✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/06/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- • १९६६ - शिव सेना या राजकीय पक्षाची स्थापना झाली. • १९७८ - गारफील्ड या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण. • १९९९- "मैत्रेयी एक्सप्रेस" या नावाने कोलकाता ते ढाका बस सेवेचे अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन 💥 जन्म :- • १९४५ - ऑँग सान सू की, म्यानमारची राजकारणी. • १९४७ - सलमान रश्दी, ब्रिटीश लेखक. • १९७० - खासदार राहुल गांधी 💥 मृत्यू :- • १८६७ - मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिकोचा सम्राट (जन्म-१८३२), मृत्यूदंड. • १९०२ - आल्बर्ट, सॅक्सनीचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - लोकसभा सभापतीपदासाठी एनडीएकडून भाजपाचे कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांना उमेदवारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - अकरावीच्या प्रवेशासाठी तुकड्यांमध्ये वाढ करणार, शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सोलापूर : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत न येऊ देता गेटला कुलुप लावून मज्जाव करणाऱ्या तिघांविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दुचाकीस्वारांना पुणे पोलिसांनी केलेल्या हेल्मेट सक्तीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्थगिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथून आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, शेकडो दिंड्यांचा सहभाग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प राज्य विधिमंडळात अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले सादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसी क्रिकेट विश्वचषक - इंग्लंडचा अफगाणिस्तानवर १५० धावांनी विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - संघर्ष* https://storymirror.com/read/story/marathi/k5sul23x/snghrss/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्यावे ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आयोडीनयुक्त मीठ म्हणजे काय ?* 📙 घरातील मिठाची पिशवी पाहा. त्यावर मोठया अक्षरात 'आयोडिनयुक्त मीठ' असे लिहिलेले दिसेल. मिठात आयोडिन का मिसळतात, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ! आयोडिन खूप अल्प प्रमाणात जरी शरीरास आवश्यक असते, परंतु तरी आयोडिन शरीराच्या वाढीसाठी फार आवश्यक असते. थायरॉईड ग्रंथींमध्ये या आयोडीनपासुन थायरॉक्सिन नावाचा अंत:स्राव तयार केला जातो. या स्रावावर शरीराची वाढ व चयापचयाच्या अनेक क्रिया अवलंबून असतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते. त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे गर्भातील अर्भक व लहान मुलांच्या वाढीवर, बुद्धिमत्तेवर याचा विपरीत परिणाम होतो व ती मतीमंद व मूकबधिर होतात. मोठ्या माणसांत लठ्ठपणा येतो. हालचाली मंदावतात. बौद्धिक क्षमता कमी होते. वाढ खुंटते. स्त्रियांमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढते. आयोडिन मुख्यत: समुद्री मासे, मीठ व काॅड माशाच्या यकृताचे तेल इत्यादीपासून मिळते. कमी प्रमाणात दूध, मांस, पालेभाज्या व तृणधान्यातही ते काही प्रमाणात सापडते. पिण्याच्या पाण्यातही थोड्या प्रमाणात आयोडीन सापडते. जमिनीमध्ये आयोडिनचे प्रमाण जेथे कमी असेल त्या भौगोलिक प्रदेशात आयोडीनच्या कमतरतेमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात या व्याधीला बळी पडावे लागते. त्यामुळे आयोडिनचा अभाव टाळण्यासाठी आयोडीनचा पुरवठा करणे आवश्यक ठरते. आयोडीनचा पुरवठा करण्यासाठी मीठ व खाद्यतेल यांचा वापर करता येतो. मिठाचा जेवणात समावेश गरीब श्रीमंत असे सर्वच लोक करत असल्याने मिठात टाकल्याने सर्व देशातील या समस्येचा नायनाट करता येईल. त्यामुळे मिठात आयोडिन १ किलोला १५ ते ३० मिलीग्रॅम या प्रमाणात आयोडिन मिसळले जाते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••• जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जायचं नाही. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* *मुख्याध्यापिका प्रा.शा. पिठ्ठी ता पाटोदा* 📱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचे राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण ?* बकीमचंद्र चॅटर्जी 2) *एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?* अनंत 3) *भारताची राजमुद्रा कोठून घेण्यात आली ?* सारनाथ येथील अशोकस्तंभावरून 4) *भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?* थरचे वाळवंट (राजस्थान) 5) *'राष्ट्रपिता' असे कोणाला आदराने संबोधले जाते ?* महात्मा गांधी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुभाष दरबस्तेवार ● खुशाल बोकडे ● भारत सोनवणे ● प्रताप भिसे ● नागेश कोसकेवार ● नारायण शिंगारे ● शंकर बेल्लूरवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनुष्य समाजशील प्राणी आहे. त्यामुळे समाजविकासाच्या दृष्टीने त्याच्याकडे जे काही गुण आवश्यक आहेत, त्यापैकी 'चारित्र्याचा' क्रमांक सर्वात वरचा लागतो. सामाजिक शांतता व प्रगती यामध्ये व्यक्तिचे चारित्र्य महत्वपूर्ण योगदान देते. चारित्र्याच्या अभावामुळे दुर्गुणांचे प्राबल्य वाढून सामाजिक अशांतता निर्माण होते तर सद्गुणांमुळे व्यक्ती व समाजाचे चारित्र्य सदृढ होते. कटु प्रवचनकार जैनमुनी तरूण सागर यांना, देशाचे संरक्षण प्रामाणिकपणे करणारा सैनिक व सामाजिक समतेसाठी झटणारा संत हे उत्तम चारित्र्याचे आदर्श नमुने वाटत.* *संत व सैनिक दोघांच्या चारित्र्य सामर्थ्यांचे महत्व सांगताना मुनी म्हणत,'संत आणि सैनिकाला झोपू देऊ नका. ते दोघे झोपल्यावर समाज आणि देशाचे भाग्य झोपी जाते. पापी माणूस आणि भ्रष्ट नेते यांना जागे होऊ देऊ नका. कारण ते जागे झाले तर देश आणि समाजातील शांतता, सुख चिरडले जाईल. ज्या देशातील संत आणि शिपाई जागे असतात, तो देश कधीही नष्ट होत नाही. जागरूक संत आणि प्रामाणिक शिपाई देशात शांतता आणि सुख निर्माण करू शकतात. आपल्या अवतीभवती असणा-या व्यक्तींच्या गरजा भागविण्याचे सामर्थ्य आपल्यात असावे. आपल्यावर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासाला सदैव पात्र राहण्याचे बळ आपल्याला मिळावे, अशी चारित्र्यसंपन्न व्यक्ती विश्वनियंत्याकडे प्रार्थना करताना दिसते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *संजय नलावडे, चांदीवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *महात्मा फुले यांची अखंड* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• निर्मीकाने जर एक पृथ्वी केली || वाही भार भली || सर्वत्रांचा ||१|| तृणवृक्षभार फाळी आम्हासाठी || फळे ती गोमटी || छायेसह ||२|| सुखसोईसाठी गरगर फेरे || रात्रंदीन सारे || तीच करी ||३|| मानवांचे धर्म एक नसावे अनेक || निर्मीक तो एक || जोती म्हणे ||४| *संकलन : एकनाथ डुमणे, मुखेड* 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे काट्यातून गुलाबाला फुलण्यासाठी काट्याशी टक्कर द्यावीच लागते तेव्हा कुठे गुलाबाला इतरांना आनंदी पाहता येते.जर इतरांना आनंद द्यायचा असेल तर आपले दुःख त्यांच्यासमोर मांडून चालणार नाही.जर मांडलेत तर त्यांना आनंदाने आपण पाहू शकणार नाही.उलट त्यांच्या आनंदावर विरजण टाकल्यासारखे होईल.इतरांना सुखात आणि आनंदात पहावयाचे असेल तर आपल्याला होत असलेले दु:ख बाजूला सारून त्यांना होणा-या दु:खावर फुंकर घालून सुखाचे काही क्षण देऊ शकतो आणि एवढी तयारी जर आपण ठेवली तर इतरांना जसा आनंद देता येईल त्या आनंदाबरोबरच आपल्या जीवनात आनंद लुटता येईल.नाही तर त्यांच्या डोक्यावर दु:खाचे ढग जसे दाटलेले पहायला मिळतील तसेच आपल्याही डोक्यावर दु:खाणे ढग अधिक गर्दी करुन राहतील.मग आपल्या सुखी जीवनाचे कोणतेही इप्सित साध्य होणार नाही.इतरांना दु:ख देण्यापेक्षा,मन दुखवण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसे फुलवता येईल याचा प्रयत्न करायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मैत्रीच्या मर्यादा* एका गावाच्या एका पेठेत एक कोळसेवाला राहात होता. जवळच एक धोबी राहावयास आला. त्या दोघांची चांगली ओळख झाली. कोळसेवाल्याला वाटले, 'धोबी फार चांगला मनुष्य आहे. आपल्या अर्ध्या घरात तो राहीला तर सोबत होईल नि हळुहळू परस्परांची मैत्रीही वाढत जाईल.' एक दिवस कोळसेवाल्याने धोब्याला आपल्या मनातील विचार बोलून दाखविले. कोळसेवाला पुढे म्हणाला, 'या महागाईच्या दिवसांत आपल्या खर्चात तेवढीच बचत होईल. शिवाय एकमेकांना सोबतही होईल!' 'फार फार आभारी आहे. तुम्ही खरोखरच फार चांगले आहात!' धोबी त्याला नम्रपणे म्हणाला. 'बाकी सर्व ठीक आहे हो, पण तुमचं आमचं एकत्र राहाणं जमायचं नाही. कारण मी जीवाचा आटापीटा करून जे जे स्वच्छ करीत जाईन, ते ते एका क्षणांत काळंकुट्टं होईल, तुमच्या शेजारानं! माफ करा!!' तात्पर्य - चांगल्या हेतूने होणा-या मैत्रीलाही परिस्थितीच्या नैसर्गिक मर्यादा असतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment