*शब्दपिसारा*
(दि.२४-०६-२०१९)
शब्दांच्या गाभाऱ्यातुन
काव्य असे स्फुरावे जणू
मनातील मोरपिसे
शब्दांंनी बहरावे
हृदयाच्या कपारीतून शब्द
हा उमटवावा जणू
शब्दांचा गर्भातून काव्य
हा उजळावा
सप्तरंगी या जीवनी
काव्य असे फुलते जणू
अंतरंगातील अंतर्भावच
स्पर्शूनी खुलते
शब्दाचा पाझर जीवनी
असा फुलवावा
जणू शब्दाचा जीवनात
सागर व्हावा
दाही दिशांनी स्वर
शब्दांचे घुमतात जणू
दिशाहीन या जीवनास
मार्ग दाखवतात
मनी शुद्ध शब्दांचे पावित्र्य
निर्मळ ते जपतात
ओवूनी शब्दांची माळ
काव्यात जणू दरवळतात.
〰〰〰〰〰〰〰
✍ प्रमिलाताई सेनकुडे
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment