✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/09/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९७१-कतारला स्वातंत्र्य मिळाले. ◆ १९१६-अँनी बेझंट यांनी 'होमरूल लीग 'ची स्थापना केली. 💥 जन्म :- ● १९६५ - चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता. ● १९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ● १९६७ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक. ● १९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वच्छ भारत अभियान राबविल्याबद्दल बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून पुरस्कार जाहीर, त्यांना मिळणारा हा जागतिक स्तरावरील दुसरा पुरस्कार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - चंद्रयान-2 च्या ऑर्बिटरपासून लँडर विक्रम काल दुपारी सव्वा एक वाजता यशस्वीरित्या वेगळे झाले,7 सप्टेंबर 2019 रोजी विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई, पुणेसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम, घरोघरी विराजमान झाले बाप्पा, देशातील अनेक शहरांमध्ये बाप्पाच्या भव्य आणि मनमोहक मूर्त्यांची स्थापना करण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम, त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे आदींसह जवळपास 70 नेते अडचणीत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वायुसेनेत 3 सप्टेंबरला दाखल होणार 8 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर, भारत हे हेलिकॉप्टर वापरणारा 14 वा देश, 2015 मध्ये भारताने अमेरिकेच्या सरकारसोबत 22 अपाचे हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला होता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मोहम्मद शमीने वेस्ट इंडीज विरुद्ध भारत कसोटी क्रिकेटमध्ये बळींचं दीड शतक साजरं केलं. शमीने आपल्या ४२ व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎙👆🏻📡 *"शालेय संस्कार"* ..कार्यक्रमांतर्गत विशेष सदर... *_बगळ्याची गोष्ट_* खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा आणि ▶यास टच करून ऐका..👉🏻📻 http://shaleyvrutta.blogspot.com/ 🎧 वाचकस्वर: *ना. सा. येवतीकर* शिक्षक - बिलोली *.. ऐका & शेअर करा..* ________________________ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कार्बनचक्र म्हणजे काय ?* 📙 पृथ्वीवरील प्रत्येक सजीवामध्ये कार्बनचे अस्तित्व आहे. मात्र वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण अत्यल्प आहे. प्राणवायूशिवाय कोणताच सजीव जगात नाही, हे आपल्याला माहीत आहेच. हवेतील प्राणवायू कायम राखण्याचे महत्त्वाचे काम वनस्पती करत असतात. हे काम जर झाले नसते, तर वातावरणातील प्राणवायू कधीच संपला असता. रात्रंदिवस वनस्पती हे जे काम करत असतात, त्यातून कार्बनचक्र अव्याहत चालू राहते. क्लोरोफिल या हिरव्या द्रव्याचा या प्रक्रियेत महत्त्वाचा भाग असतो. बहुतांश वनस्पती क्लोरोफिलचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात. जमिनीतून मिळवलेले पाणी व अन्य अनेक रसायने यांचा यासाठी वापर होतो. मुख्यत: शर्करा तयार करताना वनस्पती सूर्यप्रकाशाचा दिवसा उपयोग करून घेतात. या क्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. ही क्रिया पुढील प्रमाणे होते - Energy + 6H2O ⬆ 6CO2 »» C6H12O6 + 6O2 ⬆ यातून ग्लुकोज तयार होऊन तिचा वनस्पती वापर करतात व हवेमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. रात्रीच्या वेळी मात्र सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने ही क्रिया घडत नाही. फक्त वनस्पतींचे श्वसन चालू राहते. त्यात प्राणवायू आत घेतला जाऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारा कार्बन प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारेच मिळवला जातो. वनस्पतींच्या फांद्या, खोड, पाने बनवण्यात कार्बनचा मोठा वाटा असतो. वनस्पतीचे आयुष्य संपल्यावर शिल्लक राहतो, तो कार्बनचाच मोठा भाग असतो. मात्र हवेतील प्राणवायूचे प्रमाण कायम राखण्यात या सार्या प्रक्रियेचा मोठा वाटा असतो. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत ?* भगत सिंह कोश्यारी 2) *'अँटीरेबीज लस' कोणी शोधून काढली ?* लुई पाश्चर 3) *ह्रदयरोपणाचे जनक कोणाला म्हटले जाते ?* ख्रिश्चन बर्नाड 4) *आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते ?* राजाराममोहन राय 5) *आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात ?* केशवसुत *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● आशिष हातोडे ● राज कुमारे ● प्रदीप पंदिलवाड ● भिमराव सोनटक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"जो घाबरतो तो वाया जातो. पाण्यात पडल्यावर जो संयम ठेवत नाही, तो शेवटी गटांगळ्या खातो." 'बी' पेरलं की लगेचंच त्याचं झाड तयार होऊन त्याची फळं खायला मिळावीत, एवढा उतावीळपणा असणारी काही माणसं पाहायला मिळतात. पण असं होत नाही, उलट असं न झाल्याचं दुःखं मात्र नक्की होत असतं. म्हणून कोणत्याही कामात माणसानं संयम राखणं आवश्यक आहे. दुःखं कितीही मोठं असलं तरी 'काळ' हा त्यावर इलाज आहे. पण त्यासाठी काही वेळ जाऊ देण्याची वाट मात्र पहावी लागते. तेवढी वेळ जाऊ देण्याइतका संयम माणसाला ठेवावा लागतो. दुःखात व्यसनाच्या आहारी जाणे किंवा आत्महत्या करून घेणे, या गोष्टी माणसाच्या हातून घडतात.* *याबरोबरच कामात प्रचंड घाई करणारी माणसंसुद्धा पाहायला मिळतात. 'अति घाई, संकटात नेई' असं रस्त्यावरील फलकांवर वाचायलाही मिळते. विशाल वटवृक्षाची सुरुवात एका छोट्याशा कोंबापासून होते. जर हे "उगवलेलं कोंब मध्यातच वाळून गेलं तर ते वाया जातं. त्याप्रमाणं 'उतावीळ' माणसाची बुद्धी वाया जाणारीच समजावी. "कोंब वाळल्यावर जसं त्याचा वटवृक्ष बनणार नाही हे आपल्याला कळतं, तसं उतावीळपणा केल्यानं काम पूर्ण होणार नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *रोज सकाळी सकाळी उठल्यावर पेपरमध्ये डोकावतो तेव्हा एक* *जोराची सनक मेंदूला चिरून जाते.* *खून,दरोडा,बलात्कार,* *अपघात,हाणामारी, विनयभंग,* *बालके आणि वृद्धावस्थेत* *जनावरासारखी रस्त्यात फेकलेली* *जिवंत* *माणसे,लुटालूट,फरारी,हल्ला,* *यापेक्षा वेगळं काही भडक ,पेपरमध्ये* *क्वचितच दिसते.* *मन अगदी सुन्न होते आणि* *पुन्हा एकदा सानेगुरुजी आणि त्यांच्या* *आईची आवर्जून आठवण* *होते.* *श्यामला आई म्हणते श्याम पायाला* *घाण लागू नये म्हणून* *जपतोस तस मनाला घाण लागू नये म्हणून जप हं।* *आजच्या भयाण बाह्य* *वातावरणात ह्या संस्काराची गरज* *पदोपदी जाणवते.बाहेर काही* *असो--आजच्या धुळवडीच्या* *दिनी प्रयत्न करूया* *की आपली मुलं, त्यांचे* *मित्र-मैत्रणीचे, शेजारील* *बालके,अवती भवतीचे मुलं, यांच्या* *वरील बाह्य विघातक शक्ती* *कशा थांबवता येतील व श्याम* *तयार करण्याचा छोटासा* *प्रयत्न आपापल्या परीने करूया।* *एक त्रिकालवादी सत्य आहे, सर्वत्र* *अंधार असतांना कुठेतरी* *छोटीशी पणती प्रकाशाची वाट दाखवतेच ना।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते. पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ? © व्यंकटेश काटकर, नांदेड ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्य निर्णय* एक कुंभार मातीची चिलम बनवित होता. चिलमचा आकार केला सुध्दा ... पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला.. मातीने विचारले, अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होती. मग का परत बदल केला? कुंभार म्हणाला, मी चिलम बनवत असताना माझी मति बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला. मातीने म्हणाली, कुंभार दादा, तुमची मति बदलल्या मुळे, माझे जीवनपण बदलले, मी चिलम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल. *तात्पर्य : जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment