✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/06/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकष्ट चतुर्थी* 💥 ठळक घडामोडी :- २००१ - परवेझ मुशर्रफ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- १८६९ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक १९३९ - रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९७२ - पारस म्हाम्ब्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९७ - बासू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट दिग्दर्शक. १९९७ - वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर. २००८ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - एक देश एक निवडणुकीच्या मुद्यावर सल्ला देणाऱ्या विविध पक्षांच्या प्रमुखांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले आभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्षपदी भाजपा खासदार ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *बिहारमध्ये चमकी तापाचा कहर अद्यापही सुरूच असून यामुळे मृत बालकांची संख्या ११२ वर पोहोचली असून ३00 जण अद्यापही या गंभीर आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *यंदा जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटला तरी वरुणराजाने पाठ फिरवल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे, यावर्षी पाऊस लांबल्याने सोयाबीन आणि भात पीक धोक्यात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई- चर्चगेटमधील बँक ऑफ इंडिया इमारतीत आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ICC World Cup 2019 भारताचा प्रमुख फलंदाज शिखर धवनचा वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार, भुवनेश्वर कुमार बाबत संभ्रम अवस्था* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विश्वचषक स्पर्धा 2019- न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेवर 4 विकेट राखून विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - अपेक्षाभंग* https://storymirror.com/read/story/marathi/u55819bp/apekssaabhng/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ☀ *उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास काय होईल ?* ☀ ************************** थोडक्यात सांगायचं तर, ते डोळे कायमचे मिटतील. कारण सूर्यकिरणांची तीव्रता इतकी असते, की त्यापायी डोळ्यांच्या पडद्याला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. त्यांची तशी कारणंही आहेत. सामान्यत: अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून दिवसाच्या तळपत्या सूर्याकडे पाहवणार नाही आशीच योजना निसर्गानं करून ठेवली आहे. त्यापायी सूर्याकडे नजर वळवली की त्याचं तेज डोळ्यांना सहन न होऊन ते टाळण्यासाठी डोळ्यातली बाहुली कमालीची आकुंचन पावते. ते करण्यासाठी डोळ्यांभोवती स्नायूंना कमाल क्षमतेबाहेर काम करावं लागतं. सहाजिकच त्याचा ताण पडून स्नायु दुखू लागतात. ती वेदना सहन न झाल्यामुळेच मग नजर आपोआप सूर्यापासून दूर वळते. पण सूर्यग्रहणाच्या वेळेस चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य काजळल्यासारखा दिसतो. सहाजिकच त्याच्या किरणांची तीव्रता कमी झाल्याची भावना होते. पण ही चुकीची कल्पना असते. साधारणपणे सूर्यकिरणांमध्ये जंबुपार विकीरणांपासून ते रेडिओलहरीपर्यंतची प्रारणं अस्तित्वात असतात. यापैकी जंबुपार किरणं जास्त धोकादायक असतात. शिवाय डोळ्यातील भिंग या किरणांचं डोळ्याच्या पडद्याच्या पेशींवर केंद्रीकरण करतं. या पेशी दोन प्रकारच्या असतात. दंडपेशी आणि शंकूपेशी. यांच्यावर प्रकाश पडताच तो शोषला जातो व विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होऊन एक विद्युतरासायनिक संदेश मेंदूकडे पाठवला जातो. आपण एखाद्या वस्तूकडे पाहातो तेव्हा त्या वस्तूवरुन परावर्तित झालेला सूर्याचा प्रकाश या पेशींवर पडतो. तो सौम्य असतो. शिवाय या रासायनिक अभिक्रियेचा प्रभाव कायमस्वरूपी नसतो. त्यामुळं या पेशी पूर्वपदावर येतात. पण जेव्हा आपण थेट सूर्याकडे पाहतो तेव्हा त्या प्रखरता कितीतरी पट अधिक असते. त्यामुळे होणारी रासायनिक अभिक्रिया अपरिवर्तनीय स्वरूपाची ठरून पेशी कायमच्या निकामी होण्याची शक्यता असते. जेव्हा आपण एखाद्या भिंगातून सूर्यकिरण कागदावर केंद्रीत करतो तेव्हा काही वेळाने तो कागद जळू लागतो. आपल्या डोळ्यातल्या भिंगातून केंद्रीकरण झालेले सूर्याचे प्रखर किरणही अशाच तर्हेने या पडद्याच्या पेशी जाळून टाकू शकतात. त्यामुळे पडद्याचा तेवढा भाग जळून जातो. असे अनेक ठिपके पडद्यावर जमा झाल्यास संपूर्ण पडदाही जळून जाऊन कायमस्वरूपाचं आंधळेपण येऊ शकतं. खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्याची लहानशी कोर जरी दिसत राहिली, तरी तिची प्रखरताही अशा प्रकारचं अंशिक किंवा संपूर्ण आंधळेपण आणण्यास पुरेसं ठरतं. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेसही संपूर्ण खग्रास अवस्था काही सेकंद किंवा मिनिटंच राहते. त्या वेळी कदाचित सूर्याकडे पाहणे शक्य होतं. पण या खग्रास अवस्थेच्या अलीकडच्या पलीकडच्या स्थितीतली सूर्यकोरही दाहक ठरू शकते. म्हणूनच कोणत्याही सूर्यग्रहणाच्या वेळेस डोळ्यांवर काळ्या काचेचं किंवा खास चष्म्याचं संरक्षण असल्याशिवाय सूर्याकडे पाहणे अतिशय धोकादायक असतं. *बाळ फोंडके यांचा 'काय ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महात्मा गांधी यांना 'महात्मा' ही उपाधी कोणी दिली ?* रविंद्रनाथ टागोर 2) *'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?* 2 ऑक्टोबर 3) *महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता ?* न्हावाशेवा पळस्पे - 27 Km 4) *महाराष्ट्रातील एकूण तालुके किती ?* 353 5) *महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद किती ?* 33 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● गणेश अंगरोड ● लक्ष्मण तुरेराव ● शंकर कदम ● रमेश मुनेश्वर ● महेश कुडलीकर ● बालाजी गाडे ● विनोद गुम्मलवार ● गंगाधर गट्टूवार ● लक्ष्मण चन्नावार ● मन्मथ मोकलीकर ● राजेंद्र पाटील ● धनंजय उजनकर ● संभाजी आटोळकर ● निमेश गावित ● अनिल राठोड ● रामचंद्र विश्वब्रम्ह ● गणेश दघाळे ● किरण बेंद्रे ● शादूल चौधरी ● साईराम सुरकूटवार ● दौलतराव वारले ● नितीन पवार ● अजित पिंगळे ● शिवा बोधने *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.* *थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *महात्माफुले यांची अखंड* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्राणिमात्रा सोई सुख करण्यास || निर्मी पर्जन्यास || नद्यांसह ||१|| त्यांचे सर्व पाणी वेगाने वाहती || आर्ये कुरापती || तिर्थे केली ||२|| दाढी दोई वेण्या मुढ भाररीती || भट करिताती || द्रव्यलूटा ||३|| आर्यानी कल्पीली थोतांडे ||ही सारी || दर्गे सर्वोपरी || जोती म्हणे ||४|| एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती स्वत:च्या सौंदर्याकडे कधीच पाहत नाहीत परंतु जगाचे अर्थात इतरांचे सौंदर्य कसे अधिक चांगले दिसेल यासाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रयत्न करण्यासाठी धडपडत असतात आणि त्यातच त्यांच्या सौंदर्यात अर्थात इतरांच्या सौंदर्यात समाधान मानतात.जेव्हा अशी व्यक्ती समाजात क्वचित पहायला मिळते ते इतरांचे अहोभाग्य समजावे.हे लोक स्वत:कडे आणि स्वत:च्या जीवनाकडे कधीच झुकून पाहत नाहीत.त्यांना स्वत:च्या जीवनात काही रस नसतो.रस असतो तो जगाकडे आणि जगाला सुंदर करण्याकडे.अशी व्यक्ती कधीच स्वार्थी वृत्तीची नसते.म्हणूनच इतरांच्या हृदयात सामावले जातात.उलट ज्या व्यक्ती आपले स्वत:चे सौंदर्य अधिकाधिक कसे खुलेल आणि इतरांपेक्षा आपण कसे खुलून दिसू,लोक आपल्याकडे कसे पाहतील अशी जर भावना असेल तर ती व्यक्ती स्वार्थी आणि मतलबी समजावी.अशा व्यक्तींना कुठेही स्थान मिळत नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *त्यागाचे महत्व* फार वर्षापूर्वी एक स्वाभिमानी राजा होऊन गेला. त्याचे राज्य मोठे होते आणि अपार संपत्तीने खजिना भरलेला होता. त्याचे महाल सोन्यापासून बनलेले होते. नोकरचाकरांची रेलचेल होती. मात्र त्याचे सल्लागार त्याच्या अहंकाराला प्रोत्साहन देत होते. एकदा त्याच्या दरबारात एक तेज:पुंज साधू आला. राजाला पाहूनच त्याने ओळखले की राजाला फार गर्व चढला आहे. राजाने मोठ्या तो-यात विचारले,''तुला काय पाहिजे?'' साधू म्हणाला,'' राजन, मला तुझ्याकडून काहीच नको आहे. उलट मीच तुला काहीतरी देण्यास आलो आहे.'' राजाचा अहंकार दुखावला व राजा मोठ्याने ओरडला,''लहान तोंडी मोठा घास घेतोस. लाज वाटते का नाही. तुझ्याजवळ फुटकी कवडी नाही अन तू मला काय देणार?'' साधू मंद स्मित करत म्हणाला,''राजन, त्यागाशिवाय भोगाला चव येत नाही. वैभवात जेव्हा त्याग समाविष्ट होते तेव्हा तो वंदनीय आणि प्रशंसनीय ठरतो. त्याग येताच अहंकार दूर होतो. आसक्ती दूर होते आणि मन परमात्म्याकडे पोहोचण्यासाठी तयार होते.'' फकीराच्या राजा खजील आला आणि त्याचे डोळे उघडले. त्याने गर्वाचा त्याग केला. तात्पर्य :- त्यागाने अहंकाराचा नाश होतो. अहंकार हा मनुष्याचे नुकसान करतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment