✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/07/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८८५-लुई पाश्चर याने रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली १८९२ - दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड. १९४७-रशियात ए के ४७ या बंदुकीच्या उत्पादनास सुरुवात झाले २००६- चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी 'नाथु ला' खिंड ४४ वर्षानंतर व्यापारासाठी खुली करण्यात आली. 💥 जन्म :- १८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक. १८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष. १८९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार. १९०१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे पहिले नेते . १९०५ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका. १९३९ - मन सूद, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८६ - जगजीवनराम, भारतीय राजकारणी. २००२ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *गरिबांचे सबलीकरण, युवकांना उज्ज्वल भविष्य देणारा, या अर्थसंकल्पामुळे उद्योग व उद्योजक या दोघांनाही बळ मिळेल आणि देशाच्या विकासात महिलांचा सहभागही वाढेल - पंतप्रधान मोदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *Budget नवी दिल्ली - नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवणार, उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यार्थ्यांना भारतात संधी उपलब्ध करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *Union Budget: पेट्रोल-डिझेलची दरवाढ मध्यरात्रीपासून लागू; बजेटमधील करवाढीचा पहिला झटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आधार कार्डच्या मदतीनं आयकर भरता येणार; पॅन कार्डची सक्ती नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा विजयी निरोप; बांगलादेशवर 94 धावांनी मात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आज भारताची लढत श्रीलंकेसोबत, भारत यापूर्वीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - संशय* https://storymirror.com/read/story/marathi/4yp3ta6e/snshy/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *निरनिराळ्या रोगांचे जंतू कसे ओळखतात ?* 📙 अनेक प्रकारचे जीवजंतू आपल्या स्वभोवतालच्या पर्यावरणात असतात. काही आपल्या शरीरातही असतात. यात काही रोगकारक तर काही अपाय न करणारे असतात. जीवजंतूंचे जीवाणू, विषाणू, एकपेशीय व बहुपेशीय परजीवी जंतु, रिकेटशीये असे अनेक प्रकार असतात. या जंतूंमुळे अनेक रोग होतात. कोणत्या जंतूपासून रोग झाला आहे हे ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत तपासण्या उपलब्ध आहेत. जंतूंचा आकार, त्याच्या पेशीतील व पेशीच्या आवरणातील घटक, पेशीची रंग स्वीकारण्याची प्रवृत्ती, कृत्रिम माध्यमात त्यांची होणारी वाढ व या वाढीची वैशिष्ट्ये इत्यादी अनेक बाबींवरून वेगवेगळे जंतू ओळखू येतात. संडासवाटे बाहेर येणारे कृमी साध्या डोळ्यांनाही दिसतात व ओळखता येतात. जीवाणू सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तर विषाणू इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली बघावे लागतात. जंतूंच्या हालचाल करण्याच्या पद्धतीवरूनही ते ओळखता येतात. रोग झाल्यानंतर रुग्णाची थुंकी (बेडका), लघवी, विष्ठा, रक्त, त्वचा इत्यादींची (रोगानुसार) तपासणी करतात व त्यातील जंतूंचा शोध घेतात. या नमुन्याचा सुरुवातीला काचपट्टीवर थर तयार करतात व नंतर या थरावर इओसीन, मेथीलीन ब्लू वा इतर रंगद्रव्याची क्रिया करतात. यामुळे जंतूंना त्यांच्या गुणधर्मानुसार रंग येतात. या काचपट्ट्यांची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करून जंतू ओळखतात. काही वेळा कृत्रिम माध्यमांमध्ये जंतू वाढवतात व नंतर काचपट्टीवर उपरोक्त पद्धतीने तपासणी करतात. विषाणूंची तपासणी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली करावी लागते. कारण ते फार सूक्ष्म असतात. काही वेळा जंतू सापडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात शरीराने तयार केलेली प्रतिद्रव्ये शोधून त्यांच्यानुसार जंतुसंसर्ग झाला होता वा नाही हे अनुमानाने ठरवले जाते. यासाठी रक्ताची तपासणी करतात. जंतू ओळखणे हे रोगनिदानासाठी, परिणामकारक उपचारासाठी अत्यंत आवश्यक असते; त्यामुळे वर सांगितलेल्या पद्धतींचे महत्त्व अजूनच वाढते. *डॉ. जगन्नाथ दीक्षितव डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेला पावसाळा जास्त महत्वाचा असतो *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *शिवाजी महाराजाच्या आईचे नाव काय होते ?* जिजाबाई 2) *भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष कोण ?* मीरा कुमार 3) *भारताची प्रथम महिला राज्यपाल कोण ?* सरोजिनी नायडू 4) *भारताची प्रथम महिला IAS अधिकारी कोण ?* अण्णा जार्ज 5) *बांगलादेशचे चलन कोणते ?* टका *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● संतोष मानेलू ● मोहन भूमकर ● साजिद शेख ● अतुल बागडे ● अशोक इमनेलू ● शंकर सोनटक्के ● आबासाहेब उसकलवार ● श्रीकांत पुलकंठवार ● शिवाजी जिंदमवार ● मधुकर कांबळे ● शंकर स्वामी ● व्यंकट चन्नावार ● नारायण वानोळे ● सुभाष इमनेलू ● अर्फत इनामदार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिका-याने टाकलेल्या जाळ्यात पक्षांचा थवा सापडतो. प्रत्येक पक्षी त्यातून सुटका करण्याचा प्रयत्न करू लागतो. प्रत्येकाचे प्रयत्न त्या जाळ्याची पकड आधिक घट्ट करत जातात. परंतु सर्वच पक्षी एकत्रितपणे उडण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा त्या जाळ्यासह उडून जातात. आपल्या आजूबाजूला संकटात सापडलेल्या मंडळींकडे न पाहता आपण आपल्या संकटापुरता विचार करू लागतो. तेंव्हा सारेच संकटाच्या गर्तेत जातो. पण सर्वांच्या हिताचा दृष्टीकोन ठेवून एकसंधपणे एकविचाराने जेंव्हा संकटाचा सामना करतो तेंव्हा संकटे पळून जातात. त्यामुळे माणसांनी एकत्र येणे, एका मंगल विचारांनी राहणे, एका महन्मधुर विचारांनी कार्यरत होणे हा यशामागचा मोठा मंत्र असतो.* *रामकृष्णांचा सहवास मिळाल्यावर नरेंद्राचे विवेकानंद होतात. विवेकानंदांच्या सानिध्यामुळे लंडनमधील एका शाळेची संचालिका असणारी मार्गारेट नोबेल ही भगिनी निवेदिता होते. गोपाळकृष्ण गोखले यांच्या सहवासामुळे मोहनदास गांधी यांचा महात्मा गांधी होण्याकडे प्रवास सुरू होतो. संतांचा म्हणजे चांगल्या माणसांचा सहवास आपले भ्रम दूर करून मन निर्मळ करतो. 'परिसाच्या संगे सोने झाला विळा' असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. नाही तर तुकारामांनीच म्हटले आहे,'कर्कशे संगती, दु:ख उदंड फजिती.'* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर जीवन कुछ नहीं, खिन खारा खिन मीठ कलहि अलहजा मारिया, आज मसाना ठीठ। सारांश जीवन क्षणभंगूर आहे. क्षणापूर्वी ते होते अन क्षणानंतर ते असेल अशी कोणीही खात्री देवू शकत नाही. जीवनाची नश्वरता पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात, जीवन म्हणजे काहीही नाही. या क्षणाला ते खारट अनुभव देत असेल तर दुसर्या क्षणी ते कडवटपणाला गोडीमध्ये बदलू शकते. जीवनाचा मधूर अनुभव देवु शकतं. जो वीरयोद्भा काल युद्धामध्वे आपलं नैपुण्य पणाला लावून बाजी प्राणपणाने लढून आपल्या बाजूने ओढून आणण्यामध्ये यशस्वी झाला म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक सोहळे साजरे झाले. सर्वांनी जयमाला गळ्यात घालून त्याचा जय जयकार केला गेला. ज्याने काल मैदान मारले तो स्वतःच आज चितेवर स्मशानी निपचित अचेतन पडला आहे. मृत्यूने भल्याभल्यांना सोडलेले नाही. तिथे सामान्य जीवांचं काय खरं आहे. घारीने भक्ष्यावर झडप घालावी तशी काळ कोणत्याही क्षणी झडप घालू शकतो, म्हणून माणसानं आपल्या हाती जे काही आयुष्य शिल्तक राहिले आहे. त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा व जीवन सत्कारणी लावायला हवे , म्हणजे सत्कर्माच्या किर्तीने मृत्यू पश्चातही जीवनाचा परिमल दरवळत राहातो. मृत्यू साक्षात पुढ्यात उभा राहिला तरी त्याचे भय राहात नाही एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काळजी केल्याने कोणतेच प्रश्न मिटत नसतात तर अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे टाकतात.त्या काळजीमध्ये तुमच्या आजच्या कामावर लक्ष नसल्यामुळे तुमचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ शकेल.त्यामुळे तुम्ही अधिक काळजी करायला लागाल.त्यापेक्षा काळजी न करणे सर्वात मोठा शहाणपणा आहे.ज्याची तुम्हाला काळजी वाटते त्याकडे लक्ष न घालणे सगळ्यात चांगले.आजच्या कामात अधिक लक्ष घातले आणि मन लावून काम केले तर त्या कामात गढून जाल.चांगले काम झाल्याचे समाधान तर वाटेलच आणि काळजी पण दूर होईल.काळजी कोणतीही असो.आजची असो की उद्याची.तो काळ तुमच्या काळजीमुळे थांबणार का ? नाही ना.मग आपले मन प्रसन्न ठेवा.येणा-या आणि हाती असलेल्या कामात अधिक लक्ष घाला मग तुम्हाला तुमचे समाधान मिळेल.समाधान हे काळजीला उत्तम पर्याय आहे हे कधीही विसरु नका. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 💠🌹💠🌹💠🌹💠🌹💠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवता हाच धर्म* एकदा *एका उंदराने हिरा* गिळला. हिऱ्याच्या मालकाने त्या *उंदिराला मारण्यासाठी* एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा *सगळे उंदिर एक घोळका* करून एका दुसऱ्यावर *चढून दाटीवाटीने* बसले होते, पण एक उंदिर त्यांच्यापासून *वेगळा बसला* होता. शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच *उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता.* हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच *उंदराला कसे काय ओळखले?* शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, *जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..!* आयुष्यात *धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा* पण *आपण ज्या समाजात वाढलो, जगलो, मोठे झालो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो.* *आपण ह्या* *समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका..* *माणसे जोडा🏻मानवता हाच धर्म* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment