✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/09/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१९९४ - सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले 💥 जन्म :- ◆१९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ. ◆ १९६७ - अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. ◆ १९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी. 💥 मृत्यू :- ◆२०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक. ◆ २०१५ - दत्तात्रय हेलसकर, जालना *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *बंगळुरू : भारताच्या चांद्रयान मोहिमेत अखेरच्या क्षणी संपर्क तुटलेल्या लँडर विक्रम सापडले असल्याची माहिती इस्रो प्रमुख के सिवन यांनी दिली आहे. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महाबळेश्वर ठरले देशातील सर्वांत जलमय स्थान, तब्बल 7 हजार 631 मिमी पावसाची नोंद, चेरापुंजी आणि मॉसिनरामलाही टाकले मागे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *इस्लामाबाद : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आइसलॅंड दौऱ्यावर जाण्यासाठी पाकिस्तानच्या एअरस्पेसमधून जाण्यासाठी परवानगी मागण्यात आली पण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही मागणी फेटाळली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी याबद्दल दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई: शिक्षक-शिक्षकेतर तसेच, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. यामुळे राज्यातील शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वैद्यकीय शिक्षकाना रडारवर आणण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांनाही बायोमेट्रिक हजेरी केली सक्तीची* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली - ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे निधन, दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी घेतला अखेरचा श्वास, मृत्यूसमयी ते 95 वर्षाचे होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांमधील पहिल्या कसोटी सामन्यास आजपासून प्रारंभ होत असून, सातत्यपूर्ण धावा करणाऱ्या शुभमन गिलला निवड समितीचे लक्ष वेधण्याची संधी मिळेल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीन audio स्वरूपात ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://b.sharechat.com/ID2NLkIuPZ ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!* भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत, ' प्रत्येक कामाची सुरुवात स्वच्छतेपासून करावी. ' ......... https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_25.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *क्लोरीन म्हणजे काय ?* 📙 खाण्याचे मीठ व पिण्याच्या पाण्याची शुद्धता या दोन महत्वाच्या गोष्टी क्लोरीनमुळेच शक्य झाल्या आहेत. क्लोरीन हा वायू स्वरूपात मिळवला व साठवला जातो. मात्र नैसर्गिकरित्या क्लोरीन आढळत नाही. सोडियम बरोबर त्याचे संयुग पटकन बनते. त्यालाच आपण मीठ म्हणतो. १७७४ साली शील यांनी त्याचा शोध लावला. फिकट हिरव्या रंगावरून ग्रीक भाषेतील क्लोराॅस या शब्दावरून त्याचे नाव पडले आहे. क्लोरीन हा वायू मुख्यतः पाणी शुद्ध करण्याच्या ब्लिचिंग पावडरमध्ये वापरला जातो. त्याच्यामुळे पाण्यातील जंतू मरतात व मुक्त झालेला क्लोरिन हवेत मिसळतो. अगदी सहज पूर्ण झालेल्या या प्रक्रियेमुळेच आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचे शुद्धीकरण करून गावे, शहरे, महानगरे यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करू शकतो. क्लोरिनचे अनेक औद्योगिक उपयोगही आहेत. क्लोरीनचा गैरवापर करून पहिल्या महायुद्धात शत्रूच्या सैनिकांवर त्या वायूचा मारा केला गेला होता. फुप्फुसदाहाने त्यांचा त्यात मृत्यू ओढवला. कोणत्याही जिवंत प्राण्यांसाठी क्लोरीन हा अतिशय घातक वायू आहे. मात्र संयुग स्वरूपातील त्याची उपयुक्तता वादातीत ठरावी. माणसाच्या खाण्यातील एक अत्यावश्यक घटक म्हणजे मीठ. शरीरातील सोडीयमचा साठा अनेक शरीरातील क्रियांना मदत करतो. असा हा घटक म्हणजे सोडियम व क्लोरीनचे संयुग होय. भूल देण्यासाठी कित्येक दशके वापरले गेलेले क्लोरोफार्म हे द्रव्यही क्लोरीनचेच संयुग. क्लोरिनमुळे अनेक पदार्थांचे ऑक्सिडेशन होते. त्यामुळे अनेक रंग, डाग यांचा रंगीतपणा जातो. कपड्यांना नवीन रंग देण्यापूर्वी, कपडे स्वच्छ करण्यासाठी ब्लिचिंग पद्धतीच्या प्रक्रियेत याचा वापर केला जातो. हायड्रोक्लोरिक अॅसिड मध्ये क्लोरिन असतो व विद्राव्य म्हणून त्याचा वापर अनेक उद्योगांत केला जातो. कार्बनबरोबरचे त्याचे संयुग कार्बनटेट्राक्लोराईड एक उत्तम विद्राव्य आहे. त्याचा वापर आग विझवण्यासाठी केला जातो. क्लोरीनची निर्मिती इलेक्ट्रोलायसिस पद्धतीने केली जाते. समुद्राचे पाणी किंवा पोटॅशियमबरोबरची त्याची निसर्गात सापडणारी संयुगे यांचा वापर त्यासाठी केला जातो. एका परीने या वायूचा शोध हा मानवी प्रगतीला लागलेला मोठा हातभारच आहे, यात शंका नाही. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'जागतिक साक्षरता दिवस' केव्हा साजरा केला जातो ?* 8 सप्टेंबर 2) *'जागतिक साक्षरता दिवस' कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो ?* 1966 3) *रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते ?* स्वावलंबी शिक्षण 4) *स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय ?* रामकृष्ण परमहंस 5) *गगन नारंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* शुटींग *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● गणेश कल्याणकर, नांदेड ● महेश ठाकरे ● पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर ● श्रीकांत पाटील ● उमाकांत कोटूरवार ● गंगाधर गुरलोड ● मारोती ताकलोर ● अर्षद खान ● किशन माटकर ● रमेश पेंडकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *यज्ञ, विवाह, ई. धार्मिक विधींचे वेळी अग्रपूजेचा-म्हणजे प्रथम -पूजेचा मान कोणत्या देवाला द्यावा, याबद्दल एकदा देवांमध्ये वाद सुरु झाला. प्रत्येकाला हा मान आपल्याला मिळावा असे वाटू लागले.अखेर हा तंटा ब्रम्हदेवांकडे गेला असता, ते म्हणाले, 'आपण कुणाही एका देवाला अग्रपूजेचा मान दिला, तर इतर देव नाराज होतील. तेव्हा हा निर्णय कसा घ्यावा, याचा मी एक मार्ग सुचवतो. जो देव या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात अगोदर माझ्याकडे येईल, त्याला हा अग्रपूजेचा मान बहाल केला जावा.'सर्वच देवांना हा तोडगा मान्य करावा लागला. मग प्रत्येकजण आपापल्या वाहनांवर स्वार होऊन, पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला. कुणी वाघावर, कुणी गरुडावर तर कुणी मोरावर.* *श्रीगणेशाने विचार केला 'आपलं वाहन उंदीर, एकतर त्यावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करणं अशक्य आणि दुसरं म्हणजे ते शक्य झालंच, तरी या स्पर्धेत विजयी होणं हे त्याहूनही अशक्य!' हा विचार मनात येताच त्याला एक युक्ती सुचली. त्याबरोबर तो घरी गेला व पार्वतीला म्हणाला, 'आई, तू थोडा वेळ बाबांजवळ जाऊन बसतेस का? 'पार्वती म्हणाली, 'ही रे काय थट्टा आरंभलीस? 'यावर शंकर म्हणाले,'तो सांगतोय तर येऊन बैस ना तू माझ्याजवळ. पार्वती शंकराजवळ जाऊन बसताच, गणेश त्या दोघांना सात प्रदक्षिणा घालून पुन्हा ब्रम्हदेवाकडे आला, हा स्थूलदेही गणपती पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करुन एवढ्या लवकर कसा परत आला, असा ब्रम्हदेवांना प्रश्न पडला, पण गणेशाने आपण योजलेल्या युक्तीची माहिती देताच ब्रम्हदेवांना त्यांच॔ म्हणणं मान्य करावं लागलं. सर्व देवांपुढे उभे राहून ब्रम्हदेव म्हणाले, 'आई ही पृथ्वीस्वरुप असून, वडील नारायणस्वरुप आहेत. त्यामुळे त्यांना घातलेली प्रदक्षिणा ही पृथ्वीप्रदक्षिणेपेक्षाही श्रेष्ठ आहे. महाबुध्दीवान गणेशाने त्याच्या आई-वडिलांना एकच नव्हे, तर सात प्रदक्षिणा घातल्या व तो सर्वांच्या आधी मजकडे आला; म्हणून अग्रपूजेचा अधिकारी 'श्रीगणेश' असल्याचा निर्णय मी देत आहे.'* ••●‼ *श्रीगणेशाय नम:*‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रानो,* *काल चांद्रयान मोहिमेच्या निमित्ताने भारताच्या इतिहासात पुन्हा एक* *सोनेरी मुकुट खोवतांना नियतीने घात केला.* *परंतु म्हणावेसे वाटते ,भारतमाते पुत्र* *शहाणे अमित तुला लाभले।* *तुझ्या कुशीत परि जन्मली सारी* *वेडी मुले।* *खरंय ,आजपर्यंत माझ्या देशाला* *अभिमानाने उंचीवर नेऊन* *ठेवणारे प्रत्येक क्षेत्रातील* *महामानव लाभले.* *स्वामी विवेकानंदानी भारताच्या संस्कृतीचे दर्शन जगाला घडविले.* *तसेच मा.मोदीजींनी कालचा दिवस संपूर्ण भारतीयांच्या मनात एक* *अविस्मरणीय जागा ध्रुवताऱ्या* *सारखी करून ठेवली.* *बंधू-भगिनींनो--हार-जीत तो* *बहादूरके किस्मत को दो सितारे होते* *है।* *हे 56 इंच छातीच्या माणूस* *उभा* *करणाऱ्या अवलियाने* *काल आपल्या उक्ती* *आणि कृतीतून दाखवून दिले.* *मोदींचे संपूर्ण प्रेरणादायी भाषण* *अपयशी मनाला उभारी* *देण्याचा उत्तम वस्तुपाठ आहे .* *नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, ‘‘जीवनात* *चढ उतार येतच* *असतात. प्रत्येक संघर्ष, प्रत्येक नवे* *आव्हान आपल्याला नवे काही* *शिकवून जाते. नव्या* *गोष्टींसाठी पुन्हा प्रवृत्त करते. त्यामुळे* *आपले चंद्रावर जाण्याचे* *स्वप्न आणखी प्रबळ झाले* *आहे. त्यामुळे इस्रोमधील* *शास्त्रज्ञांनी खचून जाण्याची गरज* *नाही.* *इस्रोमधील शास्त्रज्ञांच्या कामाचा* *गौरव करताना ते म्हणाले,* *मंगळावर प्रथमत: यान* *पाठवणारे आपणच आहोत.* *विविध मोहिमा यशस्वी* *करणारे आपणच आहोत.* *कधीही हार न* *मानणाऱ्या भारतीय संस्कृतीचे* *उदाहरण म्हणजे इस्रो आहे.* *तुम्ही प्रेरणेचा जिवंत सागर आहात.* *इतिहास घडवणारे आहात.* *तुमच्यात निराशेला स्थान नाही.* *वैज्ञानिक माणूस निराशेला आशेत* *परावर्तित करतो. त्यामुळे* *_शेवटच्या क्षणाच्या_* *अपयशानं तुमचं यश झाकोळून जात* *नाही. तुम्ही देशासाठी अमूल्य* *योगदान दिलंय.’’* *यातील काही अमृतथेंब ग्रहण करता* *आले तर बघा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणत्याही क्षेत्रात यश आणि प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी ठराविक कालावधी,वेळ, जिद्द,सातत्य,परिश्रम,ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य हवे असते तर याशिवाय प्रगती होत नाही.याउलट अधोगतीचे आहे.अधोगतीला कोणतीही अट नाही.कोणत्याही क्षणी माणसाच्या डोक्यात कोणतेही विध्वंसक वाईट विचार आले की,अधोगती ही क्रांतीरुपाने होते आणि त्यांचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घोडा आणि नदी* एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल". मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत." उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या.... प्रत्येकजण आपआपल्या अनुभवाने सल्ला देतात. तो सल्ला कितपत योग्य आणि बरोबर आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment