✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/09/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षक दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆२००५ - मंडाला एरलाइन्स फ्लाइट ०९१ हे बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील दाट वस्तीच्या भागात कोसळले. विमानातील १०४ व जमीनीवरील ३९ व्यक्ती ठार. 💥 जन्म :- ◆१८८८ - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे दुसरे राष्ट्रपती. ◆१९१० - फिरोझ पालिया, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ●१९९७ - मदर तेरेसा, समाजसेविका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अण्णा हजारे रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर, आण्णा हजारे यांना किमान आठ दिवस संपूर्ण विश्रांतीचा डॉक्टरांनी दिला सल्ला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्यात प्रथमच ऑनलाईन परीक्षा होणार असून या प्रक्रियेत पोलीस शिपाई पदाच्या ३ हजार ४५० जागा भरल्या जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुढील 48 तासांत मराठवाड्यात पावसाचे आगमन तर मुंबई आणि कोकणमध्ये अतिवृष्टीचा, हवामान खात्याचा अंदाज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली, काँग्रेसने त्यांच्या काळात उत्तम काम करून मंदीतून बाहेर काढलं होतं, खासदार संजय राऊतांचा सरकारला घरचा आहेर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लेफ्टनंट अनिल पुरी १ हजार २०० किमी लांब सायकल स्पर्धा ९० तासांत पूर्ण करणारे ठरले पहिले भारतीय, साहस फ्रान्समधील सर्वात जुन्या स्पर्धेत ६० देशांतील ६ हजार ५०० खेळाडूंनी घेतला होता सहभाग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• ऑडिओ ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://b.sharechat.com/EV65u2FRIZ ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षकदिन विशेष लेख* *बदलत्या काळात शिक्षकांची भूमिका* https://bit.ly/2kiaD5G लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *काँक्रिट म्हणजे काय ?* 📙 एखादी चर्चा चालू आहे. विविध सूचना केल्या जात आहेत. त्यावर फक्त चर्चाच होते आहे. पुन्हा सूचना येतात. पुन्हा चर्चा. अशा वेळी कोणीतरी वैतागून म्हणते, 'काहीतरी काँक्रीट घडू द्या ना !' म्हणजेच मूर्त किंवा साकार असे त्याला सुचवायचे असते. एखादी अत्यंत पक्की, नीट साधलेली, एकत्र बांधलेली गोष्ट म्हणजे काँक्रीट. व्यवहारात गेली सत्तर एक वर्षे काँक्रिट म्हणजे सिमेंट काँक्रिटच होय. सिमेंटचा शोध लागून वापर सुरू झाल्यावर त्यापासून विविध मिश्रणे वापरली गेली. सिमेंट व वाळूचे मिश्रण कायम पक्के राहत नाही. सिमेंट व खडी एकमेकांना बांधून राहत नाहीत. पण सिमेंट, बारीक वाळू, जाड वाळू, खडी यांचे मिश्रण करून त्यात योग्य प्रमाणात पाणी घालून कालवले, तर ते हवे तेवढे पक्के होते. अगदी दगडच म्हणा ना ! याला काँक्रिट किंवा शास्त्रीय भाषेत प्लेन सिमेंट काँक्रीट (PCC) म्हणतात. खूप मोठा भार सहन करण्याचा या काँक्रेटचा गुण बघून त्याचा वापर सुरू झाला. रस्ते बनवणे, विमानांच्या धावपट्टय़ा तयार करणे यांसाठी सिमेंट वापर वापरतात व धरणे बांधताना भिंतीसाठी काँक्रिटचे प्रचंड ठोकळेच वापरतात. एवढेच काय, पण समुद्र हटवण्यासाठीसुद्धा काँक्रिटचे मोठे आकाराचे विविध ठोकळे वापरून फुटणाऱ्या लाटांचा जोर त्यावर येईल, अशी व्यवस्था केली जाते. रेल्वेसाठी रूळ टाकताना जमिनीत जे स्लिपर्स आडवे घातले जातात, तेही गेली काही वर्षे काँक्रिटचेच वापरले जातात. एखाद्या पुलाचा पाया वा एखाद्या अतिउंच इमारतीचा पाया खोदून झाला की, प्रथम त्या खड्ड्यांमध्ये जवळपास फूटभर जाडीचे पीसीसीच ओतले जाते. ते पक्के झाले की मग त्यावर पुढचे काम सुरू होते. आपल्या देशात जवळपास न वापरला गेलेला पण अनेक देशांत उपयोगात आणलेला पीसीसीचा एक वापर म्हणजे अणुबाँब स्फोटापासून वाचवण्यासाठी तयार केलेली सुरक्षाघरे. या सुरक्षाघरांच्या भिंती दोन ते तीन फूट जाडीच्या पीसीसीने बनवतात. छतासाठी व पिलर्ससाठी सुद्धा खास रिएन्फोर्स्ड काँक्रीट (म्हणजे सळ्या घालून ताकद वाढवलेले, ताण सोसू शकणारे) वापरलेले असते. या काँक्रिटच्या जाडीतून रेडिओ उत्सर्जन आत पोहोचू शकत नाही. यासारखा दुसरा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे महासत्तांनी तयार केलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्रे व त्यांवर बसवलेले अण्वस्त्रे सुरक्षित ठेवायला तयार केलेली महाप्रचंड तळघरे. यांना 'सिलो' म्हणतात. यांची बांधणीसुद्धा अशीच तीन तीन फूट जाडीच्या काँक्रिटने केलेली असते. शत्रूच्या क्षेपणास्त्रानेसुद्धा विध्वंस होणार नाही, इतकी पक्की रचना या सिलोंची असते. काँक्रिटच्या पक्केपणाचा महिमा हा असा आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ दुसऱ्याला शिकवीत असतांना माणूस स्वतःला शिकवीत असतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'शिक्षक दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 5 सप्टेंबर 2) *शिक्षक दिन कोणाच्या जन्म दिवसानिमित्त साजरा केला जातो ?* डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन 3) *जगात किती देशात शिक्षक दिवस साजरा केला जातो ?* 100 4) *भारतात कोणत्या वर्षी प्रथम शिक्षक दिवस साजरा केला गेला ?* 1962 5) *डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला ?* 5 सप्टेंबर 1888 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सौरभ सुरेश सावंत, नांदेड ● नितीन शिंदे ● रत्नाकर चिखले ● राजकुमार काळे ● रत्नजित पाटील पटारे ● धोंडोपंत मानवतकर ● लक्ष्मीनारायण येरकलवार ● नरेश रेड्डी ● पांडुरंग बोमले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरीब माणसाला घरापासून दूर राहून पोटाच्या चार घासासाठी प्रचंड मरमर करावी लागते. पण पैशावाल्याच्या बाबतीत हे होत नाही. "एका बसल्या ठिकाणी त्याचा व्यापार चालतो. त्याला घर सोडून कुठेही जावं लागत नाही." गरीबाला एका वस्तूसाठी पैशाअभावी कुढत मरावं लागतं. शेवटपर्यंत ती वस्तू मिळेलच असं होतं नाही. पण "श्रीमंताला मात्र पाहिजे असणारी कोणतीही वस्तू रानावनातच काय या पृथ्वीतलावर कुठंही असली तरी पैशाच्या जोरावर मिळवणं सोपं असतं आणि वस्तू कोणतीही असू द्या, कितीही अनमोल असू द्या, कितीही महत्वाची असू द्या, शक्यतो जास्तीचे पैसे देऊन मिळवता येणार नाही, इतकी ती अवघड नसतेच." थोडे जास्त पैसे देऊन अति मौल्यवान वस्तुसुद्धा पैश्यावाल्याला सहज मिळवता येते.* *म्हणून, पैसा माणसाच्या आयुष्यात यासाठी महत्वाचा आहे. पैसा वाईट मार्गाने कमवायचा तर नाहीच, पण चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवून तो वाईट मार्गावर खर्च सुद्धा नाही करायचा. चांगल्या मार्गाने कमावलेला खूप पैसा 'आनंदी आणि सुखकर आयुष्य' जगण्यासाठी खर्च करायचा आहे. पैशाचा लोभ नाही आणि तिरस्कारही नाही. त्याची हाव नको आणि त्याच्याविषयी विरक्ती नको. पैसा कमवताना आनंदाने कमवायचा तसाच तो खर्च करतानासुद्धा जीवनात आनंदच असला पाहिजे. एवढा सुंदर असा 'मध्यम मार्ग' संतानी आपल्याला दिला आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनहो,* *मंजिले उन्हीको मिलती है,* *जिनके सपनोमे जान होती है।* *पंखोसे उडान नही होती,* *होसले बुलंद होने चाहीए।* *तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.* *जीवनात येणारे प्रत्येक उदाहरण* *सोडवण्याचा प्रयत्न करा* *पण एका ठराविक वळणावर ते* *सोडून पण द्या.* *मात्र* *न थांबता मार्ग बदलून ध्येय साध्य* *करण्यासाठी पुढे चालत रहा,भले कितीही अडथळे येवोत. नदीचे ध्यान करा ती* *अडथळे अनेक येऊनही* *समुद्राला मिळाल्याशिवाय राहत* *नाही.* *सूर्याचे ध्यान करा तो रोज* *उगवल्याशिवाय राहत नाही.* *वाऱ्याचे ध्यान करा तो कुणाच्यानेही* *अडवला जात नाही.* *गवताचे ध्यान करा तर कितीही काढून* *टाकले तरी पुन्हा पुन्हा* *उगवते.* *हे सगळं करण्यासाठी स्वतःच्या* *विचारावर, भाषेवर,मनावर विश्वास* *ठेवा.* *प्रगतीचे विचार आणि वैज्ञानिक* *दृष्टिकोन बाळगा.* *अंतिम सत्य तेच आहे, कामात आहे राम नाहीतर आहेच देवाचे धाम।* *फक्त देवच रक्षण करीत असत तर मोठमोठाल्या मंदिरात सी.सी.कॅमेरे* *बसवण्याची वेळ* *कधीच आली नसती.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात.असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत.भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो.जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो.विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते.ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात.आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात.केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्ञानाचा दिवा सतत तेवत ठेवा* द्रोणाचार्य जेंव्हा गुरुकुलामध्ये वर्गात कौरव आणि पांडवांना शिकविण्यासाठी गेले तेंव्हा ते अत्यंत प्रसन्न होते. द्रोणाचार्य स्वतः परम गुरु होते. मात्र त्यांना एका दिव्य ज्ञानाचा अनुभव आला होता. आणि तोच त्यांच्या सर्व अस्तित्वातून अभिव्यक्त होत होता. वर्गात गुरुदेव आल्याबरोबर त्यांनी तोच अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांनी सांगितले कि काल रात्री एक अशी घटना घडली कि, अर्जुन आश्रमात भोजन करीत होता. बाकी विद्यार्थ्यांचे भोजन आटोपले होते. रात्र बरीच झाली होती. अर्जुन एका दिव्याच्या प्रकाशात भोजन करत होता. अचानक हवेची झुळूक आली आणि दिवा विझला. मात्र त्यानंतरही अर्जुन भोजन करत राहिला.अंधारातही त्याला भोजन करण्यास बाधा वाटली नाही. भोजन पूर्ण झाले आणि अर्जुन उठला आणि धनुर्भ्यास करू लागला. गुरुनी पुढे सांगितले, बाणांचा आवाज ऐकून मी बाहेर आलो तेंव्हा अर्जुनाने मला सांगितले कि भोजनादरम्यान मला अंधाराचे काही वाटले नाही तसेच बाण चालवितानाही मला अंधाराचा अडसर आला नाही. बघा गुरुवर्य ! आपल्या कृपेमुळे मला अंधारातही बाण लक्ष्यापर्यंत पोहोचविता येत आहेत. गुरुजी म्हणाले,"अर्जुनाचा हा प्रयत्न अनुकरणीय आहे. दिवा फक्त उजेडाचा प्रसार करतो पण अंधारात मात्र ज्ञानाच्या दिव्याने, हृदयातील आत्मज्योतीने जर सराव केला तर कोणतेच काम अशक्य नाही." तात्पर्य :- सरावानेच माणूस लक्ष्य प्राप्त करू शकतो. एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी, यश प्राप्तीसाठी अंतरीच्या ज्ञान ज्योतीला जागृत करणे गरजेचे आहे.ज्ञानारुपी दिवा नेहमी तेवत ठेवत राहणे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment