✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/07/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहीद दिन - म्यानमार* 💥 ठळक घडामोडी :- १९९९-'मैत्रेयी एक्सप्रेस' या कोलकाता ते ढाका बससेवेचे तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले. १९६६-'शिवसेना'या राजकीय पक्षाची स्थापना झाली. १९८५ - ईटलीतील व्हाल दि स्लाव्हा धरण फुटले. पुरात २६८ ठार. १९८९ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट २३२ हे डी.सी. १० प्रकारचे विमान अमेरिकेतील सू सिटी शहराजवळ कोसळले. वैमानिकांच्या कौशल्यामुळे १८४ प्रवासी वाचले परंतु ११२ अन्य प्रवासी मृत्युमुखी. 💥 जन्म :- १८९६ - ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक. १९३४ - फ्रांसिस्को से कमेरो, पोर्तुगालचा पंतप्रधान. १९३८ - डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ. १९४७-सलमान रश्दी ,ब्रिटिश लेखक 💥 मृत्यू :- १९४७ - ऑँग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक. १९६५ - सिंगमन र्ही, दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष. १९८० - निहात एरिम, तुर्कस्तानचा पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची तात्काळ मुक्तता करावी, अशी मागणी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानकडे केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आजपासून मान्सूनचा मध्य-महाराष्ट्र, विदर्भात जोर, मुंबई, ठाण्यातही वाढणार तीव्रता, देश व्यापत चाललेला मान्सून ठिकठिकाणी मनसोक्त बरसत असतानाच मराठवाडा आणि विदर्भाकडे मात्र वरुण राजाने फिरवली आहे पाठ.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सर्वोच्च न्यायालयाची निवडक निकालपत्रे मराठीसह सात प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्याची सोय कालपासून झाली सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी विशेष उपाययोजना, प्रस्तावित असलेल्या मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे विशेष उपाययोजना करण्यात येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *३१ जुलै रोजी शिर्डी येथे राज्यातील ४० हजार सरपंच, उपसरपंचांचा जंगी मेळावा आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे अन्य काही मंत्री प्रामुख्याने उपस्थित राहणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत अरनॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : भारताची आघाडीची धावपटू हिमा दास हिने आपली सुवर्ण धाव कायम राखताना गेल्या १५ दिवसांत तब्बल चौथे सुवर्ण पदक जिंकण्याचा केला पराक्रम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - जादूची पिशवी* https://storymirror.com/read/story/marathi/epuemarh/jaaduucii-pishvii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *वादळाचं बारसं कोण करतं ?* 📙 २००९ हे वर्ष सरता सरता महाराष्ट्राच्या किनारपट्टीला उद्ध्वस्त करणारं वादळ आठवतं ? त्यानं केलेल्या विध्वंसाच्या खुणा आजही तिथं जागोजागी दिसतात. त्या वादळाचं 'फयान' हे नाव तर तिथल्या नागरिकांच्या मनावर कायमचं कोरलेलं आहे. तीच गत अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील न्यू आॅर्लियान्स या शहराची. 'कत्रिना' हे नाव उच्चारलं तरी मंडळी चळाचळा कापायला लागतात. कारण २००५ साली त्या तुफानानं त्या शहराची केविलवाणी अवस्था करून सोडली होती. वादळ, तुफान, झंझावात, चक्रावर्त अशा अनेक नावांनी ही वादळं ओळखली जातात. इंग्रजीतही सायक्लॉन, टायफून, हरिकेन, स्टाॅर्म अशी नावं आहेत. तरीही त्यांना 'फयान' किंवा 'कत्रिना' याच्यासारखी विलक्षण नावं देतं कोण ? असा प्रश्न मनात येतोच. भूकंप हाही एक नैसर्गिक प्रकोपच आहे; पण भूकंपांना कधी अशी नावे दिलेली आढळत नाहीत. तर मग वादळांचंच असं बारसं कोण करतं ? जसजशी हवामान अंदाजाची यंत्रणा अधिक कार्यक्षम होत गेली, तसतशी वादळांची पूर्वसूचना मिळणे अधिक शक्य होत गेलं. त्यात हंगामामध्ये एकाहून अधिक वादळं एकाच प्रदेशात एकापाठोपाठ येऊन थडकत असतात. अशा वेळी त्यांची वेगवेगळी ओळख पटवण्याची गरज भासू लागली. त्यातूनच मग त्यांचं नामकरण करण्याची प्रथा अस्तित्वात आली. त्याची जबाबदारी मुख्यत्वे 'वर्ल्ड मीटिआॅराॅलॉजिकल ऑर्गनायझेशन' या संस्थेने उचललेली आहे. त्या संस्थेने जगातील तीन वेगवेगळ्या वादळप्रवण क्षेत्रांमध्ये विभागणी केली आहे. उत्तर हिंदी महासागर, उत्तर अटलांटिक महासागर आणि ईशान्य पॅसिफिक महासागर अशी ही ढोबळ विभागणी आहे. उत्तर हिंदी महासागरात उठणाऱ्या वादळांचं बारसं करण्याची जबाबदारी आठ देशांनी उचलेली आहे. यात भारत, पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका, थायलंड आणि ओमान हे देश येतात. त्यांनी सर्वांनी मिळून प्रत्येक देशाने आठ अशी चौसष्ट नावांची यादी बनवलेली आहे. त्यातून अनुक्रमाने भारतीय हवामान खाते या वादळाचे नामकरण करतं. 'फयान' हे नाव म्यानमारने सुचवलेलं होतं. यानंतर येणाऱ्या वादळाला ओमानने सुचवलेले 'वार्द' त्यानंतरच्या वादळाला पाकिस्ताननं सुचवलेलं 'लैला' अशी नावं यादीवर आहेत. यापूर्वीच्या वादळांना दिलेली नर्गिस (पाकिस्तान), रश्मी (श्रीलंका), कायमुख (थायलंड), बिजली (भारत), निशा (बांगलादेश) व ऐला (मालदीव) ही नावे होती. कोणाही व्यक्तीवरून ही नावे दिली जात नाहीत. एकदा एक नाव वापरल्यावर त्याचा परत वापर केला जात नाही. ही यादी संपायच्या आधी पुढची यादी तयार केली जाईल. इतर क्षेत्रांसाठी काही तपशील वगळता अशाच प्रकारची पद्धत वापर अवलंबली जाते. उदाहरणार्थ उत्तर अटलांटिक प्रदेशासाठी तीन वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. अनुक्रमाने त्यांच्यामधील नावं वापरली जातात. तिथे एकाआड एक पुरुषी नाव तर एका आड एक बायकी नाव दिले जाते. पॅसिफिक महासागरातल्या वादळांना नावं देण्यासाठीही संबंधित राष्ट्रांनी अशाच प्रकारची यादी तयार केलेली आहे. तेव्हा वादळांचं बारसं मुख्यत्वे 'वर्ल्ड मीटियोरोलॉजिकल ऑर्गनायझेशन' संबंधित देशांच्या हवामान खात्यांच्या सहकार्यानं करत असते. *बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातुन* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राष्ट्रसंत तुकडोजीला 'तुकड्या' हे नाव कोणी दिले ?* आडकोजी महाराज 2) *'ग्रामगिता' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 3) *तुकडोजीचा 'राष्ट्रसंत' या पदवीने कोणी गौरव केला ?* डॉ राजेंद्र प्रसाद 4) *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ?* मोझरी 5) *श्री गुरुदेव मंडळाची स्थापना कोणी केली ?* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● रविकिरण बलूले ● मनोज बडे ● अमोल पाटील सावंत ● अनिकेत पडघन ● गजानन शिराळे ● श्रीनिवास मुरके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत संघर्ष आहे. हा संघर्ष आतल्या श्वासांबरोबर सुरू होतो आणि श्वासांबरोबरच संपतो. मी खूप दगदग केली आहे. तेलाच्या घाण्याला बैलाला जुंपावे तसे आयुष्याला जुंपलो आहे. आता थोडे आरामाचे क्षण आले आहेत. थोडा विश्राम करतो असे जर कुणी म्हणाले, तर हा विचार आयुष्याला पूर्णविरामाकडे नेतो. माणूस उद्यमशिल राहिला नाही तर त्याचे अस्तित्व संपते. बुद्धिने श्रमाचा ठेका धरला तर आयुष्याचे सप्तसुरात न्हाणे होईल.* *कु-हाडीने लाकडे फोडणारा प्रचंड शारीरीक श्रम करीत असतो. रस्त्याकडेला झाडाखाली बसलेला चर्मकार दिवसभर अखंड कामात असतो. या कामाला बुद्धीची जोड मिळाली, तर श्रम कमी होतील, उत्पन्न वाढेल आणि कामात आनंद निर्माण करता येईल. त्यामुळे उद्योगशिल राहणे जितके गरजेचे असते तितकेच त्या उद्योगशिलतेला बुद्धिने दिशादर्शन करणेही आवश्यक असते. प्रतिकूलतेचे आव्हान स्विकारून ते अनुकूल करणारे श्रमर्षि थेट ब्रम्हांडनायक भास्करांनी नाते सांगतात. प्रतिभेला परिश्रमाची साथ मिळाली तर वाळवंटातही नंदनवन फुलत असेल, तर ही साथ घेऊन नंदनवनी असणारे आपण बहरून यायलाच हवे ना !* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परबत परबत मै फिरया, नैन गवाए रोई | सो बूटी पौ नहीं , जताई जीवनी होई || अर्थ माणूस बर्याचशा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी व बर्याच अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्या कर्तृत्त्व , चिंतन , शांती व समाधानातून प्राप्त होणार्या या लौकिक बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी पण जागा विसरलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधानं ऊर फुटेतो धाव धाव धावतो. कस्तुरी स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात होतो. तसंच माणसाचं झालंय. थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर सर्वच जण अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्या अर्थानं कुंभ सापडलेला ! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकिवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातंच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. 'नर करणी करे सो नारायण होय ।' याची प्रचिती दिली. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना महात्मा कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो , दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्म गुटिकाच माणसाला अमर करते. हे जीवनातून फलित निघालं. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला आसरा दिला की जीवनच नंदनवन होवून जातं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चांगल्या विचाराने आणि चांगल्या संगतीने खरा माणूस घडतो. आपल्या जीवनात नेहमी चांगला विचार करत राहिल्यास आपल्या प्रत्येक कामात यश मिळते आणि मनस्वी आनंद मिळतो.तो आनंद इतरांचे वाईट व्हावे आणि माझेच भले व्हावे असे विचार सतत आपल्या मनात असतील तर आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतल्यासारखे होईल.त्यात आपली प्रगती होण्यापेक्षा अधोगतीच होईल. तसेच चांगल्यांच्या सहवासात राहिले तर आपल्या मनातील वाईट विचारांना कधीच संधी मिळणार नाही.चांगली माणसे स्वत:साठी आणि इतरांसाठी नेहमी चांगलाच विचार करत असतात.सुसंगती सदा जोडावी ती म्हणजे चांगल्या सज्जनांची आणि पुस्तकांची तसेच ग्रंथांची.यांच्या सानिध्यात राहिल्यावर देखील आपले जीवन सुखी व समृद्ध बनेल.त्यामुळे आपण इतरांसमोर एक आदर्श म्हणून उभे राहू. © व्यंकटेश काटकर, नांदेड. 📱९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 📚🌱📚🌱📚🌱📚🌱📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खोड मोडली* सखाराम नावाचा एक मीठाचा व्यापारी होता. त्याच्याजवळ एक गाढव होते. ते फार आळशी होते. रोज सकाळी सखाराम गाढवाच्या पाठीवर मीठाच्या पिशव्या लादत असे. मग तो गाढवाला घेऊन शेजारच्या गावात मीठ विकायला जात असे. जाताना एक ओढा लागत असे. एके दिवशी ओढा ओलांडत असताना गाढवाचा पाय अचानक घसरला व ते पाण्यात पडले. त्यामुळे त्याच्या पाठीवरचे मीठाचे पोते पाण्यात भिजले. त्यातील मीठ विरघळल्याने ते हलके झाले. त्यामुळे गाढवाचे ओझे कमी झाले. त्याला चांगलाच आराम मिळाला. दुसर्या दिवशी गाढवाने मुद्दाम पाण्यात पडल्याचे नाटक केले. मीठ पुन्हा पाण्यात भिजल्याने त्यादिवशीही गाढवाला आराम मिळाला. मग तो सारखेच असे करू लागला. पण लवकरच सखारामला ही युक्ती लक्षात आली. त्याची खोड मोडण्यासाठी मग त्याने एके दिवशी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवले. ओढा लागताच गाढवाने पुन्हा पडल्याचे नाटक केले. मात्र, या वेळी पाटीवर मीठाऐवजी कापूस असल्याने तो भिजल्यावर चांगलाच जड झाला. त्यामुळे गाढवाला लवकर उठता येईना. त्याला त्या दिवशी अधिकच ओझे वाहावे लागले. त्याला चांगलीच अद्दल घडली. तेव्हापासून गाढवाने कधीच पाण्यात पडल्याचे नाटक केले नाही व कामचुकारपणा केला नाही. *तात्पर्य: कामातून पळवाट शोधणे केव्हाही वाईट.आळस,कामचुकारपणा केल्यास स्वतःचेच नुकसान होते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment