २००३ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर मायकेल पी. अँडरसन, डेव्हिड ब्राउन, कल्पना चावला, लॉरेल क्लार्क, रिक डी. हसबंड, विली मॅककूल, इलान रमोन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राजस्थानात १ मार्चपासून बेरोजगारांना भत्ता, युवकांना तीन तर युवतींना साडेतीन हजार रुपये अशी माहिती अशोक गेहलोत यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन २ व ३ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मोदी सरकारच्या नोटाबंदीचा फटका ; 2017-18 मध्ये सर्वात जास्त बेरोजगार, देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या 45 वर्षांत सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जळगाव : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात शिक्षणाची वारीचा शेवटचा टप्पा उत्साहात संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता घेणार केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. न्यूझीलंड चौथ्या एकदिवसीय सामन्यात किवी गोलंदाज ट्रेंट बोल्टचा विश्वविक्रम, सर्वात जलद 100 विकेट्सचा पराक्रम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षकांना शिकवू द्या ...* शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कल्पना चावला* कल्पना चावला अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या.भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले. संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात होता. तेव्हा कल्पना यांनाही तेथे जावे असे वाटत. पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला तेव्हा अधिकार्यांनी कल्पना महिला आहे, ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पना यांना या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अलिर्ंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन,त्यांनी कॉलोरॅडो विद्यापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली. लहानपणापासून विमान शिकण्याचे स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'पृथ्वी शिखर संमेलन'चं आयोजन कोणी केलं होतं ?* यूएनसीईडी *२) २0१0 मध्ये पार पडलेल्या विश्व मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?* रामदास कामत *३) सजीवांच्या रचनेचे आणि कार्याचे एकक कोणते ?* पेशी *४) एड्स हा रोग कशामुळे होतो ?* विषाणूमुळे *५) एलआयसीचं मुख्य कार्यालय कुठे आहे ?* मुंबई *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ∆ नारायण गायकवाड ∆ राजेश हाके ∆ शिवराज रंगावार ∆ शिवा पडोळे ∆ स्वप्नील कैवारे ∆ अतुल भुसारे ∆ प्रिया मदनकर ∆ सादिक शेख ∆ गजेंद्र ढवळापुरीकर ∆ हिलाल पाटील ∆ एम बी शेख ∆ शिवानंद सूर्यवंशी ∆ तानाजी कदम ∆ विठ्ठल चिंचोलकर ∆ जयश्री मगरे ∆ वशिम शेख ∆ सय्यद अक्तर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सत्तेसाठी* सत्तेसाठी आता मारामारी आहे कोणाला वाटत ही गोष्ट बरी आहे सत्तेसाठी त्यांना हे सर्वच बरे वाटते कोणाला पटो ना पटो त्यांच त्यांना पटते शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पदव्या-प्रमाणपत्रांनी भौतिक यशाच्या आकाशाला भिडता येते. पण चांगलं सुखा-समाधानाचं जगणं कधी शिकणार आपण? जीवनाशी नातं सांगत नैतिक जगण्याचा 'मंत्र' का होत नाही आपलं शिक्षण. माणसाला माणसापासून तोडणारी धर्मांधता, भोळ्या-भाबड्यांची दिशाभूल करणा-या कालबाह्य परंपरा आणि अंधश्रद्धेच्या खाईत लोटणारी बुवाबाजी... अशी विविध आव्हानं पेलणा-या शिक्षणाची आज गरज आहे. समता आणि बंधुभाव समाजमनात रूजविणे ही काळाची पुकार आहे. खरंतर माणसापुढेच माणूसपणाचं आव्हान उभं असावं, ही आपली शोकांतिका आहे. हा जन्म सार्थकी लागायचा असेल आणि माणसाला पशूपक्ष्यांहून उंच उठायचं असेल तर पारंपारिक शिक्षणाची चौकट मोडून नव्या मूल्यशिक्षणाचं आकाश खुलं व्हायला हवं.* *नद्या समुद्रात जाऊन मिळाल्या की त्या स्वत:च समुद्र होऊन जातात. सर्व जातीधर्मांना एकाच रंगाच्या समुद्रात विलीन करून निखळ माणूस म्हणून जगायला आपण कधी शिकणार? आपण शिकलो, वैभवसंपन्न झालो पण आपल्या समर्थ खांद्यावर कुण्या हताश-निराश माणसाला विश्वासानं मान कधी ठेवता येईल? ही सारी आव्हानं झेलत, वंचितांच्या चेह-यावर हसू फुलवण्यासाठी माणसांमाणसातलं अंतर कापू या...आणि आपण सारे माणूस होऊ या ! पूजा-प्रार्थना याहून वेगळी काय असते. सा-या विश्वाला घरपण देणारी संताची जीवनशैली मानवतेचे धडे देत आपल्याला वाट दाखवत असते.* ⭐‼ *रामकृष्णहरी* ‼⭐ ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ऊँचे पानी ना टिके , नीचे ही ठहराय | नीचा हो सो भारी पी , ऊँचा प्यासा जाय || अर्थ : माणसाला नम्रतेने व शालीनतेने ज्ञानाची प्राप्ती करता येते . गुरूसोबत नम्रतेने वागायला पाहिजे. ताठर ,उद्धट व मी पणाचा अहंकार मिरवणार्याला गर्विष्ठपणाशिवाय काही प्राप्त करता येत नाही.उगाच फुशारकीचा रिकामा ताठा मिरवणार्याचा भ्रमाचा फुगा फार काळ टिकत नाही. वाकणार्या नरम लोखंडालाच हवा तसा आकार देता येतो . पोलादाचा ताठरपणा त्याचे तुकडे व्हायला कारण ठरतो. महात्मा कबीरांनी सुंदर दाखला देत सांगितलंय की पाणी उंच जागेवर कधी थांबतं का? ते सदैव खोलगट जागेकडं धाव घेतं व तिकडंच वास्तव्य करतं. उंच माळरानावर व हवेत वावरणार्यांना तहाणेनं तरमळावं लागतं. मात्र खोलगट, सखल जागी वस्ती करणार्याला पावसाळ्यात थोडे कष्ट जरूर परंतु उन्हाळ्यात भरपेट पाणी मिळतं. त्याची तहाण भागते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते. पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ? © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना सर्वथा नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥ संकलक - सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हे क्षण हीं निघून जातील !!!* एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू , संत , फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल व मला कायम आनंदी ठेवेल. अखेर एका बौद्ध भिक्षुने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल. बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच दुष्ट व कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले. विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला. हे समजल्यावर प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार. त्या क्षणी त्याला त्या अंगठीची आठवण आली अन् ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते , " *This too shall pass* " म्हणजे " *हाही क्षण निघून जाईल"* केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले , सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला असे समजून ते परतले. राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला. विजयाचा जंगी समारंभ चालू असताना नवीन प्रधानाने पाहिले की , महाराज कुठेही अति-उत्साहित न होता शांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले , " महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे. " राजा म्हणाला, " नाही , आता मला बुद्धाचा अनित्यता वादाचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही. *परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही* *राहात नाही , दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले* *आहे.म्हणून दुःखात खचू नये अन् सुखात नाचू नये."* *This too shall pass !* *हे क्षणही निघून जातील.* ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. _______ *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment