✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/07/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ■ २०१४ - पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार. ■ २००१- राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंग यांना 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्यासाठी त्यांनी लोकसहभागातून काम केले आहे. ■ २०००-चंदन तस्कर वीरप्पनने डॉ राजकुमार यांचे अपहरण केले. ■ १९९७- गानकोकिळा लता मंगेशकर यांना 'राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार' जाहीर. 💥 *जन्म* :- ● १९४७ - आर्नोल्ड श्वार्झनेगर, ऑस्ट्रियाचा अभिनेता व कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर. ● १९७३ - सोनू निगम, पार्श्वगायक. 💥 *मृत्यू* :- ● १९४७ - जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचा सहावा पंतप्रधान. ● १९९४ - शंकर पाटील, मराठी लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कर्नाटकातील राजकीय नाट्य संपलं, येडियुरप्पा यांनी केलं बहुमत सिद्ध, सरकारला 106 आमदारांचा पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : आषाढ संपत असताना संपूर्ण राज्यात पावसाने धरला जोर, मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर, धरणांंमधील साठ्यात समाधानकारक वाढ होत असून खोळंबलेल्या पेरण्यांना आला वेग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेस करणार नवीन अध्यक्षांची निवड. नवीन अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती असेल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दाेन सीएनजी बसेस सुरु करण्यात आल्या असून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा हाेणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *दिल्लीः लोकसभेत राष्ट्रीय चिकित्सा आयोग विधेयक मंजूर करण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नांदेड : येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी पक्ष सोडल्याची केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बुलडाण्याच्या अनंता चोपडेला इंडोनेशियातील प्रेसिडेंट कप बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक, 52 किलो गटात अफगाणिस्तानच्या रेहमानी रमीशचा केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ऑफरचा भुलभुलैय्या* * कमी श्रमात जास्त संपत्ती मिळावी असे प्रत्येक मनुष्याला वाटणे म्हणजे आपल्या अंगात असलेल्या आळशीपणाला उत्तेजन देणे होय. ज्या ज्या वेळी मनुष्य असे प्रयत्न करत आला आहे त्या त्यावेळी त्याला उदासीनते शिवाय काहीही मिळाले नाही. तरी सुद्धा माणूस अश्या घटनेतून काही बोध न घेता पुन्हा तश्याच काही बाबीच्या शोधात राहतो. मी गोष्ट करतोय ऑफरची.......... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/01/blog-post_28.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कृष्णविवराचा शोध कोणी लावला ?* 📙 तारे अमर नाहीत, त्यांचीही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. अर्थातच तार्यांची अखेर झाल्यानंतर त्यांची काय अवस्था होते, याविषयीच्या संशोधनाला चालना मिळाली. अंतरंगात धडधडत असणाऱ्या अणुमीलनाच्या भट्ट्यांपायी तारे स्वयंप्रकाशित होतात. हायड्रोजनच्या अणुंचं मीलन होऊन त्यापासून हेलियमचे अणू तयार होत असताना फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते. तीच प्रकाशाच्या रूपाने आपल्या नजरेला पडते. पण हायड्रोजनचं इंधन अमर्यादित नसतं. ते संपल्यावर हेलियम त्याचं स्थान घेतं. ते संपल्यानंतर चढत्या भाजणीनं कार्बन, नायट्रोजन यासारख्या अधिकाधिक जड मूलतत्त्वांचा इंधन म्हणून वापर होतो. एकदा का या प्रक्रियेतून लोहाची निर्मिती झाली, की ही प्रक्रिया थंडावते. आता कोणतंच इंधन शिल्लक राहिलेलं नसतं. त्यामुळे त्या ताऱ्यांच्या अंतरंगातून ऊर्जा बाहेर पडत नाही. सहाजिकच त्या ताऱ्यावर आतल्या दिशेनं आकुंचन पावायला लावणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा पगडा बसतो आणि तारा आकसायला सुरुवात होते. त्याचीच परिणती त्या ताऱ्यांचं अतिशय फिकुटलेला प्रकाश असणाऱ्या श्वेतबटूंमध्ये रूपांतर होतं, याची प्रचिती काही प्रमाणात मिळाली होती. कारण अवकाशात अशा प्रकारच्या श्वेतबटूंच्या अस्तित्वाचा पुरावा मिळालेला होता. त्यानंतर काय होतं याविषयी मात्र निश्चित सांगता येणे शक्य होत नव्हतं. पण ज्या अर्थी हे श्वेतबटू ताऱ्यांसारखेच स्थिर असल्याचं दिसतं त्यावरून हीच तार्यांची अंतिम अवस्था असावी, असा तर्क केला जात होता. मृत तार्यांचं कलेवर म्हणजेच श्वेतबटू, असाच समज प्रचलित होत होता. तरीही ते स्थिर कसे होतात ? हा प्रश्न अनुत्तरितच होता. कारण जर अंतरंगातल्या भट्ट्या थंड पडल्या असतील तर मग गुरुत्वाकर्षणाच्या ओढीला विरोध करणारं दुसरं बल असण्याची शक्यताच मावळते. पण क्वांटम मेकॅनिक्सच्या सूत्रांचा अवलंब करून डॉ. राल्फ फाउलर यांनी त्याचं तर्कसंगत स्पष्टीकरण दिलं होतं; पण ते पर्याप्त नाही, अशी भूमिका एका विशीतल्या भारतीय तरुणानं घेतली. त्यानं त्यावेळी नुकत्याच प्रकाशात आलेल्या आईन्स्टाइनच्या सापेक्षतावादाचा अवलंब करत, जर श्वेतबटू बनलेला तारा महाकाय असेल, म्हणजेच त्याचं वस्तुमान आपल्या सूर्याच्या दीडपटीहून जास्त असेल, तर श्वेतबटूही आतल्या आत कोसळतच राहील आणि त्याचं रूपांतर अपरिमित गुरुत्वाकर्षणाची ओढ असलेल्या एका सूक्ष्म अवस्थेत होईल, असं भाकीत केलं. त्या अवस्थेत गुरुत्वाकर्षणाची ओढ इतकी प्रचंड असेल की त्यातून प्रकाशकिरणही बाहेर पडू शकणार नाहीत, असा दावा त्यानं केला होता. त्यावेळचे खगोलमहर्षी त्या तरुणाचे गुरू अार्थर एडिन्गटन यांनी त्या प्रबंधाची जाहीर टिंगल केली. त्या तरुणाची हेटाळणीही केली. पण कालांतराने इतर प्रख्यात खगोलविदांनी त्या तरुणाचा सिद्धांतच बरोबर असल्याचं सप्रमाण दाखवून दिलं. त्या अवस्थेला मग इतर काहीजणांनी कृष्णविवर असं नाव दिलं. कृष्णविवरांच्या अस्तित्वाची प्रचिती देणारे असंख्य अप्रत्यक्ष पुरावे आता मिळाले आहेत. त्यामुळे कृष्णविवर केवळ कल्पनेचा खेळ नसून आपल्या विश्वातील एक सत्य घटक आहे हे सिद्ध झालं. कृष्णविवराचं भाकीत करणारा तो तरुण होता सुब्रह्मण्यम चंद्रशेखर. त्यांना या शोधाबद्दल १९८३ सालचा नोबेल पुरस्कार दिला गेला. *बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?* श्री भुपेश बघेल 2) *संत गाडगेबाबा यांचे आवडते भजन कोणते ?* गोपाला गोपाला , देवकी नंदन गोपाला 3) *स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते ?* नरेंद्रनाथ दत्त 4) *आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* सिंधुदुर्ग 5) *संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?* आळंदी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● नागनाथ इळेगावे ● सचिन गादेवार ● प्रवीण चातरवाड ● विजय कुऱ्हाडे ● प्रियंका घुमडे ● शेख नवाज ● निलेश कोरडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोड आत डोकावून पहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव येरझारा घालतांना सापडेल. माणूस लहान असो, मोठा असो, त्याला जे काही हवं आहे, ते मिळत नसल्याची नांगी सतत डंख मारीत असते. जी काही आपली पात्रता आहे, त्यानुसार आपल्याला जे हवं आहे, ते मिळत नाहीये, ही भावना त्याला छळत असते. शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टींमागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणतीही शांती मिळणार नाही? औदासीन्य नाहीसं कसं होणार? अहंकारानं मन काठोकाठ भरलेलं असलं, तर आशीर्वादानं आत उतरायचं कसं? भांड रिकाम हवं, तरच ते भरता येईल.* *कवी शांताराम आठवले यांनी एका ओळीत जे सांगितलंय, “जो हसला, तो अमृत प्याला” हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे.. संपला की स्वास्थ्य आणि आनंदा व्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतः च येतो. हा अडथळा दूर होणं महत्वाचं. कबीर यालाच 'सहजयोग' म्हणतात. हा अहंकार मिटला, तर जीवन प्रतिक्षणी पूज्य भावाने व्यापून जाईल. राहत्या वास्तूत प्रतिदिन गंगास्नान घडेल. तुम्ही जिथं जिथं विहार कराल, ते ते तीर्थस्थळ घडेल. अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मुळ अहंकार गेला नाही तर.. प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा सगळं व्यर्थ आहे!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रेमभाव एक चाहिए , भेष अनेक बनाय | चाहे घर में वास कर , चाहे बन को जाए || अर्थ मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ? भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा . विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य व प्रेमभाव हाच खर्या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते म्हणून माणसाने अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जिद्द,मेहनत आणि प्रयत्न हे तुमच्या हाती घेतलेल्या कामासाठी वापरलेले कौशल्य आहे.यामुळे तुमचे काम अधिक चांगले व उत्कृष्ट दर्जाचे होण्यास मदत करते. कोणतेही काम जेव्हा हाती घ्याल तेव्हा ह्या तीन गोष्टी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्येच आपली प्रगती सामावलेली असेल. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनमोल क्षण* प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग. एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'. 'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'. खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment