✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले. १७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. 💥 जन्म :- १९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे १९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे १९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन १९४०: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास 💥 मृत्यू :- १९९९: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर; 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान होणार अधिवेशन, 01 तारखेला अर्थसंकल्प होणार सादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; 165 मते पडली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *औरंगाबादचे पालकमंत्रिपद एकनाथ शिंदें यांच्याकडे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचा दिलासा; माथेफिरू एसटीचालक संतोष मानेला फाशीऐवजी जन्मठेप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर : 30 हजार घरं मजुरांना दिल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नरसय्या आडम यांनी मानले आभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी झाला आहे सज्ज, शनिवारपासून होणार सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर अंतिम भाग बारावा वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2019/01/12.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गणेश हरी खरे* गणेश हरी खरे (जन्म १० जानेवारी १९०१ - मृत्यू०५ जून १९८५) हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?* सिंद्री (झारखंड) *२) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?* वॉशिंग्टन *३) कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?* जिराफ *४) भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?* हिराकुंड *५) केळीचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?* तामिळनाडू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीनिवास रेड्डी ● साईनाथ सोनटक्के ● राजेश कुंटोलू ● गणेश वाघमारे ● शत्रूघन झुरे ● स्वरूप खांडरे ● आकाश क्षीरसागर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शाश्वत* छोट्यांची छोटी अन् मोठ्यांची मोठी रिश्वत आहे ज्याच्या त्याच्यापरीने घेतात ते सारे शाश्वत आहे लपून छपून घेणाराला काहीही पटत असते रिश्वत सुद्धा त्यांना शाश्वत वाटत असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.* *गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यों गूंगा के सैन को, गूंगा ही पहिचान त्यों ज्ञानी के सुख को, ज्ञानी हबै सो जान। सारांश मुक्याची भाषा मुक्याला बरोबर समजते कारण दोघेही समान संवेदनेचे असतात. त्यांना बोलता येत नसले तरी त्यांची (देहबोली) खुणवाखुणवी इशार्याची भाषा असते. त्या खुणवण्यातून त्याला काय सांगायचंय ते समोरचा बहीरा बरोबर ओळखतो. मात्र हे इशारे व सुचित करावयाचा भाव विद्वानालाही कळू शकत नाही. त्यासाठी त्याच्याच पातळीवर यावं लागतं. जसं लहाण बाळाचं रडणं अन त्याचे चेहर्यावरचे हावभाव त्याच्या आईला वाचता येतात. म्हणून त्यांच्यात डोळ्याची भाषा विकसित झालेली असते. लेकराचं अर्ध अधिक पालन-पोषण तर आई डोळ्याच्या ईशार्यावरंच पूर्ण करते. विशिष्ट वयामध्ये वेगवेगळ्या सांकेतिक भाषा विकसित होतात. किशोरावस्थेपासून अशा सांकेतिक भिषा विकसित होतात. प्रत्येक शब्दात विशिष्ट अक्षर क्रमात एखादे अक्षर टाकून त,व,म,प....ची भाषा बोलता येणे. बोलणार्या दोघांनाच कळायचं बाकीचे उगा तोंडाकडं पाहात राहाणार . कुमारावस्थेनंतर अशा भाषांचं आकर्षण ओसरून जातं. जनावरांच्या बाजारात हेड्यांची दलालांची भाषा तरी कुठे कळते दलालांशिवाय दुसर्यांना ! कित्येक जणांच्या समुहात वावरणार्या दोन प्रेमींनी आपली एक भाषा विकसित केलेली असते. कितीही चौक्या पहारे असले तरी ती त्या दोघांना बरोबर कळते. चौक्या पहार्यांना भेदून ती एकमेकांची भेट घडवून आणतेच. त्याप्रमाणे आत्मरूपाच्या आनंदात एकरूप झालेल्या आत्म ज्ञान्याला दुसरा आत्मज्ञानी बरोबर ओळखू शकतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे प्रत्येक फुलाचा आकार, रंग आणि सुगंध वेगवेगळा असतो त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तींची शारिरीक रचना,आचार आणि विचार हे वेगवेगळे असतात.याचे कारण जरी वेगळे असले तरी आपण एकमेकांना आपल्या जीवनात स्वभावानुसार समजाऊन घेऊन आपले जीवन व्यवहार अगदी व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करायला हवा.काही अंशी कमी-जास्त असलेतरी ते आपण आपल्या स्वभावानुसार आणि विचारानुसार ओळखून जीवनात एकोप्याने राहण्यातच आपले खरे कौशल्य आहे.म्हणून कुणालाही आपल्यापेक्षा कमी लेखून आपले वर्चस्व इतरांवर लादू नये.त्यातील एखादा आपल्याला हवा असलेला गुण शोधून आपल्या जीवनात आचरणात आणून एकमेकांना समजावून घेऊन आपल्या जीवनाबरोबर घेऊन आनंदी जीवन जगण्यात धन्यता मानावी. हाच आपला व आपल्या माणुसकीचा खरा धर्म आहे. ज्या विविधतेत एकता असते त्या एकमेकांच्या भावना दुखावण्यात नसते.तेव्हा आपण वेगवेगळे जरी असलो तरी अनेक विचारांना एकत्रीत बांधून एकतेचे दर्शन घडवू शकतो.हा विचार नित्यासाठी आचरणात आणायला हवा.त्यात आपल्यातही दडलेल्या चांगल्या विचारालासुध्दा इतरांमध्ये सामावून घेण्याची संधी मिळेल.एकमेकांना हीन समजून 'मी 'चे अस्तित्व वृध्दिंगत करणे अयोग्य आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌻🌺🌸🌼🌹🌷🌻🌺🌸🌼🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अपूर्ण - Incomplete* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गुरू ,परीक्षा ,शिष्य* गुरुकुलातून तीन शिष्य उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल.. आणि या परीक्षेत तुम्ही पास झाला तर तुमचे जीवन यशस्वी व सत्कारणी लागेल. आता आपल्या गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती विशेष परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात सत्कार सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढील जीवनातील आयुष्य यशस्वी करण्यासाठी बाहेर पडले. एके दिवशी ते संध्यासमयी जंगलातुन जात होती.आणखी काही क्षणांमध्ये काळोख पसरणार होता .राञ होणार अंधार पडणार आणि त्या काळोखातुन त्यांना जंगल पार करून गावी परतायचे होते . झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. अचानक पुढे चालणारा विद्यार्थी थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं. दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला.. तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला. दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का? कोणत्याही क्षणी अंधार पडेल.आता सांज होत आहे.अशा या संध्यासमयी आपल्याला लवकरात लवकर मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर.. तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत. आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो वाटसरू येईल, त्याला काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत.. ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे. *तात्पर्यः* अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती,भावनिकतेची होती , अनुकंपेची होती, सहवेदनेची होती,दुःख वाटून घेण्याची होती.तुम्ही दोघेजण ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे.भावनिकतेची जोपासना होणे बाकी आहे.बस तेवढी जोपासयला शिका.मगच जीवनात सर्वोतोपरी यशस्वी व्हाल *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment