✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/07/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतराष्ट्रीय न्यायासाठी दिन* *बाथ क्रांती दिन - इराक* *लुइस मुनोझ रिव्हेरा जन्मदिन - पोर्तो रिको* संविधान दिन - दक्षिण कोरिया. 💥 ठळक घडामोडी :- २०००-अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना 'भरतनाट्यम शिखरमणी'पुरस्कार जाहीर १९८४ - लॉरें फाबियस फ्रांसच्या पंतप्रधानपदी. १९९४ - फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले. २००४ - भारतातील तामिळनाडू राज्यातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार. 💥 जन्म :- १९५४-अँजेला मेर्केल,जर्मनीच्या चान्सलर १९२० - हुआन अँतोनियो समारांच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा अध्यक्ष. १९३०-बाबुराव बागुल,दलित साहित्यिक १९४१ - बॉब टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४९ - स्नायडर रिनी, सोलोमन द्वीपांचा राष्ट्राध्यक्ष. 💥 मृत्यू :- २००५ - सर एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. २०१२ - मृणाल गोरे, सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी विश्वभुषण हरिचंदन तर छत्तीसगडच्या राज्यपालपदी अनुसया उकी यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मुंबईतील जीर्ण इमारतींबाबत कायदा करण्याची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांची नंदुरबारच्या जिल्हाधिकारीपदी बदली, त्यांच्या जागी प्रकाश वायचळ यांची नियुक्ती, वायचळ हे अहमदनगर येथे जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिक : पावसाने दडी मारल्यामुळे कोथिंबीरची आवक घटल्याने बाजारसमितीत कोथिंबीर च्या भावाने गाठला ऐतिहासिक उच्चांक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *लंडन - केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी घेतली ब्रिटनच्या पंतप्रधान टेरेसा मे याची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *येत्या महिन्यात 1 हजार 300 पोलिसांची भरती करण्यासाठी जाहिरात दिली जाईल, भरतीवेळी वयाची अटही थोडी शिथिल केली जाईल, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले जाहीर.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा यांना भारताचे क्रीडा मंत्रा किरेन रिजिजू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - कुस्ती* https://storymirror.com/read/story/marathi/iaysl897/kustii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ⛈ *गार किती मोठी असते ?* ⛈ 'वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि' ही कवीकल्पना जरूर आहे; पण प्रत्यक्षात असे परस्परविरोधी गुणधर्म असणारा कोणताही पदार्थ नाही, असं मानण्याचं कारण नाही. आपल्या अतिशय परिचयाच्या, ज्याचं दुसरं नावच मुळी जीवन आहे अशा, पाण्याकडे पाहा ना ! अधिक नेमकेपणाने बोलायचं तर या पाण्याच्या घनरुपाकडे लक्ष केंद्रित करा ना ! हिवाळ्याच्या ऐन भरात जेव्हा हिमपाताच्या रूपात हे घन पाणी सामोर येतं, तेव्हा अतिशय हलक्या वाऱ्याच्या मंद झुळकीनंही इतस्तत: फेकल्या जाणाऱ्या हिमाच्या त्या पात्यांनी मन मोहरून येतं. अंगावर संक्रांतीच्या हलव्यासारखा सुखद काटा उभा राहतो; पण सरत्या हिवाळ्यात किंवा त्यानंतरही जेव्हा हेच घन पाणी गारांच्या रुपात वर्षाव करतं तेव्हा अक्षरश: ब्रह्मांड आठवतं. उघड्यावर जर गारपीटीच्या मारत सापडला तर हेच 'जीवन' अक्षरश: जीवावर उठतं. हिमाची हलकी पाती अाणि गारांचे वजनदार गोळे यात एक साम्य जरूर आहे. त्यांचा नेमका आकार कोणता आणि तो त्यांना कसा मिळतो, हे एक न सुटलेलं कोडं आहे. साधारण गारा आपण पाहतो त्या सामान्य गोलाकार किंवा फार फार तर अंड्याच्या आकाराच्या असतात. वाटाण्यापेक्षा त्यांचं आकारमान सहसा मोठं नसतं. म्हणजेच साधारणत: दीड ते दोन सेंटिमीटर व्यासाच्या या गारांचं वजन असतं दहा बारा ग्रॅम. वरून ओबडधोबड दिसणाऱ्या या गाराची अंतर्गत रचना तशी आतल्या गाठीची नसते. हळुवारपणे एखादी गार उभी कापली तर आता एखाद्या कांद्याप्रमाणे एकाआड एक पापुद्र्यांचे थर दिसतील. एक पापुद्रा स्वच्छ, नितळ बर्फाचा, त्यावर एक पापुद्रा धुसर दुधी बर्फाचा, परत एक स्वच्छ नितळ पापुद्रा. असे एकावर एक थर. तरीही ९ जून १८६७ साली ४५०० मीटर उंचीवरच्या बेलाईक्लिच गावात झालेल्या गारांच्या वर्षावात प्रा. अाबिच यांना एक गार मिळाली होती. तिचा आकार चक्क एखाद्या तार्यासारखा किंवा हिऱ्यामाणकांच्या हारातलं मध्यवर्ती पदकच जणू असा होता. ज्यांनी या गारांचा साग्रसंगीत अभ्यास केला आहे, त्यांना शंकूच्या, लाटण्याच्या, इतरही अनेक आकारांच्या गारा पाहावयास मिळाल्या आहेत. आकारमानही चक्क पंधरा सेंटिमीटर व्यासपर्यंत आढळलं आहे. अमेरिकेतील नेब्रास्का या मध्यवर्ती राज्यातील वॉटर या समर्पक नावाच्या गावात ६ जुलै १९२८ रोजी गारपीट झाली. त्यातल्या एका गारेचं वजन तब्बल साडेसहाशे ग्रॅम होतं. त्या गोलाकार गारेचा व्यास होता १५ सेंटीमीटर; पण उच्चांक वगैरेच्या गोष्टी करायच्या तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एक नोंद आढळते. अमेरिकेतील तिथल्या कॉफव्हील नामक गावात तीन सप्टेंबर १९७० या दिवशी एक गार पडली होती. एकोणीस सेंटिमीटर व्यास आणि ४५ सेंटीमीटर परीघ असलेल्या या गारेचं वजन होतं साडेसातशे ग्रॅम. पाऊण किलो ! *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Confidence is a key to success.* ( आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे. ) *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?* पुणे 2) *शिवाजी महाराज यांच्या वडिलाचे नाव काय होते ?* शहाजी राजे 3) *भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका कोण ?* सावित्रीबाई फुले 4) *'स्त्री मुक्ती दिन' केव्हा पाळला जातो ?* 3 जानेवारी 5) *भारतात पालम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?* दिल्ली *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● माधव गैनवार ● अनिलकुमार बिंगेवार ● पुरुषोत्तम केसरे ● मधुकर फुलारी ● अरिफा शेख ● आनंद पंगेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरेपणा, प्रामाणिकपणा, वास्तवता, अस्सलपणा आणि यथार्थपणा अशी आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख ठेवणं चांगलं. हीच तर आपल्या जीवनाची खरीखुरी गुणसंपदा असते. माणसाने आपल्या ठायी असलेल्या गुणांची जाणीव विसरली तरी चालेल; परंतु आपल्या ठायी असलेल्या दोषांची चांगली जाणीव ठेवावी. जसं दगडातील नको असलेला भाग काढून टाकला की, सुंदर मूर्ती तयार होते, तसं आपल्या स्वभावातील दोष काढून टाकले की, निखळ आणि सुंदर व्यक्तिमत्व झळकत असतं. खरंतर गुणी माणसं लोखंडाचं सोनं बनविणा-या परिसासारखी असतात, ओसाड जमिनीचं नंदनवन करणारी असतात. म्हणून जीवनात यश मिळविण्यासाठी सत्य, पामाणिकपणा, कठोर परिश्रम, न्याय आणि चारित्र्याची गरज असते हे विसरता येणार नाही.* *सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्य विचार, सत्य आचार आणि सत्य उच्चार होय. सत्य म्हणजे जीवन. असत्य म्हणजे मरण. अनेक माणसं अशी जगता जगता मरत असतात आणि अनेक माणसं मरूनदेखील जगत असतात. यासाठी आपण स्वत: सत्यभाषी झाले पाहिजे. समाज सत्याचा आदर करतो. प्रामाणिकपणाची कदर करतो. न्यायची चाड बाळगतो. श्रमाची महती गातो आणि चारित्र्याची पूजा करतो. आज 'सत्यमेव जयते' हाच आपल्या जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. यासाठी सत्याचे महत्व आपल्या मनाच्या पाटीवर कायमचे कोरून ठेवले पाहिजे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राम पियारा छड़ी करी , करे आन का जाप | बेस्या कर पूत ज्यू , कहै कौन सू बाप || अर्थ महात्मा कबीर जीवनात कृतज्ञतेवर भर देतात. आपल्यावर ज्यांनी ज्यांनी उपकार केले त्यांना माणसानं कधीच विसरू नये. आई, वडिल, गुरूंसह अवतीभोवतीच्या सर्व घटकांनी आपल्या जडणघडणीत योगदान दिलेलंच असतं. त्यामुळे त्यांना विसरून कसं चालणार बरं ! वरील बाबी मानवी कक्षेतल्या आहेत. त्याही पलीकडील काही अलौकिक , अमानवीय शक्ती आपल्या जीवनाला साकारण्यामध्ये फार मोठ्या सहभागी आहेत. त्यांना पंचमहाभूते म्हणतात. पृथ्वी, आप, तेज , आकाश व वायू या पाच महाशक्तींना विश्वचालक शक्ती माणले गेले आहे. या शक्ती नसत्या तर सजीवांचं अस्तित्वंच राहिलं नसतं. या सर्वांचं नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिलाच आपण विधाता किवा ईश्वर माणतो. अलिकडे स्वार्थापायी दगडधोंडे पुजणे. पशू पक्ष्यांची देवाच्या नावावर हत्त्या करणे. हे सारं कळत्यांचं ढोंगीपण अज्ञानी लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवणारं असतं. अंधरूढी व अंधश्रद्भा वाढवतात. अशा लोकांबाबत कबीरजीच सांगतात, 'जत्रा में बिठाया फतरा, तीरथ बनाया पानी। दुनिया भयी दीवानी, ये सब है पैसे की धुलधानी॥' अशा ढोंगांच्या मागं न लागता खर्या विधात्याप्रति कृतज्ञभाव जपला पाहिजे. खर्या विधात्याला सोडून जे इत्तरांना त्या मार्गावरून भरकटवतात व नको त्याच ढोंगाच्या मागे लागतात. त्यांबाबतीत कबीर म्हणतात , वेस्येच्या लेकानं खर्या बापाला विसरावं. तशी त्यांची गत झालेली असते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• तुमच्याजवळ जे आहे ते इतराजवळ नाही किंवा इतरांजवळ जे आहे ते तुमच्याजवळ नाही. असे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेलही आपल्या जीवनात असं का बरं होतं आणि त्याबाबतीत नसल्याचीही मनाला खंत वाटते. खंत वाटून घ्यायचेही कारण नाही. पहिल्यांदा तुम्ही थोडा विचार करा असे जर सगळ्यांना सारखेच मिळाले असते तर आपण काहीच प्रयत्नही केले नसते. इतरांच्यासोबतही आपण तुलना करु नये. ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि ज्याला आपण कधी कधी नशिब म्हणतो कदाचित नशिबाचाही भाग असू शकते. पण एक लक्षात असू द्यावे पहिल्यांदा आपण इतरांची बरोबरी करु नये आणि जर करायचीच असेल तर आपण आपल्या कामात आणि प्रयत्नात कसूर करायची नाही. इतर जर पुढे जात असतील तर आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आपणही आपल्या प्रयत्नाने कसल्याही प्रकारचे मन खचून जाऊ न देता समोरच्या परिस्थितीला सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा संकल्प करायचा. अशा कृतीमुळे आपलेही जीवन इतरांपेक्षा सुखी व समाधानी होऊ शकेल. इतरांबरोबर स्पर्धा करायची काही गरज नाही किंवा इतरांसोबत तुलनाही करायची गरज नाही. आपल्यालाही आपल्या कर्माने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यामुळे आपणही आपल्या जीवनात खूप पुढे जाऊ शकतो हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता* पांडुरंग *' मनाची एकाग्रता कशी करावी '* या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ? '' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग? मनाची एकाग्रता साधून जे कार्य केले जाते ते सर्वोत्तम असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment