✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/07/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महाराष्ट्र कृषी दिन* *डॉक्टर्स डे* 💥 ठळक घडामोडी :- १९५५-इमपीरिअल बँकेची स्टेट बँक ऑफ इंडिया नावाने स्थापना १९६१ -महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना २००२ - बाश्किरियन एरलाइन्स फ्लाइट २९३७ हे तुपोलेव्ह टीयु-१५४ प्रकारचे विमान आणि डीएचएल कंपनीचे बोईंग ७५७ प्रकारचे विमान जर्मनीतील ऊबेरलिंगेन गावावर आकाशात एकमेकांस आदळली. ७१ ठार. २००६ - चीन मध्ये किंगहाइ-तिबेट रेल्वेचे उद्घाटन. 💥 जन्म :- १९१३ - वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. १९४७ - शरद यादव खासदार १९४९ - व्यंकय्या नायडू भाजपा नेते १९६० - सुदेश भोसले गायक १९६० - गिरीश पंचवाडकर गायक १९६१ - कल्पना चावला, अंतराळवीर १९६१ - डायना, वेल्सची राजकुमारी. 💥 मृत्यू :- १९७१ - सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता. १९९४ - राजाभाऊ नातू, मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *लोकशाही हक्क हिरावले जाऊ नयेत यासाठी सजग राहा - मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड होण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील अनेक राज्यांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : देशात ४४ टक्के डॉक्टर ताण-तणावाचे बळी असल्याची धक्कादायक बाब एका खासगी संस्थेने केलेल्या वैद्यकीय चिकित्सकांच्या आरोग्यविषयक अभ्यासातून समोर आली आहे. यात महिला डॉक्टरांचे प्रमाण सर्वाधिक आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ पाठविणार १ हजार २०० अत्याधुनिक बस, मूलभूत सुविधाही पुरविणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन : नोव्हाक जोकोव्हिच, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे आजपासून सुरु होणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत जेतेपद पटकावण्यास आहेत उत्सुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बर्मिंगहम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : निर्णायक सामन्यात दमदार खेळ करत इंग्लंडने अपराजित असलेल्या भारतावर मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हरित क्रांतीचे प्रणेते - वसंतराव नाईक* http://blog.diecpdnanded.in/हरित-क्रांतीचे-प्रणेते-व/ वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ढगांचं बारसं कोणी केलं ?* 📙 मे १७८३ पासून त्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत बहुसंख्य युरोपीय देशांच्या आकाशात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळत होतं. आईसलँडमधील एल्डेयार इथं तसंच जपानमधील असामा यामा इथं ज्वालामुखींचे उद्रेक झाले होते. त्यातून बाहेर पडलेली राख आणि राळ यांचं मिश्रण साऱ्या उत्तर गोलार्धामधील आकाशात पसरलेलं होतं. त्या दृश्यानं अनेकांना विस्मयचकित केलं होतं. कलाकारांनी त्याची चित्रं रंगवली होती. नियमित रोजनिशी लिहिणाऱ्यांनी त्याची तपशीलवार वर्णनं नोंदवून ठेवली होती. साहित्यिकांनी आपल्या कथा कादंबऱ्यांसाठी त्या आकाशदर्शनाची पार्श्वभूमी वापरली होती. त्यात भर पडली ती १८ ऑगस्टच्या रात्री एक धगधगता तेजस्वी अशनी त्या आकाशात चमकून गेला तेव्हा. सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या त्या दृश्यानं एका अकरा वर्षांच्या मुलाच्या मनावर कायमची मोहिनी घातली नसती तरच नवल. त्या दिवसांपासून ल्युक हार्वर्डला आकाशदर्शनाचा छंद जडला. वास्तविक पुढील आयुष्यात त्यानं खगोलशास्त्राचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला नव्हता वा त्या विषयाचा अभ्यासही केला नव्हता. वनस्पतीशास्त्रातली पदवी त्यानं मिळवली होती. तरीही आकाशदर्शनाचं त्याचं वेड काही कमी झालं नाही. त्याच सुमारास डेन्मार्कमधील वनस्पतीशास्त्रज्ञ कार्ल लिनायस यानं वनस्पतीचं वर्गीकरण करणारी एक प्रणाली विकसित केली होती. ती सर्वत्र गाजली होती. आजतागायत त्याच प्रणालीचा वापर होतो आहे. तरुण ल्युकवरही त्याचा प्रभाव पडला होता. त्या भरात त्यानंही त्या वर्गीकरणामध्ये आपल्या परीनं थोडी भरही घातली होती. वनस्पतीचं वर्गीकरण करता येतं, तर मग आकाशात नेहमीच दिसून येणाऱ्या ढगांचं वर्गीकरण का करता येऊ नये, असा विचार त्याच्या मनात घोळू लागला होता. त्याच सुमारास फ्रेंच वैज्ञानिक ज्याँ बातिस्त लमार्क यानं आकाशात दिसणाऱ्या ढगांची पाच ढोबळ वर्गांमध्ये विभागणी केली होती. तशी ती जुजबीच होती; पण तोवर तसा प्रयत्न कोणीच केला नसल्यानं लमार्कच्या वर्गीकरणालाही मान्यता मिळाली. त्यामुळे ल्युक हाॅवर्डला अधिक प्रोत्साहन मिळालं आहे आणि मग त्यानं अधिक तर्कसंगत अशी आपली प्रणाली सादर केली. त्याने एकंदरीत चार मार्ग प्रतिपादित केले होते. एक *क्युम्युलस* म्हणजे एखाद्या ढिगासारखे दिसणारे, दोन *स्ट्रॅटस* म्हणजे एकावर एक थर असणारे, तीन *सिर्रस* म्हणजे कुरळ्या केसांसारखे वेटोळेदार आणि लांबलचक असणारे आणि चौथे *निम्बस* म्हणजे पाण्याचा साठा असणारे पावसाळी ढग. या चार वर्गांमध्ये संकर होण्याची शक्यताही त्यानं वर्तवली होती. त्यानुसार पावसाळी पण ढिगासारखे असणारे ते *क्युम्युलोनिम्बस* कुरळ्या केसांचे थरावर थर असणारे सिर्रोस्ट्रॅटस वगैरे. अठराव्या शतकाची अखेर होता होता हाॅवर्डच्या या वर्गीकरणाला सर्व स्तरांमधून विस्तृत मान्यता मिळत गेली. आजही यांच वर्गीकरणाचा वापर केला जात आहे. ढगांचे गुणधर्मही या वर्गीकरणातून प्रतीत होतात याचीही प्रचिती आता मिळालेली असल्यामुळे तर या वर्गीकरणावर शिक्कामोर्तबच झाले आहे. म्हणून ल्युक हॉवर्डलाच ढगांचं बारसं केल्याचं श्रेय द्यायला हवं. *बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश इंग्रजी - मराठी सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• Knowledge is power. ( ज्ञान ही खरी शक्ती आहे. ) *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'जय जवान, जय किसान' हा नारा कोणी दिला ?* लालबहादूर शास्त्री 2) *जगातील पहिले तिकीट कोठे छापले गेले ?* इंग्लंड 3) *भुंकपाची तीव्रता मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात ?* भूकंपमापी 4) *बॉलपेनचा शोध कोणी लावला ?* लाजिओ जोसेफ बिरो (1931) 5) *भारतात पहिली सहकारी बँक कोठे स्थापन झाली ?* बडोदा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● एल वाय मुपडे ● श्रीकांत चरलेवार ● व्यंकटेश बतुलवार ● मारोती कांडले ● मोरेश्वर गायधने ● अशोक कांबळे ● बालाजी भगनुरे ● मधूसुदन पांचाळ ● गजानन कवळे ● हनुमंत भोपाळे ● सय्यद इलियास झुकलकर ● रामकृष्ण पाटील ● तुकाराम मुंगरे ● गणेश गोंटलवार ● विजय निलंगेकर ● हणमंतू देसाई ● पंढरी गड्डपवार ● विलास नांदूरकर ● पंढरीनाथ खांडरे ● मारोती भुसेवार ● विशाल कण्हेरकर ● राजू पांचाळ ● डी डी वाघमारे ● नागोराव रायकोड ● बालाजी बाबुराव डाके पाटील ● शहादेव सुराशे ● रघुनाथ नोरलावार ● निळकंठ पाटील ● त्रिरत्नकुमार भवरे ● बाबासाहेब ढोले ● शेषेराव आवरे ● बाबुराव दस्तुरे ● नितीन गाडे ● करुणा खंडेलोटे ● दिगंबर नागलवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परिस्थिती कितीही कठीण असली तरी तोंड लपवून, मस्तक झुकवून जगू नका. दु:खांचे युग आले तरी हसतमुख राहून जगा. प्रसंग कितीही वाईट असला तरी हिंमतीने सामोरं जाता आलं पाहिजे....* *न मुंह छुपाके जियो* *और न सर झुकाके जियो...* *गमोंका दौर भी आये* *तो मुस्कुरा के जियो...* *ढगांनी झाकले गेले तरी तारे नष्ट होत नाहीत. संकटांच्या अंधाररात्री ह्रदयाचे दिप उजळून जगा. जीवनातील कुठला क्षण मृत्यूची ठेव म्हणून आरक्षित झाला आहे हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मानवी जीवन अखंड प्रवाही असून ते कोणत्याही टप्प्यावर कायमचे थांबू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुक्कामानंतर पुढे पुढे जातच जीवन जगलं पाहिजे....!* *ये जिंदगी किसी मंजिल पे* *रूक नही सकती.....* *हर एक मकाम के आगे* *कदम बढा के जियो...*. *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर गाफील क्यों फिरय, क्या सोता घनघोर तेरे सिराने जाम खड़ा, ज्यों अंधियारे चोर । सारांश महात्मा कबीर मृत्यूची आठवण करून देतात. हे मानवा तुला असा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत आहेस ? कोणत्या घणघोर अंधार्या काळ कोठडीत तू स्वतःला जखडून घेत आहेस ? कुठल्याही संपत्तीच मोल देवूनही हा जन्म परत मिळणारा नाही . तुला मिळालेले ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात महान भेट आहे. इत्तर प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं अधिकचं वरदान तुला दिलं तर तू त्या वैभवाचा वापर करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी धडपडायला पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे , किमाण या सृष्टीला तरी विद्रुप करण्याचं कुकर्म करू नकोस ! हे वैविध्पाने भरलेले जग तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलेस. त्याच्या रचनेला धक्क् न देता त्याचा मानव कल्याणासाठी वापर करून घेतलंस तर भविष्य सुंदर नाही तर निसर्ग प्रकोप ठरलेलाच. तू कितीही सावध वागण्याचा प्रयत्न करीत असलास तरी हा मृत्यू रूपी चोर तुझ्यावर सारखी पाळत ठेवून आहे. तू भौतिक सुखसोयींचा कितीही इधार घेतलास तरी काचाच्या बंदिस्त महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी आत्म्याला तो कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय राहाणार नाही. तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला मोहवून हुरळून जातोस त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य दृष्टी देणार्या आत्मदृष्टीची जडणघडण चांगली होण्यासाठी मनाचा निकोप विकास होणे गरजेचे आहे. सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू शकतात. तेव्हा अज्ञानाचा अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान जाणून घे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ज्ञानाची गरज आहे.ज्ञानामुळे केवळ व्यक्तिमत्व विकास होत नाही तर आत्मविकासही होतो.ज्ञानाचा संचय जीवनासाठी तर आवश्यक आहेच आणि त्याबरोबरच जीवनव्यवहारात कसे जगायचे यासाठी ज्ञान दिशा दाखवते.आपल्यातील दुर्गुण घालविण्यासाठी,आत्मसन्मानासाठी आणि खरा माणूस म्हणून जगण्यासाठी ज्ञान आणि ज्ञानसंचयाची आवश्यकता आहे.स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच इतरांच्या कल्याणाच्याही बाबतीत विचार करायला प्रेरीत करते. ज्ञान आणि ज्ञानसंचय ह्यासाठी प्रत्येकाने अविरत प्रयत्नशील रहायला हवे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 📚🌷📚🌷📚🌷📚🌷📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तीन वाटसरु* एके दिवशी तीन वाटसरू एका धर्मशाळेत रात्रीसाठी एकत्र आलेले असतात. तिथे स्वयंपाकासाठी एकच चूल आणि एकच भांडं असतं... तिघांनाही भूक लागलेली असते, मग ते एकत्र स्वयंपाक करायचा असं ठरवतात. चुलीवर भांडं ठेवून त्यात पाणी उकळायला ठेवतात आणि त्यात प्रत्येकानं आपापल्या जवळच्या तांदुळाची एक एक मूठ टाकायची असं त्यांचं ठरतं... पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात तांदूळ टाकायची वेळ येते. पहिला वाटसरू विचार करतो तसंही बाकीचे दोघं एक एक मूठ तांदूळ टाकतीलच, तेवढा भात तिघांना पुरेल. मी कशाला माझे तांदूळ वाया घालवू...?? म्हणून तो स्वतःच्या पिशवीत हात घालून रिकामीच मूठ घेऊन येतो आणि पातेल्यावरचं झाकण बाजूला सारून तांदूळ आत टाकल्याचं नाटक करतो... गंमत म्हणजे exactly असाच विचार बाकीचे दोघंही करतात आणि पातेल्यात तांदूळ टाकल्याचा नुसता अभिनयच करतात... थोड्या वेळानं ते झाकण दूर करून बघतात तेंव्हा अर्थातच पातेल्यात फक्त गरम पाणी असतं, भाताचा पत्ताच नसतो...!! तिघेही चडफडत आणि एकमेकांना रागावून उपाशीच झोपतात....!!! तात्पर्यः स्वतःचा वेळ, पैसा किंवा कष्ट अशी कोणत्याही प्रकारची तांदुळाची मूठ contribute न करता, ह्या समाजातले सर्व प्रश्न, इतर कोणाच्या तरी प्रयत्नातून आपोआप सुटतील असं ज्यांना वाटतं आणि प्रश्न सुटत नाहीत म्हणून जे तावातावानं फक्त चर्चा करतात... *अशा सर्व "वाटसरूंना" ही गोष्ट अर्पण...* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment