✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/07/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००० - मेक्सिकोमध्ये ७० वर्षे पार्तिदो रेव्होल्युसियोनारियो इन्स्तित्युसियोनाल या पक्षाच्या सत्तेचा अंत होउन पार्तिदो ॲक्सियाँ नॅसियोनाल पक्षातर्फे व्हिसेंते फॉक्सची राष्ट्राध्यक्षपदी निवड. २००१ - ॲबिकोर स्वयंचलित हृदयाचे सर्वप्रथम आरोपण. २००२ - स्टीव फॉसेट हा उष्णहवेच्या फुग्याद्वारे पृथ्वीप्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला. २०१० - काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकात ट्रकचा स्फोट होउन किमान २३० व्यक्ती ठार 💥 जन्म :- १८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता १०२९ - अल-मुस्तांसिर, कैरोचा खलिफा. १८२१ - चार्ल्स टपर, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान. १८६२ - विल्यम हेन्री ब्रॅग, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ. १८७६ - विल्हेल्म कुनो, जर्मनीचा चान्सेलर. १८७७ - हेर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. 💥 मृत्यू :- १९२८ - नंदकिशोर बल, उडिया भाषेतील कवी, कादंबरीकार १९३२ - मनुएल दुसरा, पोर्तुगालचा राजा १९६३ - सेट बार्नेस निकोल्सन, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ. १९९६ - राजकुमार, हिंदी अभिनेता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मराठा समाजास शिक्षणात १२, तर नोकऱ्यांत १३ टक्के आरक्षण; विधिमंडळात सुधारणा विधेयक एकमताने मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पावसाच्या धिंगाण्याने मुंबईकरांचे हाल; पालघरमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, ठाण्यात संततधार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राहुल गांधींनीच राजीनामा मागे घ्यावा, या मागणीसाठी सुशीलकुमार शिंदे यांचीच आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबईतल्या ५०० फुटांच्या औद्योगिक, व्यापारी आणि निवासी गाळ्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचे विधेयक आज विधान परिषदेत एकमताने झाले मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आता कॉलेज मध्येच मिळणार लर्निंग लायसन्स; परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ICC World Cup 2019: टीम इंडिया उपांत्य फेरीसाठी आज बांगलादेशविरुद्ध भिडणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : ऐन वेळी कच खाल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत वेस्ट इंडिजला पत्करावा लागला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - परतफेड* https://storymirror.com/read/story/marathi/ddi4xdrw/prtphedd/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• "म्हसवे'' च्या वटवृक्षाची महती सातारा जिल्ह्यातील म्हसवे (ता. जावळी) येथील वटवृक्षाचा "वंश‘ तब्बल अडीच एकर परिसरात विस्तारला असून, तो विस्ताराने आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. पाचवड-कुडाळ रस्त्यावर पाचवडपासून पाच किलोमीटर अंतरावर म्हसवे गावानजीक हे वडाचे झाड आहे. या गावात देशातील सर्वांत जुने आणि विस्ताराने मोठे असे वडाचे झाड आहे. या वटवृक्षामुळेच गावाला "वडाचे म्हसवे‘ या नावाने ओळखले जाते. या वटवृक्षाची ब्रिटिशकालीन "फ्लोरा ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी‘मध्ये प्रथम क्रमांकाचा वटवृक्ष म्हणून नोंद आहे. 1882 मध्ये ली वॉर्नर या ब्रिटिश अधिकाऱ्याने सातारा जिल्ह्यातील या वडाच्या झाडाचा उल्लेख केला आहे. 1903 मध्ये पुण्याच्या सायन्स कॉलेजचे प्राचार्य असलेल्या कूक थिओडोर या ब्रिटिशाने पश्चि्म घाटावरील वृक्षाची नोंद असलेले पुस्तक लिहिले आहे. त्यातही या वृक्षाची नोंद आहे. विस्ताराने मोठ्या असलेल्या या वटवृक्षावर पशुपक्ष्यांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असते. वटवाघूळ, बुलबुल, सातभाई, भारद्वाज आदी 28 प्रजातींचे वास्तव्य आढळते. झाडाच्या सुमारे शंभर पारंब्यांचे खोडात रूपांतर झाले आहे. त्यामुळेच सुमारे दोनशे वर्षांहून अधिक काळाचे हे झाड अद्याप टिकून आहे. वडच का लावावा? -एक परिपूर्ण वड सुमारे 35 हजार जिवांना अभय-आश्रय देतो. -पाच वातानुकूल यंत्रे उघड्या वातावरणात 24 तास चालू ठेवल्यावर त्याचा वातावरणावर जो परिणाम दिसून येईल तो परिणाम एक पूर्ण वाढ झालेले वडाचे झाड देते. -जिथे वड, तेथील एक किलोमीटर परिसरात हमखास पाणी सापडते. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Work is worship.* ( कर्म हीच पूजा आहे. ) *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ?* मिश्र 2) *'दक्षिण भारताची गंगा' असे कोणत्या नदीला म्हणतात ?* गोदावरी (1498 km) 3) *गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ?* नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावामागे सह्यांद्रीतील ब्रह्मगिरी डोंगरावर 4) *'तुम मुझे खून दो, मै तुमे आझादी दुगा' असे कोणी म्हटले ?* सुभाष चंद्र बोस 5) *राष्ट्रगीताला अधिकृत मान्यता केव्हा मिळाली ?* 24 जानेवारी 1950 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● विक्रांत दलाल ● शिवानंद चौगुले ● पंडीत दगडगावे ● शैलेश तरले ● वसंत पाटील घोगरे ● श्रीनिवास पुलावार ● जेजेराव सोनकांबळे ● चिमणाजी हिवराळे ● लक्ष्मण कुमार ● मारोती जाधव ● साईनाथ सावंत ● बाबू हतोडे ● शिवा पांचाळ ● गोपाळ पामसकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर गाफील क्यों फिरय, क्या सोता घनघोर तेरे सिराने जाम खड़ा, ज्यों अंधियारे चोर । सारांश महात्मा कबीर मृत्यूची आठवण करून देतात. हे मानवा तुला असा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत आहेस ? कोणत्या घणघोर अंधार्या काळ कोठडीत तू स्वतःला जखडून घेत आहेस ? कुठल्याही संपत्तीच मोल देवूनही हा जन्म परत मिळणारा नाही . तुला मिळालेले ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात महान भेट आहे. इत्तर प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं अधिकचं वरदान तुला दिलं तर तू त्या वैभवाचा वापर करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी धडपडायला पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे , किमाण या सृष्टीला तरी विद्रुप करण्याचं कुकर्म करू नकोस ! हे वैविध्पाने भरलेले जग तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलेस. त्याच्या रचनेला धक्क् न देता त्याचा मानव कल्याणासाठी वापर करून घेतलंस तर भविष्य सुंदर नाही तर निसर्ग प्रकोप ठरलेलाच. तू कितीही सावध वागण्याचा प्रयत्न करीत असलास तरी हा मृत्यू रूपी चोर तुझ्यावर सारखी पाळत ठेवून आहे. तू भौतिक सुखसोयींचा कितीही इधार घेतलास तरी काचाच्या बंदिस्त महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी आत्म्याला तो कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय राहाणार नाही. तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला मोहवून हुरळून जातोस त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य दृष्टी देणार्या आत्मदृष्टीची जडणघडण चांगली होण्यासाठी मनाचा निकोप विकास होणे गरजेचे आहे. सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू शकतात. तेव्हा अज्ञानाचा अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान जाणून घे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• व्यक्ती कितीही मोठी असेल परंतु संस्कार आणि ज्ञान नसेल तर त्याच्या मोठेपणाचा काहीच अर्थ नाही. कोणतीही व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो ज्यांच्याजवळ संस्कार,नम्रता, सहनशीलता आणि ज्ञान आहे तीच व्यक्ती सर्वश्रेष्ठ ठरु शकते आणि तीच व्यक्ती जगाला प्रिय असते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 📚🌸📚🌸📚🌸📚🌸📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उपकाराचे स्मरण ठेवावे* एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मारूती मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना. अखेर एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, ‘थांबा, त्यांने स्वत:च किंमतीएवढीच बक्षिसी दिली. यात त्याची का चूक? त्याची किंमत एवढीच आहे.’ तात्पर्य - माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हे माणसाचे पवित्र कर्तव्य आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment