✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/06/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १५१७ - अपंगांना कृत्रिम हातपाय पुरवणारे आणि रक्तवाहिन्या शिवून रक्तस्त्राव थांबविण्याची कल्पना मांडणारे अॅब्रायस्ते पेरी यांचा जन्म. १९४० - सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसबाहेर पडून 'फॉरर्वड ब्लॉक' या पक्षाची स्थापना केली. फ्रान्सने अधिकृत शरनागती पत्करुन हीटलरसमोर गुडघे टेकले. १९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव केला. १९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव केला. 💥 जन्म :- १९३५ - वामन कुमार, भारतीय क्रिकेट खेळाडू. १८९६ - बाबुराव पेंढारकर, भारतीय अभिनेता. १९०८ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्य संशोधक 💥 मृत्यू :- १९४० - ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ. २००१ - डॉ. अरुण घोष, भारतीय अर्थतज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नांदेड जिल्ह्यात कालरात्री जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के, माहूर, किनवट,हिमायतनगर, हदगाव आणि अर्धापुर या भागात जाणवले धक्के* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा, नांदेडमध्ये रामदेव बाबा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये योगाभ्यासासाठी मोठी गर्दी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधिमंडळात विधेयक मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना इशारा, मान्सून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात अजून ही दाखल झालेला नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सातारा : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला संशय. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची केली मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखालील पहिली जीएसटी काऊन्सिलची बैठक संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : इंग्लंडचा धक्कादायक पराभव, लसिथ मलिंगा ठरला 'गेम चेंजर'!* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - परीक्षा* https://storymirror.com/read/story/marathi/os217c0i/priikssaa/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *२१ जूनची माहिती* *21 जून म्हणजे वर्षातील सर्वात मोठा दिवस.* पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस १३ तास १३ मिनिटांचा असतो. त्यामुळे २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. २१ जूनपासून उत्तरायन संपून दक्षिणायन सुरु होते.पृथ्वी २३. ५ अंशाने एका बाजूस कललेली आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये ती सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते. पृथ्वीच्या या कललेल्या आसामुळे नॉर्वेच्या उत्तरभागात अर्ध्या रात्रीपण सूर्य दिसतो. त्यालाच मध्यरात्रीचा सूर्य म्हणतात. दोन्ही ध्रुवावर तर सहा महिन्याचा दिवस व सहा महिन्याची रात्र असते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. दिवस १३ तास १३ मिनिटांचा असतो. पृथ्वी अक्षवृत्त साडे तेवीस डिग्रीच्या झुकावाने ११ हजार किमी प्रती तासाच्या गतीने पश्चिमेकडून पूर्व दिशेला फिरते. यासोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील २१ जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस २२ डिसेंबर असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असते. पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी होत आहे. २००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामीची लाट आली त्यामुळे फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंदनी कमी झाला. पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चालल्याने ठरावीक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय घडीत लिप सेकंद अॅाडजेस्ट करावा लागतो. १९७२ मध्ये सर्वात प्रथम लिप सेकंद अॅतडजेस्ट केला होता. इंटरनॅशनल अर्थ रोटेशन अॅणन्ड रेफरन्स सिस्टीम सर्व्हिस ही आंतरराष्ट्रीय संघटना लिप अॅाडजेस्ट करते. ३० जूनच्या मध्यरात्री किंवा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री लिप सेकंद अॅयडजेस्ट केला जातो. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चुकणे ही प्रकृती, मान्य करणे ही संस्कृती आणि सुधारणे ही प्रगती आहे. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती ?* कॅनबेरा 2) *जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता ?* सहारा 3) *जगातील सर्वात मोठी नदी कोणती ?* नाईल (6650 Km) 4) *'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ?* मुंबई 5) *'इंडिया गेट' कोठे आहे ?* दिल्ली *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● बालाजी राजापूरकर, ● भीमराव तायडे ● गंगाधरराव तोटलोड, ● स्वप्नील पाटील ● सुधीर मरवळीकर ● माधव बोडके ● श्याम गाडे ● निलेश दौडकर ● नंदकिशोर कोरे ● आशा मांकावार ● साईनाथ डब्बेवाड बामणी ● अभिषेक बकवाड यादव ● लक्ष्मण शीरमाने ● गंगाधर बोमलवाड ● दिनेश बंगारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तसं पाहिलं तर आपल्यापैकी बहुतेकांचं जीवन साचेबद्ध असतं. घर आणि नोकरी किंवा घर आणि व्यवसाय अशा दोन विश्वांतलं आपलं जीवन. त्यामधील माणसांभोवती फेर धरणारं जगणं. आपण स्वत:साठी जगत असतो; परंतु आई-वडिल, भावंडे, पती-पत्नी आणि मुलं, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांच्यासाठीही जगत असतो. शिकत असतो त्यावेळी उत्तम गुण मिळवून परिक्षा उत्तिर्ण होण्याचं स्वप्न असतं आपलं. शिक्षणानंतर स्वप्न असतं ते करिअरचं. नोकरी वा व्यवसायात स्थिरावण्याचं आणि त्यानंतर स्वत:च्या कुटुंबाचं, घराचं. लग्नाचं आणि मग मुला-मुलींना वाढवण्याचं. म्हटलं तर हे चक्रच. त्या-त्या काळातील आपली महत्वकांक्षा हे चक्र फिरवित असते.* *महत्वकांक्षा हे एक मानवी मूल्य आहे. विद्यार्जनासाठी, कर्तृत्वासाठी, स्वयंप्रेरणेसाठी ते आवश्यकच असते. महत्वाकांक्षा नसेल तर मग आपण कशाचा ध्यास घेणार आणि त्याच्या मागे धावणार? आपली इच्छा असो वा नसो, आपण स्पर्धेत ओढलो जातोच. महत्वाकांक्षा आपल्यामधील स्पर्धात्मकता वाढविते, कष्ट करायला प्रेरणा देते, चिकाटी निर्माण करते. निसर्गाकडून आपल्या प्रत्येकाला कमी'-आधिक प्रमाणात प्रतिभाशक्ती मिळालेली असते. वैयक्तिक जीवनात महत्वाकांक्षा जशी आवश्यक, तशी ती समाजजीवनातही गरजेची आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी, गांधीजींनी, नेहरूंनी देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची आकांक्षा बाळगली. देशवासियांना एकत्र करून त्यांनी त्याची पूर्ताताही केली. महत्वाकांक्षा समाजासाठी अशा प्रकारे उपयुक्त ठरते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⭐🔹🔹🔹🔹🔹🔹⭐ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोइ एक राखै सावधां, चेतनि पहरै जागि । बस्तर बासन सूं खिसै, चोर न सकई लागि ॥ भौतिकाच्या नादे काढी जागुनिया सारी रात जे देई परमानंद त्याची सांग काय बात अर्थ : जो सर्वकाळ दक्ष व तत्पर म्हणजेच जागा असतो. त्याच्या घरी चोरी होणे. कपडे भांडी कुंडी चोरीला जाणे असा प्रकार घडत नाही. माणूस भौतिक क्षणिक बाबींना जपण्याचा किती आटापिटा करत असतो. नाशीवंत वस्तुंच्या मोहासाठी माणसाची केवढी मोठी धडपड चाललेली असते. मानसाचं जीवन व शरीरही नश्वर व क्षणभंगूर आहे. कोणत्याही क्षणी ते नष्ट होऊ शकतं. म्हणून माणसानं तत्पर असावं. सत्कर्म व सन्मार्ग सोडू नये. विकारांपासून अलिप्त राहण्यासाठी वाईट संगती, वाईट विचार व वाईट प्रवृत्तीं सोडून दिल्या पाहिजेत व सदैव दक्षता बाळगली पाहिजे. सद्गुण व सत्संगतीचा मार्ग अाचरावा लागेल एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्यावेळी माणसाच्या हातून झालेली एखादी चूक कळत नकळत झाली असे समजावे. ती चूक जर दुस-यावेळी झाली तर समजावे की, दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे . तिस-यावेळी तीच चूक झाली तर असे समजावे की, तुमचे त्या कामात लक्ष नसल्यामुळे झाली आहे आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर असे समजावे की,आपण इतरांपेक्षा जास्त चूका करण्याचा जणू संकल्प केला आहे आणि त्यातही तुम्ही महामूर्ख आहात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हीच विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात चूका करायच्या की चूका टाळायच्या ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्राप्त परिस्थितीत समाधान मानने. एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा तो पक्षी बघ यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.' तात्पर्य:- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे. प्राप्त परिस्थितीत समाधानी राहणे हेच उत्तम. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment