✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/09/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆२००८- दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले. ◆२००३ - ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर. ● १९४८- *ऑपरेशन पोलो*- विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबाद वर चढाई केली. 💥 जन्म :- ●१९६९- शेन वार्न ,ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर ●१९८० - वीरेन रास्किन्हा, भारतीय हॉकी खेळाडू. 💥 मृत्यू :- ●२०१२- रंगनाथ मिश्रा,भारताचे २१ वे सरन्यायाधीश. ●१९२८ - श्रीधर पाठक, हिंदी कवी. ●१९७१ - केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कुलभूषण जाधवांच्या काऊन्सलर अॅक्सेससाठी भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार, पाकिस्ताननं दुसऱ्यांदा काऊन्सलर अॅक्सेसला नकार दिल्यानं भारत आक्रमक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या गणरायाला निरोप, चांद्यापासून बांद्यापर्यंत वाजत-गाजत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये विघ्नहर्त्याला निरोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला; 14 तारखेला पंतप्रधानांच्या उपस्थितीत हाती घेणार कमळ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नितीन गडकरींच्या कायद्याला भाजपशासित राज्य सरकारांकडून खो, दिवाकर रावतेंकडूनही मोटार वाहन कायद्याबद्दल पुनर्विचार करण्याचं पत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या निवडणुकांचा दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आढावा, लवकरच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, लोकेश राहुलला डच्चू तर शुभमन गिलला संधी ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मेरी कोमसह यंदा 9 महिला खेळाडूंची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यात जागतिक सुवर्णविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचं नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रक्तदान : सर्वश्रेष्ठ दान* https://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post_7.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *चक्रीवादळे का येतात ?* 📙 उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. भर दुपारी उन्हाचा कडाका अंगाची लाहीलाही करत असतो. जमीन अगदी चटके बसतील, अशी तापलेली व हवा अजिबात पडलेली. झाडाचे तर पानही हलत नाही आणि बघता बघता लांबवर कुठेतरी जमिनीवरची पडलेली पाने वाऱ्याने गोलगोल भिरभिरताना दिसू लागतात. बघता बघता तीच पाने उंचावर उचलली जातात. त्यांच्याबरोबरच धुळीचा लोटही उफाळताना, गरगरताना दिसतो. काही सेकंदातच वाऱ्याची वावटळ आपल्यालाही घेरून टाकते. हेलकावणारी झाडे, वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळमाती यांमुळे सारेच कसे भीषण वाटत असते. ही असते चक्रीवादळाची सुरुवात. चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही मैलांच्या परिसरापेक्षा कमी अथवा जास्त झाल्याने दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल फार मोठ्या वेगाने घडतात, त्यात वाऱ्याची फार मोठी ताकद सामावलेली असते. त्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब कमी होतो वाह वाढतो. तो चक्रीवादळाचा केंद्रबिंदूच असतो. दाब कमी झाल्यास तेथील हवेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वातावरणातील हवेत एक प्रकारचे भोवरे तयार होतात. याउलट दाब वाढला असल्यास त्या पट्टय़ातील हवा दाबामुळे केंद्राकडे खाली दाबली जात असते. याही क्रियेमध्ये वारे वाहणे वेगाने सुरू होते, पण त्यांची तीव्रता खूपच कमी असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. कसलाही अडथळा वाटेत नसल्याने हे वादळ स्वतःभोवती फिरत वेगाने घोंगावत इकडे तिकडे हेलकावत राहते. पण समुद्री वार्यांमुळे हलके हलके जमिनीकडे येऊ लागते. सुरुवातीला जमिनीवरचा मोठा पट्टा त्यामुळे त्याच्या तडाख्यात सापडतो, पण त्याचबरोबर त्याचा वेग हळूहळू कमी होत पसरत जातो व काही काळाने ते संपूनही जाते. समुद्रपातळीपेक्षा जमिनीची वाढलेली उंची, वाटेत येणारे अडथळे व जमिनीवरील बरेचसे स्थिर तापमान यांमुळे या चक्रीवादळांचा वेग मंदावतो. चक्रीवादळ बहुधा स्वतःबरोबर सोसाटयाचा पाऊसही आणते. खूप मोठ्या आकारमानात हे पसरलेले असल्याने (चारशे ते सहाशे किलोमीटर) या सर्व भागातील निरनिराळे ढग यात ओढले गेलेले असतात. या ढगांचे एकत्रीकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येऊन त्यापासून पाऊस पडेल, असे मोठे बाष्पकण तयार होतात. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणारे वारे, धुळीचे वातावरण व नंतरच्या पावसाचे तडाखे ही चक्रीवादळाची खासियतच म्हणायला हवी. चक्रीवादळांचा वेग जमिनीवर पोहोचल्यावर अनेकदा ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर इतका असतो. समुद्रावरील वेग मोजण्याची पद्धत नाही, पण तो कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतो. समुद्रावरील बोटी या वादळात सापडल्यास अनेकदा त्यांचे गंभीर नुकसान होण्याइतका त्यांना तडाखा बसलेला असतो. वादळाचा पट्टा ओलांडण्यास त्यांना एक ते चार दिवस लागत असल्याने तोवर राक्षसी लाटांचे तांडव असहाय्यपणे बघणे एवढेच त्यांच्या हातात असते. अनेकदा या लाटांची उंची तीस ते पस्तीस फुटांपर्यंतही असू शकते. ही वादळे सागरी अपघात व दुर्घटना यांचे एक मुख्य कारण असल्याने या वादळी टापूंची सतत माहिती घेऊन त्याप्रमाणे मार्ग आखणे, बदलणे बोटीच्या कप्तानाने कामच राहते. किनाऱ्यावर जेव्हा ही वादळे येतात, तेव्हा उंच झाडे उन्मळून पडणे, सागरी लाटा खोलवर घुसून त्यामुळे नुकसान होणे, घरांचे पत्रे उडणे या गोष्टी होतात. चक्रीवादळांची सूचना हल्ली उपग्रहांमुळे खूपच लवकर मिळू शकते. उपग्रहांमधून या सर्व वादळांचा नेमका प्रवास, हवेतील घडत जाणारे बदल यांचे फोटो मिळतात. या खेरीच एक मोठी विलक्षण पद्धत चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी गेली २० वर्षे वापरली जात आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीत लष्करी जेट विमानातून संशोधक या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडेच प्रवास सुरू करतात. थेट केंद्रबिंदूचा वेध घेऊन विमान वर न्यावयाचे व त्या दरम्यान विविध शास्त्रीय निरीक्षणे करायची, अशी ही पद्धत आहे. निष्णात वैमानिक व जिवावर उदार झालेले संशोधक यांचा चमू हे काम करतो. या प्रकारात विमान पार वेडेवाकडे होऊन दोन तीन हजार फूट लांबवर एखाद्या खेळण्याप्रमाणे भिरकावलेही गेले आहे. तरीही सुखरूप उतरल्यावर नवीन चक्रीवादळाची सूचना कधी मिळते, इकडेच या चमूचे लक्ष असते. धाडस व जिज्ञासा यांचा संगम काय करू शकतो, याचे हे एक थरारक उदाहरण आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ वाईट बातमीला पंख असतात तर शुभ बातमीला पायच नसतात. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *विधानपरिषदेच्या सभासदांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 6 वर्ष 2) *मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणती ?* औरंगाबाद, नागपूर, पणजी 3) *उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?* राष्ट्रपती 4) *राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?* पोलीस महासंचालक 5) *जिल्हा पातळीवर कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?* जिल्हा पोलीस अधीक्षक *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● योगेश वाघ ● दिपश्री वाणी ● कबीरदास गंगासागरे ● नवीन रेड्डी ● हरीश दादा बल्लाल *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कळायला लागल्यापासून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक गोष्टी कराव्या लागतात. वयाचा काही काळ त्यांना संस्कार, संस्कृती या नावाने ओळखले जाते. तर एका विशिष्ट वयानंतर त्याला 'कर्तव्य' ही संज्ञा प्राप्त होते. मग कुटुंबात, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी केले जाणारे काम हेही कर्तव्यात मोडते. 'कामात देव शोधा' हे जीवनाचे खरे तत्वज्ञान मानले पाहिजे. "कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो।" हे ज्याला कळले, तोच पुढे जातो.* *कामाशी साधली जाणारी एकरूपता, त्यातून दिसणारी तादात्म्यता हाही 'उपासना' मार्गच आहे.* *जो करी कर्म अहेतु निरंतर,* *देव तयास मिळो न मिळो रे।* *यातून कवीला जे सांगायच आहे, त्याचे चिंतन करूया. त्यासाठी 'मोहाच्या फुलबागा' दूर सारायला हव्यात. त्यासाठी मनाची अवस्था कोती असून चालणार नाही. आकाशाएवढे मन झाले, तरच नव्या पिढीसमोर आदर्श उभे राहतील. जन्मलेल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वेदनेला सामोरे जावे लागते. कुणीही त्यातून सुटत नाही. हे टाळून पुढे जाऊया, मनाचा विकास साधूया....* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *बहिणाबाई यांनी मनाचे कंगोरे* *उलगडून दाखवतांना खूप सुंदर रचना* *केली.* *त्या म्हणतात* *मन वढाय वढाय उभ्या पिकातलं* *ढोर।* *किती हाकला हाकला फिरी येत* *पिकावर।असे असले तरी* *हे मन नदीसारखे असायला आणि* *करायला काही हरकत नाही.* *नदी म्हणते ,* *🤝🏻मी कोणाची , मी सर्वांची , बंधुनिया मज नेणाराची।* *जेथे जाईल तेथे फुलवीन बाग मनोहर* *आनंदाची।* *मानवी शरीर हे अनेक जडद्रव्यांचा* *नित्य असलेला प्रवाह* *आहे. नदी सारखे प्रत्येक* *क्षणी आपण त्यात नवनवीन द्रव्य* *टाकत असतो,भरत* *असतो.तसेच ते बाहेरही टाकत* *असतो.म्हणून शरीरासारखे मनाचे ही* *कार्य चालत असते,ते काही घेते* *काही देते.नदी जसे काहीही* *मिळो त्याचा स्वीकार* *करून त्याला निर्मळ करते तसे मनाने* *करावे.वाईटाचा अंत करून* *शुद्ध अमृत सर्वांना द्यावे.* *नदीतून पाण्याचे लोट सारखे एका* *ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. पाणी क्षणाक्षणाला* *बदलत* *असते,किनाराही बदलत* *असतो,परिसरही सारखा बदलत असतो,तरीही नदी पवित्र* *राहते.परिवर्तनाच्या या मालिकेत मनाचे कार्य असे चालवता येते का ते* *बघा। जमले ना ,तर तुम्ही सुद्धा एक अलौकिक महात्मा बनू शकतात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यामध्ये कमी असलेली बाजू इतरांसमोर कधीही मांडू नका कारण हेच लोक तुमच्यातल्या कमी असलेल्या बाजूचा फायदा उचलून तुम्हाला अजून कमकुवत करायला पाहतात.त्यामुळे आपण अधिक कमकुवत बनत जातो.त्यापेक्षा आपल्यात काय कमी आहे याचा शोध घेऊन आपली कमी असलेली बाजू अधिक भक्कम कशी करता येईल यासाठी प्रयत्न करायला हवे आणि तेही सातत्याने.मग तेच लोक आपला फायदा घेत होते आणि हसत होते आता त्यांना फायदा घेण्याची,हसण्याची संधी मिळणार नाही हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड 📲 ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• . *आयुष्यभराची प्रतिष्ठा* महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने तुम्ही कसे काय उभे राहिलात.? कृष्णाने उत्तर दिले. ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले. आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले. *रुक्मिणीने विचारले..* *कोणते पाप.?* कृष्ण म्हणाला. जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे. *रुक्मिणीने विचारले.* *मग कर्णाचे काय.?* कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही. पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले. तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला. *तात्पर्य :-* तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.!! *चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment