✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/09/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ २०१३-रघुराम राजन यांनी 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' चे २३ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. ◆१९९८- स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेई ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी 'गुगल'ची स्थापना केली. 💥 जन्म :- ●१९६२-किरण मोरे,भारतीय यष्टिरक्षक. ●१९५२-ऋषी कपूर,चित्रपट अभिनेता. ●१९४१-सुशीलकुमार शिंदे,माजी केंद्रीय मंत्री. 💥 मृत्यू :- २०१३ - सुश्मिता बॅनर्जी, भारतीय लेखिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई: जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला, लवकरच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) काश्मीरमध्ये दोन रिसॉर्ट बांधण्यात येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढल्यास पक्षाला १६० जागांवर विजय मिळेल, असे भाकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पूरग्रस्त भागातील मुलींच्या विवाहासाठी मदत करणार, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोठी घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कृष्णेच्या पाण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सरकार एकत्र, लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्रच्या याचिकेला संयुक्तपणे विरोध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ * येत्या ४८ तासांत मुंबई, कोकणसह राज्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे., पाणीटंचाईग्रस्त मराठवाड्यात चांगला पाऊस झाला, नांदेडमधील धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे येथील पाण्याचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा कार्यकाळ पूर्ण, शासनातर्फे राजभवनात भावपूर्ण निरोप, राज्याचे नवे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा शपथविधी उद्या होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मिताली राजने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून घेतला संन्यास, सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला क्रिकेटर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *या बुलेटीनची audio ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.* https://sharechat.com/post/Bga1VrN ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुरक्षित प्रवास करू या* https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कावीळ म्हणजे काय ?* 📙 कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते. कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते. आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ, ओकारी, भूक मंदावणे, गुबारा धरणे, शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो. दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्हाॅसिस' असे म्हणतात. सिर्हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो. अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते. कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो. शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *A positive attitude can overcome a negative situation.* * ( सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकते. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'होमरुल लीग' ची स्थापना कोणी केली ?* डॉ अँनी बेझंट 2) *शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण आहेत ?* उद्धव ठाकरे 3) *वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत हवेतील कोणता वायू शोषून घेतात ?* कार्बन डायआक्साईड 4) *भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त कोणत्या राज्यात होते ?* अरुणाचल प्रदेश 5) *'द वाल' असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ?* राहुल द्रविड *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● मुकेश धर्मले, नांदेड ● जयेंद्र कुणे ● श्रीपाद जोशी ● संतोष पेंडकर ● सुनील अस्वले, कोल्हापूर ● संगमेश्वर नलगिरे ● सायारेड्डी सामोड ● मुकेश पाटील ● विशाल गंगुलवार ● कांचन कानतोडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"जो घाबरतो तो वाया जातो. पाण्यात पडल्यावर जो संयम ठेवत नाही, तो शेवटी गटांगळ्या खातो." 'बी' पेरलं की लगेचंच त्याचं झाड तयार होऊन त्याची फळं खायला मिळावीत, एवढा उतावीळपणा असणारी काही माणसं पाहायला मिळतात. पण असं होत नाही, उलट असं न झाल्याचं दुःखं मात्र नक्की होत असतं. म्हणून कोणत्याही कामात माणसानं संयम राखणं आवश्यक आहे. दुःखं कितीही मोठं असलं तरी 'काळ' हा त्यावर इलाज आहे. पण त्यासाठी काही वेळ जाऊ देण्याची वाट मात्र पहावी लागते. तेवढी वेळ जाऊ देण्याइतका संयम माणसाला ठेवावा लागतो. दुःखात व्यसनाच्या आहारी जाणे किंवा आत्महत्या करून घेणे, या गोष्टी माणसाच्या हातून घडतात.* *याबरोबरच कामात प्रचंड घाई करणारी माणसंसुद्धा पाहायला मिळतात. 'अति घाई, संकटात नेई' असं रस्त्यावरील फलकांवर वाचायलाही मिळते. विशाल वटवृक्षाची सुरुवात एका छोट्याशा कोंबापासून होते. जर हे "उगवलेलं कोंब मध्यातच वाळून गेलं तर ते वाया जातं. त्याप्रमाणं 'उतावीळ' माणसाची बुद्धी वाया जाणारीच समजावी. "कोंब वाळल्यावर जसं त्याचा वटवृक्ष बनणार नाही हे आपल्याला कळतं, तसं उतावीळपणा केल्यानं काम पूर्ण होणार नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* , *देरे हरी * खाटल्यावरी ,हे कधी घडलं* *नाही आणि घडणारही नाही.* *आपले कर्तृत्व हीच आपली काशी.* *संत तुकारामांनी सांगितले आहे की* *असाध्य ते साध्य करिता सायास।* *कबीर म्हणतात, ** *एकही साधे सब साधे।* *श्रीकृष्ण म्हणतात,* *कर्मन्यवाधिकारस्ये मा फलेशु* *कदाचनम।* *जनार्धन स्वामी म्हणतात* , *चला उठा कामाला लागा।* *याचा अर्थ कुणीही खाटल्यावर देणार* *नाही ,आणि काम व सराव * या शिवाय पर्याय नाही.* *सचिनची बॅट फिरली सर्व सुख* *त्याच्या पुढ्यात उभी ठाकली. लता* *दीदीच्या फक्त गाण्याने जगाला* *वेड लावलं,आजही त्या* *गाणं गाण्यापूर्वी रियाज* *करतात.* *बहिणाबाई फक्त दिसलं त्यात वास्तव* *शोधून बोलत गेल्या गाणी* *कविता अजरामर झाल्या.* *गाडगेबाबा फक्त गल्लीबोल आणि* *माणसांची मने साफ* *करत ,राष्ट्रसंत झाले.* *बाबा आमटेनी कुष्ठरोग्यांच्या जीवनात* *प्रकाश पेरला, जगात* *किर्ती मिळाली.* *नीलिमा मिस्रांच्या गोधड्या* *सातासमुद्रापार गेल्या,सुरेखा* *पुणेकरांनी लावणीवर प्रेम केलं आणि* *लावणीसम्राज्ञी अस नाव* *मिळवलं.* *अशी कितीतरी मोठी यादी तयार* *होईल.* *ज्यांना एखादी गोष्ट कळली व त्यावर* *त्यांनी जीवापाड मेहनत* *घेतली तर नक्की त्या क्षेत्रात आपण* *शेहनशहा झाल्याशिवाय* *राहत नाही.* *नको अजरामर पण प्रयत्न करायला* *काय हरकत आहे.* *आखिर कोशिश करने वालोकी कभी* *हार नही होती।* *अशोक लक्ष्मण कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात.असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत.भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो.जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो.विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते.ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात.आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात.केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभी माणूस* एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जावून खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, ''अरे मला वाटते की तसे तुझे काहीच गेले नाही. आपला पैसा येथेच आहे, असे समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झाले.'' तात्पर्य : लोभी माणसे पैसे असून दारिद्र्यी व अशांना पैश्यांचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ? *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment