✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/07/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८७३ - मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला. १९५१ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली १९६९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले. 💥 जन्म :- १९२५ - गुरू दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक. १९३८ - संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- २००५-डॉ रफिक झकारिया, महाराष्ट्राचे माजी नगरविकास मंत्री आणि लोकसभा सदस्य *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटली. फक्त 253 वाहनांची आवक. शनिवारच्या तुलनेत 50 % आवक घटली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - येत्या 24 तासांत मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर ५,४00 कोटींचा खर्च* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - आज रिक्षाचालकांच्या होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट चालवणार अतिरिक्त बस, बेस्ट प्रशासनाची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कन्येच्या विवाहावरील अनावश्यक खर्च टाळत राज्याचे माजी मुख्य सचिव तथा लोकपाल सदस्य दिनेश कुमार जैन यांनी मुख्यमंत्री मदत निधीला दिली पाच लाखांची रक्कम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : विलेपार्लेच्या सिया देवरुखकर हिने नुकत्याच राजकोट येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रीय स्तरावरील सियाचे हे पहिले पदक ठरले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आय सी सी विश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज होणाऱ्या सामन्यावर पावसाचे सावट आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - रेल्वेतील शाळा* https://storymirror.com/read/story/marathi/n96hoqhe/relvetiil-shaalaa/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो ?* 📙 'जीवेत शरद: शतम्' असा आशीर्वाद किंवा शुभेच्छा कोणालाही दिल्या जातात. माणसाचं आयुष्य शंभर वर्षांचं आहे अशी जी एक सर्वसाधारण समजूत आहे त्याचीच ही परिणती आहे; पण माणूस जास्तीत जास्त शंभर वर्षे जगू शकतो या समजुतीला कोणता आधार आहे ? कारण आजही शंभरी गाठलेल्या व्यक्तींची संख्या पूर्वीपेक्षा जास्त असली तरी एकूण लोकसंख्येच्या मानाने नगण्यच आहे. म्हणून तर शंभरी ओलांडलेल्या आलेल्या व्यक्तीकडे नवलाईने पाहिलं जातं. तेव्हा खरा प्रश्न हा आहे की माणसाचं सरासरी आयुर्मान किती आहे ? त्याला काही नैसर्गिक मर्यादा आहेत की नाही ? इतिहास पाहिला तर याचं उत्तर दे़ सोपं होत नाही. कारण माणसाचं सरासरी आयुर्मान वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या भौगोलिक स्थानी वेगवेगळं राहिलं आहे. अश्मयुगात ते जेमतेम २५ ते ३० वर्षांचं होतं. ब्राँझयुगात तर ते अठरापर्यंत घसरलं होतं. पण त्याच युगात स्वीडनसारख्या ठिकाणी ते त्याहून दुप्पट ते तिप्पट होतं. सिकंदर वयाच्या बत्तिसाव्या वर्षी निधन पावल्याचं इतिहास सांगतो; आणि आपण त्याला अल्पवयातच मृत्यू आल्याचं निदान करतो. पण ग्रीक संस्कृतीत काय किंवा रोमन संस्कृतीत काय सरासरी आयुर्मानच तिशीपेक्षा जास्त नव्हतं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही पंचवीस ते तीस हीच सीमा त्यानं गाठली होती. आज जगातलं सरासरी आयुर्मान ७० वर्षांचं आहे. आपल्या देशातही परिस्थिती वेगळी नाही. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा म्हणजेच उण्यापुऱ्या साठ वर्षांपूर्वी देशातलं सरासरी आयुर्मान ३५ वर्षांचं होतं. आज ते ६७ झालं आहे. याचं कारणही स्पष्ट आहे. मृत्यूदरात झालेली लक्षणीय घट. ती तशी झाली कारण सार्वजनिक आरोग्यसुविधांमध्ये फार मोठा फरक पडला आहे. ज्या सांसर्गिक रोगाला माणूस बळी पडत असे त्यापैकी बहुतेक रोगांना आळा घालण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्या रोगांचा उपसर्ग होण्यास अटकाव करणाऱ्या प्रभावी लसी उपलब्ध झाल्या आहेत, तसंच लागण झाल्यानंतरही त्यावर मात करणारी शक्तिशाली औषधंही सहजगत्या मिळत आहेत. आहारात आणि त्यामुळे उपोषणातही वेगाने प्रगती झाली आहे. वाढत्या वयात मिळणाऱ्या सकस आणि पर्याप्त अन्नापायी माणूस सुदृढ बनत चालला आहे. उतारवयातही त्याचं स्वास्थ्य टिकून रहत आहे. ही जी वाढ झालेली आहे ती नैसर्गिक मर्यादा गाठण्यात ज्या काही अडचणी येत होत्या त्यांचं निराकरण झाल्यामुळे आलेली आहे. माणसाच्या जनुकीय साठय़ामध्येच त्याच्या एकंदर आयुर्मर्यादेचं इंगित दडलेलं आहे. २००९ सालचं नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या वैज्ञानिकांनी केलेले संशोधन या विषयाशीच निगडित आहे. त्यानुसार आपल्या यच्चयावत शारीरिक, शरीरक्रियाविषयक तसंच वर्तणुकीबाबतचेही गुणधर्म निर्धारित करणारी जनुकं च्या गुणसूत्रांमध्ये लपलेली असतात, त्या गुणसूत्रांच्या एका टोकाला असलेल्या टोपीमध्ये, टेलोमिअरमध्ये, आयुर्मर्यादा निश्चित करणाऱ्या जनुकांचा साठा असतो. ती जनुकं कार्यान्वित करणारं एक विकरही, टेलोमरेझ शोधुन काढलं गेलेलं आहे. तेच आयुर्मर्यादेची निश्चिती करत असतं. त्याचं कार्य नेमकं कसं चालतं याचं गुढ उकललं की मग माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो ? या प्रश्नाचं नेटकं उत्तर देणं शक्य होईल. *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वेळ आल्यावर आपल्या गरजा बदला पण आपल्या गरजेसाठी आपली माणसं बदलू नका. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'गरबा' कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?* गुजरात 2) *'पोंगल' उत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात ?* तामिळनाडू 3) *महाराष्ट्रात कुंभमेळ्याचे आयोजन कोठे केले जाते ?* नाशिक 4) *भारताचे पितामह असे कोणाला म्हटले जाते ?* दादाभाई नौरोजी 5) *भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?* सरदार पटेल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीकृष्ण राचमाळे ● पंडीत पवळे ● बालाजी अनमूलवाड बेळकोणीकर ● घनश्याम सोनवणे ● महेश जाधव ● साईनाथ विश्वब्रम्ह *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकदा पंक्चर काढणा-याकडे उभा असताना एका टायरमधली हवा फस्सकन गेली. वाटले 'मृत्यू' असाच होत असणार. मृत्यूविषयी एक ऑब्सेशन अनेकांच्या मनात खोल असते. एका मित्राला सतत एक विचित्र समस्या छळत असते. त्याच्या अंत्यदर्शनाला येणारे लोक गाड्या कुठे लावतील ? त्या दिवशी पाऊस असेल का ? आता याची काळजी मागे राहिलेले घेतील की ! अशी सत्वहीन माणसं जगण्याला काही देत नाहीत आणि घेतही नाहीत.* *दु:ख घेता येत नाही तर देऊ नये. 'सुख द्यावे आणि घ्यावे' हे सूत्र जगण्याचा 'तोल आणि ताल' संभाळते. कविराज विंदा करंदीकर यांनी कुणाकडून काय घ्यावे याची यादी दिलीय, पण.... असे घेता येते का ? काही जिंदादिल माणसे सतत देत राहतात, घेणे त्यांच्या गावी नसते. जिंदगी घोटा-घोटाने पिण्याचा 'अमृतरस' आहे. या रसाचे भोक्ते किती राहिलयं ते चुकूनही पहात नसले तरी त्यामुळे त्यांचे 'अक्षयपात्र' भरलेले राहते. तसे तुमचेही राहो, हिच आज 'अक्षयतृतीया'ची सर्वांना शुभेच्छा !* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जहाँ न जाको गुन लहै, तहाँ न ताको ठाँव । धोबी बसके क्या करे, दीगम्बर के गाँव ॥ अर्थ : जिथे आपल्याला पात्रता व योग्यतेनुसार गुण व कौशल्य दाखवण्यासाठी कार्य कर्तृत्त्व करण्यास वावच नसेल तिथे राहून काय हशील होणार आहे ? तिथे राहाणे व्यर्थच आहे. ही बाब पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात की, ज्या गावात सर्व दिगंबरच (कपडे विरहित लोक) राहातात तिथे राहून धोब्याला काय उपयोग होणार आहे ? कला ही जीवनाची सावली मानली जाते. 'कलेनेच माणसाची ओळख । एरव्ही कोण पुसतो आणिक ? तुम्ही आहात राव की रंक । आता कोणी पुसेना ।' असे राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामगीतेत म्हणतात. कलावंतानं आपली कला जीवनाचा आधार केली व कलेचा अहंकार अंगी न बाळगता तिला विनयशीलतेची जोड दिली की सर्व जग आपलंस होवून जातं. आपलं कसब व कौशल्य अशा ठिकाणी दाखवायला हवं की ते आपल्या जीवनाला स्वावलंबनाकडे नेईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात. परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्राप्त ज्ञानास आत्मसात करणे* राजा जनक राजा असूनही त्यांना राज वैभवात आसक्ती नव्हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहत. विनम्रता त्यांच्या स्वभावात होती. त्यामुळे ते आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असत. आत्मशोध घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न सुरुच असे. एकदा ते नदीकाठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्याने त्यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्या कानात ऋषींच्या बोलण्याचा आवाज गेला पण त्याने आपला जप सुरुच ठेवला. अष्टावक्रही ही गोष्ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्हणाले,’’माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’ तेव्हा अष्टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंच आवाजात म्हणणे आहे. मंत्राला घोकण्याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्मसात करणे किंवा त्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचे फळ मिळते.’’ तात्पर्य: कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment