✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/09/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆२००७ - ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा युवराज सिंग पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले. 💥 जन्म :- ◆१८६७ - पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, मराठी चित्रकार, वेदाभ्यासक. 💥 मृत्यू :- "●१९३६ - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीतज्ञ. ●२००१ - अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक. ●२००२ - प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री . ● २००७ - दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : येणाऱ्या विधानसभेची निवडणूक ईव्हीएम मशीनवर होणार असून बॅलेट पेपर आता इतिहास जमा होताहेत, असं मत देशाचे मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारताच्या नियंत्रणाखाली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं मोठं विधान, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकलाही खडेबोल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार, हवामान खात्याचा अंदाज, येत्या 48 तासात मुंबईसह पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *17 नोव्हेंबरला सरन्यायधीशांच्या निवृत्तीपूर्वी अयोध्या प्रकरणी निकाली काढण्याचे सुप्रीम कोर्टाचे संकेत, वकिलांना महत्त्वाच्या सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नांदेड, औरंगाबादेत खासगी कोचिंग क्लासेसवर आयकर विभागाच्या धाडी; कर चुकवल्याचा संशय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली: देशातील ११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना या वर्षी ७८ दिवसांचे वेतन बोनस म्हणून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताची दक्षिण आफ्रिकेवर सात विकेटनी मात, कर्णधार विराट कोहलीचे शानदार अर्धशतक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ या बुलेटीनची audioclip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://sharechat.com/post/n1P5Oqa ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परावलंबी जीवन* https://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_28.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *जाडेपणा म्हणजे नेमके काय ?* 📙 शरीरातील चरबीचे प्रमाण नको एवढे वाढत गेले, तर जाडी व वजन वाढते. चरबी प्रत्येकाच्या शरीरात असतेच, पण तिचे सर्व शरीरभर योग्य त्या पद्धतीत विवरण करण्याची व्यवस्था निसर्गानेच केलेली असते. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त खाऊ लागतो, तेव्हा ही व्यवस्था बिघडायला सुरुवात होते. खाण्यात आलेल्या अन्नातून उष्मांक मिळतात. हे उष्मांक जेव्हा रोजच्या रोज खर्च होत नाहीत, तेव्हा शरीर ते साठवू लागते. ही साठवण्याची शरीराची पद्धत म्हणजे चरबीचा साठा वाढवणे. पोटावर, मांड्यांमधील जागेत, नितंबांवरील व हातांच्या दंडामागील भागात प्रथम चरबी साठू लागते. पुरुषांमध्ये जाड माणसाला सफरचंदाचा, तर स्त्रियांमध्ये पीअर या फळाचा आकार प्राप्त होऊ लागतो. सर्वसाधारण आकडेवारीनुसार उंची, वय व वजन यांचे जेवढे प्रमाण असायला हवे, त्यापेक्षा वजन जास्त असेल, तर माणूस जात आहे, त्याने चरबी साठवायला सुरुवात केली आहे, असे समजावे. याखेरीज कातडीमधील चरबीचा साठा रास्त व जास्त आहे, हे ठरवण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे चिमटेही मिळतात. या बाबतीत सोपा घरगुती अंदाज म्हणजे दंडामागील कातडी छोट्या चिमटीत पकडता आली तर चरबीचा साठा रास्त व न आली तर जास्त, असे समजावे ! प्रत्येक प्राण्यामध्ये चरबीचा साठा करणे व वापरणे यांवर निसर्ग नियंत्रण ठेवतो. पण माणूस त्याच्या अति खाण्याने व ऐदी वागणुकीने हे नियंत्रण झुगारू पाहतो. साखर, लोणी व मोटार वाहन वापर यांमुळे मानवाने स्वतःचे संतुलन घालवले आहे, असे डॉक्टर मंडळी म्हणतात. वाहनांमुळे हालचाल संपली, साखरेने नको असलेले उष्मांक पोटात वाढू लागले, तर लोण्यामुळे चक्क चरबीच पोटात वाढू लागली. विसाव्या शतकात जाड माणसांचे प्रमाण व त्यातून उद्भवणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. जाड माणसाला जास्त घाम येतो. घामाला वास येत राहतो. थकवा जाणवतो, धाप लागते, जास्त तहान लागते, सतत खावेसे वाटते, खाऊनही समाधान होत नाही. या साध्या साध्या लक्षणानंतरही लक्ष दिले नाही, तर हळूहळू जाड माणसाच्या शरीरात मधुमेह, रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे विकार व त्यांतूनच उद्भवणारा हृदयविकार यांचा शिरकाव होतो. वजन जास्त वाढल्याने सांध्यांची झीज होत जाऊन सांधेदुखी, तर पायांतील रक्तवाहिन्यांना शिथिलपणा आल्याने पायांत रक्त साचून पाय दुखणे, सूज येणे सुरू होते. जाड माणसे अपघाताला जास्त निमंत्रण देतात. रस्ता ओलांडताना अचानक आलेले वाहन धडकणे, जिन्यावर तोल न सावरता येणे यांतून हे अपघात घडतात. पूर्ण उपवासाने जाडी कमी करणे हे सोपे आहे. पण कमी केलेली जाडी तशीच टिकवणे हे मात्र अत्यंत कठीण काम आहे. एका आकडेवारीनुसार जाडी कमी केलेल्यांतील जेमतेम ५ टक्के लोकच ती तशीच टिकवण्यात यशस्वी होतात. एकंदरीत खाण्यापिण्याच्या पद्धतीत व जीवनपद्धतीत अत्यंत नियमितपणा आणून सुयोग्य व्यायाम केला, तरच जाडी आटोक्यात राहू शकते. स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर, विद्यार्थ्यांत बैठे काम सुरू झाल्यावर, मध्यम वयात म्हणजे चाळीस ते पन्नास या दरम्यान वजन वाढू लागते. नियमित व्यायाम केल्यास आणि तेलकट, तळकट व गोड खाणे मोजकेच ठेवल्यास जाड होण्याची भीती बाळगायची गरज नाही. हजारभर जाड माणसात एखाद्याचीच जाडी अनुवांशिक असते. ती आटोक्यात आणणे मात्र डॉक्टरांनाच शक्य असते. पण उरलेले सर्वजण मात्र 'हे कोणालाच शक्य नाही', अशा समजुतीत वावरतात. जगातील सर्वात जाड इसम 'जॉन मुनाॅक' याचे वजन होते सहाशे पस्तीस किलोग्रॅम. १९८३ साली त्याचे जेमतेम बेचाळीसाव्या वर्षी निधन झाले. हा विक्रम आजही अबाधित आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताची राष्ट्रीय लिपी कोणती ?* देवनागरी 2) *भारताचा जगप्रसिद्ध बुद्धीबळपटू कोण ?* विश्वनाथन आनंद 3) *1 टन म्हणजे किती क्विंटल ?* 10 क्विंटल 4) *पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी झाल्या ?* इ स 1896 5) *आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा मुख्यालय कोठे आहे ?* लुसाने ( स्वित्झर्लंड ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुरज आर बोम्मावार ● ठाकूर रविंदसिंह परिहार ● अभय कुळकजाईकर ● प्रवीण साधू ● आनंद पाटील, नाशिक ● मनीष बिरादार ● सचिन कौठवाड ● तृषा गंगाधर तिपनोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] ~~~~~~~~~~~~~~~~~~~ या समुहात join होण्यासाठी खालील लिंकद्वारे join होता येईल. https://chat.whatsapp.com/DaK0QvLfzbe6E1coFTHAsC •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक भिकारी आयुष्यभर भीक मागत राहिला. भीक मागून मागून जमा करत राहिला. हे नाही ते नाही करत करत आधिक मागत राहिला. देवाला त्याची दया यायची. त्याने कधी कोणाला आयुष्यात काही दिले नाही तर त्याला आनंद व समाधान कसे मिळणार? देवही चिंतेत पडला. देण्याचा आनंद काय असतो हे प्रत्यक्ष समजावून सांगण्यासाठी देवच एक दिवस भिका-याच्या दारावर भीक मागायला उभा राहिला. त्याने आरोळी ठोकली. 'देssरे बाssबाss भिका-याला काहीतरी.' भिका-याच्याच घरी भीक मागायला भिकारी? त्याने कानाडोळा केला, नंतर त्याला समजावण्याचा व धमकावण्याचाही प्रयत्न केला. पण दारावरचा भिकारी हटला नाही. देssरे बाssबा च्या आरोळ्या काही थांबत नव्हत्या.* *भिका-याचीही भीक मागायला निघायची वेळ झालेली. परंतु दारावरचा भिकारी हटायला तयार नव्हता. त्यापासून सुटका व्हावी म्हणून शेवटी भीक मागून जमा केलेल्या धान्याच्या ढिगातील एक दाणा उचलून तो भिका-याच्या कटो-यात टाकतो. एक दाणा का होईना भीक मिळाली म्हणून दारातील भिकारी निघून जातो. एक दाणा कमी झाला म्हणून भिकारी हळहळत ढिगा-याकडे बघतो. ढिगा-यावर काहीतरी चमकत आहे हे पाहून तो जवळ जातो. ती चमकणारी वस्तू सोन्याचा दाणा असतो. भीक दिलेला ढिगावरचा एक दाणा कमी न होता सोन्याचा झाला. संपूर्ण धान्याचा ढिगच भिका-याच्या कटो-यात टाकला असता तर..? आता भिका-याने संपूर्ण आयुष्यच देऊन टाकले आहे. पण माझ्यातल्या भिका-याचे काय? त्याला कळले आहे पण अजूनही 'वळले' मात्र नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *कर्तृत्ववान माणसाचे लक्षण वर्णन* *करतांना मंगेश* *पाडगावकरांनी खूप छान लिहिलं* *आहे,* *ते म्हणतात,* *आयुष्य विधात्याच्या वहीतलं पान* *असत।* *रिकामं तर रिकामं ,लिहिलं तर छान* *असत।* *शेवटचं पान मृत्यू अन पहिलं पान* *जन्म असत।* *पाने आपणच भरायची, कारण ते* *आपलंच कर्म असत।* *हे करत असतांना काही माणसं* *कोल्ह्याला द्राक्ष आंबट सारखी* *वागतात, पण प्रत्यक्षात वास्तव मात्र वेगळं असत. आपल्याला शरीरूपी* *मिळालेल्या अनमोल देणगीचा वापर जर खुबीने केला तर* *कोळश्याच्या खाणीतूनही हिरा जन्माला आल्याशिवाय राहत नाही.* *दाखलाच द्यायचा झाला तर मी बालाजी मंजुळे यांचा देईन.*नागराज तर सगळ्यांनाच सैराट ने माहीत केला,पण त्यांच्याच घरातला भाऊबंधकीतला बालाजी .दगडफोडी जमात, आईवडील दगड फोडणारे, सतत भटकंती,* *भाऊबहीणी,खाणारी तोंड जास्त, कमवणारी कमी सगळं* *बिऱ्हाड पाठीवर, कधी कौतुक झालं तरी गर्व झाला* *नाही. अनेक वेळेस अपमानाची वेळ आली पण राग नावाची चीज* *नाही. राग आलाच तर दोन घाव दगडावर जास्त पडायचे पण कुणाला* *उलट बोलणे नाही. परिणाम* *काय झाला.* " *जैसा बोया वैसा पाया"* *सुसंस्कृत ,मेहनती संततीची पेरणी केली. बालाजीला डावा डोळा* *नाही,उजव्या डोळ्याने 15 % * *दिसते,अठराविश्व दारिद्र्य,* *अज्ञान, तरीही ध्येय आणि स्वप्न साकार केले.2008 ची बॅच, देशात* *राज्यशास्रात पहिला, महाराष्ट्रात 8 व्या रँकने पठ्ठा* *आय.ए. एस.झाला,अख्खा तामिळनाडू डोक्यावर घेऊन* *नाचतोय.* *रडणे सोडावे,लढणे शिकावे ,बस* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुखदु:खाच्या सागरातून जीवनरुपी नौका जो मानव चांगल्या प्रकारे जो चालवतो आणि तरुन जातो त्यालाच जीवन म्हणजे काय हे नक्कीच कळलेले असते.अशा सुंदर जीवनाला अधिक सुंदर कसे बनवता येईल त्यासाठी जो सुखातही आणि दु:खातही निरंतर प्रयत्न करतो आणि सुखदुःखाला समान मानतो तोच जीवनात यशस्वी होतो. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०. 🚣🏼♀🚣🏻🚣🏼♀🚣🏻🚣🏼♀🚣🏻🚣🏼♀🚣🏻🚣🏼♀ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति तेथे माती* एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' आणि मला तसे आवडणार नाही. त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला. *तात्पर्यः कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment