✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/09/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेद दिन* 💥 ठळक घडामोडी :- ●१९५३ - निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी. ● १९०६- बँक आफ इंडिया ची स्थापना झाली. 💥 जन्म :- ◆ १९३६ - बडी हॉली, अमेरिकन गायक, संगीतकार. ◆ १९५५ - अझहर खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ●१५५२ - गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु. ● १९५३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पुणे : एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळालेले 1300 उमेदवार पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगसमोर आंदोलनासाठी उतरले, जर तात्काळ नियुक्ती मिळाली नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *बॉलीवूड डेस्क - भारतीय चित्रपट संगीतात सात दशकांच्या अभूतपूर्व योगदानासाठी गान कोकिळा लता मंगेशकर यांना 'डॉटर ऑफ द नेशन'ची उपाधी बहाल करण्यात येणार आहे. त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवशी (28 सप्टेंबर) त्यांना हा किताब प्रदान करण्यात येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई : काँग्रेसचे नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी पत्रकाद्वारे दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *गडकिल्ले लग्न, हॉटेलिंगसाठी भाडेतत्वावर देणार नाही, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली, गडकिल्ल्यांच्या बाबतीत ही चुकीची अफवा पसरविण्यात आली, असल्याचेही ते म्हणाले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अनुसूचित जमातींच्या 13 योजना धनगर समाजाला लागू, राज्य सरकारचा शासन निर्णय जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशारामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौराही रद्द करण्यात आल्याचे नागपूर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मँचेस्टर : अॅशेस कसोटीतील इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने आपल्या कारकिर्दीतलं तिसरं दमदार द्विशतक झळकावलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्मिथच्या या खेळाचं केलं तोंडभरुन कौतुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *बुलेटीन audio मध्ये ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे* https://sharechat.com/post/6RGpy39 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागरूक पालकच खरे मालक* वास्तविक पाहता शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यासोबत त्यास शिकविणारे शिक्षक जेवढे जबाबदार आहेत त्याच्याच तुलनेत त्यांचे पालक सुद्धा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत कारणीभूत घटक आहेत. शाळेतील शिक्षक मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी विविध उपक्रम राबवत जीवाचे रान करतांना, विद्यार्थ्यांच्या घरात मात्र दूषित वातावरण असेल तर पालथ्या घागरीवर पाणी नव्हे का ? ज्या ठिकाणी शिक्षक व पालक यांच्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत संवाद घडून येतो त्याच ठिकाणी आपणाला विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि प्रगती आढळून येते....... https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_61.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संस्कारक्षम जीवन* *जीवनात संस्काराचे खूप महत्त्व आहे.* संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात व उत्तरम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. संस्काराशिवाय जीवन म्हणजे ब्रेक नसलेल्या गाडीप्रमाणे असते. आदर्श जीवनाचा पाया म्हणजे संस्कारच आहेत. संस्कारक्षमतेविना जीवन म्हणजे पाण्याविणा मासा. कारण माशाच्या अस्तित्वासाठी पाणी हवेच तसेच मनुष्याच्या या जीवनाला उत्तम आकार हे संस्कारच देऊ शकतात. संस्कार म्हणजे मनुष्याच्या अंगी असणारे सद्विचार, सद्गुण. संस्कारशिल व्यक्तीच स्वतःची व समाजाची उन्नती करू शकतो हे आपणाला पाहिला मिळते आणि हेच संस्कार व्यवहारिक जीवनाबरोबर पारमार्थिक उन्नतीदेखील करून देते. त्यामुळेच एक चांगला व्यक्ती बनण्याची सुरुवात ही प्रत्येकाची आपल्या घरापासून सुरु होते. त्यामुळे ज्याच्या अंगी संस्कारयुक्त आचार विचार असतील त्याच्याद्वारे सर्व व्यवहार नियमबद्ध चाकोरीत चालतात. प्रकृतीही आपल्या नियमाने चालते. जसे कि, दिवस-रात्र, महिने, ऋतु सर्वकाही नियमाने चालतात. हिवाळा आणि उन्हाळा पण निसर्गनियमांप्रमाणे येतात व जातात. यामुळेच जगातील सर्व व्यवहार व्यवस्थितरितीने पार पाडतात. हे सर्व जगाच्या कल्याणासाठी घडत असते. असेच संस्कारित असणाऱ्या व्यक्तीकडूनही अशाप्रकार सर्वकाही नियमावलीनेच घडते. म्हणून मानवसमाजाने देखील आपले जीवन सुखी होण्यासाठी चांगले संस्कार स्वतःमध्ये रूजविले पाहिजे. या सर्व गोष्टींची सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे घरातूनच व्हायला पाहिजे. एक चांगला मनुष्य व आदर्श नागरिक बनविण्याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?* सरदार पटेल 2) *'सामाजिक न्याय दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 26 जून 3) *'कमवा व शिका' या संकल्पनेचे जनक कोण ?* कर्मवीर भाऊराव पाटील 4) *जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?* राज्यपाल 5) *कोणत्या क्रिकेटपटूने एकदिवसीय सामन्यात तीन वेळा द्विशतक झळकविण्याचा पराक्रम केला ?* रोहित शर्मा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● प्र. श्री. जाधव ● त्र्यंबक स्वामी ● गजानन जाधव ● भारत पाटील ● सुमीत पेटेकर ● हणमंत गायकवाड ● गोविंद पटेल ● सिद्धू पुरी ● भास्कर चटलोड ● दशरथ याटलवार ● प्रवीण कुमार ● पवन धनडु *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"या जगात अनेक जातीचे प्राणी, अनेक जातीच्या वनस्पती इ. आहेत. (आंब्याची जात गोड चवीची तर कारल्याची जात कडू चवीची.) अशा अनेक जातींचे अनेक वेगवेगळे रंग आहेत. अशा अनेकविध जाती आणि त्यांच्या गुणधर्मानुसार व्यक्त होणारे रंग-ढंग एकत्र येऊन तर 'जग' हे नाव निर्माण झालं आहे." या जगात खूप काही असलं तरी हिताचं जे मोजकंच आहे, त्याला खरी किंमत आहे. 'शब्दज्ञान' किती मर्यादित असतं, याचं बोधक उदाहरण म्हणजे "उजेड काजव्यातूनही निघतो, पण तो फक्त त्याच्या पार्श्वभागापूरताच उजेड देतो, आणि तेही कायम नाही देत; तर चालू-बंद, चालू-बंद असा देतो." शब्दज्ञान हे काजव्याच्या उजेडासारखं आहे. ते देणा-याच्यासुद्धा समोर प्रकाश पाडत नाही. असा उजेड जगाला काय प्रकाश देणार? शब्दज्ञानानं समाजाचं जाऊ द्या, स्वतःचंही भलं होऊ शकत नाही.* *स्वतःसहीत समाजाचंही भलं करायचं असेल, तर कॉपी-पेस्ट बंद झालं पाहिजे. ज्ञान आता शब्दांचं नको तर अनुभवाचं असायला हवं.--* *तुका म्हणे झरा । आहे मुळचाची खरा ।।* *तुकोबा म्हणतात, "माझं ज्ञान हे काही कुठून आयात केलेलं नाही. ते कॉपी केलेलं नाही. माझ्या ज्ञानाचा जो झरा आहे, तो माझ्या अंतःकरणातून प्रकट होतो." याउलट शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान समुद्राइतकं विशाल दिसत असलं, तरी ते अनेक नद्या, नाले, झरे यांच्यावाटे आलेलं आहे. जरी विशाल असला तरी समुद्राचं पाणी तहानलेल्याची तहान भागू शकत नाही, तसं शब्दज्ञान लोकांचं भलं करू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ती अनुभवाच्या झ-याचीच.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *पहाट वारा अंगाला झोंबला,* *तसा उठून हातात पेपर पडला।* *नित्याचच हे रहाटगाडग।* *पण मस्तकात जोरात सनकी भरते ती* *बांडगुळा सारखे ,व पळकुटे पणाने* *जगणाऱ्याची.* *मध्येच भयानक चीड येते ती* *जीवनाला कंटाळून आत्महत्या* *करणाऱ्यांची.* *आणि नेमक्या ह्याच* *बातम्या फ्रंटला ,मोठया* *हेडिंगमध्ये येतात.* *लाख मोलाचे जीवन संपवतांना या* *पळकुट्याना आपण मागे काय* *टाकून जातो याची जराशीही* *भ्रांत पडत नाही.* *परिस्थिती बदलत असते,दोन हात* *करण्याची तयारी ठेवली* *पाहिजे.* *त्यांना सांगावं वाटत* *सुखदुःखाची उनसावली येते,जाते,राग* *नको.* *संकटास लीलया भिडावे, आयुष्याचा* *त्याग नको।* *बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास* *फिरुनी मिळते का?* *मनासारखे सारे काही जीवनात या* *घडते का?* *मित्रांनो, जगात आलोच ना ,मग लढा* *ना ,कधी दोन* *देत,कधी दोन घेत.* *यातून कुणाचीही सुटका झालेली* *नाही.संत तुकारामांनी सांगितले* *आहे की--आपुली आपण* *करा सोडवणं।* *🤝🏻विचार करा, आम्हीबी घडलो,तुम्हींबी* *घडा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९० 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता* एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्याने वृद्ध योद्धा सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्य' हे बिरूद लावून मिरवू. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्याने स्वत:हून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात'' तेव्हा वृद्ध गुरु म्हणाला,'' मुलांनो कोणत्याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्वाची असते. कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.'' *तात्पर्य : मनाची एकाग्रता साधल्याने बरेचशी कामे साध्य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्यास हमखास यश मिळतेच.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment