✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/07/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विजय दिन - भारत* (कारगिल युद्धाची समाप्ती) 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९६५ - मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. ◆ २००५ - मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी. ◆ २००८-अहमदाबाद शहरात २१ बॉम्बस्फोटात ५६ मृत्युमुखी तर २०० जखमी. ◆ २०११ - मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार. 💥 *जन्म* ◆१८८५-मुग्धा गोडसे,अभिनेत्री व मॉडेल. ◆ १९२७ - जी.एस. रामचंद, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९४३ - मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक. ◆ १९४९ - थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान. 💥 *मृत्यू* ◆ १८६७ - ओट्टो, ग्रीसचा राजा. ◆ १९५२ - एव्हा पेरोन, आर्जेन्टिनाची गायिका. ◆ २००९ - भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : काश्मीरच्या कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावताना पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या युद्धाला आज २० वर्षे पूर्ण होत असून, त्याच्या आदल्याच दिवशी पुन्हा ‘कारगिल’सारखी घुसखोरी करण्याची हिम्मत करू नका असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकला ठणकावले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत तिसऱ्यांदा मंजूर; काँग्रेसचा सभात्याग, तिहेरी तलाक विधेयकाच्या बाजूनं ३०३ मतं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात काल ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा मारा सुरूच होता. कुलाबा येथे ५२.२ तर सांताक्रुझ येथे ३८.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, आज कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला असून, मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *औरंगाबादमधील सुमारे २ हजार उद्योगांवर मंदीचे संकट, जीएसटीचा फटका, दुष्काळाची छाया : लाखांहून अधिक कामगार, कर्मचाऱ्यांवर गंडांतराची भीती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *किन्हवली : शहापूर तालुक्यातील दुर्गम गाव असलेल्या वाऱ्याचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रमोद आणि शर्मिला पाटोळे यांनी स्वखर्चाने एका वर्गात बसवल्या दोन एसी.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *विद्यार्थी निवडणुकांच्या खर्चाचा भार पडणार महाविद्यालयांवर ? नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार तब्बल २५ वर्षांनंतर विद्यापीठ व महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका घेतल्या जाणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *हैदराबाद : अखेरच्या चार मिनिटांमध्ये भक्कम बचाव करतानाच निर्णायक चढाया करत दबंग दिल्लीने गमावलेल्या सामन्यात पुनरागमन करत तामिळ थलाइवासचा प्रो कबड्डी लीगमध्ये अवघ्या एका गुणाने ३०-२९ असा केला थरारक पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - भूक* https://storymirror.com/read/story/marathi/yk8b6w78/bhuuk/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *रक्तदान कोण करू शकत नाही ?* 📙 रक्तदान हे श्रेष्ठदान आहे यात शंकाच नाही. त्यामुळे रक्तदान करणाऱ्या कोणाचंही कौतुक करायला हवं. पण आपण एखादं दान देतो ते तेव्हा ते सत्पात्री असावं अशी खबरदारी जशी आपण घेतो तशीच ते दानही 'योग्य' आहे याचीही खातरजमा करून घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच इच्छा असली तरी काही जणांना तात्पुरत्या काळाकरता तसंच इतर काही जणांना कायमचं रक्तदान करण्यापासून रोखलं जातं. ही नकारघंटा वाजवली जाणार्यांची यादी दात्याच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी जशी बनवली जाते तशीच घेत्याच्याही आरोग्यावर लक्ष ठेवून बनवली जाते. म्हणूनच रक्तदान केल्यामुळे दात्याला कोणत्याही प्रकारच्या आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागू नये, याची काळजी घेणं आवश्यक ठरतं. त्या तत्त्वानुसारच, ज्यांच्यामध्ये सर्दी, पडसे, खोकला किंवा ताप यासारख्या कोणत्यातरी रोगजंतूचा उपसर्गाची लक्षणं दिसत आहेत त्यांना ती लक्षणं नाहीशी होईपर्यंत रक्तदान करता येत नाही. त्या रोगावर उपचारासाठी प्रतिजैविकांसारखी काही औषध दिली असतील तर त्यांचा असर नाहीसा होईपर्यंत रक्तदानाला मनाई करण्यात येते. एखाद्याला स्वतःलाच जर रक्त दिलं गेलं असेल तर त्या दानापासून एक वर्षांपर्यंत त्याला रक्तदान करता येत नाही. बाळंत झालेल्या स्त्रीला पुढचे सहा आठवडे रक्त देता येत नाही. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, ज्या स्त्रीला पाळी आलेली आहे, ज्या व्यक्तीने पुरुष अथवा स्त्री वेश्येशी समागम केला आहे, जिचा गर्भपात झाला आहे, अशांनाही काही काळापुरतं रक्तदानावरच्या बंदीला सामोरं जावं लागतं. पण ही झाली तात्पुरती बंदी. बंदीचा काळ उलटून गेल्यावर त्यांना रक्तदान करता येतं; पण काही व्यक्तींना तर रक्तदानापासून कायमचं दूर ठेवण्यात येतं. यात ज्यांनी रक्तवाहिनीवाटे नशील्या पदार्थांचं सेवन केलं आहे अशांचा समावेश होतो. मग ते त्यांनी एकदाच का केलेलं असेना. तसंच ज्यांना एड्सला कारक असलेल्या एचआयव्ही या विषाणूंची बाधा झालेली आहे, अशांचंही रक्त घेतलं जात नाही. हिमोफेलिया, थॅलेसेमियासारख्या रक्ताच्याच रोगांची लागण ज्यांना झालेली आहे अशांनाही रक्तदान करता येत नाही. वयाच्या अकराव्या वर्षांनंतर ज्यांना विशिष्ट प्रकारची कावीळ झालेली आहे, कर्करोग किंवा मल्टिपल स्क्लेरॉसिस या रोगांनी ग्रासले आहे, अशांनाही रक्तदान करण्यापासून परावृत्त केलं जातं. वेश्याव्यवसाय करणाऱ्या कोणालाही मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष रक्तदान करता येत नाही. ज्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे किंवा तो येऊ नये यासाठी ज्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशांनाही रक्तदान करता येत नाही. तीच बाब पक्षाघाताचा झटका येऊन गेलेल्यांनाही लागू होते. ही बंदी दात्यापेक्षा हे रक्त ज्याला दिलं जाण्याची शक्यता आहे अशा व्यक्तीच्या आरोग्याच्या काळजीतून घेतली जाते. कारण त्या व्यक्तीवर हे दान घेतल्यानंतर अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. 'भीक नको पण कुत्रा आवर' अशी त्यांची परिस्थिती होऊन जाते. ही एवढी लांबलचक यादी असली तरी रक्तदानास पात्र असतात अशांची यादी याच्या कितीतरी पटींनी मोठी आहे. म्हणून रक्तपेढ्यांमध्ये सहसा रक्ताचा तुटवडा नसतो. *बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. नात्यामध्ये आणि मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *विद्युत बल्बमध्ये भरला जाणारा वायू कोणता ?* नायट्रोजन 2) *इंद्र धनुष्यात किती रंग असतात ?* 7 3) *वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता ?* 22 डिसेंबर 4) *भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण ?* दादासाहेब फाळके 5) *पहिला भारतीय चित्रपट ( मुकपट ) कोणता ?* राजा हरिश्चंद्र (1913) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● वैभव पाटील भोसले ● रमेश मस्के ● उदयकुमार केंद्रे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डाॅ. राधाकृष्णन् यांनी आपल्या बोलण्यातून जगभर ख-या आणि शाश्वत धर्माची मूल्ये सांगितली. या निमित्ताने ते बोलत राहिले आणि सरोवरात कमलपुष्पे फुलत जावीत तसे त्यांचे बोलणे फुलत गेले. सत्ताधीशांचे स्तुतीपाठक खूप असतात. पण राजा तू चुकतो आहेस, असे बोलण्याची धमक असणारे क्वचित असतात. इष्ट असेल ते बोलणार, शक्य असेल ते करणार, असे म्हणणा-या गोपाळ गणेश आगरकरांना केवळ ३९ वर्षांचे आयुष्य लाभले. दारिद्र्य, दमा यांच्याशी झुंज देत धिक्कार व अपमान सोसूनही त्यांनी प्रबोधनाचा ध्यास घेतला आणि त्यासाठी काम केले.* *ज्ञानी माणसाने जगाला मार्ग दाखवावा. आपण वेगळे आहोत असे वागू नये. आपले अलौकिकत्व लोकांसाठी असावे. असा मार्ग दाखिवण्याचे काम जसे संतांच्या लेखनातून होते, वर्तनातून होते तसे बोलण्यातूनही होते. मूर्ख व कृतिहीनांचा वाचाळपणा आणि शहाण्या व कर्मवीरांचे मौन समाजाला घातक असते. रामदासांनी मूर्खांची लक्षणे सांगितली आहेत. त्यामध्ये 'दुर्जनांचेनि बोलणारा, मर्यादा सांडून चालणारा' त्याचप्रमाणे 'आदरेविण बोलणारा, न पुसता साक्ष देणारा' मूर्ख म्हटला आहे. तर उत्तम लक्षणांमध्ये 'विचारेविण बोलो नये, विवंचणेविण चालो नये' हेही सांगितले आहे. आपल्याला आयुष्यात गोडी निर्माण करायची असेल तर आपले बोलणे मधुर हवे. त्यासाठी आपले अंतरंग मधुर हवे. मग सर्वच मधुर होऊन जाईल.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल -9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पत्ता बोला वृक्ष से , सुनो वृक्ष बनराय | अब के बिछड़े न मिले , दूर पड़ेंगे जाय || अर्थ : संघटनेचं विघटन झालं की उभारी घेणं अवघडच असतं. हे पटवून देताना महात्मा कबीरांनी निसर्गातला किती समर्पक दृष्टांत दिलेला आहे. पान झाडाला म्हणतं, ' हे तरूवर वृक्षराज तुम्ही ऐका तर खरं ! आज तुम्ही भक्कमपणे उभे आहात. या तुमच्या भक्कम पणासाठी आम्ही लक्षावधी पानांनी स्वतःला ऊन्हात सूर्यासोबत टक्कर देत त्याला न घाबरता अंगावर घेतलं. ऊन्हात राबून स्वतःचं नाजूकपण तुझ्या संगोपणात साकारण्यात विसरूनच गेलो. अन राठ होवून पिकत गेलो. आम्ही जुन्या दमाची परंतु अनुभवी तुझ्या स्वछंद बागडण्याला मुरड घालून ताळ्यावर आणू पाहाणारी तुला नकोशे वाटतोय. नव्या दमाची फौज तुला हवी. तिला जशी फुस दिली तशी ती उधळते. भूत भविष्याचा विचार न करता वर्तमानाच्या क्षणिक फसव्या मोहात पाडून तू त्या नव्या नाजूक पात्यांना फसवून स्वतःच वैभव आभाळी मिरवू पाहात आहेस. तुझे पाय त्या वटवृक्षावाणी मजबुतीनं कुठं घट्ट रोवलेले आहेत ? त्याच्या सोबतीला जुने नवे असे पानाचे अक्षौहिनी सैन्य खोडाआधी भक्कमपणे ऊन, वारा थंडीशी टकरायला तयार आहे. म्हणून तर वडाचं राज्य दीर्घकाल चालतं. तो आधार असणार्या पान अन मातीची नाळ वड तुटू देत नाही. तू मात्र "विद्या आली हाता अन गुरूला लाथा" असं वागून नवीन पिढी बिघडवत आहेस. ती पिढी बायका पोरं झाली की मायबापा पासून दुरावून स्वतःचा अधःपात करून ऊर फोडून घेत आहेत. तुला वैभव उंच आभाळी नेल्यासारखं वाटत असलं तरी वादळं वावटळी मध्ये सर्वात आधी ताडमाड उंचीची दिखाऊपणा करणारी भक्कम आधार नसलेलीच झाडंच आधी आडवी होतात. दुरावलेलं गळालेलं पान पुन्हा आधाराला कधीच जवळ येत नाही. ते नव निर्माणासाठी मातीशीच एकरूप होवून जातं ! सोबत्यांना (जनतेला) मारून नव्हे तर सोबत घेवून मोठं होता येतं. हे झाडांनी विसरता कामा नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा एकाच बिंदूतून कितीतरी रेषा काढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत तरीही त्या एकमेकांना एकाच बिंदूत छेदून पुढे सरळ मार्गाने निघून जातात आणि त्याच रेषा परत एकाच बिंदूत एकत्रीत येऊन मिळतानाही पाहिले आहे.असा जर आपण विचार केला तर आपले हृदय आणि मनही एकच आहे.आपणच आपल्या हृदयातून आणि मनातून अनेक माणसांना जोडण्याचे काम करत असतो.त्यात काहींना काही कारणाने जवळ करतो तर काही माणसे आपल्यापासूनच जवळ येऊन दूर जातात.जे दूर जातात त्यांचा विचार करु नका,कारण त्यांना स्वातंत्र्य आहे.परंतु जी माणसे तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांना दूर करु नका कारण त्यांना तुमचे मन आणि हृदय कळलेले असते.तुम्ही त्यांचे केंद्रस्थानी आणि बिंदूस्थानी आहात.तुम्हीच त्यांचे आधारही आहात आणि त्यांची प्रेरणाही.सा-यांना जवळ करण्याचे बिंदूसारखेच काम करायला शिकले पाहिजे तरच जीवन समृद्ध होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०./८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या माणसाकडून मिळालेले दुःख* एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो." *तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment