✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/01/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १६७१ - छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मुघलांकडून काबीज केले. १८३२ - दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित १९२४ - महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले १९४९ - पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था सुरू झाली १९५७ - भारतात विक्रीकर कायदा लागू झाला. 💥 जन्म :- १८६८ - गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू, मराठी संतकवी १८८३ - खलील जिब्रान, अरब कवी, तत्त्वज्ञानी व चित्रकार १८९२ - कृ.पां. कुळकर्णी मराठी भाषेचे अभ्यासक. १८९३ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.१९१३ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक. १९२५ - रमेश मंत्री, मराठी साहित्यिक . १९२८ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक . 💥 मृत्यू :- १९७१ - पी.सी.सरकार, भारतीय जादूगार. १९८२ - रामचंद्र चितळकर उर्फ सी.रामचंद्र, भारतीय संगीतकार. १९९० - रमेश बहल – चित्रपट निर्माता व दिग्दर्शक २००४ - ज्येष्ठ चित्रकार गजानन नारायणराव जाधव. २०१८- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ••••••••••••••••••••••••••••••••••••• 1⃣ *मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी. २१ व्या शतकातील तत्व, व्यवस्थेनुसार मराठी अग्रेसर झाली पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागपुरात १६ व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नांदेड: वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड लोकसभेसाठी उमेदवार जाहीर. धनगर समाजाचे नेते प्रा. डॉ. यशपाल भिंगे लढणार नांदेड लोकसभा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *07 जानेवारी पासून बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वेतनवाढीच्या मागणीसाठी टपाल खात्याच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, कामावर फारसा परिणाम नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आरोग्यमंत्री दीपक सावंत राजीनामा देणार; 7 जानेवारीला सावंत यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे 598 धावांची आघाडी, ऑस्ट्रेलिया बिनबाद 24* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पवनार आश्रम पवनार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील वर्धा शहरापासून ६ की.मी. अंतरावर असलेले एक गाव आहे. आचार्य विनोबा भावे यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलचे योगदान लाभले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भूदान चळवळ उभारली. आश्रम - या गावी धाम नदीचे तीरावर आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे. हा आश्रम १५ एकर जागेवर् विस्तारलेला आहे. ह्यात खुप् जैविक विविधता आहे. अनैसर्गिक गोष्टींनपासून खुप दुर आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्ला असा हा आश्रम ईथे येणार्या लोकांना आकर्शित करतो. ईथे येणारे बहुतेक लोक उच्च शिक्शित असतात. भुदान आंदोलनाचे प्रणेते विनोभा भावे यांनी हा आश्रम सुरु केला. विनोभांनी हा आश्रम खास करून् महिलांसाठी चालु केला. ईथे येणार्या महीला साध्वी (मीराबाई सारख्या) जिवनाच्या उपासक होत्या. आश्रमात रहाणार्या महीला याला ब्रह्म विद्या मंदिर म्हणून संबोधत. सध्या ह्या आश्रमाचे व्यवस्थापक विनोबा भावेके सहयोगी, श्री गौतम बजाज आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) कटक हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलं आहे ?* महानदी *२) केंद्रीय सिसा संशोधन संस्था कोठे आहे ?* गडसा कुलू (हिमाचल प्रदेश) *३) रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला ?* सॅम्युअल कोल्ट *४) देशात सर्वाधिक शाखा असणारी बँक कोणती ?* भारतीय स्टेट बँक. *५) विश्वाच्या उत्पत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते ?* कॉस्मोलॉजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुरेंद्र अकोडे ● भाऊसाहेब चासकर ● सिंकदर डोंगरे ● गणराज गुरुपवार ● संजय घोगरे ● व्यंकटी केंद्रे ● राजकुमार बेरलीकर ● नितीन उत्तरवार ● लक्ष्मण मिरदुडे ● लक्ष्मीकांत पवार ● माधव रामपुरे ● किशन कांबळे ● प्रभाकर मिरेवाड ● बजरंग राजापूरकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घमंड* वय अन् पैशाची घमंड करता येत नाही हे कायम राहील विश्वास धरता येत नाही जे मोजता येत ते नक्की नष्ट होतं नको त्याचा घमंड वाईट हे स्पष्ट होतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनत्वाच्या अनेकविध कसोट्यांपैकी एक म्हणजे व्यक्तीचे बोलणे होय. माणसाच्या जिभेवर खडीसाखर असली तर त्याची न होणारी, लांबणारी कामेसुद्धा झटक्यात होतात याचा अनुभव अनेकदा येतो. वाणीतील मवाळपणा माणसाला कुठच्या कुठे घेऊन जाणारा ठरला असल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. व्यक्तीजवळ इतर कोणतेही धन नसेल तरी एकवेळ चालेल; पण त्याच्या जीवनव्यवहारात गोडवा हवा. त्याच्याशी बोलावे, नाते निर्माण करावे असा मोह जेव्हा इतरांना होतो तेंव्हा तो त्याचा जीवन-विजय असतो.* *लोक अनेकदा स्पष्टवक्तेपणाच्या नावाखाली दुस-याला दुखावतात, त्यांचा अपमान करतात; पण असे करणे चांगले नव्हे. मार्दवाने बोलल्यास कमीपणा येतो, आपली बाजू सत्याची असली तरी लोक साशंकतेने पाहतात, त्यात ठाशीवपणा नसतो, असा काही लोकांचा गैरसमज असतो. मोठ्याने, ओरडून बोलले तरच समोरचा नमतो, त्याच्यावर प्रभाव पडतो असे मानणे वेडेपणा आहे. ज्याला चांगुलपणाची आस असते, त्याच्या मवाळतेच्या चर्चा सर्वदूर पसरलेल्या असतात. बोलण्यातील मऊपणा म्हणजे दुय्यमत्व नव्हे. ते तुमच्या प्रभावी व्यक्तीमत्वाचे एक लक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणवर्णनातील वैशिष्ट्ये वाचली की, त्यांनी जे विराट काम केले, त्यांनी डोंगराएवढी माणसे प्राणपणाने जपली त्यात त्यांच्या स्नेहार्द्र वाचेचा वाटा सर्वोच्च होता.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञानी तो निर्भय भया, मानै नहीं संक इन्द्रिन केरे बसि परा, भुगते नरक निशंक। सारांश ज्ञानी सदा सर्वदा निर्भय असतो. कारण ज्ञानी माणसाला सर्व घटना घडामोडींमागील कार्यकारण भाव लक्षात येतो. अज्ञानी मात्र घटना घडामोडीमागील कार्य कारण भाव लक्षात न आल्यामुळे त्या घटनेला चमत्कार समजू लागतो. प्रत्येक घडामोडीमागे शास्त्र असते. वरवरचा विचार करणार्यांना ही घडामोड म्हणजे जादू किवा चमत्कार वाटते. चतुर माणसे अज्ञानी माणसांच्या अज्ञानाचा फायदा उठवत स्वतःचा स्वार्थ साधत असतात. मात्र ज्ञानी, सर्वज्ञ अशा चतुर व फसव्यांच्या ढोंगांना बाधत नाहीत. त्यांनी सृष्टीत सामावलेला परमात्मा जाणलेला असतो. परमात्माच्या रूपाबद्दल ते निशंक असतात. माणूस ज्ञानी असूनही तो जेव्हा माया मोहाच्या भ्रमात फसतो. षडविकारांच्या आहारी जातो, तेव्हा त्याच्या विचार वृत्ती दोलायमान होतात. विवेकी वृत्ती कचमरू लागते. जिथे फसव्या गोष्टी डोळसपणावर पांघरण घालू लागतात, तिथे सत्य व विवेक दबला जातो. चारित्र्यवान माणूसही अधःपतित होतो. त्याला सत्याकडे केलेल्या डोळेझाकीचे परिणाम भोगावे लागतात. म्हणून माणसाने सारासार विचाराने इंद्रियांवर अंकुश ठेवला पाहिजे. इंद्रियांवर विजय मिळविणारा जीतेंद्रीय असतो. त्याला जगातल्या कुठल्याही शक्ती विचलित करू शकत नाहीत. स्वतःला इंद्रियांचा दास बनविता कामा नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात. त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात.ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही.ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात.प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते. तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो.त्याचे कारणही तसेच असते.सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी,मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली,जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी,अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो.अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो.अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो.म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उदार - Generous* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वतःमध्ये बदल* *कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'* *तात्पर्य:- दुसर्याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला कधीही चांगले असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment