✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/06/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०१३ - भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात ३४० मिमी (१३ इंच पाउस) पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले. 💥 जन्म :- १९७३ - लियँडर पेस, भारतीय टेनिसपटू. १९८० - व्हिनस विल्यम्स, अमेरिकन टेनिसपटू. 💥 मृत्यू :- १८५८ - राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी (लढाईत). १८९५ - गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारक, विचारवंत. २००४ - इंदुमती पारीख, सामाजिक कार्यकर्त्या. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विदर्भ वगळता आजपासून शाळेला सुरुवात, पहिल्याच दिवशी मुलांना मिळणार पुस्तके, नवागताचे होणार स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे, सुरेश खाडे, डॉ. संजय कुटे, यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, राधाकृष्ण विखेंना गृहनिर्माण खात्यावर मानावे लागले समाधान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *रायगड - पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनीत आग, मोठा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *संसदेचे पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात, लोकसभेतील नेत्याविषयी काँग्रेसमध्ये अद्यापही अनिश्चितता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *World Cup 2019 मँचेस्टर - विराट कोहलीचे एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 11 हजार धावा पूर्ण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला. विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर हा सातवा विजय ठरला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *आजची कथा - मैत्रीचं झाड* * https://storymirror.com/read/story/marathi/eqz2hwpv/detail/detail?undefined कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्यावे ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राणी लक्ष्मीबाई* लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १८, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले. लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या. लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले. इ.स. १८४२मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३मध्ये गंगाधररावांचे निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• केवळ ज्ञान असून चालत नाही ते कस आणि केव्हा वापरायचं याचही ज्ञान असावं लागत. *संकलन : सौ. सुभद्रा खेडकर, बीड* *मुख्याध्यापिका प्रा.शा. पिठ्ठी ता.पाटोदा 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?* गॅलिलिओ 2) *सिग्नलचा शोध कोणी लावला ?* गॅरेट मॉर्गन 3) *प्लास्टिकचा शोध कोणी लावला ?* अलेक्झांडर पार्क्स 4) *महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?* गंगापूर ( गोदावरी नदीवर ) 5) *राष्ट्रगीत किती सेकंदात पूर्ण करणे आवश्यक असते ?* 52 सेकंद *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● आकाश रेड्डी येताळकर ● गजानन पाटील ● गणेश गुंडेवार ● आप्पा यलकटवार ● दिग्विजय चव्हाण पाटील ● लालूभाई शंकरोड ● धनंजय गुडसुरकर ● गणपत कल्हाळे ● भास्कर भेदेकर चिटमोगरेकर ● साईबाबा बनसोडे ● प्रवीण जावळे ● अक्तर शेख *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'यश' नेमकं काय? असं विचारल्यावर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. मुलांनी परीक्षेत चांगले मार्कस् मिळवणं? त्याला ‘योग्य’ तो मार्ग मिळणं, चांगली नोकरी मिळणं, भरपूर पैसे-प्रतिष्टा कमविणे? घर-गाडी मिळविणे.* *९५% मिळवून देखील आत्महत्या/नैराश्य असतेच. प्रतिष्टा-पैसा असूनही तुरुंगवास, वाद-विवाद... मग स्वतःला यशस्वी समजून देखील सुखी का नाही? असो... !* *कृष्णमूर्ती, रविंद्रनाथ टागोर याचं कधीही शाळेशी जमलं नाही. महात्मा गांधींना ३८%- ४०% गुण मिळत, तरीदेखील ही माणसं जगद्गुरू झाली. मुलं परीक्षा देऊन, गुणवत्ता दाखवून कधीच हुशार होत नाहीत किंवा यशस्वी होत नाहीत. जेव्हा शिक्षण संपतं आणि जगणं सुरु होत, तेव्हाच अनुभवाचं शिक्षण चालू होतं. worldclass होण्यासाठी अनुभवाचं शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी स्वप्रतिमा प्रबळ असावी लागते. आनंदी, समाधानी आणि जगावर प्रेम करणारी माणसंच "Worldclass Personality" म्हणून ओळखली जातात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• *संजय नलावडे, चांदीवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कबिराचे बोल.......!* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोइ एक राखै सावधां, चेतनि पहरै जागि । बस्तर बासन सूं खिसै, चोर न सकई लागि ॥ भौतिकाच्या नादे काढी जागुनिया सारी रात जे देई परमानंद त्याची सांग काय बात अर्थ : जो सर्वकाळ दक्ष व तत्पर म्हणजेच जागा असतो. त्याच्या घरी चोरी होणे. कपडे भांडी कुंडी चोरीला जाणे असा प्रकार घडत नाही. माणूस भौतिक क्षणिक बाबींना जपण्याचा किती आटापिटा करत असतो. नाशीवंत वस्तुंच्या मोहासाठी माणसाची केवढी मोठी धडपड चाललेली असते. मानसाचं जीवन व शरीरही नश्वर व क्षणभंगूर आहे. कोणत्याही क्षणी ते नष्ट होऊ शकतं. म्हणून माणसानं तत्पर असावं. सत्कर्म व सन्मार्ग सोडू नये. विकारांपासून अलिप्त राहण्यासाठी वाईट संगती, वाईट विचार व वाईट प्रवृत्तीं सोडून दिल्या पाहिजेत व सदैव दक्षता बाळगली पाहिजे. सद्गुण व सत्संगतीचा मार्ग अाचरावा लागेल - एकनाथ डुमणे, मुखेड ९०९६७१४३१७ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनातील कोणत्याही व्यवहारात दोन बाजू असतात आणि जेव्हा मनुष्य दोन्ही बाजूंचा विचार करतो तेव्हा त्याला ख-या व्यवहाराचे ज्ञान अवगत झाले आहे असे समजावे.जर एकाच बाजूने विचार करायला लागला तर कधी कधी कमी फायदा होतो तर जास्त नुकसान.नुकसान जेव्हा व्हायला लागते तेव्हा त्याला ख-या व्यवहाराचे ज्ञान अत्यल्प आहे असे समजावे.कुठेतरी त्याची बाजू कमी आहे.अशावेळी त्याच्या मनात नकाराची,नैराश्याची,परिस्थितीशी टक्कर देण्याची क्षमता अधिक वृद्धिंगत झाली आहे.त्यामुळेच वेळोवेळी अपयशाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.ह्या अशा नकारात्मक उर्जेचा त्याग करायचा असेल तर उलट विचार करायला हवे.जीवनात येणा-या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी.मन स्थिर ठेवून कृती करण्याची तयारी,ठाम विश्वास, कामात एकाग्रता आणि सातत्य ह्यावर जर अधिक भर दिला तर कोणतेही जीवनव्यवहारातले प्रश्र्न सोडवायला तत्पर व्हाल.तुमच्या मनातला नकार हा तुमच्या जीवनातला सदैव अपयशाकडे घेऊन जाणारा आहे की,त्यातून काहीच साध्य होणार नाही.त्यापेक्षा सकारात्मक बाजूने जर नेहमी जीवनात विचार करून मार्गक्रमण केले तर जीवनातले कितिही बिकट प्रश्न असले तरी सहजपणे सोडवता येतील.तेव्हा जीवनात ह्या दोन्ही बाजूने विचार करुन योग्य अयोग्य, चांगले वाईट ह्याचे ज्ञान असणे केव्हाही चांगले. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• साप आणि खेकडा एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही. एके दिवशी साप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकड्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, 'तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती ? तात्पर्य - राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment