✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/06/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन सामाजिक न्याय दिन 💥 ठळक घडामोडी :- १८१९ - सायकलचा पेटंट देण्यात आला. १९६० - सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६० - मादागास्करला फ्रांसपासून स्वातंत्र्य. १९९९-नांदेड तालुक्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करून माहूर हा नवीन तालुका तयार करण्यात आला 💥 जन्म :- १८७४ - राजर्षी शाहू महाराज १८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक. १८९२ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका. 💥 मृत्यू :- १९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ. २००१ - वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक. २००४ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी. लिट पदवी प्रदान करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आरोग्यविषयक सर्वोत्तम कामगिरीबाबत केरळने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश व महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाने मोटर वाहन (संशोधन) विधेयकाला दिली मंजुरी, यामध्ये वाहतुकीचे नियम मोडल्यास तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा प्रस्ताव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बिहार- चमकी तापामुळे मृत पावलेल्या बालकांचा आकडा 131 वर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर विदर्भात आज होत आहे शाळांची दारे उघडी, जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पुस्तके देऊन केले जाणार त्यांचे स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - रमेशचे शौर्य* https://storymirror.com/read/story/marathi/hqfwvd9w/rmeshce-shaury वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 😴 *आपण केव्हा घोरतो ?* 😴 तसंच पाहिलं तर सर्वच जण घोरतात. पण कोणी ते कबूल करायला तयार नसतो. तसा सबळ पुरावा दाखवून ते कबूल करून घेणंही सोपं नसतं. कारण माणूस घोरतो ते झोपेत. त्या वेळी त्याला आजूबाजूच्या जगाचं भानच नसतं. त्याला उठवलं तर तो घोरत होता याचा पुरावाच नष्ट होतो. तरी बरं अलीकडे अँड्रॉइड वगैरे प्रकारच्या मोबाइल फोनवर कोणाचाही साग्रसंगीत व्हिडिओ घेण्याची सोय आहे. त्याचा वापर करून माणूस घोरी घराण्याचा सदस्य असल्याचं सिद्ध करता येतं. माणूस गाढ झोपलेला असताना घोरतो हे तर स्पष्टच आहे. तरीही नेमकी कोणती परिस्थिती त्याच्या घोरण्याला कारणीभूत होते हेही समजून घेतलं, तर तो केव्हा घोरतो हे स्पष्ट होईल. झोपेत असताना आपले स्नायू शिथिल पडलेले असतात. आपल्या घरातील अवयवांचं नियंत्रण करणाऱ्या स्नायूंचीही तीच स्थिती असते. त्यामुळे मऊ टाळू, जीभ, पडजीभ वगैरे अवयवांची या नियंत्रणापासून सुटका होते. त्याच वेळी श्वासनलिकाही सुस्तावल्यामुळे अरुंद झालेली असते. ज्या वेळी आपण श्वास घेतो तेव्हा तो या अरुंद श्वासनलिकेतून आत जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला अर्थात त्या अरुंद नलिकेकडून विरोध होतो. त्याचा परिणाम जवळच्या मृदू अवयवांवर पडून ते फडफडू लागतात. त्यांचाच जोराचा आवाज होतो. तोच आपल्याला घोरण्याच्या स्वरूपात ऐकू येतो. कधीकधी सर्दीमुळे किंवा अशाच काही कारणांमुळे नाक चोंदलेलं असतं. त्यातून वाट काढणाऱ्या श्वासालाही विरोध होतो. त्यावर मात करण्यासाठी हवेला जास्त जोर लावावा लागतो. परिणामी हवेचा प्रवाह सुरळीत होण्याऐवजी खळबळल्यासारखा होतो. त्या खळबळीपोटी घशातल्या मृदू अवयवांची फडफड होते. माणूस घोरायला लागतो. घोरण्याचा केवळ इतरांना त्रास होतो असं नाही. तर घोरणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा त्रास होत असतो. कारण घोरण्यामुळे बर्याच वेळा झोप चाळवली जाते. काही वेळा तर जागही येते. परत झोप लागणं कठीण होतं. व्यवस्थित झोप न मिळाल्यामुळे उठल्यावर माणूस तेवढा ताजातवाना राहू शकत नाही. जसा खोकला हा आजार नाही तर ते केवळ लक्षण आहे, तसंच घोरणंही हा आजार नाही. तेही एक गंभीर ठरू शकणाऱ्या आजाराचं लक्षण आहे. कधीकधी झोपेत असताना श्वासोच्छ्वासाला अडथळा होतो. याला अाॅब्स्टक्ट्रिव्ह स्लीपअॅंप्निया म्हणतात. झोपेत असल्यामुळे या अडथळ्याचं रूपांतर श्वासोच्छ्वास थांबण्यात कधी होतं ते कळतही नाही. तसं झाल्यास जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते. त्यावर वेळीच उपाय करणं आवश्यक असतं. त्यामुळे अतिघोरणं होत असेल व त्यातून झोप वरचेवर चाळवली जात असेल तर डॉक्टरी तपासणी करून घेणं हिताचं ठरतं. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *अफगणिस्तान या देशाची राजधानी कोणती ?* काबुल 2) *राष्ट्रगीतात 'जय' हा शब्द किती वेळा आलेला आहे ?* 9 3) *नागपूर हे नाव कशावरून पडले ?* नाग नदीवरून 4) *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?* डोनाल्ड ट्रम्प 5) *रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?* ब्लादिमिर पुतीन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● रमेश इटलोड ● नारायण ईबीतवार ● राजेश पाटील उमरेकर ● संतोष रेड्डी बोमीनवाड ● सुरेश यादव ● अनिल पाटील भुसारे ● गणेश आरटवार ● कैलास स्वामी ● शेख बाशू ● मनीष अग्रवाल ● कृष्णा भोरे ● बालाजी सावंत ● लक्ष्मण नोमुलवार बाभळीकर ● अंकुश कामगोंडे ● पुरुषोत्तम रेड्डी चाकरोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुन्शी प्रेमचंद यांनी तारूण्याविषयी फार छान विचार मांडले. ते म्हणतात, 'तारूण्य जोश आहे, बल आहे, साहस आहे, दया आहे, आत्मविश्वास आहे. गौरव आणि सर्वकाही आहे. तारूण्य व्यक्तीच्या जीवनाला उज्ज्वल आणि परिपूर्ण बनविते. परंतु एकदा का ते भरकटले तर सर्व सद्गुणांचा नाश होऊन जीवन सैरभैर होते.' तारूण्याला विश्वात्मकतेचे परिमाण द्यायचे असेल, तर तेवढे साहस आणि उदार असणे आवश्यक आहे. उदारता आणि साहस यांच्या संयोगामुळेच डाॅ. कोटणीस मानवतेच्या भावनेतून चीनमध्ये स्थिरावतात. भारत-चीन या देशांमध्ये मानवतेचा सांस्कृतिक बंध निर्माण करतात. तारूण्याचा खरा अर्थ कळलेली 'डाॅ. कोटणीस की अमर कहाणी' संपूर्ण जगाला आकर्षणाचा आणि आत्मसंवेदनाचा विषय वाटते.* *जनावरे राखता राखता अभ्यास करीत बौद्धिक कर्तृत्वावर आणि तारूण्यातील सकारात्मक ऊर्जेमुळे तात्याराव लहाणे यांच्यासारखा तरूण नेत्ररोग तज्ञ म्हणून नावारुपाला येतो. अलिशान हाॅस्पिटल उभारून खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याच्या नादी न लागता सरकारी दवाखान्यात नोकरी करून सामान्यांची सेवा करण्यात धन्यता मानतो. तेही तारूण्याचा अर्थ समजल्यानेच. युवावर्गाने आपल्या तारूण्यावस्थेतील महत्वाचा काळ शक्ती, कार्यक्षमता, बुद्धिचातुर्य यांचा योग्य वापर केला तर कुटुंब, देश पर्यायाने मानवसमाज प्रगतीपथावर जाऊ शकतो.* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• उदर समाता अन्न ले, तन ही समाता चीर अधिक ही संग्रह ना करें, तिस्का नाम फकीर। सारांश संन्याशी कसा असावा ? याबद्दल महात्मा कबीर सांगतात की जो पोट भर अन्न घेतो आणि काया झाकण्यापुरती वस्त्र मिळाली की संतुष्ट व समाधानी धारण करतो. यापेक्षा अधिकचे द्रव्य,कपडेलत्ते जमा करीत नाहीं किवा त्यांचा संग्रह ही करीत नाही तोच खरा फकीर किवा संन्यासी असतो . अध्यात्म सांगण्याच्या नावाखाली लोकांना लुटण्याचे प्रकार केले जातात. पूर्वी सामान्य माणसाला अध्यात्म किवा वेद पुराण कळायचं नाही. ते समजून घेण्यासाठी एखाद्या ज्ञानी पंडिताकडं जावं लगायचं. तो पंडितही भलता भाव खायचा .समोरच्याला माहिती सांगणे किवा मजकूर वाचण्याच्या मोबदल्यात त्या गरजू व्यक्तीकडून अंगमेहनतीची कामे फुकट करून घेणे. द्रव्यादी उकळणे असा प्रकार सर्रास चालायचा. आजही थोतांडी कर्मकांडाची भिती दाखवून लुबाडणूक होताना दिसते. भोळे भाबडे भक्तगण जादू छू मंतर हात चालाखीला भुलून बुवाबाजी व ढोगाला आहारी पडतात. ढोगी नाटकी सन्याशांचे आश्रम जागोजागी थाटले जातात. धर्म व पंथांच्या नावाखाली साध्या भोळ्या भक्तांना लुटून संन्यस्तपणाच्या बुरख्याआडून अधर्म करणार्यांना वेळीच ओळखून दूर राहावं. ऐसे कैसे झाले भोंदू| कर्म करूनी म्हणती साधू॥ अंगी लावुनिया राख| डोळे झाकुनिया करती पाप॥ दाखवुनिया वैराग्याची कळा| भोगी विषयाचा सोहळा॥ तुका म्हणे सांगो किती| जळो तयाची संगती॥ जगद्गुरू तुकोबांचा वरील अभंग ध्यानात घेतला तरी अशा ढोंगी सन्याशांपासून अलिप्त होता येईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्या विचारात आणि तुमच्या विरोधकांच्या विचारात खूप फरक आहे.तुमचा विचार हा सर्वसाधारण पणे त्रास होऊ नये,आपल्या बोलण्यामुळे मन दुखवू नये,तो जरी आपल्याकडे काकदृष्टीने पाहत असला तरी आपण त्याच्याकडे चांगल्या दृष्टीनेच पाहणे.आपले एखादेवेळी नुकसान झाले तरी चालेल पण त्याचे नुकसान होऊ नये अशी आपली धारणा असते आणि यामुळेच समोरच्यापेक्षा आपले जीवन सुखावह जगण्याचे मंत्र्यांनी शिकवते.हाच जगण्याचा मंत्र समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत नसतो आणि त्यामुळे त्यांच्या जगण्याचे चित्रच बदलून जाते.शेवटी त्यांच्या जगण्यात आणि जीवनात तुमच्यासारखा अर्थच नसतो.म्हणून तुमची जगण्याची जीवनशैली ही खरोखरच सर्वसमावेशक आणि आदर्श आहे हे विसरु नका.आज नाही उद्या तरी तुमच्या जीवनशैलीचा नक्कीच स्वीकार करतील. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गुरुकृपा* *विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे* एकदा सर्व संत मंडळी जमली होती. तेव्हा मुक्ताबाईने गोरा कुंभारांना सांगितले की, 'सर्व संतांची परीक्षा घ्या'. त्यांनी एक लाकूड घेतले आणि लाकडाने सगळ्यांच्या डोक्यावर एक-एक थापटी मारली. जेव्हा नामदेवांच्या डोक्यावर थापटी बसली, त्या वेळी ते काहीच बोलले नाहीत; पण रागाने त्यांचे तोंड फुगले. त्यांनी अहंकाराने विचार केला, ‘मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा होऊ शकते का ?' नंतर गोरा कुंभारांनी सांगितले, ‘‘नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत. हे ऐकून नामदेव विठ्ठलाजवळ आले आणि घडलेली सर्व घटना त्याला सांगितली. देवाने सांगितले, ‘मुक्ताई आणि गोरोबा म्हणत आहेत की, तुझे डोके कच्चे आहे, तर तू खरोखरीच कच्चा आहेस; कारण तू सद्गुरूंचा आश्रय घेतला नाहीस. माझा विसोबा खेचर म्हणून एक भक्त आहे. त्याच्याकडे तू जा. तो तुला ज्ञान देईल'. संत नामदेव विसोबा खेचरांकडे आले. तेव्हा विसोबा खेचर महादेवाच्या पिंडिकेवर पाय ठेवून झोपले होते. हे पाहिल्यावर नामदेवांनी विसोबांना सांगितले, ‘‘शिवलिंगावरून आपले पाय बाजूला काढून ठेवा". त्या वेळी विसोबांनी नामदेवांना सांगितले, ‘‘ज्या ठिकाणी शिवाचे अस्तित्व नाही, अशा ठिकाणी तू माझे पाय काढून ठेव". नामदेव जिथे जिथे पाय ठेवायचे, तिथे तिथे शिवलिंग प्रकट होत असे. त्यामुळे सगळा गाभारा शिवलिंगांनी भरून गेला. हे पाहून नामदेवांना आश्चर्य वाटले. त्या वेळी विसोबा खेचरांनी सांगितले, ‘‘भगवंत सर्वत्र आहे; पण या इंद्रियांनी आपल्याला त्याची जाणीव होत नाही". नामदेवांच्या ठिकाणी भक्ती होती. गुरुकृपेमुळेच ‘सर्वत्र ब्रह्म आहे', याचे त्यांना ज्ञान झाले. संत नामदेव परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकरूप होते. केवळ गुरुकृपेनेच त्यांना निर्गुण रूपाशी एकरूप होता आले. तात्पर्यः गुरूचे कार्य महान असते.गुरुकृपा ही सर्वश्रेष्ठ असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment