✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/09/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१६३३ - पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्या बद्दल गॅलेलियोवर खटला चालवण्यात आला. 💥 जन्म :- ● १८५४ - नारायण गुरु, केरळमधील समाजसुधारक . ●१८९७ - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार. ● १९२१ - पनानमल पंजाबी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ●१९२२ - द. न. गोखले, चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक. ●१९२५ - राम सातवा तथा आनंद माहिडोल, थायलंडचा राजा. ● १९४४ - रमेश सक्सेना, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ १९९६ - दया पवार, मराठी साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *हवामान विभागाकडून आज मुंबईसह परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी; समु्द्रात 3.85 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता, मुसळधार पावसामुळे मुंबईसह आसपासच्या शहरांतील शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं स्वदेशी 'तेजस' विमानातून उड्डाण, तेजसमधून भरारी घेणारे पहिले संरक्षणमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई महापालिका कर्मचार्यांना खुशखबर, दिवाळीआधीच बोनस मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *परळी-वैद्यनाथ देवस्थानचा रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळांच्या यादीत समावेश, रेल्वे मंत्रालयाचं मुंडे भगिनींना पत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राजू शेट्टी विधानसभा निवडणूक लढवणार, शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा घटक पक्षांचा आग्रह* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *एअर मार्शल आरकेएस भदौरिया असतील भारताचे नवीन एअर चीफ मार्शल, बीएस धनोओ 30 सप्टेंबरला होत आहेत निवृत्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मोहाली : क्रिकेटपटू विराट कोहलीच्या खणखणीत अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने मोहालीच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीनची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे https://sharechat.com/post/d0W3GwE ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उद्याची काळजी आज कशाला* https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_8.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *जायरोस्कोप म्हणजे काय ?* 📙 होकायंत्र ज्यावेळी स्थिर राहू शकत नाही, हेलकावे, वळणे, हिंदकळणे यांमुळे त्याचा लोहचुंबक दिशा नीट दाखवायला जेव्हा असमर्थ ठरू लागतो, त्या वेळी जाइरोस्कोप वापरावा लागतो. जमिनीला समांतर स्वरूपात होकायंत्र स्थिर असेल, तेव्हा त्यावरून नेमकी दिशा ज्ञात करून घेता येते. पण पाण्यावर जेव्हा एखादे जहाज वादळात सापडून सतत हेलकावू लागते, तेव्हा आपण पकडलेली दिशा कोणती, असा प्रश्न उद्भवतो. अशीच काहीशी स्थिती विमानात येते. जायरोस्कोप म्हणजे एक जड, स्वतःभोवती फिरणारे चक्रच असते. एका विशिष्ट अक्षाभोवती हे चक्र अत्यंत वेगाने फिरू शकते. या अक्षाची दिशा त्याभोवती असलेल्या मोजपट्टीवर पाहिजे त्या ठिकाणी स्थिर करून मग हे चक्र फिरवायला सुरुवात करतात. थोडक्यात म्हणजे होकायंत्रावरून प्रवासाचे अक्षांश रेखांश पक्के ठरले की सुकाणूची दिशा पकडण्यासाठी जायरोस्कोप स्थिर करून त्याचे चक्र फिरवायला सुरुवात केली जाते. एकदा का चक्र वेगाने फिरू लागले की, याची दिशा हलवणे व त्याचा फिरणारा चक्राचा पृष्ठभाग अक्ष बदलून फिरणे ही जवळपास न होणारी गोष्ट बनते. चक्राने घेतलेला स्वतः भोवतीचा वेग केंद्रीभूत होऊन अशी काही अक्षाभोवती पकड घेतो की ती पकड हलणे व्यवहारत: अशक्य असते. यालाच जायरोस्कोपिक इनर्शिया' किंवा 'जडत्व' असे म्हणतात. यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे चक्राचा फिरण्याचा वेग अबाधित राखणे. हा वेग जर काही कारणाने कमी होऊ लागला, तर मात्र ज्या आधारावर जायरोस्कोप उभा केलेला, आधारलेला असतो, त्यालाच तो संथपणे गोलाकार फेरी घालू लागतो. जायरोस्कोपचा वापर होकायंत्राच्या जोडीला सर्व प्रकारच्या लांब पल्ल्याच्या जल व हवेतील प्रवासासाठी केला जातो. होकायंत्र वाचणे व त्याचा वापर करणे हे तल्लख खलाशाचे व अधिकाऱ्याचे काम; पण या ऐवजी जाइरोस्कोप दाखवेल ती दिशा पकडणे ही मात्र कोणाही माणसाला जमणारी गोष्ट असू शकते. हाही महत्त्वाचा उपयोग नाही काय ? अंतराळ प्रवासात होकायंत्र बिनकामी ठरते; पण जाइरोस्कोप वापरता येतो. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते ?* वटवृक्ष 2) *भावी पिढीचा शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?* शिक्षक 3) *'खेड्याकडे चला' अशी हाक कोणी दिली ?* महात्मा गांधी 4) *ऑलिम्पिक ध्वज सर्वात प्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आले ?* 1920 ( बेल्जियम ) 5) *1 एकर म्हणजे किती आर ?* 40 आर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● जिग्नेश क्रांती बुद्धेवार ( सिम्बॅा ) ● शीतल प्रभू ● पांडुरंग कोकरे ● धम्मकीर्ती कांबळे ● संगीता देशमुख, वसमत ● उमेश वडजे पाटील ● गणेश भोसले ● सुरेश जमपंनगिरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एखादा रिक्षावाला प्रवाशाची चुकून राहिलेली सोन्या-नाण्यांची थैली घर शोधत त्याच्या घरी पोहचवून देतो, आणि मोबदल्यात बक्षिसी नाकारतो. ही प्रामाणिकता थक्क करते! जगण्यासाठी ज्यांचा संघर्ष असतो...आपल्या पायावर जे धड उभेही नसतात, अशा लोकांचे देणारे हात मागे येत नाहीत. कारण माणुसकीवरील त्यांची निष्ठा कुठल्या अपेक्षांची मोहताज नसते. वाट्याला अंधार असला तरी हे लोक उजेड वाटत राहतात जगाला. लौकिक अर्थाचं यश त्यांच्याकडे नसतं, पण त्यांचं निर्मळ जगणं अंतर्मुख करतं माणसाला. फाटक्या आयुष्याला ठिगळ लावत राहयची आणि मूल्य जपत राहायची, हा त्यांचा जीवनधर्म असतो. चांगुलपणाची व सत्याची प्रेरणा देणा-या अशा घटना अंत:करणाचे डोळे करून बघायच्या असतात.* *'सच काम किया जग मे जिसने, उसने प्रभुनाम लिया न लिया' असं राष्ट्रसंत तुकडोजींनी सांगितलं. पण आपण उलट जगतो. 'प्रभुनाम लिया जग मे जिसने, उसने सच काम किया न किया' ही आपली धार्मिकता असते. आपले भक्तीचे, प्रतिष्ठेचे शिक्षक विचित्र असतात. आपल्या पायांवर उभं रहाताना ज्यांचे पाय थरथरतात आणि तरीही समाजाला जे इमान देतात, त्यांच्या दातृत्वाच्या हातांना आपणही कृतज्ञतेची फुलं दिली तर? असं लहान होऊन... हाताला हात देऊन निरपेक्ष जगता आलं तर आपसुकच जगणं सुगंधित होते. किती अनोखा आहे माणूस !* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *माणूस पेरायला शिकलं पाहिजे.* *ऊबंटू चित्रपटात खूप छान प्रार्थना* *आहे.* *हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे* *मागणे.* *माणसाने माणसाशी माणसासम* *वागणे।* *बहिणाबाई म्हणतात , अरे माणसा* *माणसा कधी होशील* *माणूस।* *माणसाचा असा कसा झाला रे* *कानुस।* *माणसा इथे मी तुझे गीत गावे।* *असे गीत गावे तुझे हिट व्हावे।* *माणूस घडविणे आणि जपणे फार* *महत्वाचे आहे.* *खरचं काही माणसं आपल्या* *आयुष्यात नशिबाने येतात . आणि* *यासारखी श्रीमंतीही नाही.* *मोगऱ्याच फूल ओंजळीत* *घेतलं की त्याचा गंध* *मनाला, शरीराला प्रसन्न करून* *जातो.. सहवासातील माणसाचं* *देखील असंच असतं... काही माणसं काही क्षणातच मनाला खूप* *आवडतात...आपली होऊन* *जातात ...तर काही कितीही* *सहवासात राहिली तरी* *आतून ओढ नसतेच...* *चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून* *बघावं ...शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल तर त्याच सुंदर* *दिसनही मग ओंगळवाणे वाटतं.... शरीराची* *सुंदरता वया बरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून* *राहते...शरीराला वय असतं ....मनाला ते कधीच नसतं...शेवटी काय आपण* *व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो... शरीर तर निमित्त मात्र* *असतं... माणसाच्या स्वभावात गोडवा, शालिनता,प्रामाणिकपणा* *आणि विनयशिलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी* *ती हवीहवीशी वाटते... म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची* *सुंदर आरास असूनही देवघरातील समईच्या तेजापुढं आपण* *नतमस्तक होतो...आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर* *त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!* *आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं ही* *आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई... ती प्रत्येकाच्या वाट्याला* *येतेच असं नाही...माणुस टिकवण आपल्या हातात असतं काही क्षणिक* *सुखासाठी नातं विसरतात .काही विश्वास गमावून* *बसतात . काही केसाने गळा कापायला मागे पुढे पहात* *नाही .शेवटी पश्चाताप च हाती येणार हे विधिलिखित आहे माझं काय किंवा* *कोणाचेही फक्त जो माणुस तुम्हाला समजला जो तुमच्या* *वर खुप निष्ठा ठेवून प्रेम करतो त्याचा तिरस्कार करु* *नका .कारण तो प्रत्येक वळणावर तुम्हाला भेटणार आहे. मग अशा* *माणसाप्रती भळभळणाऱ्या जखमाचे घाव देऊ नका. पण आजकाल अशी* *माणसं भेटतात तरी कुठे ? नशिबानं कधी भेटलीच* *तर हळुवार जतन करून ठेवावीत.... कदाचित पुन्हा भेटतील न* *भेटतील ?* *मला माणूस हवाय,मला माणूस* *हवाय।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९० 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरी आई कि खोटी आई* एका आठ वर्षाच्या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्या संगोपनात काही अडचण येऊ नये म्हणून वडील दुसरे लग्न करून त्या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते?तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे? म्हणून पुन्हा त्या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्यासाठी उन्हातान्हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्वत:च्या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्हाला? गेल्या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्हणूनच मी तिला खरी आई असे म्हणत आहे.'' तात्पर्य :- आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment