🌳झाडांची लागवड करूया🌳
🌱 झाडांची लागवड करूया
लावली झाडे वाढवूया 🌱
पर्यावरणाचे रक्षण करूया
झाडेच झाडे लावूया
🌱झाडांची लागवड करूया
लावली झाडे वाढवूया🌱
जिकडे तिकडे झाडेच झाडे
जंगल सारे सजवूया
🌱झाडांची लागवड करूया
लावली झाडे वाढवूया🌱
फुला फळांनी झाडे बहरूया
हिरवी शेते पाहूया
🌱झाडांची लागवड करूया
लावली झाडे वाढवूया🌱
पावसाचे पाणी अडवू या
नाल्यांना बंधारे घालू या
🌱झाडांची लागवड करूया
लावली झाडे वाढवूया🌱
निसर्ग सहल काढूया
मज्जाच मज्जा करूया
🌱झाडांची लागवड करूया
लावली झाडे वाढवूया🌱
🌳🌴🌲🌱☘🌴🌳
〰〰〰〰〰〰〰
✍श्रीमती प्रमिला सेनकुडे.
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment