✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/06/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १६१३ - विल्यम शेक्सपियरच्या नाटकांचे पहिले प्रयोग जेथे झाले ते ग्लोब थियेटर आगीत भस्मसात. १९५६ - अमेरिकेत देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर. 💥 जन्म :- १८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक. १९३४ - कमलाकर सारंग, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता. 💥 मृत्यू :- २००० - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, मराठी ऐतिहासीक कादंबरीकार. २००३ - कॅथेरिन हेपबर्न अमेरिकन अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू काश्मीरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मांडला प्रस्ताव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा म्हाडा घेणार ताबा, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कोकणसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला असला तरी जोर कमी राहिला. कोकणासह विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *'जात प्रमाणपत्राऐवजी वडिलांच्या हमीपत्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश द्या', शिक्षणमंत्री आशिष शेलार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्राची २० सूत्री व्यापक योजना, शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्याची कबुली सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला हरवत विश्वचषकातील दुसरा विजय नोंदविला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : आज ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात होणार लढत, श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास दोन्ही संघ सज्ज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - व्यसन* https://storymirror.com/read/story/marathi/wkjlo9ps/vysn/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌫 *हिमालयाचा जन्म केव्हा झाला ?* 🌫 'उत्तरम् यत्समुद्रस्य । हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम । भारती यंत्र संतत.' भारतवर्षांची - आपल्या देशाची अशी ओळख सांगितली आहे. म्हणजे सागराच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस असणारा देश. यावरून आपला देश अस्तित्वात आला तेव्हापासून उत्तरेला हिमालयाचा कोट आपलं संरक्षण करत आला आहे अशी आपली समजूत होईल. पण ती बरोबर नाही. कारण हिमालयाचा जन्म आपली भूमी अस्तित्वात आल्यानंतर कितीतरी शतकांनी झाला आहे. किंबहुना धरतीतलावरच्या एकूण उत्तुंग पर्वतांपैकी हिमालय हा सर्वात कमी वयाचा पर्वत आहे. फार फार पूर्वीचं म्हणजे साधारण पृथ्वीचा धगधगता गोळा थंड झाल्यावरचं पृथ्वीचं भौगोलिक रूप फार वेगळं होतं. तिच्या पृष्ठभागापैकी जवळजवळ सारा भाग पाण्यानं व्यापलेला होता. जी काही कमी होती ती आग्नेय कोपऱ्यात म्हणजे आज जिथं साधारणपणे ऑस्ट्रेलिया आहे तिथं एकच एक मुटकुळं करून चुपचाप पडून राहिली होती. तिचं नाव होतं पॅनगाईया. या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे समस्त भूमी. त्यानंतरचा कितीतरी काळ अशीच परिस्थिती राहिली. साधारण साडेबावीस कोटी वर्षांपूर्वी या भूमीच्या गाठोड्याला जात आली. तिच्यात हालचाल सुरू झाली आणि तिचे दोन प्रचंड तुकडे झाले. पुढच्या अडीच कोटी वर्षांमध्ये हे तुकडे एकमेकांपासून पूर्णपणे अलग झाले. उत्तरेचा लॉरेशिया आणि दक्षिणेला गोंडवनालँड. लाॅॆशियाचं वायव्य दिशेनं भ्रमण सुरू झालं. आजची उत्तर अमेरिका आणि युरोप खंडं त्यात समाविष्ट होते. गोंडवनालँडमध्ये आजची आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका वगैरेंचा समावेश होतो. हे दोन्ही भूखंड एकमेकांपासून अलग होत पुढची साडेतेरा कोटी वर्षे दूर दूर जात राहिले. पृथ्वीच्या गाभ्यात तप्त शिलारस असून त्यावरच्या घन कवचाचे हे तुकडे तरंगत असतात. त्यांचं भटकणं अविरत चालूच असतं. यालाच आता वैज्ञानिक भाषेत प्लेट टेक्टॉनिक्स असं म्हणतात. या भूखंडांच्या भटकण्यातून या दोन प्रचंड भूखंडांचेही तुकडे झाले. त्यातूनच उत्तर अमेरिका आणि युरोपही एकमेकांपासून वेगळे झाले. गोंडवनालँडचे तर तीन चार तुकडे झाले. एकात दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका होते. ते पश्चिमेकडे सरकू लागले. दुसऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका होते. त्याचेही दोन तुकडे होऊन अंटार्क्टिका दक्षिण दिशेनं तर ऑस्ट्रेलिया थोडा अाग्नेयाकडे सरकला. एक दुसरा मोठा तुकडा बाजूला होऊन त्याचं एक बेट झालं. ते टेथिस महासागरात तरंगू लागलं. हेच भारतीय उपखंड. कालांतराने तेही वायव्येकडे सरकत राहिलं. आणि साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी त्यानं जाऊन आशिया खंडाला धडक दिली. त्यावेळी भारतीय उपखंडाच्या सरकण्याचा वेगही एका शतकात ९ मीटर एवढा होता. धडकीनंतर तो निम्म्यावर आला. आणि पाच कोटी वर्षांनंतर तो आताच्या एका वर्षांत २-३ सेंटीमीटर एवढा कमी झाला. जमिनीवरून आपण एखादा कागद सरकवत नेला तर तो सरकत राहतो. पण जेव्हा तो भिंतीला भिडतो तेव्हा पुढे सरकू शकत नाही. तरीही सरकण्याचा रेटा चालूच राहिला तर त्याला घड्या पडून तो तिथंच उंचावतो. भारतीय खंडाच्या आशिया खंडाला भिडलेल्या सीमारेषेवर तसाच प्रकार घडला आणि त्यातूनच हिमालयाचा जन्म झाला. टप्प्याटप्प्यानं त्याची उंची वाढत राहिली. ती अजूनही वाढतेच आहे. सर्वात उत्तुंग शहर एव्हरेस्टची उंची गेल्या शंभर वर्षांमध्ये ८-९ मीटरनी वाढली आहे. या रेट्यापायी तिबेटच्या पठाराचाही जन्म झाला. तो भूभाग पाच हजार मिटरने उंचावला गेला. तेव्हा हिमालयाचा जन्म हा गेल्या पाच कोटी वर्षांपूर्वीचा आहे. भारतवर्ष मात्र त्यापूर्वी कितीतरी कोटी वर्षं अस्तित्वात आलं होतं. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भूतकाळातील "अनुभूती", वर्तमानकाळातील "कृती", आणि भविष्याची "दूरदृष्टी", माणसाला "परिपक्व" बनवते.* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पेरू या देशाची राजधानी कोणती ?* लिमा 2) *T V चा शोध कोणी लावला ?* जॉन लागी बेअर्ड 3) *जगातील सात वास्तू आश्चर्यापैकी भारतातील आश्चर्य कोणते ?* ताजमहाल 4) *ताजमहाल कोणी बांधला ?* शाहजहान 5) *आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे ?* यमुना *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● चैतन्य दलाल ● हौसाजी ढेपाळे ● सदा वडजे ● सुनील मद्दलवार ● वर्षा लोखंडे ● किशनराव भाऊराव पाटील ● अनिल भाकरे ● सिद्धार्थ डुमणे ● दलित सोनकांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दुस-याचं सुख पाहून सुखी होणारी आणि दुस-याचं दु:खं पाहून दु:खी होणारी माणसं सतत आनंदी वृत्तीनं जगतात. इतरांच्या सुखात आपलं सुख पाहण्यासाठी आपल्याजवळ मोठं अंत:करण असावं लागतं. माणसाच्या ठायीच्या ज्ञानापेक्षा कल्पकतेला आधिक महत्व असतं. कल्पनेला वास्तवतेचे पंख लाभले की, किती सुंदर काम होते याचं उत्तम उदाहरण आहे ताजमहाल! शहाजहानच्या मनात ताजमहालाची कल्पना आली आणि गड्यागवंड्यांच्या बोटांतून सफल साकारली. कलाकारांची पाच बोटं म्हणजे सुंदर महाकाव्यच असतं. कारण त्यातूनच अवीट सौंदर्याची निर्मिती होते. माणसाच्या जीवनातील खरी सौंदर्यप्रसाधनं कोणती ? शांतवृत्ती, उदार स्वभाव, सोशिकता, नम्रता, आचाराची शुद्धता आणि मानवतेचे प्रेम हीच खरी आपल्या आत्म्याची सौंदर्यप्रसाधनं.* *मानवी जीवन महान असल्यानं आपण आपल्या इच्छा-आकांक्षाही महान ठेवल्या पाहिजेत. यासाठी प्राप्त परिस्थितीचे दास होण्यापेक्षा स्वामी होण्यात आनंद असतो. एखादा माणूस यशस्वी होतो म्हणजे तरी काय ? तो आपला दृढ संकल्प सिद्धिप्रत घेऊन जातो. एकदा सिकंदरला एकानं विचारलं की, 'तुम्ही हे जग कसं जिंकलं?' त्यावर सिकंदर म्हणाला, 'अनिश्चित नीतीचा त्याग केल्यामुळे मी विजयी झालो.' आत्मनियंत्रण आणि आत्मसंयम हे तर यशप्राप्तीचे दोन धवल स्तंभच आहेत.* •• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ● •• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कलि मंह कनक कामिनि, ये दौ बार फांद इनते जो ना बंधा बहि, तिनका हूॅ अमै बंद । सारांश महात्मा कबीर सांगतात कलीयुगात जो माया मोहात अडकणार नाही. स्त्रियांच्या फंदात पडून जो स्वतःला बिघडवून घेणार नाही तोच या मायावी जगातून सुखरूप सुटेल. तो सर्वांच्या आदरास पात्र होईल. अन्यथा लोक टिकेला सामोरे जावे लागणार. अपमानाचे बोल सहन करावे लागणार. हे ठरलेलेच. म्हणून सन्मार्गावर चालणार्या माणसानं माया आणि कामिनी यांच्या मोहात पडणं म्हणजे स्वतःला अधोगतिच्या मार्गाला नेणं होय. रामायण घडण्यामागील मुख्य कारण स्त्री लालसेत सापडते, आर्य अनार्य संघर्षाच्या काळात आर्य पुत्र लक्ष्मणाकडून अनार्य कन्या शुर्पनखा या महाबली राजा रावनाच्या बहिणीला तपमानित केलं जाणं. तिला विद्रुप केलं जाणं. दुर्लक्षित कसं होणार ? ती काय गोरगरीबा घरची पोर थोडीच होती ? फूल हुंगून फेकून दिलं किवा तसाच त्याचा चोळामोळा केला तरी त्याची दखल कोण घेतंय ! मात्र इथ राज कुलाच्या इज्जतीचा पेच. सुडाग्निनं पेटलेल्या एका मानिनीनं दुसरीला संघर्षात ओढलं नाही तरंच नवल ! तिथं दोन्ही पैकी एका बाजुची राख रांगोळी होणं स्वाभाविकंच होतं. नेमकी न्यायाची बाजू कोणाची ? चिकित्सा करणारे करत राहतील .मात्र दोन स्त्रियांच्या पात्राभोवतीच हा महासंग्राम फिरत राहतो. महाभारत म्हणजे सत्ता, संपत्ती आणि सुंदरी यांच्या भोवती फिरणारी भावबंदकीच नव्हती का ! त्यातही अपरीमित हानी झालेली. महारती योद्धे माया, मोहिनीतच गारद केल्या गेलेले. आजही जागोजागी त्या बाबींची पूनरावर्त्ती होताना दिसते. अशा प्रकारापासून सावध व्हायला हवे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी व्यक्ती स्वत:च्या आणि इतरांच्या जीवनशैलीचा फरक जाणते तेव्हा ती व्यक्ती नक्कीच चिंतनशील आहे असे समजावे.इतरांच्या जीवन जगण्यामध्ये काही उणीवा असतील त्या आपल्या जीवनात तर नाही ना याचा वेध घेऊन त्या सुधारणा करता येतात असाही विचार करण्यास प्रवृत्त होते तर काही चांगल्या गोष्टी असतील तर अनुकरण करायला काहीच हरकत नाही असाही विचार करून चांगले जीवन जगण्यासाठी तयार होते.म्हणजेच चांगले विचार सुधारण्याची संधी देतात तर वाईट विचार मनातून काढून टाकण्याची इच्छा प्रकट करतात.ह्या दोन्ही बाजूंनी विचार करणारीच व्यक्ती आपले सुंदर जीवन जगू शकते.उलट विचार न करणारी किंवा अविचारी व्यक्ती जीवनात कधीही आपल्या चुकांना सुधारण्याची संधी देऊ शकत नाहीत आणि जीवनात कधीही सुधारु शकत नाहीत हे मात्र खरे आहे. @ व्यंकटेश काटकर, नांदेड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सकारात्मक दृष्टिकोन* *एक बेडूक डोंगराच्या टोकावर चढण्याचा विचार करतो आणि पुढे सरकतो, तेंव्हा इतर सर्व बेडूक जोरजोरात ओरडायला लागतात, "हे अशक्य अाहे.... आजपर्यंत कोणीच चढू शकला नाही... हे संभव नाही....नाही चढू शकणार"* मात्र, कोणाचेही न ऐकता शेवटी तो बेडूक डोंगराच्या टोकावर पोहचतोच.... *तुम्हाला माहिती आहे याचे कारण काय आहे ते??* *कारण, तो बेडूक "'बहिरा"' होता... आणि सर्व बेडकांना ओरडताना पाहून त्याला वाटत होते की, ते माझा उत्साह वाढवत आहेत.* *म्हणूनच जर तुम्हाला तुमचे "'ध्येय"' गाठायचे असेल तर, नकारात्मक लोकांच्या प्रति "'बहिरे" व्हा.सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले ध्येय गाठा. ..!* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment