✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/09/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक ओझोन संरक्षण दिन* 💥 ठळक घडामोडी :- ●१९६३ - झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक. ●१९६३- मलायाला स्वातंत्र्य.या देशाने मलेशिया हे नाव स्वीकारले. 💥 जन्म :- ◆१९१६ - एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका. ◆ १९४२ - ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार. 💥 मृत्यू :- ●१९८९ - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार. ● १९९४ - जयवंत दळवी, मराठी साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे थांबवावे अन्यथा पाकिस्तानचे तुकडे होणे अटळ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अमरावती ( आंध्रप्रदेश ) :- गोदावरीत पर्यटकांनी भरलेली नाव उलटली ; 11 जणांचा मृत्यू तर 27 जण बेपत्ता, एनडीआरएफचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर 19 सप्टेंबरला शिक्कामोर्तब, नाशिकमधील महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात घोषणेची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस येथील तेल क्षेत्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर सौदी अरेबियाने ५० टक्के अर्थात निम्मं तेल उत्पादन थांबण्याचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *निवडणूक लढवायला सज्ज, जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरे यांचं सूचक विधान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : भारतीय अंडर नाईन्टिन संघानं बांगलादेशवर निसटती मात करुन सातव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा पहिला टी-२० सामना सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीनची audio clip ऐकण्यासाठीखालील लिंक वर क्लीक करावे. https://sharechat.com/post/rgAWllK ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरज तेथे मदत करा* https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_8.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दूरदर्शन* १५ सप्टेंबर ‘दूरदर्शन’ या केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशातील पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा वाढदिवस. १५ सप्टेंबर, १९५९ रोजी एक छोटासा ट्रान्समीटर व स्टुडिओ यांच्या साह्याने दूरदर्शनचे काम चालू झाले. राजधानीत दूरदर्शनची ही मुहूर्तमेढ रोवली जाताना ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा त्यात मोलाचा वाटा होता. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे! पु. लं. देशपांडेनीच "दुरदर्शन" हे नाव सुचवले. दूरदर्शनवरुन बातमीपत्राची नियमित सेवा १९६५ पासून सुरु झाली. १९७२ मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. १९७५ मध्ये चेन्नई, श्रीनगर, अमृतसर व लखनौ या शहरांमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरु झाले. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण अथवा अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सामाजिक शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग भारतात केला गेला. सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलेव्हिजन एक्सपरीमेंटची चाचणी १९७५-७६ या वर्षी घेण्यात आली. याद्वारेच जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रचार घरोघरी करण्यात आला. १९८२ मध्ये दिल्ली आणि अन्य ट्रान्समिटर्स दरम्यान उपग्रहांमार्फ़त प्रसारण सुरु करण्यात आले. १९८२ मध्ये टीव्ही रंगीत झाला. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरचे भाषण देश पाहू लागला आणि ‘नॅशनल ब्रॉडकास्टर’ ही दूरदर्शनची ओळख रुजली. ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या सावलीतून दूरदर्शन बाहेर आले. १९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलीच भाव खावून जायची. हिंदीतल्या बुनियाद, हमलोग, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. अनंत भावे, प्रदीप भिडे, शम्मी नारंग, अविनाश कौर सरीन यांचे आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले वृत्तनिवेदन प्रेक्षकांना भारावणारे असेच होते. गेल्या दोन दशकांत झालेल्या संज्ञापन क्रांतीमुळे दूरदर्शनचा भारतातला एकाधिकार संपत गेला. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?* सिंद्री ( झारखंड ) 2) *मुंग्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?* वारूळ 3) *पक्ष्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?* घरटे 4) *बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ?* मुरलीधर देविदास आमटे 5) *अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय ?* किसन बाबुराव हजारे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● प्रसाद मुतनवाड ● लक्ष्मणराव भवरे ● साईराम पिंगळे ● मंगेश यादव ● संतोषभाई ओझा ● विठ्ठल आढाव ● कृष्णा डाफने *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी वाईट गोष्ट सोबतच असते. माणूस विद्वान तर आहे, पण त्याला धन आणि मानाची अपेक्षा असेल तर? ही अपेक्षाच त्याचा नाश करत असते, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे." अपेक्षेसोबत अपेक्षाभंग असतो, हे पटवून देण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. "आपण ज्या ज्या इच्छा करतो, जेवढ्या अपेक्षा बाळगतो त्या सर्वच्या सर्वच पूर्ण कशा होऊ शकतील? पण माणूस हे समजून घेत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे या आणि अशा अनेक वासना माणसाला शेवटी भीक मागायला लावत असतात." हव्यासापोटी भिकेला लागण्याची वेळ आली तरी माणूस शहाणा होत नाही.* *जुगारात मिळण्याची अपेक्षा सर्व घालवून बसते. राज्यच काय पण बायकोला सुद्धा 'डावात' हरून बसल्याची साक्ष महाभारतासारखे ग्रंथ देतात. संत तुकाराम आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छेतून अपमानित होण्याची वेळ येणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे. "एखाद्या गाढवाचं 'राजहंस' असं अलंकारीक नाव जरी ठेवलं, तरी त्या नावाचं त्या गाढवाला काय भूषण वाटणार आहे?" गाढवाची राजहंस नाव ठेवण्याइतकीसुद्धा पात्रता नसते आणि त्याला त्याचं भूषणही वाटत नसतं.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *छोटा प्रयोग करून बघा,* *कोणत्याही परिस्थितीत विचारांमध्ये* *सकारात्मकता* *ठेवा,प्रसंग कितीही छोटा असुद्या* *आपण मात्र मनाला नकारात्मक* *विचाराचा स्पर्श होऊ देऊ* *नका,आपण अलगद संकटातून बाहेर* *पडतो.* *एक लक्षात ठेवा जहरी विषापेक्षाही* *नकारात्मक विचार* *भयंकर विषारी असतात. *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणत्याही परिस्थितीची जाणीव असलेली व्यक्ती कितीही आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला घाबरत नाही.कारण त्याला माहित असते की,आपण घाबरलो तर समोर असलेली परिस्थिती आपल्या पाठीमागे भूतासारखी मागेच लागते आणि जर नाही घाबरलो तर ती तशीच माघारी फिरते.अशा व्यक्तीला परिस्थितीच जगण्याची जाणीव करून देते आणि त्यातून मार्गही दाखवते.त्यामुळे जीवन जगण्याची आशा पल्लवित करते. ज्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीची जाणीव नाही किंवा कोणतीही त्यातून मार्ग काढण्याची कल्पना नाही अशा व्यक्तीच्या जीवनात कोणतीही परिस्थिती क्षुल्लक असली तरी ती भित्र्या सशासारखीच असते. अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीवर मात करु शकत नाही किंवा जीवनात यशस्वी होऊ शकत नाही.कोणत्या परिस्थितीला कसे आणि कोणत्या प्रकारे तोंड द्यायचे याचे थोडेही ज्ञान अवगत नाही किंवा जाणीवही नाही अशा व्यक्तीकडून कोणताही गुण इतरांना घेण्यासाठी मिळणार नाही.समोर असलेल्या परिस्थितीला निभावून नेण्यासाठी आपल्या मनामध्ये परिस्थितीनुरुप जाणीव निर्माण व्हायला हवी.अशी जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये उपजतच असते फक्त थोडा विचार करायला शिकले पाहिजे.जाणीव ही एक आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी बळ आणि प्रेरणाच देते.त्यामुळे आपल्यातील जाणीवेला नेहमी जीवंत ठेवायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 🥙•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभाची शिक्षा* एक इसम यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे इसमला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. इसमाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' इसमाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले. इसम अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने त्या इसमाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस तात्पर्य – लोभाने माणसाच्या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्यक आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment