✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/06/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिवराज्याभिषेकदिन - या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला स्वराज्याच्या राजधानीचा दर्जा दिला आणि याच गडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला. 💥 ठळक घडामोडी :- १९९१ - युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले. १९९८ - कुआलालम्पुर विमानतळ खुला. 💥 जन्म :- १८६९ - हान्स श्पेमान, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता. १९१७ - खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९३० - रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी. १९५१ - मेरी मॅकअलीस, आयरिश राष्ट्राध्यक्ष. १९६३ - मीरा स्याल, ब्रिटीश लेखिका, अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९९९ - जॉर्ज पापादुपॉलस, ग्रीसचा हुकुमशहा. २००८ - सॅम माणेकशा, भारताचे फिल्ड मार्शल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आशिया-प्रशांत समूहाने संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) दोन वर्षांच्या हंगामी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला ५५ देशांचा पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *एक कोटी घरे २०२२ मध्ये नव्हे, पुढील वर्षीच देणार, गृहनिर्माणमंत्री हरदीप सिंग पुरी यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पालघर - जिल्ह्यातील 190 अनधिकृत शाळांवर कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोल्हापूर : पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार लोकायुक्त नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करेल - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अमिताभ कांत यांना नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी दोन वर्षांची मुदतवाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद तीन हजार धावा करणारा आशिया खंडातील पाकिस्तानचा बाबर आझम ठरला पहिला क्रिकेटपटू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतापुढे विश्वचषकाच्या सहाव्या साखळी सामन्यात आज वेस्ट इंडिजचे आव्हान, या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्याचा भारताचा प्रयत्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - गोष्ट एका आंबेगावाची* https://storymirror.com/read/story/marathi/lzuhb7d4/gosstt-ekaa-aanbegaavaacii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌎 *पृथ्वीचा जन्म केव्हा झाला ?* 🌎 आपण कोणालाही त्याची जन्मतारीख विचारतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण त्यांचं वय किती आहे, हेच विचारात असतो. पृथ्वीचा जन्म केव्हा झाला हे विचारताना पृथ्वीचं आजमितीचं वय काय आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं असतं. ते आता वैज्ञानिक प्रणालींच्या मदतीने जवळजवळ अचूकपणे सांगणे शक्य झालं आहे. पहिली प्रणाली ज्याला भूगर्भशास्त्रज्ञ स्ट्रॅटिग्राफिक अॅनॅलिसिस म्हणतात त्याची आहे. भूगर्भात आणि धरतीच्या पृष्ठभागावरही निरनिराळे कातळांचे थर सापडतात त्यांची चिकित्सा करून ते किती पुरातन आहेत याचा छडा लावण्याची प्रक्रिया या प्रणालीत अंतर्भूत आहे. त्यासाठी उपयोगात आणलेले बहुतेक कातळ रूपांतरित म्हणजेच मेटॅमाॅर्फिक जातीचे आहेत. या कातळांच्या रूपांचं तसंच त्यांच्या वेगवेगळ्या थरात सापडलेल्या जीवाश्मांचं परीक्षण करून त्या कातळांचं वय ठरवलं जातं. ते साधारण साडेतीन अब्ज वर्षे एवढं असल्याचं निदान केलं गेलं आहे. म्हणजेच पृथ्वीचं वय किमान तेवढं असलं पाहिजे. परंतु रूपांतरित खडक अग्निजन्य तसंच गाळांच्या खडकांचं रूपांतर होत होत तयार होत असतात. याचाच अर्थ असा की पृथ्वीचं वय त्याहीपेक्षा जास्त असलं पाहिजे. त्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंग प्रणालीचा अवलंब केला गेला. रेडिओकार्बन डेटिंगमध्ये कोणत्याही पदार्थातील कार्बनच्या बारा अणुभाराच्या आणि चौदा अणुभाराच्या अशा दोन समस्थानकांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण तपासलं जातं. यापैकी चौदा अणुभाराचं समस्थानक किरणोत्सारी आहे. निसर्गात या दोन रुपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण निश्चित आहे. जेव्हा वनस्पती हवेतून कार्बनडायआॅक्साईड शोषून घेतात तेव्हा या दोन रुपांचं वनस्पतींमधील प्रमाणही निसर्गात जेवढं असतं तेवढंच भरतं. पण एकदा का वनस्पती मृत झाली की त्यात त्या वेळी असलेल्या किरणोत्सारी कार्बनच्या रूपाचं प्रमाण घटत जातं. त्यामुळे वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या अवशेषांमधील या दोन रूपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजून त्या जीवाश्मांचे वय निश्चित करता येते. याच तत्त्वावर आधारित पण कोट्यवधी वर्षे पुरातन असलेल्या वस्तूंचं, खडकांचं वय निश्चित करण्यासाठी युरेनियम शिसं, थोरियम शिसं, रुबिडियम स्ट्रॉन्शियम यासारख्या मूलतत्त्वांच्या जोड्यांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजण्याची पद्धत विकसित केली गेली आहे. तिसरी प्रणाली भूगर्भातील शिशाचं निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या तसंच सौरमालिकेत इतरत्र असलेल्या त्याचं प्रमाण मोजण्याची आहे. या पद्धतीनुसारही पृथ्वी किमान साडेचार अब्ज वर्षांपूर्वी प्रस्थापित झाल्याचं निदान झालं आहे. म्हणजेच पृथ्वीचा जन्म साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला असं आपण म्हणू शकतो. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवन जगण्याची कला त्यांनाच माहित असते जे स्वत: सोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *चीनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?* शी जिनपिंग 2) *पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत ?* इमरान खान 3) *कोणत्या देशात भारतीयांची संख्या अधिक आहे ?* मॉरिशस 4) *भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय ?* इंडियन एअरलाईन 5) *भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणते ?* उत्तरप्रदेश *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुशील कापसे ● अनुपमा जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनात आपल्याला जे काही यश मिळते ते फक्त आपल्या स्वत:च्या प्रयत्नांचे फळ आहे, असे आपण कधीही प्रामाणिकपणे म्हणू शकत नाही. आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या कष्टाला, पतीच्या किंवा पत्नीच्या मदतीला, मित्रांच्या व* *सहका-यांच्या योगदानाला आपण दिले नाही, तर तो स्वार्थ ठरेल. पण आपल्या यशप्राप्तीत एक अदृश्य हितचिंतक नेहमीच आपली साथ देत असतो आणि तो असतो सर्वसाक्षी परमेश्वर. गरजेच्या वेळी आपल्याला त्याची आठवण येते, पण गरज भागल्यावर त्याचे आभार मानायचे आपण बहुतेकदा विसरून जातो.* *परमेश्वराचे आभार आपण का आणि कशासाठी मानायचे? आपल्याला त्याने जीवन दिले म्हणून. जीवनात आपली सतत प्रगती होत राहिली म्हणून, आपण सुरक्षित, निरोगी राहिलो म्हणून नाही, तर आपल्यासाठी हे सगळे करत असताना परमेश्वर मात्र अदृश्य राहतो आणि तो कशासाठीच स्वत:ला श्रेय घेत नाही म्हणून त्याचे आभार मानले पाहिजेत.* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• यह जग कोठी काठ की, चहुं दिश लागी आाग भीतर रहै सो जलि मुअै, साधू उबरै भाग । सारांश महात्मा कबीर क्रोधाचे दुष्परिणाम लक्षात आणून देतात. हा संसार म्हणजे लाकडी महालासारखा आहे. कोणत्याही क्षणी हा महाल आगीचे भक्ष होवू शकतो. मानवाच्य्या ठायी षड्विकार उत्पन्न होत असतात, त्या सर्व विकारांमध्ये क्रोध हा फारच घातक असतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की रागाची निर्मिती होते. रागाचं प्रकटीकरण क्रोधाद्वारे होत असतं. मनाची एकाग्र अवस्था साधली नाही की चिडचिड करणं , रागे भरणं अशा क्रिया सहज प्रकट होतात. त्यामुळे पुढचा कार्यभाग बिघडतो. राग ही क्षणिक स्वरूपात व्यक्त होणारी आणि नकारात्मक विचाराकडे नेणारी सहज भाव क्रिया होय. ती अचानक प्रकटत असली तरी ती माणसाचा जीवन विषयक सकारात्मक दृष्टीकोनच बिघडवून टाकते. क्रोधामुळे मानसिक संतुलन बिघडतं, रागाच्या भरात माणूस अविचाराने वागतो. स्वभावात चिडखोरपणा वाढायला लागतो. माणून आतल्या आत गुदमरून स्वतःचे नुकसान करून घ्यायला लागतो. शक्तीक्षय होवून शारीरिक दुर्बलता ओढवून घेतो. क्रोधामुळे मित्र नातलग दुरावतात. साधू, सज्जन मात्र आपल्या चित्त प्रवृत्ती स्थिर ठेवतात. क्रोधाचा वाराही अंगाला लागू देत नाहीत. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद, समाधान कधीही कमी होत नाही. म्हणून माणसानं क्षमाशिलता, समंजसपणा व धैर्य अंगी धारण करून क्रोधाला दूर पिटाळायला शिकलं पाहिजे एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जगाच्या पाठीवर असा एकच संप्रदाय आहे की,त्यात जातीयता नाही,धर्मभेद नाही,गरीब- श्रीमंत नाही,स्त्री-पुरुष असाही भेद नाही,कुणीही कुणाचे आणि एकमेकांचे एकमेकांबद्दल मन कलुषित होत नाही,जिथे मानवतेचे,एकात्मतेचे,भक्तीचे दर्शन घडते तो म्हणजे वारकरी संप्रदाय आहे.वारकरी संप्रदाय आमच्या मराठी भूमीत आणि अनेक शतकापासून संतांच्या पावनस्पर्शाने आणि विचाराने आजही त्यांच्या मार्गावर भगवंताचे नामस्मरण करीत भागवतांची पताका घेऊन अखंड चालू आहे.असा संप्रदाय अन्य इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही.म्हणून अशा संप्रदायाचा प्रत्येक वारक-याला सार्थ अभिमान आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌎🚩🌎🚩🌎🚩🌎🚩🌎 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जंगलचा राजा* एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.' तात्पर्य - आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment