✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/07/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ■ १९७५ - अमेरिकेतील टीम्स्टर युनियन चा नेता जिमी हॉफा गायब. ■ १९८१ - पनामाचा हुकुमशहा ओमर तोरिहोसचा विमान अपघातात मृत्यू. ■ १९८७ - कॅनडातील एडमंटन शहरात एफ.४ टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी डॉलरपेक्षा जास्त मिळकतीचे नुकसान. 💥 *जन्म* :- ◆ १९१२ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ. ◆ १९१९ - लेफ्टनंट कर्नल हेमु अधिकारी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९५३ - जिमी कूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. ◆ १९४१ - अमरसिंह चौधरी, गुजरातचे मुख्यमंत्री. 💥 *मृत्यू* :- ● १९७२ - पॉल-हेन्री स्पाक, बेल्जियमचा पंतप्रधान. ● १९८० - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक. ● १९९३ - बॉद्वां पहिला, बेल्जियमचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा चौथा विशेष पदवी प्रदान समारंभ; डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते डी. लिट पदवी प्रदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इस्रोच्या मंगळयान, चांद्रयान आणि गगनयान यांसारख्या एकामोगामाग एक यशस्वी मोहीमा, तरीही सरकारकडून वैज्ञानिक, इंजिनीअर्सच्या पगारात कपात * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *तात्काळ तिहेरी तलाक विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर, मुस्लिम महिलांना न्याय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल अनुपस्थित तर AIDMK चा सभात्याग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा धनगर समाजाला खूश करण्याचा प्रयत्न, एसटी प्रवर्गाच्या सर्व सवलती धनगर समाजालाही लागू होणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पावसाची हजेरी, पुणे, नाशिकमध्ये नद्यांना पूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कृत्रिम पावसासाठी सुकाणू समिती स्थापन; १ ऑगस्टपासून मराठवाड्यात प्रयोग शक्य, विभागीय महसूल उपायुक्त हे प्रयोगासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नागपूर : आर्थिक दुर्बलांना मिळणार थेट अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश, 10 टक्के आरक्षण लागू करण्याचा हायकोर्टाचा आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अन्न म्हणजे पूर्णब्रह्म* अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. यातील अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सजीव धडपडत असतो. अश्मयुगीन काळातील लोक अन्नाच्या भटकंतीत अनेक वर्षे घातली. या अन्नाच्या शोधातच त्यांनी अग्निचा शोध लावला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही......... पूर्ण लेख खालील लिंकवर वाचण्यास मिळेल. https://nasayeotikar.blogspot.com/2019/05/blog-post_69.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अन्नाशिवाय माणूस किती काळ जगेल ?* 📙 या प्रश्नाचं एकच एक असं उत्तर देता येणं कठीण आहे. व्यक्ती व्यक्तीनुसार त्यात फरक पडू शकतो. कारण मुळात त्या व्यक्तीचं वजन किती होतं, त्याचं सर्वसाधारण आरोग्य कसं होतं, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या विकारांचा प्रादुर्भाव होता की काय व मुख्य म्हणजे शरीरात कितपत पाणी होतं यावर हा काळ अवलंबून असतो. जोवर शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखलं जात आहे तोवर केवळ अन्नत्यागापोटी किती काळ काढता येईल, याविषयीची विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नाही. वयाच्या ७४ व्या वर्षी महात्मा गांधींनी केवळ पाणी घेऊन २१ दिवस उपोषण केलं होतं. त्यापायी त्यांचं वजन जरी घटलं तरी आरोग्यावर तितकासा अनिष्ट परिणाम झाला नव्हता. मायकेल पील यांनी १९९७ साली 'ब्रिटिश मेडिकल जर्नल' मध्ये प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात आणि २८,३६,३८ आणि ४० दिवस अन्नावाचून काढलेल्या व्यक्तींविषयीचा विश्वासार्ह अहवाल दिला होता. एवढे दिवस शरीर अन्नावाचून कसं काढू शकतं, याचं कारणही त्यात त्यांनी नमूद केलं होतं. शरीराचं नेहमीचं कार्य चालतं त्याला चयापचय म्हणतात. त्याचा कार्यवेग राखण्यासाठी आपल्याला पोषणाची म्हणजेच अन्नाची गरज भासते; पण जेव्हा या पोषणाची कमतरता भासते तेव्हा शरीर चयापचयाच्या कार्यवेगातही योग्य ते बदल करतं असं दिसून आलं आहे. थायरॉईड ग्रंथीतून होणार्या स्रावांचा वापर करून शरीर हे साध्य करतं. या बदलाचं प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं असू शकतं. साहजिकच अन्नावाचून किती काळ काढता येईल हे या घटकावरही अवलंबून असतं. जोवर पाण्याच्या प्रमाणात लक्षणीय फरक पडलेला नाही तोवर अतिशय अल्प अन्नसेवनावर दीर्घकाळ काढल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या छळछावणीतील कित्येक जणांना जवळजवळ उपाशी अवस्थेत दिवस काढावे लागले होते. हा काळ काही महिन्यांपासून तीन चार वर्षांपर्यंतही होता. त्यापायी त्यांच्या शरीराचा जवळजवळ हाडांचा सापळा झाला होता. तरीही त्या स्थितीत त्यांच्या अंतर्गत अवयवांचं काम व्यवस्थित चालून ती मंडळी जिवंत राहिली होती. एवढेच नाही तर तिथून सुटका झाल्यानंतर ती पूर्वावस्थेत येऊ शकली होती. 'अॅनोरेक्सिया नर्वोसा' या रोगानं पछाडलेल्या व्यक्ती जाणूनबुजून स्वतःची उपासमार करून घेतात. आपलं वजन कमी करण्याच्या अतिरेकी हट्टापायी काहीजणांना ही व्याधी जडते. अशा मंडळींचं वजन तब्बल ४० टक्क्यांनी घटतं. त्याहून अधिक घट मात्र ते सहन करू शकत नाहीत. कर्करोगाची बाधा झालेल्या व्यक्तींनी नेहमीइतकंच अन्नसेवन केलं तरी त्यातलं पोषण कर्करोगग्रस्त पेशी पळवत असल्यामुळे इतर शरीराला योग्य तितके उष्मांक मिळत नाहीत. त्यांच्याही बाबतीत वजन ४० टक्क्यांहून अधिक घटलं तर मृत्यू ओढवतो. वजनात तितकी घट होण्यास किती वेळ लागेल हे अर्थात व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून असतं. *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Well beginning is the half done.* *( चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थळ व समाधी स्थळ कोठे आहे ?* देहू 2) *मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?* अमरावती 3) *मराठीचे आद्यकवी कोण ?* मुकुंदराज 4) *साने गुरुजीचे पूर्ण नाव काय ?* पांडुरंग सदाशिव साने 5) *'श्यामची आई' या ग्रंथाचे लेखक कोण ?* साने गुरुजी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● बालासाहेब कच्छवे, नांदेड ● प्रशिक नंदुरकर, उमरखेड ● प्रीतम नावंदीकर, नांदेड ● मनोज बुंदेले, धर्माबाद ● कैलाश गायकवाड, तेलंगणा ● दिलीप सोळंखे, भोकर ● नागनाथ इळेगावे, बिलोली *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस बर्याचदा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्या कर्तृत्त्व, चिंतन, शांती व समाधानातून प्राप्त होणार्या या लौकिक बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी परि जागा चुकलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधाने ऊर फुटेतो धाव धाव धावतो. 'कस्तुरी' स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात होतो. तसंच माणसाचं झालंय.* *थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर कोणीही अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्या अर्थानं कुंभ सापडला! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो-शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकीवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना संत कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो, दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्मच माणसाला अमर करते. हे जीवनाचे फलित आहे. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला आसरा दिला की जीवनाचं नंदनवन होवून जातं.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरे जीवन समजून घ्या.* *एकदा एक काम करा, स्वतःलाच फोन लावून बघा, स्विच ऑफ, नो रेंज, व्यस्त असे अनेक प्रकार होतील पण फोन लागणार नाही.* *या जगात आपण सगळ्यांसाठी आहोत, वेळ पण देतो आणि स्वतःसाठी, बघा स्वतःसाठी आपण नेहमी व्यस्त आहोत, जगून घ्या,* *वागणं चांगल नसेल तर, साधी उचकीही लागत नाही. बोलणं गोड़ नसेल तर, महागडया मोबाइलवर घंटी पण वाजत नाही.* *आणि घर मोठ असो वा लहान जर गोड़वा नसेल तर, माणूसच काय, मुंगीसुद्धा जवळ येत नाही. मग एवढा अभिमान कशापायी, खरे जीवन जगा ।* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाच्या जीवनात निराशा ही सवतीसारखी नेहमी मनाला छळत असते.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मनाला विचलीत करते.अशा स्थितीतून तिला हद्दपार करण्यासाठी काही ना काहीतरी करण्यासाठी तो आशेकडे धावतो आणि त्यातुन सुटका करून घेतो.अर्थात जीवनात निराशेने घर केले तर नक्कीच आशेचा शोध घेऊन निराशेला बाजूला सारतो आणि जीवन निराशेतून मुक्त करतो.निराशा जरी जीवनात आली तरी घाबरायचे नाही तिला हिमतीने तोंड देत आशेचा शोध घ्यायला शिकले पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.हीच आपल्या जीवनाची खरी परीक्षा आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रलोभनापासुन सावधपणे वागणे.* एका जंगलात मोठ्या संख्येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्या सहका-यांची संख्या कमी होत चालल्याचे एका हरणाच्या लक्षात आले. त्याने आपल्या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्या हरणाने आपल्या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्या वृक्षांच्या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्याचा मित्र त्याची गोष्ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्या पानाआड दडलेल्या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्या बळी पडून फळे खाण्यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्याचे म्हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही. *तात्पर्य :- आजच्या काळात कोणी जर आपल्याला प्रलोभन दाखवून जर फसवत असेल तर आपण सावध राहायला हवे किंवा कोणी जर सावध करत असेल तर त्याचे ऐकायला हवे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment